* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEN OF STEEL
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980288
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GENERALLY, IT IS THE BUSINESS JOURNALIST WHO WRITES THE AUTOGRAPHY OF THE BUSINESSMAN. THESE JOURNALISTS GENERALLY END UP ASKING THE PROPORTION OF THE EXPENDITURE AND PROFIT, OR THEIR YEARLY TURNOVER. VERY RARELY, THE TRUE BUSINESSMAN IS REVEALED THROUGH THESE FIGURES. I INTERVIEWED THESE BUSINESS LEADERS AS I WOULD INTERVIEW ANY POLITICIAN, ANY ACTOR, ANY AUTHOR OR ANY SUCH PERSON. SURPRISINGLY, IT WAS VERY EASY TO MAKE THEM TALK, THE FORMAT WHICH I HAD SELECTED PROVED TO BE VERY PERFECT. YOU WILL HARDLY COME ACROSS THE FIGURES IN TERMS OF FINANCE OR LOSS AND PROFIT OR ANY SUCH THING RELATED TO FINANCE. MOSTLY, THESE INTERVIEWS REFLECT THE TRUE PERSONALITIES THAT THESE PEOPLE ARE. -VEER YES, I HAVE BEEN VERY RICH THROUGHOUT MY LIFE. I WAS BORN AS A RICH. BUT I CANNOT EVER FORGET THOSE 10 YEARS IN AMERICA. I WAS SURVIVING ONLY ON THE ALLOWANCE PROVIDED BY THE RESERVE BANK, NEEDLESS TO SAY THAT IT WAS ALWAYS VERY INSUFFICIENT. TO MAKE BOTH THE ENDS MEET, I HAD TO ACCEPT JOBS AS WASHING AND CLEANING THE PLATES AND DISHES IN HOTEL, ANYTHING THAT WOULD HELP ME TO KEEP MYSELF ALIVE. SUCH JOBS MAKE YOU FORGET HOW RICH YOUR FAMILY IS. -RATAN TATA. TO WHOM SHOULD WE GIVE THE CREDIT OF OUR SUCCESS? ACTUALLY, IT DOES NOT GO TO THE MAN POWER OR MACHINE POWER. TODAY, AT THIS STAGE I REALIZE THAT IT GOES TO THE IMAGINATION POWER. TODAY, I HAVE ALSO COME TO THE CONCLUSION THAT MY IDEAS HAVE IMPRESSED THOSE WHO HAVE NOT BEEN IN MY DIRECT CONTACT. NATURALLY, THIS GIVES ME IMMENSE HAPPINESS. -NANDAN NILEKANI.
"उद्योगपतींचे चरित्रलेख साधारणत: बिझनेस-पत्रकारच लिहितात. ते त्यांना किंमत व मिळकतीच्या गुणोत्तरांसंबंधी प्रश्न विचारतात, त्यांच्या समूहाच्या वार्षिक उलाढालीविषयी चर्चा करतात... यांतून, आकड्यांच्या जंजाळातून खराखुरा माणूस क्वचितच प्रकटतो... मी या बिझनेस नेतृत्वांची मुलाखत, इतर कुणाही व्यक्तीची – म्हणजे राजकारणी, चित्रपट तारा, लेखक किंवा इतर कुणी – जशी घेतली असती, त्याच पद्धतीनं घेतली. या उद्योगपतींना बोलतं करणं आश्चर्यकारक सोपं गेलं... या लेखांच्या मांडणीचं मी निवडलेलं स्वरूप यशस्वी ठरलं. या चरित्रलेखांत आकडेवारी, नफा-तोटा, किंमत-मिळकत यासंबंधी फारसं आढळणार नाही; तर या लोकांविषयी व त्यांचं नशीब घडवणाऱ्या परिस्थितीविषयी अधिक वाचायला मिळेल." – वीर संघवी ``होय, मी खूप श्रीमंतीत वाढलो आहे... पण मी अमेरिकेतली ती दहा वर्षं विसरू शकत नाही. मी तिथं रिझर्व बँकेच्या भत्त्यावर जगत होतो, ते पैसे कधीच पुरेसे नसत. त्यामुळं मला जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी बश्या विसळण्यासह सगळ्या प्रकारची कामं करावी लागायची. अशा प्रकारच्या गोष्टींमुळं तुमचं कुटुंब श्रीमंत आहे ही गोष्ट झटकन विसरली जाते.`` – रतन टाटा ``आम्ही आमच्या यशाचं श्रेय कशाला द्यायचं? ते श्रमशक्तीला व यंत्रसामग्रीला नसून कल्पनांना आहे आणि आता मला असं जाणवतं की, माझ्या कल्पना मला कधी न भेटलेल्या माणसांवरसुद्धा प्रभाव टाकत आहेत. मला या गोष्टीचा आनंद होणार नाही का? – नंदन निलेकणी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #सुप्रिया वकील #VIRSANHAVI #NAVBHARTACHESHILPKAR #नवभारताचे शिल्पकार (MEN OF STEEL चा अनुवाद) #SUPRIYA VAKIL #
