* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664515
  • Edition : 14
  • Publishing Year : APRIL 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 308
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL IS A GRAPHIC DESCRIPTION OF RAJA RAVI VERMA`S LIFE WHICH BEGINS WITH HIS EARLY CHILDHOOD DAYS IN HIS NATIVE PLACE, KILIMANOOR, A TYPICAL KERALA VILLAGE. HIS DEVELOPMENT AS AN YOUNG ARTIST UNDER THE GUIDANCE OF HIS MATERNAL UNCLE RAJA RAJ VERMA.
"राजा रविवर्मा या अजरामर चित्रकाराच्या जीवनावरील श्रेष्ठ कादंबरी.या कादंबरीत प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांची जीवनकहाणी चित्रमय शैलीत सांगण्यात आली आहे. कादंबरीची सुरुवात होते ती, निसर्गरम्य केरळमधल्या किलीमनुर या गावातून. या गावात रवीवर्मांच बालपण गेल. कादंबरीत तरुण वयात झालेली त्यांची जडणघडण,त्यांच्या काकाकडे-राजा रविवर्माकडे घेतलेले चित्रकलेचे शिक्षण यांचे ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे.

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHHARPERCOLLINS INDIA https://harpercollins.co.in/product/raja-ravi-varma/
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starभावना प्रसाद नातु

    प्रसिद्ध लेखक रणजित देसाई,सर्वांना “स्वामी कार” म्हणून परिचित आहेत.त्यांच्या स्वामी,श्रीमानयोगी,राधेय या कादंबऱ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारलेल्या आहेत.पण राजा रविवर्मा ही कादंबरी,प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा,यांच्या जीवनावर आधारित आहे.कादंबरत एखाद्या कलावंताचे चरित्र लिहायला घेताना,नुसता सत्याचा आधार घेऊन चालत नाही.त्यात कलावंताच्या कल्पकतेचा आधार घ्यावा लागतो,असे लेखक म्हणतात.या कादंबरीतील,साऱ्याच व्यक्तिरेखा वास्तवातल्या नाहीत.तर काही कल्पक आहेत,याची नोंद घ्यावी,असे लेखक सुचवतात.राजा रविवर्मा,यांच्यावर कादंबरी लिहावी.असे रॉय किणीकर यांनी सुचवले.मग लेखक त्यावर विचार करू लागले.त्यांनी आधी,रविवर्मा यांचे वास्तव्य असलेले प्रदेश पाहिले.बंगलोर, म्हैसूर, केरळ, मावेलीकिरा, कन्याकुमारी ही चित्रकाराची वास्तव्याची,सारी स्थळे पाहून झाली.त्यांचे काही नातेवाईक भेटले. त्यांच्याशी बोलून सगळी माहिती गोळा करून,प्रस्तुत कादंबरी पूर्णत्वास नेली,असे रणजित देसाई सांगतात. राजा रवी वर्मा यांचा जन्म,राजघराण्यात झाला.वडील इझूमाविल वेदशास्त्रसंपन्न पंडित,आई उमांबा,मामा राजा राज वर्मा, बहीण मंगला हे सारे किलीमानुर येथे रहात असत.मातृकूलपद्धतीनुसार रवीचे वडील लग्नानंतर त्याच्या आईच्या, उमांबाच्या घरी राह्यला येतात.