DNYANDA NAIK

About Author

Birth Date : 21/04/1975


WELL-KNOWN RURAL STORY WRITER KAI. GYANADA WAS BORN ON APRIL 21, 1950 TO VENKATESH MADGULKAR AND HIS EARLY FILM ACTRESS BABY VIMAL. HE HAS DONE GRADUATION IN PHILOSOPHY AND POST GRADUATION IN MARATHI.

सुप्रसिद्ध ग्रामीण कथालेखक कै. व्यंकटेश माडगूळकर व त्यांच्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळातील अभिनेत्री बेबी विमल यांच्या पोटी २१ एप्रिल, १९५० रोजी ज्ञानदा यांचा जन्म झाला. त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी व मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ , पुणे तर्फे प्रसिद्ध होणाऱ्या किशोर मासिकाच्या कार्यकारी संपादक या पदावरून २९ वर्षांच्या सेवेनंतर त्या २०१०मध्ये सेवानिवृत्त झाल्या. पाठ्यपुस्तक मंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी १९९२ ते २०१० या काळात काम पाहिले. कम्युनिटी एड अ‍ॅन्ड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम , भारतीय जैन संघटना आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांमध्येही त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. आतापर्यंत त्यांची ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यांपैकी ४० बालवाङ्‌मयातील आहेत. बालवाङ्मय : नवी इसापनीती , रूव्या बुरूज आणि धाडसी चमू , बागेचे रहस्य , बाबी पत्रकार झाली , क्लाराज डायरी (भाषांतर), रेडी-स्टेडी गो याशिवाय अमेरिकेच्या अंतरंगात , कलावंत विचारवंत , महाराष्ट्रातील प्रतिभावंत कलावंत , आदिशक्ती , ही पुस्तके विशेष गाजली. पुरस्कार : मुंबई पत्रकार संघाचे उत्कृष्ट संपादक यासाठीचे केशवराव कोठावळे पारितोषिक (२००३), उत्कृष्ट बालसाहित्य लेखिका यासाठी, ग. ह. पाटील पारितोषिक (१९९८) तसेच माय व्हिलेज साठी दूरदर्शन केंद्र, नवी दिल्लीच्यावतीने उत्कृष्ट माहितीपट पारितोषिक व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त म्हणून २००५पासून काम पाहत आहेत. प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग.
Sort by
Show per page
Items 1 to 9 of 9 total
CHHOTISHI PAAULVAT VA ITAR GOSHTI Rating Star
Add To Cart INR 295
GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-1 Rating Star
Add To Cart INR 210
GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-2 Rating Star
Add To Cart INR 210
GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-3 Rating Star
Add To Cart INR 280
KHARA GURU KON VA ITAR GOSHTI Rating Star
Add To Cart INR 360
RAJA,KABUTER ANI VRUDDHA VA ITAR GOSHTI Rating Star
Add To Cart INR 195
RAJVADA ANI VAN VA ITAR GOSHTI Rating Star
Add To Cart INR 295
SONYACH KAD VA ITAR GOSHTI Rating Star
Add To Cart INR 195
TAJELDAR CANVAS Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more