PEARL BUCK

About Author

Birth Date : 26/06/1892
Death Date : 06/03/1973

PEARL SYDENSTRICKER BUCK (JUNE 26, 1892 – MARCH 6, 1973), ALSO KNOWN BY HER CHINESE NAME SAI ZHENZHU (CHINESE: 赛珍珠), WAS AN AMERICAN WRITER AND NOVELIST. AS THE DAUGHTER OF MISSIONARIES TO CHINA, AND LATER AS A MISSIONARY HERSELF, BUCK SPENT MOST OF HER LIFE BEFORE 1934 IN ZHENJIANG. THE FAMILY SPENT THEIR SUMMERS IN A VILLA IN KULING TOWN, MOUNTAIN LU, JIUJIANG,[1] AND IT WAS DURING THIS ANNUAL PILGRIMAGE THAT THE YOUNG GIRL DECIDED TO BECOME A WRITER.[2] THE GOOD EARTH WAS THE BEST-SELLING NOVEL IN THE UNITED STATES IN 1931 AND 1932 AND WON THE PULITZER PRIZE IN 1932. IN 1938, BUCK WON THE NOBEL PRIZE IN LITERATURE "FOR HER RICH AND TRULY EPIC DESCRIPTIONS OF PEASANT LIFE IN CHINA AND FOR HER BIOGRAPHICAL MASTERPIECES";[3] SHE WAS THE FIRST AMERICAN WOMAN TO WIN THE PRIZE. FROM 1914 TO 1932, BUCK SERVED AS A PRESBYTERIAN MISSIONARY, BUT HER VIEWS LATER BECAME CONTROVERSIAL DURING THE FUNDAMENTALIST–MODERNIST CONTROVERSY, LEADING TO HER RESIGNATION.[4] AFTER RETURNING TO THE UNITED STATES IN 1935, SHE CONTINUED WRITING PROLIFICALLY, BECAME A PROMINENT ADVOCATE OF THE RIGHTS OF WOMEN AND MINORITY GROUPS, AND WROTE WIDELY ON CHINESE AND ASIAN CULTURES, BECOMING PARTICULARLY WELL KNOWN FOR HER EFFORTS ON BEHALF OF ASIAN AND MIXED.

पर्ल बकबद्दल कितीही लिहिलं-वाचलं गेलं, तरी तिची खरीखुरी ओळख पटण्यासाठी तिची पुस्तकंच उपयोगी पडतात. द गुड अर्थ, द मदर, द इंपीरियल वुमन, पॉQव्हलियन ऑफ विमेन, लेटर फ्रॉम पेकिंग यासारखी तिची पुस्तकं इतकी वर्षं, इतकी लोकप्रिय का आहेत, हे तिचं एखादं तरी पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. अमेरिकन मिशनरी आईवडिलांची ही मुलगी अमेरिकेत जन्मली आणि चीनच्या एका दुर्गम प्रदेशात चिनी दाईच्या पारंपरिक कहाण्या ऐकत मोठी झाली. थोडं चिनी तत्त्वज्ञानाचं शिक्षण, थोडं शांघायमधल्या वसतिगृहात राहून घेतलेलं शिक्षण आणि वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी अमेरिकेत राहून दोन वर्षं घेतलेलं शिक्षण. अशा अत्यंत परस्परविरोधी विचारप्रणालींचा प्रभाव पडल्यामुळे, पर्ल सायडनाQस्ट्रकरची तटस्थपणे विचार करण्याची वृत्ती वाढीस लागली. आणि याचाच आविष्कार दिसतो तो तिच्या साहित्यात. इस्ट विंड वेस्ट विंड या तिच्या पहिल्या कादंबरीनंतर १९३१च्या मार्चमध्ये बकची दुसरी कादंबरी प्रकाशित झाली - द गुड अर्थ आणि तिने अमेरिकन वाङ्मयात इतिहास घडवून आणला. १९३२ साली द गुड अर्थ बद्दल पर्ल बकला पुलित्झर पारितोषिक मिळालं. १९३४ साली ती कायमची अमेरिकेत राहायला गेली. १९३० ते १९३५ या कालखंडातल्या उत्कृष्ट साहित्यासाठी असलेलं विल्यम डीन हॅविल्स पदक १९३५ साली मिळालं आणि १९३८ साली ती नोबेल पारितोषिकाची तिसरी अमेरिकन विजेती ठरली. पर्ल बकच्या प्रचंड साहित्यसेवेची तपशीलवार दखल घेणं इथं अशक्यच आहे. परंतु मानवजातीवरच्या प्रेमामुळं, त्यांच्या दु:खामुळं, हेलावणाऱ्या मनामुळं आलेला लेखनातला आग्रहीपणा सोडला, तर तिचं सारंच लेखन आजही खूप नव्या-नव्या बाबींमध्ये वाचकाला अंतर्मुख करू शकतं.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
KALI Rating Star
Add To Cart INR 280
PIDHI DAR PIDHI Rating Star
Add To Cart INR 440
THE MOTHER Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर