REKHA BAIJAL

About Author

Birth Date : 06/07/1952


REKHA BAIJAL IS A RENOWNED WRITER. SO FAR, HE HAS SUCCESSFULLY HANDLED MANY TYPES OF LITERATURE LIKE NOVELS, ANTHOLOGIES, PLAYS, ONE-ACT PLAYS, FINE ARTS. HE HAS DONE STORYTELLING PROGRAMS ON DOORDARSHAN, E TV, ALPHA TV. MARATHWADA UNIVERSITY B.A. AND M.A. HIS STORIES AND POEMS ARE INCLUDED IN THE SYLLABUS. CONCLUDED AT PARBHANI HE HAS CHAIRED THE 2ND MARATHWADA LEKHIKA SAMMELAN.

रेखा बैजल एक प्रथितयश लेखिका आहेत. आतापर्यंत कादंबरी, कथासंग्रह, नाटके, एकांकिका, ललित असे अनेक साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. दूरदर्शन, ई टीव्ही, अल्फा टीव्ही या वाहिन्यांवर त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रमात त्यांच्या कथा व कविता समाविष्ट झाल्या आहेत. परभणी येथे संपन्न झालेल्या दुसरे मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्यावर प्रा. दादासाहेब गिऱ्हे यांनी पीएच. डी. मिळविली आहे. रेखा बैजल यांनी काटा रुते कुणाला या चित्रपटाचे लेखनही केले आहे. आकाशवाणीच्या पुणे, औरंगाबाद, परभणी या केंद्रांवरून त्यांच्या कथा, कवितांचे सातत्याने प्रसारण होत असते. त्यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगु, इंग्रजी या भाषांत अनुवाद झाले आहेत. रेखा बैजल यांना समग्र लिखाणासाठी अनंत काणेकर पुरस्कार , पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, त्यांच्या लेखनाला बा.सी. मर्ढेकर पुरस्कार , नाथमाधव पुरस्कार (गोवा) , महाराष्ट्र राज्य शासनाचे सहा पुरस्कार असे एकुण पंचवीस पुरस्कार मिळाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
ADNEYA Rating Star
Add To Cart INR 120
PRASTHAN Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.