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT 27-07-2010

    आत्मभान जागवणारी ग्रंथसंपदा… आयुष्यात काही तरी करुन दाखवण्याची प्रेरणा देणारे आणखी एक दर्जेदार पुस्तक म्हणजे ’नवभारताचे शिल्पकार’. हे पुस्तक म्हणजे ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांनी भारतीय उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या नेतृत्वांशी केलेली दिलखुलास बातचीतआहे. एक मुलाखतकार आणि मुत्सद्दी लेखक महणून वीर संघवी सर्वांनाच परिचित आहेत. त्यांनी प्रश्नांची गुगली टाकत अनेकांना बोलते केले आणि गोंधळवून टाकले पण, उद्योगक्षेत्रातील काही मातब्बरांच्या यशोगाथा पडताळून पाहताना ते स्वत:च चकीत झाले, त्यातूनच नवभारताच्या ११ रत्नांचा परिचय करुन देण्याचे त्यांच्या मनाने धाटले, हे अकराजण म्हणजे नंदन निलेकणी, कुमार मंगलम बिर्ला, सुनील मित्तल, राजीव चंद्रशेखर, अझीम प्रेमजी, सुभाष चंद्रा, बिक्की ओबेरॉय, नसली वाडिया, उदय कोटक, विजय मल्ल्या आणि रतन टाटा. या सर्वांच्या जडणघडणीची कुतूहलजनक गाथा वीर संघवी यांनी मांडली असून त्याचा नेटका अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. संघवी यांनी वर्णन केलेली या अकराजणांची टीम आपल्याला उद्योगजगतातील अनेक बारकावे उलगडून दाखवतेच पण विविध क्षेत्रातील संधींचा फायदा कसा घेतला गेला हे पडताळून दाखवले. भारतीय उद्योगक्षेत्र आणि त्यातील जिद्दीची कहाणी जुळून समजून घ्यायची तर या पुस्तकाला पर्याय नाही. ...Read more

  • Rating StarNAVPRABHA 20-07-2009

    दर्जेदार पुस्तकांची मेजवानी… उत्तम आणि सकस साहित्य वाचायला मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र प्रादेशिक भाषांमधून अनेक चांगल्या पुस्तकांचे अनुवाद होत नाहीत. ही त्रुटी दूर करण्यासाठी तसेच दिग्गज उद्योगपतींची जडणघडण सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्ासाठी मेहता प्रकाशनतर्फे नवीन चार दर्जेदार अनुवादित पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. माणूस अनेकदा आत्मशोधाच्या प्रतिक्षेत असतो. या शोधात त्याला अनेक प्रश्न पडतात. आपण यशस्वी होऊ ना, यशाचे सूत्र गवसेल का नाही असे प्रश्न त्याला पडतात. त्यामुळे वेळ येते ती आत्मपरीक्षणाची. ते करताना आजूबाजूला विविध क्षेत्रातील मातब्बरांची मातब्बरी पहायला मिळते. ही माणसं मोठी कशी झाली आणि त्यांनी पाहता पाहता आकाशाला गवसणी कशी घातली हे तपासून पाहताना आश्चर्य वाटतं. म्हणूनच अशा विलक्षण उमेद लाभलेल्या व्यक्तिमत्त्वाची जीवनगाथा पडताळून पाहण्याची संधी मिळाली की गमवावीशी वाटत नाही. ‘मेहता प्रकाशन’तर्फे अलीकडेच अशी चार पुस्तके बाजारात आणण्यात आली आहेत. धीरूभाईझम, प्रतिकूलतेवर मात, नवभारताचे शिल्पकार आणि ईट हॅपन्ड इन इंडिया या चार पुस्तकांनी प्रत्येक सामान्य माणसाची जिगर जागवल्यास नवल नाही. धीरूभाईझम आणि प्रतिकूलतेवर मात या ए. जी कृष्णमूर्ती लिखित दोन पुस्तकांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांमधून धीरूभाई अंबानी यांचे कार्यविषयक असामान्य तत्त्वज्ञान आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या शौर्याची, अथक प्रयत्नांची विलक्षण कहाणी रेखाटण्यात आली आहे. वस्तुत: धीरूभाई अंबानी हेच एक विद्यापीठ आहे. ज्या उमेदीने त्यांनी व्यवसाय केला, अनेक संकटावर मात केली आणि ‘आम्ही माणसांच्या भरवशावर धोका पत्करतो’ हे जीवनसूत्र मानले त्याची स्पष्ट झलक धीरूभार्इंवरील दोन पुस्तकांमुळे मिळते. दोन्ही पुस्तकांना ज्येष्ठ उद्योगपती आणि सुपुत्र मुकेश अंबानी यांची प्रस्तावना लाभली आहे. संपूर्ण हयातीत धीरूभाई ‘आशा हे तुमचं सर्वात शक्तीमान शस्त्र आहे, तर आत्मविश्वास हे सर्वात मोठी जमेची बाजू आहे’ असं सांगत राहिले. मुकेश अंबानी यांनी हे सूत्र उचलून धरताना धीरूभार्इंच्या आयुष्यातील अनेक टप्पे जवळून वर्णन केले आहे. ‘गुरू’ या चित्रपटातून धीरूभार्इंना समांतर असे एक व्यक्तिमत्व चितारण्यात आले आणि त्यामुळे त्यांची यशोगाथा रूपेरी कहाणी बनून जगापुढे आली. या कहाणीचा तपशिलवार घेतलेला मागोवा दोन पुस्तकांमधून पहायला मिळतो. ‘प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातील प्रतिकूलता असूनही, किशोरवयीन स्वातंत्र्यसेनानी, संपूर्ण विश्वास-एक जीवनमार्ग, आव्हानं, अशक्य? - ते काय असतं? विशालहृदयी नेता आदी टप्प्यांमधून धीरूभार्इंचे नेमकं व्यक्तिमत्त्व उलगडतं. धीरूभार्इंनी म्हटलं होतं, ‘आपण स्वप्न बघण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तेसुद्धा भव्य स्वप्न बघण्याचं,’ हे स्वप्न त्यांचे दोन्ही सुपुत्र आज अंमलात आणत आहेत. या संपूर्ण परिवाराने अशा ठराविक गृहितकांवर अढळ श्रद्धा ठेवत मिळवलेलं यश आवर्जून तपासून पाहण्याजोगं आहे. दोन्ही पुस्तके सुमारे ७० पानांची असून त्यांची किंमत अनुक्रमे ८० आणि ७० रुपये अशी आहे. ‘मेहता प्रकाशन’च्याच ‘इट हॅपन्ड इन इंडिया’ या पुस्तकाने अशीच एक जिगरबाज कहाणी मांडली आहे. भारतातील किरकोळ विक्री क्षेत्राचा पसारा गेल्या पाच वर्षात वाढला. या काळात हृदयात धडकी भरवणारे टोलेजंग मॉल्स धडाधड उभे राहिले आणि त्यांचे करोडोंचे अर्थकारण समजून घेता घेता सामान्यजनच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गजही हबवूâन गेले. मॉल्सच्या वाढत्या पसाNयात बिग बझार, सेंट्रल, पेंटॅलून्स, फूड बझार यांच्या शृंखलांनी अनेकांचे डोळे दिपवले. या सर्व उद्योगांचे प्रमुख म्हणून किशोर बियाणी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय उद्योगजगतात विशेष नाव कमावणाऱ्या बियाणींची सध्या ‘इट हॅपन्ड इन इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या निमित्ताने चांगली चर्चा होत आहे. वस्तूत: नामांकित उद्योजकांना बियाणींचा किरकोळ विक्री क्षेत्रात धडाक्याने उतरण्याचा उपक्रम म्हणजे एक पोरखेळ वाटला होता. चाकोरीबद्ध व्यवस्थापकांना त्यांच्या तार्विâक विचारप्रणालीनं गोंधळात टाकलं होतं. त्यांच्या बेपर्वाई बघून सहकारी काळजीत पडले होते. असे असताना बियाणी मात्र आपल्या तत्त्वानुसार पुढे जात राहिले. भरभराट अनुभवणाऱ्या भारतीय बाजारपेठेद्वारे मिळणाऱ्या विविध गुप्त संधींचा उपयोग त्यांनी करून घेतला आणि भारतीय किरकोळ विक्रीक्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. प्रचंड जाहिरातबाजी करून आणि विक्रीच्या नवनवीन क्ऌप्त्या लढवून बियाणींनी बाजारपेठेतली हलचल कायम ठेवली. त्यामुळे आज त्यांच्या नावापेक्षा विक्री कल्पनांची विशेष चर्चा आढळते. ‘इट हॅपन्ड इन इंडिया’ या पुस्तकातून त्यांची कहाणी टप्प्याटप्प्याने उलगडून दाखवली आहे. व्यवसायाच्या भारतीय शैलीवर श्रद्धा ठेवून ग्राहकांच्या मनाचा अचूक