* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A LONG WAY HOME
  • Availability : Available
  • Translators : LATA RELE
  • ISBN : 9789353171933
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘A LONG WAY HOME’ IS A MEMOIR WRITTEN BY THIRTY YEAR OLD AUSTRALIAN YOUNG MAN SAROO BRIERLEY. SAROO IS ORIGINALLY AN INDIAN HAILING FROM KHANDVA, MADHYA PRADESH. WHILE TRAVELLING BY TRAIN WITH HIS ELDER BROTHER, HE GETS SEPARATED FROM HIM AND ENDS UP IN AN ORPHANAGE IN KOLKATTA. HE WAS ADOPTED BY AN AUSTRALIAN COUPLE IN 1987. ALTHOUGH HE WAS HAPPILY SETTLED WITH HIS NEW FAMILY IN AUSTRALIA, THE MEMORIES ABOUT HIS PLACE AND FAMILY IN INDIA KEEP HAUNTING HIM. AFTER ALMOST TWENTY FIVE YEARS, ON THE BASIS OF HIS FAINT MEMORIES AND WITH THE HELP OF ‘GOOGLE EARTH’ AND ‘FACEBOOK’, HE DISCOVERS HIS INDIAN HOME; VISITS INDIA AND RE-ESTABLISHES HIS BOND WITH HIS MOTHER AND SIBLINGS. THIS IS A TRUE STORY ABOUT HIS LIFE IN DIRE POVERTY, OF BEING LOST, OF HIS LIFE IN AUSTRALIA, HIS OBSESSION TO FIND HIS ORIGINAL PLACE AND FAMILY, INCESSANT STRUGGLE AND EFFORTS TO SEARCH AND ALSO UPHEAVALS IN HIS MIND WHILE DOING THIS SEARCH! ALL THIS STRUGGLE WAS TO FIND OUT HIS ORIGIN, WHERE HE WAS FROM, WHAT HAPPENED TO HIS BROTHER AND TO LET HIS INDIAN FAMILY KNOW THAT HE WAS STILL ALIVE! THIS IS A REAL LIFE LESSON ON HOW TO FIND A WAY OUT OF A DIFFICULT SITUATION (HOWEVER DAUNTING), BY MAKING MOST OF EACH AVAILABLE OPPORTUNITY, BY DETERMINED CONTINUOUS EFFORTS WITHOUT GIVING UP BEFORE REACHING THE DESTINATION.
घरपरतीच्या वाटेवरती... ही सरू ब्रायर्ली या तीसवर्षीय ऑस्ट्रेलियन मुलाने लिहिलेली आत्मकथा आहे. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकात्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दाम्पत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ` व ‘फेसबुक`च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो. ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे, त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#A LONG WAY HOME# GHAR PARTICHA VATEVARTI# REHABILITATION CENTRE# LATA RELE# SAROO BRIERLEY# #सरू ब्रायर्ली# ‘अ लाँग वे होम’# घर परतीच्या वाटेवरती#ऑस्ट्रेलिया# टॅस्मेनिया# होबार्ट# खांडवा # बुरहानपूर# कोलकाता#कलकत्ता#नवजीवन# इंडियन सोसायटी फॉर स्पॉन्सरशिप अँड अडॉप्शन (इस्सा)#गुगल अर्थ#फेसबुक# दत्तकविधान# दत्तक केंद्र# अ‍ॅडॉप्शन सेंटर# लता प. रेळे
Customer Reviews
  • Rating StarDivya Marathi 07.12.19

    एका मुलाचे हृदयस्पर्शी, भावस्पर्शी अनुभवकथन… आत्मकथन किंवा अनुभवकथन हा वाचकप्रिय साहित्यप्रकार आहे. कथनकाराचं जीवन जवळून अनुभवण्याचा आनंद हा साहित्यप्रकार देतो. सर्वसाधारणपणे वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू झाली, की माणसं आत्मकथन किंवा अनुभवकथनाचा मार्ग अुसरतात; पण एखाद्या व्यक्तीचं जीवन इतकं वादळी किंवा जगावेगळं असतं, की तारुण्यातच त्याला असं वाटतं, की आपल्या जीवनातील अनुभव लोकांसमोर मांडावेत. तीसवर्षीय सरू ब्रायर्लीलाही असंच वाटलं आणि त्याने आपले अनुभव ‘अ लाँग वे होम’मधून मांडले. हे अनुभव मराठीत अनुवादित केले आहेत लता प. रेळे यांनी ‘घरपरतीच्या वाटेवरती...’ या शीर्षकासह. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकत्त्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दांपत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ` व ‘फेसबुक`च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो. ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे. त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे. या अनुभवकथनाच्या शेवटी सरू लिहितो, ‘कसंही पाहिलं तरी, माझं भारतात परत येणं व माझ्या आई-भावंडांचं जीवन डोळ्यांनी पाहणं, हा वैयक्तिक व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करणारा अनुभव आहे. विशेषतः मी माझ्या बहीण-भावाकडे बघतो, तेव्हा कुटुंबावर व नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या पारंपरिक दृष्टिकोनाचं मला कौतुक वाटतं. शब्दांत सांगणं कठीण आहे; पण मला वाटतं, की उपनगरात अलिप्तपणे राहून व वैयक्तिक स्वातंत्र्यावर भर देता देता आपण पाश्चिमात्य देशांत काहीतरी हरवून बसलो आहोत.’ सरूचे हे विचार चिंतनीय आहेत. त्याचं कुटुंबाविषयीचं प्रेम मनाला स्पर्शून जाणारं आहे. सरूचं हे आत्मकथन मुळातून वाचण्यासारखं आहे. लता रेळे यांचा अनुवाद उत्तम. ...Read more