एकदा मामाचा सेवक पाचन हा रवीची तक्रार घेऊन मामाकडे येतो आणि रवीने देवळाच्या भिंती कोळश्याने चित्र काढून,रंगविल्याचे सांगतो.रवीचा मामा चित्र पहातो,तो रवीला विचारतो की ही चित्रे कुणी काढलीत.रवी स्वतःच काढल्याचे सांगतो.राजा राज मामा रवीच्या आईला बोलावून घेतो आणि रवीने काढलेल्या घोड्याच्या चित्राचे कौतुक करतो आणि रवीच्या आईस म्हणतो की,घोड्याचे चित्र काढणे कठीण गोष्ट आहे,जे ज्याने इतके सुरेख काढले आहे.यापुढे मी त्याला शिकवू शकत नाही.त्याने आता त्रावणकोरची राजधानी त्रिवेंद्रमला जाऊन शिक्षण घ्यावे.तेथील राजे आईल्यम तिरूनाल कलेचे भोक्ते आहेत.तिथे त्याला चांगले शिक्षण मिळेल.असे म्हणून राजा राज मामा,रवीला त्रिवेंद्रमला घेऊन जातो.राजे तिरूनालशी परिचय करुन देतो.राजे खुष होतात.राजे तिरूनाल दूरदर्शी, स्पष्ट विचारांचे,कलाकारांना प्रोत्साहन देणारे असतात.त्यांच्या दरबारी परदेशी चित्रकार,चित्र काढण्यास येतात.तेव्हा राजे,त्यांना रवीला शिकवण्याची विनंती करतात.तिथे ब्रूक्स नावाच्या गोऱ्या चित्रकाराला रवीला शिकव असे राजे सांगतात.तो मला चित्र काढत असतांना जवळ कुणी चालत नाही.म्हणून नकार देतो.राजे ज्यावेळेस त्यास तुमची आम्हास गरज नाही सांगतात,तेव्हा ब्रूक्स चित्र काढतांना दूरुन पाह्यला परवानगी देतो.रवी दुरूनच चित्र कसे काढतात,रंग तबक कसे वापरतात,ते बघतो. एकदा राजे तिरूनाल ह्यांच्या भगिनी राणी लक्ष्मीबाई रवी वर्माच्या महालात येतात.तेव्हा रवी त्यांना त्यांचे “अन्नपूर्णा देवीच्या” स्वरूपांत चित्र काढू देण्याची परवानगी मागतो. राजे तिरूनाल यांना सांगायचे नाही एवढ्या एका अटीवर त्या तयार होतात.चित्र पुर्ण झाल्यावर तो त्यांना दाखवतो आणि चित्र पाहण्यासाठी बोलावणे करतो,चित्र पाहून राजे खूप खुष होतात.हेच रवी वरम्याचे पहिले चित्र. ते चित्र पाहिल्यावर राजे,राणी साहेबांना म्हणतात की मी मागे तुमची बहीण,पुरुतार्थीचे लग्न रवी वर्माशी लावण्याबाबत बोललो होतो.तेव्हा तुम्ही त्याच्या काळ्या रंगावरुन नकार दिला होता.माणसं नुसती रुपानं संपन्न असून चालत नाहीत,ती गुणानही संपन्न असावी लागतात.रवी वर्माचे पुरुतार्थीशी लग्न होते.रवीला मातृकूलपद्धतीनुसार पुरुतार्थीच्या घरी मावेलीकिराला जावे लागते.तिथे रवीचे पुरुतार्थीशी मतभेद होतात.तिला ह्याचे चित्रकार असणे मान्य नसते.रवी पुनः किलीमानुरला परत येतो. काही दिवसांनी राजे आईल्यम तिरूनाल रवीला,पुनः त्रिवेंद्रमला बोलावतात.राजा तिरूनाल यांनी खास दरबार भरविलेला असतो.रवी वर्मा याचे जेव्हा दरबारात आगमन होते.तेव्हा राजे, “राजा रवी वर्मा आपण पुढे यावे.”असे महणून स्वागत करतात.रवी वर्मा ‘राजा’ असा उल्लेख केल्यामुळे गडबडून जातात.तेव्हा राजे तिरूनाल खुलासा करतात आणि दरबारचा वीरशृंखलेचा मान प्रदान करतात आणि राजा ही पदवी बहाल करतात,तेव्हा पासून रविवर्मा,”राजा रविवर्मा” म्हणून ओळखला जाऊ लागतो. . आता रविवर्मा सगळ्या भारतभर भ्रमंती करून,वेगवेगळ्या विषयावरील चित्र काढतात.