वेध घेणाऱ्या बियाणींच्या यशोगाथेची ही झलक आवर्जून अनुभवण्याजोगी आहे. माणसाने अनुभवातून सतत काही तरी शिकत जावं असं म्हणतात. हा नियम खरा मानायचा तर बियाणींचे अनुभव तपासून पहायला हवेत. ‘इट हॅपन्ड इन इंडिया’चे लेखक स्वत: किशोर बियाणी आणि दीपायन वैश्य असून मराठी भाषांतर उषा महाजन यांनी केले आहे. सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. २२४ पानांचे हे पुस्तक १८० रुपयाला उपलब्ध आहे. आयुष्यात काही तरी करून दाखवण्याची प्रेरणा देणारे आणखी एक दर्जेदार पुस्तक म्हणजे ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक महणजे ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांनी भारतीय उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या नेतृत्वांशी केलेली दिलखुलास बातचीत आहे. एक मुलाखतकार आणि मुत्सद्दी लेखक म्हणून वीर संघवी सर्वांनाच परिचित आहेत. त्यांनी प्रश्नांची गुगली टाकत अनेकांना बोलते केले आणि गोंधळवून टाकले पण, उद्योगक्षेत्रातील काही मातब्बरांच्या यशोगाथा पडताळून पाहताना ते स्वत:च चकित झाले. त्यातूनच नवभारताच्या ११ रत्नांचा परिचय करून देण्याचे त्यांच्या मनाने धाटले. हे अकराजण म्हणजे नंदन निलेकणी, कुमार मंगलम बिर्ला, सुनील मित्तल, राजीव चंद्रशेखर, अझीम प्रेमजी, सुभाष चंद्रा, बिक्की ओबेरॉय, नसली वाडिया, उदय कोटक, विजय मल्ल्या आणि रतन टाटा. या सर्वांच्या जडणघडणीची कुतुहलजनक गाथा वीर संघवी यांनी मांडली असून त्याचा नेटका अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. संघवी यांनी वर्णन केलेली या अकराजणांची टीम आपल्याला उद्योगजगतातील अनेक बारकावे उलगडून दाखवतेच पण विविध क्षेत्रातील संधींचा फायदा कसा घेतला गेला हे पडताळून दाखवते. भारतीय उद्योगक्षेत्र आणि त्यातील जिद्दीची कहाणी जवळून समजून घ्यायची तर या पुस्तकाला पर्याय नाही. १२४ पानांचे हे पुस्तक १०० रुपयांना उपलब्ध आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKASHA 23 -08 -2009

    नवभारताचे शिल्पकार… भारत स्वतंत्र झाला त्या वेळी ज्यांना खऱ्या अर्थाने उद्योगपती म्हणता येते असे दोनच उद्योगपती देशात होते. उद्योगपती म्हटले की, लोकांना जमशेदजी टाटा आणि बिर्ला कुटुंबीय यांच्या नावाची आठवण व्हायची. नंतरच्या काळात अनेक नवे घराणे या कषेत्रात आले त्यापैकी मफतलाल, नंदा, महेंद्र या कुटुंबांचा विचार करावा लागेल. १९५६ च्या सुमारास देशात खऱ्या अर्थाने औद्योगिकरणाला अनुकूल असे वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. विकास करायचाच या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याची तयारी सुरू केली. त्याच वेळी पुढील काळात देशातील उत्पादने देशी नसतील अशी काळजी घेण्यात आली. या सुमारास धीरूभाई अंबानी यांनी परदेशातून येऊन रिलायन्सचा पाया घातला. पुढे १९७० च्या सुमारास इलेक्ट्रॉनिक क्रांती झाली. या क्रांतीने उद्योग व्यवसायासाठी किती तरी क्षेत्रे नव्याने उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा घेऊन नारायण मूर्ती यांनी इन्फोसेसचा पाया घातला तर अजीज पे्रमजी यांनी विप्रोचे क्षेत्र वाढविले. सुभाष चंद्रा, उदय कोटक, विजय मल्ल्या, बी. के. ओबेरॉय, कुमार मंगलम बिर्ला आदींनी या क्षेत्रात भरारी घेतली. या लोकांना देशाला औद्योगिक चेहरा मिळवून दिला. खुल्या अर्थव्यवस्थेनंतर यापैकी अनेकांनी आपले उद्योग क्षेत्र देशाबाहेर वाढवले. देशात उत्पादित होणाऱ्या मालाची गुणवत्ता व दर्जा वाढविला. आंतरराट्रीय दर्जेचे उत्पादने देशात सुरू झाली. भारतीय उत्पादने इतर देशातील उत्पादनाच्या तुलनेत सरस असली तरी त्याची किंमत मात्र कमी असते. त्याचा फायदा घेऊन हे उद्योग घराणे वाढत राहिले आणि देशाचा लौकिकही वाढत राहिला. भारताला नवा चेहरा मिळवून देणाऱ्या काही लोकांविषयी वीर संगवी यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न नवभारताचे शिल्पकार या पुस्तकामार्फत बाहेर आला. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला असून मेहता पब्लिकेशन हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. उद्योजक हा जन्मावा लागतो, यशस्वी उद्योजक होण्यासाठी उद्योगधंद्याचे ज्ञान पाहिजे. त्याच वेळी परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. परिश्रम हे योजनाबद्ध असले पाहजे. अलीकडे उद्योगधंद्यात यशस्वी होणाऱ्या लोकांना फार लवकरच प्रचंड पैसा मिळतो, पैसा मिळाला म्हणून माणसे बदलतात. अशी माणसे उद्योग व्यवसाय क्षेत्रात दीर्घकाळ टिकून राहू शकत नाहीत. व्यवसायात टिकून राहण्यासाठी काळाचा वेग घेणे मानवी स्वभावाचे निरीक्षण आणि स्वतःच्या वागण्यात बदल करण्याची तयारी पाहिजे, असे या लोकांचे चरित्र पाहिले तर प्रकर्षाने लक्षात येते. नवभारताचे शिल्पकार या पुस्तकात यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती आहेत. त्यांचे चरित्र नाही. लेखकाने त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून त्यांच्या कामाचे महत्त्व उलगडत जाते. त्यासाठी संबंधितांनी बराच अभ्यास केला असावा असे सहज लक्षात येते. मोठ्या माणसांच्या मुलाखती मिळविणे आणि प्रत्यक्ष मुलाखत घेणे सोपे नाही या बाबीचा प्रत्यय जागोजागी येत असतो. इन्फोसिस ही जगातली एक मोठी आयटी कंपनी. इन्फोसिसची स्थापना करणारे नारायण मूर्ती आणि नंदन नीलकेनी हे पाटणी कॉम्प्युटरमध्ये कर्मचारी होते. एका किरकोळ कारणावरून त्या दोघांनीही पटणी कॉम्युटर्स कंपनी सोडली आणि इन्फोसिसची स्थापना केली. नारायण मूर्ती हे तरुणवयात साम्यवादी विचारांकडे आकर्षित झालेले उद्योजक आहेत. इन्फोसिसची उभारणी करताना त्यांनी आपली साम्यवादी विचारसरणी सोडली असावी असे वाटत नाही. त्यांच्यासाठी इन्फोसिस ही प्रायव्हेट लिमिटेड करणे अवगत नव्हते. तरीही त्यांनी इन्फोसिस ही पब्लिक लिमिटेड कंपनी केली. या एकाच कृतीमधून नारायण मूर्ती आणि नंदन यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. इन्फोसिसबद्दल सांगितले जाते की, या वंâपनीत काम करणारा एकूण एक कामगार हा कंपनीचा मालक आहे. कामगार भरती करताना व्यवस्थापनाने जात-पात-धर्म-राजकीय विचारसरणी यांना थारा दिला नाही. फक्त गुणवत्ता पाहिली. त्यामुळेच आज ही वंâपनी जगातल्या बलाढ्य आणि चांगला नफा मिळविणाऱ्या कंपनीपैकी समजली जाते. अजीज प्रेमजी हे विप्रोचे मालक. विप्रोचा आयटी क्षेत्रात प्रवेश होण्यापूर्वी प्रेमजी यांचा वनस्पती तूप उत्पादनाचा व्यवसाय होता. शिवाय साबण उत्पादनही चालू होते. प्रेमजी यांनी या क्षेत्रात पदार्पण केले आणि आज ते भारतातील सर्वांत श्रीमंत म्हणून ओळखले जातात. उदय कोटक - महिंद्रा, विजय मल्ल्या, कुमार मंगलम बिर्ला, राजीव चंद्रशेखर, ओबेरॉय यांचेही चरित्र अशीच कर्तृत्वांनी भारावलेली आहेत. या लोकांनी उद्योग-व्यवसाय वाढविला आणि हजारो लोकांच्या रोजगाराची सोय केली. उद्योजक हा प्रशिक्षणाने तयार होत नसतो ही बाब त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more