  • Rating StarSwapna Limaye

    भुसावळ जवळील "बुरहानपूर" वरुन एक ५वर्षाचा मुलगा हरवतो, अनवाधनाने ट्रेन ने कोलकाता ला येतो. तेथे काही दिवस उघड्यावर काढून बालसुधारग्रुह-अनाथाश्रम तिथुन थेट अॉस्ट्रेलियातील दाम्पत्याकडे दत्तक म्हणून जातो..... समज आल्यावर गुगल अर्थ च्या मदतीने आठवतील त्ा खाणाखुणा वरून आपलं जुनं घर शोधून काढतो. २५वर्षांनी आईला भावंडांना भेटतो सगळंच अनाकलनीय......आणि विशेष म्हणजे बाकी मुलं मोठी होऊन दुसरीकडे रहायला जातात पण त्याची आई "कधीतरी माझा मुलगा परत येईल, त्याला हे घर सापडले पाहिजे" ही श्रध्दा ठेवून तिथेच राहते.. आईशी जुळलेली नाळ तुटत नाही, मातीची ओढ असते म्हणतात ते उगाच नाही........ सलाम त्या विधात्याला... त्या सरु ब्रायली ची ही गोष्ट ...Read more

  • Rating StarLOKMAT MANTHAN

    एका मुलाचे हृदयस्पर्शी, भावस्पर्शी अनुभवकथन… आत्मकथन किंवा अनुभवकथन हा वाचकप्रिय साहित्यप्रकार आहे. कथनकाराचं जीवन जवळून अनुभवण्याचा आनंद हा साहित्यप्रकार देतो. सर्वसाधारणपणे वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू झाली, की माणसं आत्मकथन किंवा अनुभवकथनाचा मार्ग अनसरतात; पण एखाद्या व्यक्तीचं जीवन इतकं वादळी किंवा जगावेगळं असतं, की तारुण्यातच त्याला असं वाटतं, की आपल्या जीवनातील अनुभव लोकांसमोर मांडावेत. तीसवर्षीय सरू ब्रायर्लीलाही असंच वाटलं आणि त्याने आपले अनुभव ‘अ लाँग वे होम’मधून मांडले. हे अनुभव मराठीत अनुवादित केले आहेत लता प. रेळे यांनी ‘घरपरतीच्या वाटेवरती...’ या शीर्षकासह. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकत्त्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दांपत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ` व ‘फेसबुक`च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो. ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे. त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे. या अनुभवकथनाच्या शेवटी सरू लिहितो, ‘कसंही पाहिलं तरी, माझं भारतात परत येणं व माझ्या आई-भावंडांचं जीवन डोळ्यांनी पाहणं, हा वैयक्तिक व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करणारा अनुभव आहे. विशेषतः मी माझ्या बहीण-भावाकडे बघतो, तेव्हा कुटुंबावर व नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या पारंपरिक दृष्टिकोनाचं मला कौतुक वाटतं. शब्दांत सांगणं कठीण आहे; पण मला वाटतं, की उपनगरात अलिप्तपणे राहून व वैयक्तिक स्वातंत्र्यावर भर देता देता आपण पाश्चिमात्य देशांत काहीतरी हरवून बसलो आहोत.’ सरूचे हे विचार चिंतनीय आहेत. त्याचं कुटुंबाविषयीचं प्रेम मनाला स्पर्शून जाणारं आहे. सरूचं हे आत्मकथन मुळातून वाचण्यासारखं आहे. लता रेळे यांचा अनुवाद उत्तम. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.