* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172091
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS MAN GLANCED OVER THE SPACE, HIS CURIOUS MIND INSPIRED HIM TO REACH AND TRAVEL THROUGH THE SPACE. THIS INEVITABLY GAVE RISE TO A NEW ERA, THAT OF SCIENCE AND TECHNOLOGY, A MIRACLE FOREVER. THE PATH FOR THE SAME WAS ALREADY CREATED BY GREAT GENIUS MINDS LIKE COPERNICUS, GALILEO, NEWTON, EINSTEIN AND A FEW OTHERS. THE MID OF THE 20TH CENTURY SAW THIS JOURNEY REACHING ITS HEIGHTS. POST SECOND WORLD WAR, THE COLD WAR BETWEEN THE TWO SUPER POWERS- AMERICA AND SOVIET UNION INTENSIFIED THEIR EFFORTS TO SHOW THEIR COMMAND OVER EVERY AREA INCLUDING SPACE. IT IS VERY DISTURBING TO KNOW THAT DURING HITLER’S NAZI REIGN, THE TECHNOLOGY NEEDED FOR SPACE INVASION WAS DEVELOPED. THE SAID STORY ‘ANTARAL SPARDHA’ – COMPETITION FOR THE SPACE HELPS US TO SOAR HIGH, UP ABOVE THE SKY, REVEALING THE WONDERFUL ‘ANOTHER WORLD’ RIGHT OUT THERE. FAUN BROWN AND KORELIYOVH WERE THE TWO EXTREMELY TALENTED AND PERSUASIVE TECHNICIAN WHO GOT THE GOLDEN OPPORTUNITY TO BE THE PIONEERS OF THIS JOURNEY TO SPACE. THIS STORY SALUTES THEM WHILE THE READERS ENJOY THE EXPEDITION.
अंतराळाकडे कुतूहलानं बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असं वाटायला लागलं आणि एक नवं युग सुरू झालं. यासाठीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच अद्भुत आहे. या सगळ्याची निर्मिती कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन यांच्यासारख्या महामानवांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालल्यामुळे साध्य झाली असली तरी तिचा कळस विसाव्या शतकाच्या मध्यावर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महासत्तांमध्ये एकमेकांवर हरप्रकारे कुरघोडी करण्यासाठीची रस्सीखेच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकमत गाजवण्याचा होता. कहर म्हणजे हिटलरच्या नाझी राजवटीत यासाठीच्या तंत्रज्ञानाची पाळंमुळं रचली गेली, हे ऐकून आपण सर्दच होऊ. अंतराळामध्ये प्रथम जाण्यासंबंधीच्या या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक, भारावून सोडणारी आणि वेगळ्याच विश्वात नेणारी कहाणी म्हणजे `अंतराळ स्पर्धा`! फॉन ब्राऊन आणि कोरेलियॉव्ह हे दोघे विलक्षण हुशार आणि अफाट जिद्दीचे तंत्रज्ञ या शर्यतीमधले मुख्य प्रवासी ठरले. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणारी ही रंजक सफर खास मराठी वाचकांसाठी!
1.अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघामार्फत दिला जाणारा साल 2019चा विज्ञानविषयक साहित्यातील प्रथम पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अंतराळ स्पर्धा#अतुल कहाते# #ANTARAL SPARDHA#ATUL KAHATE#
Customer Reviews
  • Rating StarDainik Samana 4 Aug.2019