त्यातील देवदेवतांची चित्रे खूप प्रसिद्ध पावतात.घराघरात त्यांचे नाव पोहोचते.पण त्यांना वेगळे विषय हवे असतात. त्यातूनच पुराणातील काही प्रसंगावर,आधारित चित्र काढतात.रविवर्मा कलेसाठी घरदार सोडून मुंबईला येतो. मुंबईत आल्यावर एका प्रशस्त बंगल्यात,रंगशाळा निर्माण करून,तेथे भाऊ राज वर्मा सह रहाण्यास सुरुवात करतो.यादरम्यान सुगंधा नामे कलावंतीण,त्याच्या आयुष्यात येते.ती त्यावर मनापासून प्रेम करत असते.त्याच्या कलेची प्रशंसा करते.रवि वर्माचे कलेवरील प्रेम,त्याची सुंदर देहयष्टी,सुंदर आणि सरळ नासिका,मध्यभागी गंध लावलेले भव्य कपाळ,तेजस्वी डोळे,धारदार नजर तिच्या मनात भरते.तिच्या सहवासात,रवी वर्मा कडून एकसेएक कलाकृती घडत जाते.जसे शकुंतला आणि मेनका,हंस दमयंती,मानिनी राधा,अशी अनेक उत्तम चित्रांची निर्मिती होते.आसेतू हिमाचल त्यांच्या चित्रांची कीर्ती पसरते.रवी वर्माच्या चित्रांचे वैशिष्ट केवळ सुंदरता एवढेच नव्हते,तर त्याच्या चित्राच्या चेहऱ्यावरील भाव इतके खरे असत,की पहाणाऱ्याची नजर चेहऱ्यावरून खाली ढळतं नसे.परंतु मनुष्याच्या आयुष्यात चांगल्या बरोबर वाईटही घडतच असतं.ज्यांना रविवर्मा यांची कीर्ती सहन होत नाही,असे लोकं त्यांची नाहक बदनामी करतात.रवी वर्माला अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले.प्रत्येक मोठ्या माणसाच्या बाबतीत जे घडते ते,की प्रशंसा करणारे लोक कमी व नावं ठेवणारे लोक जास्त अशी परिस्थिति त्याच्याही जीवनांत येते. मुंबईला असतांनाच राजा रवी वर्मा यांस कोर्टाची नोटिस येते.त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यांत आलेले असतात.पहिला गुन्हा ‘हिंदूंच्या देवदेवता घराघरांत पोहोचवून त्यांच पावित्र्य नष्ट केले’ आणि दूसरा ‘देवदेवतांची नग्न चित्र काढून त्यांना बीभत्स रूप दिले आहे.देवदेवतांची विटंबना केली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.ही बातमी पसरल्यावर बापट नावाचे वकील,जे त्यांच्या चित्रांचे ग्राहक व चाहते असतात.ते राजा रवी वर्मा यांचे वकीलपत्र घेण्यास पुढे येतात.पण राजा रवी खटला स्वतःच चालविण्याचे ठरवितात.नकार देतांना जे शब्द लेखकाने राजा रवी ह्यांच्या तोंडी दिलेले आहेत,ते असे “बापट,एक गोष्ट लक्षांत घ्या. माणसान आयुष्यात कुठेतरी श्रद्धा बाळगून जगावं. त्या श्रद्धेला तडा जातो असं वाटलं तर सर्वस्व पणाला लावावं..ही माझी श्रद्धा आहे.तिला कोणीतरी आव्हान दिले आहे.ते स्वीकारणें हा माझा एकट्याचा धर्म आहे.खटला दाखल करणाऱ्यांचे वकील आणि रवी वर्मा ह्यांच्यातील दावे आणि प्रतिदावे हे कादंबरीची 10-12 पाने व्यापुन टाकतात.ते येथे देणे शक्य नाही.पण राजा रवी वर्मा कोर्टापुढे जे म्हणतो ते असे, “महाराज माझ्यावर जो आरोप केला आहे की, माझ्या चित्रात नग्नता आहे आणि मी देवादिकाच्या चित्रांचा प्रसार केला,हा आरोप मला मान्य आहे,फक्त मला आज एवढाच खेद वाटतो की माझ्या मनातलं नग्नतेचे जेवढं सुंदर रूप मला दिसलं तेवढं मला चित्रित करता आलं नाही.” राजा रवी वर्माची ह्या खटल्यातून सुटका होते. या कटू पण जीवघेण्या प्रसंगातून ते सहीसलामत बाहेर पडतात.पण सुगंधाला गमावून बसतात. मुंबईच्या वास्तव्यातच, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याशी,रविवर्मा ह्यांचा परिचय होतो.ते रवी वर्मा ह्यांना चित्र परदेशात पाठविण्यासाठी सुचवितात व संधी उपलब्ध करून देतात.राजे गायकवाड गुणग्राही असतात व उत्तम कलाकारांना मानसन्मान देतात.बडोदा संस्थानांमध्ये प्रदर्शन भरवितात.तिथून पुढे चित्रकलेचा प्रसार व्हावा,म्हणून त्यांच्या मदतीने,रविवर्मा वेगवेगळ्या शहरांमधून चित्रांची प्रदर्शनं भरवितात.लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.चित्रांची कमतरता भासू लागते.म्हणून ते चित्रांचा छापखाना काढायचे ठरवतात.यामागे लोकांना चांगली चित्रे पहाण्याची सवय लागली पाहिजे,हा त्यांचा उद्देश असतो.पण हा सगळा कामाचा डोलारा सांभाळताना,त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकडे ते लक्ष देऊ शकत नाही.दरम्यान त्यांचे मामाजी,जे त्यांच्यासाठी दैवता समान असतात,त्यांचा मृत्यू होतो.लहान भाऊ,जो चित्र काढण्यास नेहमी मदत करतो,त्याचा मृत्यू होतो.मृत्यूची साखळी संपतच नाही.आईचा वृद्धापकाळाने मृत्यु होतो.रवी या सगळ्यात एकाकी पडतो.खचून जातो. ह्या सगळ्याच कारणांमुळे,ते मुंबईचा छापखाना विक्रीला काढतात.चांगल्या किंमतीची अपेक्षा असूनही,जर्मन तंत्रज्ञान असलेला हा कारखाना,फक्त पंचवीस हजार रुपये एवढ्या किमतीला विकला जातो.मुंबई सोडून ते आपल्या जुन्या गावी,किलीमानूर येथे येऊन रहातात.आपुली अर्धवट राहिलेली चित्रे पुर्ण करतात.ते निराश झालेले असतांना,त्यांची मैत्रीण फ्रेंना म्हणते,नाही रवी,तुझा पराजय नाही झाला,तू यशस्वी झाला आहेस.ती कांगरा आर्ट,ती मुगल आर्ट यांचे वळण बदलून,तू चित्राला नवीन दिशा दिलीस.माणसासारखी माणसं निर्मिलीस,हेच तुझ्या कलेचे मोठेपण आहे.ती समजावते.पण कलावंताचे कलासक्त मन,ते समजण्याच्या पलीकडचे असते.त्या आजारपणात रवी वर्मा जगाचा निरोप घेतात. कादंबरी वाचून आपण सुन्न होऊन जातो.प्रत्येकाने वाचावे अशी ही कादंबरी आहे.रणजीत देसाईंनी कादंबरीत,प्रत्येक प्रसंग अक्षरश जिवंत केला आहे.राजा रवी वर्माच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा जिवंत उभ्या केल्या आहेत.कादंबरी वाचतांना,प्रत्यक्षात प्रसंग घडताहेत,असे वाटत राहते.रविवर्म्याचे मामा,राजा राज वर्मा ह्यांची बुद्धिमत्ता तेजस रंग,भेदक डोळे,अशी प्रतिमा उभी केली आहे.तर कुटुंबातील इतर सदस्य आई,वडील,भाऊ राज,बहिण मंगल,सगळे अवतीभवती वावरत आहेत असे वाटते.बडोद्याचे राजे सयाजीराव,तसेच सेवक रविवर्माचा मित्र रामय्या,या पात्रांच्या व्यक्तिरेखा,छान रेखाटल्या आहेत.त्यांची लेखणी साहित्याच्या सर्व अंगाला स्पर्शून जाते.कादंबरीत स्वामी विवेकानंद रविवर्म्याच्या घरी भेट देतात तो प्रसंग,रविवर्मा आपल्या आई,वडील,मामांना भेटायला जातो तो प्रसंग, गोपाळ कृष्ण गोखले,दादाभाई नवरोजी इत्यादी मान्यवर राजा रविवर्माना भेटतात तो प्रसंग,आणि राजा रवी वर्माच्या अंतिम प्रवासाचा प्रसंग,असे अनेक प्रसंग,लेखक आपल्या लेखणीने अजरामर करतात.ही कादंबरी,वाचण्यायोग्य आहे.एका जगप्रसिद्ध कीर्तीच्या,अजरामर चित्रकाराची, सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली कादंबरी “राजा रवी वर्मा” आपण वाचली नसल्यास अवश्य वाचा. मला कल्पना आहे की,परिचय अतिदीर्घ झाला आहे.पण राजा रवी वर्मा सारखे अफाट व्यक्तिमत्व, रणजीत देसाई ह्यांच्या सारखा सिद्धहस्त लेखक आणि 300 पानांची कादंबरी, ह्या सगळ्याकडे बघता हा फारसा मोठा नाही,हे आपणांस ही कादंबरी वाचतांना जाणवेल. येथे प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो की मी आणि प्रसाद आणि श्री आणि सौ दिवटे,स्वामीकारांच्या गांवी कोवाडला गेलो असतांना,स्वामीकारांचा नातु सिद्धार्थ शिंदे (मुलीचा मुलगा) ह्याने आम्हांस स्वामीकारांची 3 पुस्तके भेट दिली होती.‘राजा रवी वर्मा’ हे त्यातलेच एक पुस्तक. ...Read more

  • Rating StarYashashri Rahalkar

    पुस्तक:- राजा रवि वर्मा प्रकार :- कादंबरी लेखन:- रणजित देसाई प्रकाशक :- मेहता प्रकाशन आज खूपच दिवसांनी एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण केले. राजा रवि वर्मा ह्या विख्यात चित्रकाराची हा जीवनप्रवास.... कादंबरी खिळवून ठेवते.... आपण रवि वर्माच्या कथेतइतके गुरफटत जातो की जणू त्यातले एक पात्र. रणजित देसाई सरांनी ह्या कादंबरी साठी पाच वर्षे अभ्यास केल्याचे , देशाविदेशात फिरून माहिती गोळा केल्याचे म्हटले आहे ते अगदी यथार्थ वाटते... एकूणात रवि वर्मा ह्यांचा प्रवास दाखविताना जे detailing केलेलं आहे ते अफाट अभ्यास करूनच शक्य आहे. चित्र , रंग आणि चित्रकला ह्यांचाही अभ्यास प्रचंड कमाल आहे... अगदी बारीक बारीक सांगायचे झाल्यास पूर्वी रंग खलून तयार केले जात मग विदेशातून तैल रंग येऊ लागले ... हा सगळा प्रवास कमाल रेखाटला आहे. अगदी एक उदाहरण द्यायचे झाल्यास एके ठिकाणी ब्राउन ते ब्लॅक मधील अनेक रंगछटांचा उल्लेख केला आहे... तो पाहून आपण थक्क होतो. अप्रतिम सुंदर , विख्यात असणारी त्यांची काही निवडक चित्रे देखील समाविष्ट केलेली आहेत. कलाकाराचे कलेच्या रंगात न्हाऊन जाणे, त्याच्यावर लुब्ध होणाऱ्या स्त्रिया, सर्वसामान्य आणि जुनाट विचारसरणीची बायको... सगळं अगदी सहज मांडल आहे. मामाचा मृत्यू, आईचा आणि धाकट्या भावंडांचा मृत्यू प्रसंग कमाल चितारला आहे . हिंदू देवदेवतांची विटंबना केली असा आरोप ठेऊन लावलेला खटला आणि त्याचे यशस्वीपणे केलेले खंडन अप्रतिम आहे. "नग्नता ही पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते" हे राजा रवि वर्मा इतक्या प्रभावीपणे मांडतात की आहा! चित्रकाराच्या आयुष्यात मॉडेल म्हणून येणाऱ्या अलौकिक सौंदर्यवतीबाबत कुठलेही पुरुष म्हणून आकर्षण न वाटण इतकं कलाकार म्हणून स्थिर असणं कमाल आहे. देहापलीकडची ओढ अतिशय सुंदर वाचकांपुढे ठेवली आहे. थोडक्यात, जरूर जरुर वाचा👍 प्रेमात पाडणारे पुस्तक ✒️यशश्री रहाळकर नाशिक ...Read more

  • Rating StarTejaswini Tawade Kolungade

    नमस्कार आज राजा रवी वर्मा हे पुस्तक वाचून झाले. नेहमी प्रमाणे रणजीत देसाई यांचे दर्जेदार लिखाण. त्यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे की ह्या पुस्तकात वास्तव आणि कल्पविलास ह्या दोहोंचे मिश्रण आहे. राजा रवी वर्मा यांची चित्रकलेशी एकनिष्ठता आणि एकरूपता खप छान प्रकारे मांडली आहे. आपली कला हेच आपले दैवत आहे असे मानणारे राजा रवी वर्मा सदैव आपल्या कलेशी प्रामाणिक राहिले. एकदा नक्की वाचावे असे पुस्तक. ...Read more

  • Rating StarAniket Save

    आत्ताच रणजित देसाई लिखित "राजा रवि वर्मा" वाचुन झाले अन् ह्याच कादंबरीवर आधारित "रंग रसिया" हा चित्रपट सुद्धा पाहुन झाला. राजा रवि वर्मा वाचुन झाल्यावर चित्रपटातील काही दृष्ये खटकतात कारण आपण पुस्तकाच्या अनुषंगाने विचार करीत असतो. असो परंतु चित्रप बनवताना दिग्दर्शकाला काही व्यक्तिस्वातंत्र्य हे घ्यावच लागतं. परंतु रणजित देसाई लिखित ह्या कादंबरी बद्दल बोलायचे झाले तर ते हातातील पुस्तक खाली ठेवु देत नाहीत अन् ठेवलं तर पुन्हा हातात घेण्याची हुरहुर लागुन राहते. त्यांची भाषा अतिशय सोपी,ओघवती आणि गुंतवुन ठेवणारी. कुठेही आपल्याला ती कंटाळवाणी किंवा बोजड वाटत नाही. हेच तर खरं यश आहे लेखकाचं. राजा रवि वर्मा यांनी काढलेल्या देवादिकांच्या चिञांनसमोर जनता आजही नतमस्तक होते आणि आजही अनेक उदयोन्मुख चित्रकार त्यांनाच आपले प्रेरणास्थान मानतात. राजा रवि वर्मा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रकारितेत एक मैलाचा दगड स्थापन केला आहे. मला वाटते ज्यावेळेस चित्रकलेचं नाव घेतलं जाईल तेव्हा राजा रवि वर्मा ह्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आपल्या अवघ्या ५८ वर्षांच्या जीवन कारकीर्दींत त्यांनी अनेक पौराणिक कथांना मूर्त रूप देऊन ती पात्र चित्ररूपात अजरामर करून भारताची चित्रकला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more