    दोन अंतराळशास्त्रज्ञांच्या जिद्दीचं आणि तंत्रज्ञानाचं व्यापक दर्शन आता अंतराळात जाण्यासाठीचं तंत्रज्ञान पुष्कळ अद्ययावत झालं आहे; पण सुरुवातीला अंतराळात उपग्रह आणि मानवाला पाठविण्यासाठी शास्त्रज्ञांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शास्त्रज्ञांचया त्या अथक परिश्रमांचं सखोल चित्रण अतुल कहाते यांनी त्यांच्या ‘अंतराळ स्पर्धा’ या पुस्तकातून केलं आहे. रॉकेटनिर्मितीचं तंत्रज्ञान, त्याची उपयुक्तता, रॉकेटनिर्मितीच्या बाबतीत आणि त्याद्वारे मानवाला, उपग्रहाला अंतराळात पाठविण्याच्या बाबतीत सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेमध्ये लागलेली चढाओढ, केवळ राजकीय चढाओढीसाठी काम न करता प्रचंड ध्येयासक्तीतून रॉकेटनिर्मितीमध्ये विविध प्रयोग करणारा रशियाचा कोरेलियॉव्ह आणि मूळ जर्मन असणारा, पण अमेरिकेसाठी काम करणारा फॉन ब्राऊन यांचं रॉकेटनिर्मितीच्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदान आणि त्यांना करावा लागलेला पराकोटीचा संघर्ष, अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना या सगळ्याचं व्यापक दर्शन कहाते या पुस्तकातून घडवतात. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जॉन फाऊलरवर जर्मनीसाठी रॉकेटनिर्मिती करण्याची जबाबदारी हिटलरने सोपवलेली असते. रॉकेटद्वारे शत्रूच्या प्रदेशावर बॉम्ब टाकणे किंवा क्षेपणास्त्र डागणे याच उद्देशाने ही रॉकेटनिर्मिती करायची असते; पण केवळ युद्धासाठी रॉकेटनिर्मिती न करता रॉकेट अंतराळात पाठविण्याची फाऊलरची महत्त्वाकांक्षा असते; मात्र त्यासाठी राजकीय वातावरण अनुकूल नसतं. दरम्यान, ही रॉकेटनिर्मिती सुरू असतानाच हिटलरचा मृत्यू होतो आणि जर्मनीत प्रचंड अस्थैर्य निर्माण होतं. रॉकेटनिर्मितीचं तंत्रज्ञान शत्रूराष्ट्रांच्या हातात पडू न देण्यासाठी नाझी सैनिक आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना ठार मारतील, अशी भीती फाऊलरला वाटते. मोठ्या शिताफीने तो स्वत:ची आणि सहकाऱ्यांची एस. एस. संघटनेच्या तावडीतून सुटका करून घेतो आणि अमेरिकेला शरण जातो. सुरुवातीला अमेरिकेचा विश्वास संपादन करण्यात फाऊलरचा बराच वेळ जातो. शेवटी एकदाची त्याच्यावर रॉकेटनिर्मितीची जबाबदारी सोपविण्यात येते; मात्र अमेरिकेलाही फक्त युद्धासाठीच रॉकेटचा वापर करायचा असतो; पण फाऊलर मनोमन रॉकेट अंतराळात सोडण्याचं स्वप्न बाळगून असतो. इकडे रशियामध्ये सर्गई पावलोविच कोरेलियॉव्ह या रॉकेटशास्त्रज्ञाला, क्रूरकर्मा म्हणून प्रसिद्ध असलेला राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन देशद्रोहाच्या तथाकथित आरोपावरून छळछावणीत डांबतो. कोरेलियॉव्हलाही अंतराळात रॉकेट पाठविण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते; पण छळछावणीत त्याच्यावर इतके अनन्वित अत्याचार होत असतात, की त्याने जगण्याची आशा सोडलेली असते; पण अनपेक्षितपणे त्याची त्या छळछावणीतून सुटका होते आणि त्याच्यावर रॉकेटनिर्मितीची जबाबदारी सोपविण्यात येते. अर्थातच रशियाचा रॉकेटनिर्मितीचा उद्देशही फक्त युद्धापुरताच मर्यादित असतो आणि कोरेलियॉव्ह तरीही अंतराळात रॉकेट पाठविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असतो. कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांनी रॉकेटनिर्मितीनंतर ते अंतराळात पाठविण्यासाठी घेतलेल्या विविध चाचण्यांचं आणि त्या दोघांच्याही कर्तृत्वाचं, त्यांच्या भावनिक आंदोलनांचं समांतर चित्रण कहाते यांनी केलं आहे. यातील कोरेलियॉव्हचं प्रसिद्धिपराङ्मुख राहून आपल्या कामाला तन-मन-धनाने वाहून घेणं मनाला स्पर्श करणारं आणि प्रेरणा देणारंही आहे. त्याचबरोबर जॉन फाऊलरचं कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, आपल्या महत्त्वाकांक्षेला चिकटून राहणंही स्फूर्ती देणारं आहे. मानवाला चंद्रावर पाठविण्याचं कोरेलियॉव्हचं स्वप्न त्याच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहणं, त्याच्या जिवंतपणी त्याचं कर्तृत्व जगासमोर न आणलं जाणं आणि त्याच्या मृत्यूनंतर ते कर्तृत्व जगासमोर आल्यावर लाखो लाकोंनी त्याचं अंत्यदर्शन घेणं या बाबी मन हेलावून टाकतात. कोरेलियॉव्हचं पत्नीपासून विभक्त होणं, मुलीपासून दूर राहावं लागणं, नंतर अनेक वर्षांनी मुलीला भेटल्यानंतर मुलीने त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारणं, नीनावर त्याचं प्रेम जडणं आणि तिच्याशी त्याने लग्न करणं या त्याच्या वैयक्तिक जीवनातील घटनांमधून एक माणूस म्हणूनही त्याचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांनी रॉकेटच्या घेतलेल्या विविध चाचण्या, अंतराळवीरांच्या अंतराळात पोचल्यानंतरच्या भावना, चाचण्या घेताना आणि अंतराळवीर अंतराळातून परत येईपर्यंतची अंतराळशास्त्रज्ञाची मन:स्थिती, अंतराळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर अंतराळशास्त्रज्ञाला होणारा मनस्वी आनंद या सगळ्याचं वर्णन वाचणं हा एक रोमांचकारी अनुभव ठरतो. चाचण्यांदरम्यान काही अतराळवीरांचा, चाचणीसाठी अंतराळात पाठवलेल्या कुत्र्यांचा झालेला मृत्यू, या घटना वाचकाला विषण्ण करतात. तसेच अंतराळवीरांना अंतराळात पाठविताना करावी लागणारी तयारी, अंतराळवीरांना तोंड द्याव्या लागणाऱ्या मुख्य अडचणी, अंतराळवीरांना दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करायला लागणं, अंतराळात संभाव्य समस्यांपेक्षा अन्य काही समस्या उद्भवल्या तर अंतराळवीराला दाखवावं लागणारं धाडस आणि प्रसंगावधान याबद्दल वाचताना या कामातील जोखीम आणि जीवन-मृत्यूच्या सीमेवर असताना सेकंदासेकंदाला असणारं महत्त्व लक्षात येतं. अस्थिर राजकीय परिाqस्थतीमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे, अहंकारामुळे कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांच्यासारख्या प्रतिभावंतांची कशी गळचेपी होते, याचं विदारक दर्शन या पुस्तकातून घडतं. रॉकेटसंबंधित तंत्रज्ञानाचं अगदी सोप्या भाषेत विवेचन केल्यामुळे आणि त्याला जॉन फाऊलर आणि कोरेलियॉव्ह या दोघांच्या प्रेरणादायक यशोगाथेची साथ मिळाल्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक आणि वाचनीय झालं आहे. शिवाय तंत्रज्ञान हा वर्ण्य विषय असूनही मानवातील कौर्य, द्वेष, सूडभावना आणि त्याच्या हळुवार भावभावना याचं संमिश्र चित्र अतिशय सहजतेनं या पुस्तकातून उमटत जातं आणि माणसाचं मन आणि बुद्धी या दोहोंनाही आवाहन करतं. म्हणूनच ते मुळातून वाचावं असं आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK DIVYA MARATHI 26-05-2019

    आता अंतराळात जाण्यासाठीचं तंत्रज्ञान पुष्कळ अद्ययावत झालं आहे; पण सुरुवातीला अंतराळात उपग्रह आणि मानवाला पाठविण्यासाठी शास्त्रज्ञांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शास्त्रज्ञांच्या त्या अथक परिश्रमांचं सखोल चित्रण अतुल कहाते यांनी त्यांच्या ‘अंतरा स्पर्धा’ या पुस्तकातून केलं आहे. रॉकेटनिर्मितीचं तंत्रज्ञान, त्याची उपयुक्तता, रॉकेटनिर्मितीच्या बाबतीत आणि त्याद्वारे मानवाला, उपग्रहाला अंतराळात पाठविण्याच्या बाबतीत सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेमध्ये लागलेली चढाओढ, केवळ राजकीय चढाओढीसाठी काम न करता प्रचंड ध्येयासक्तीतून रॉकेटनिर्मितीमध्ये विविध प्रयोग करणारा रशियाचा कोरेलियॉव्ह आणि मूळ जर्मन असणारा, पण अमेरिकेसाठी काम करणारा फॉन ब्राऊन यांचं रॉकेटनिर्मितीच्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदान आणि त्यांना करावा लागलेला पराकोटीचा संघर्ष, अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना या सगळ्याचं व्यापक दर्शन कहाते या पुस्तकातून घडवतात. रॉकेटसंबंधित तंत्रज्ञानाचं अगदी सोप्या भाषेत विवेचन केल्यामुळे आणि त्याला जॉन फाऊलर आणि कोरेलियॉव्ह या दोघांच्या प्रेरणादायक यशोगाथेची साथ मिळाल्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक आणि वाचनीय झालं आहे. ...Read more

  • Rating Starशिरीष भोसले, सांगली

    नुकतेच आपले अंतराळ स्पर्धा पुस्तक झपाट्याने वाचून काढले,आपल्या आधीच्या पुस्तकां प्रमाणेच हेही पुस्तक अगदी सुंदर लिहिलं गेलेले आहे,आपण ज्या पध्दतीने मांडणी केलीत ती वाचताना थक्क व्हायला होते, अशीच नवीन पुस्तके आम्हास वाचायला मिळावोत, आणि नवीन विषय आपाकडून लिहला जावो हीच आपणास शुभेच्छा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 14-04-2019

    अंतराळविश्वात नेणारी कहाणी... दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांमध्ये सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर परस्परांवर कुरघोडी करण्याची त्यांच्यात एक स्पर्धाच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकुमत गाजवण्याच होता. या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक कहाणी अतुल कहाते यांच्या ‘अंतराळ स्पर्धा’ या नव्या पुस्तकातून उलगडत जाते. या शर्यतीमधले फॉन ब्राऊन आणि सर्गई पावलोव कोरेलियॉव्ह हे विलक्षण हुशार आणि जिद्दी तंत्रज्ञ मुख्य प्रवासी ठरले. त्यांच्या कर्तृत्वाची अतिशय रंजक सफर वाचकाला या पुस्तकात वाचायला मिळते. सगळ्या अडचणींवर आणि निराशाजनक परिस्थितींवर मात करत या दोघांनी आपल्यातील जिद्द अभंग ठेवली. आवश्यक तेवढ्याच वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे लेखकाने हा प्रवास चितारला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more