* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAN, INTERRUPTED
  • Availability : Available
  • Translators : VIDULA TOKEKAR
  • ISBN : 9788184980929
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JAMES BAILEY SUFFERED FROM A BIZARRE AND DEBILITATING FORM OF OBSESSIVECOMPULSIVE DISORDER (OCD). HE WAS ACUTELY ANXIOUS ABOUT MIND-ALTERING DRUGS GETTING INTO HIS SYSTEM AND WARPING HIS BEHAVIOUR. PARANOID QUESTIONS WOULD ROUTINELY PLAGUE HIM. WERE PEOPLE TRYING TO SPIKE HIS FOOD? COULD HE GET HIGH JUST BY TOUCHING A PHOTOGRAPH OF A MARIJUANA LEAF? THE TREATMENT PROGRAMME HE WENT THROUGH AT A SPECIALIST AMERICAN CLINIC BROUGHT HIM FACE TO FACE WITH HIS NIGHTMARES. HE WAS ASKED TO MINGLE AND SHAKE HANDS WITH THE LOCAL JUNKIES, OVERCOMING HIS FEAR THAT WHATEVER THEY`D TAKEN WOULD BE TRANSMITTED TO HIM THROUGH THEIR SKIN. THE LONGER HE RESISTED WASHING HIS HANDS, THE BETTER HE WAS GETTING. IT IS A TESTIMONY TO BAILEY`S INDOMITABLE SPIRIT THAT HE IS NOW ABLE TO SEE THE ABSURDITY OF MANY OF THE BIZARRE SITUATIONS IN WHICH HE FOUND HIMSELF, AND THIS QUIRKY SENSE OF HUMOUR, COMBINED WITH HIS STRENGTH OF CHARACTER, HELPED HIM TO RECOVER AND GO BACK OUT TO FACE THE WORLD AGAIN. MAN, INTERRUPTED GIVES US A GLIMPSE INTO THE TORTURED WORLD OF A MAN SUFFERING FROM WHAT IS AN INCREASINGLY COMMON DISORDER. BUT FAR FROM BEING A DOOM-LADEN ACCOUNT OF MENTAL ILLNESS, THE RESULT IS UNIQUELY REVEALING, HILARIOUSLY ENTERTAINING AND WONDERFULLY REWARDING.
यथार्थ स्मृतिचित्रे – डेली टेलिग्राफ तुमचं हृदय काम करत असेल आणि तुम्ही हसू शकत असाल, तर हे पुस्तक घरी न्या. तुम्हाला ते आपलंसं वाटेल – ब्रायन रेली. चित्रपट निर्माता. जेम्सच्या भावनिक प्रवासाचे फार गंभीर आणि गमतीदार चित्रण... क्याचर इन द राय आणि वन फ्लू ओव्हर द ककूज नेस्ट यांच्या मधली ही गोष्ट आहे – विचित्र विलक्षण जेम्स बेली हा विचित्र आणि खचवून टाकणा-या ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) ने ग्रासला होता. मनावर परिणाम करणारी औषधं आपल्या शरीरात जातील आणि आपल्या मनावर ताबा मिळवतील, या भीतीने तो पछाडला होता. भीतिदायक प्रश्नांनी नेहमी त्याच्यावर पगडा बसवलेला असायचा. लोक त्याच्या अन्नात काहीतरी मिसळतील का? मारिजुआनाच्या पानांच्या फोटोला हात लावला तर नशा चढेल का? अमेरिकेतील एका विशेष रुग्णालयात, त्याच्यावरच्या उपचार कार्यक्रमामध्ये तो आपल्या सर्व भयानक दु:स्वप्नांना सामोरा गेला. त्याने स्थानिक भणंगांमध्ये मिसळावं, त्यांच्याशी हात मिळवावेत आणि त्यांनी जे काय घेतलं आहे ते त्यांच्या आणि आपल्या त्वचेमार्फत आपल्या शरीरात जाईल, या भीतीवर मात करावी; असं त्याला सांगण्यात आलं होतं. हात धुण्याची प्रबळ इच्छा तो जेवढी पुढे ढकलू शकेल, तेवढा तो सुधारेल. हे कथन म्हणजे बेलीच्या अजिंक्य चैतन्याचा आविष्कार आहे, की जो, स्वत: ज्या अतर्क्य प्रसंगांत होता, त्यातली विसंगती आता सांगू शकत आहे आणि ही मिश्कील विनोदबुद्धी आणि त्याच्या जोडीला असलेली चारित्र्यातली शक्ती यामुळेच त्याला बरं व्हायला आणि परत येऊन जगाला सामोरं जायला बळ मिळालं आहे. ‘मॅन, इंटरप्टेड’ हे आपल्याला माणसाच्या दिवसेंदिवस अधिकच दृष्टीस पडणाऱ्या, पिळवटून टाकणा-या एका जगाची ओळख करून देतं. पण हा एक मानसिक आजाराचा नीरस वृत्तान्त राहत नाही; तर एक अत्यंत खुलं, प्रचंड करमणूक करणारं आणि अतिशय समाधान देणारं रंजक कथन होऊन जातं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MANINTERRUPTED #MANINTERRUPTED #मॅनइंटरप्टेड #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIDULATOKEKAR JAMES BAILEY "
Customer Reviews
  • Rating StarDainik Deshdoot 19.9.10

    मानसिक व्याधी किती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. भीती, क्रोध, तिरस्कार, द्वेष, काळजी, असूया या प्रकारच्या मानसिक व्याधींनी हैराण किंवा त्रस्त झालेले लोक याबद्दल मानसोपचारसुद्धा घेतात. हा उपचार घेण्याचा कालावधी पार पाडणं एक दिव्य असतं. हे दिव्य पार करतना त्याला कुटुंबाची आणि स्नेहीमंडळींची सोबत हवी असते. ऑब्सेसिव्ह कंपाटसिव्ह डिसऑर्डर नावाच्या मनोरुग्णाची कथा-व्यथा वाचण्यात आली. (ओसीडी) सतत जीवाच्या भीतीने तो सत्रस्त असायचा. कोणी आपल्या अन्नात काही विष तर नाही मिसळणार? कुणाच्या स्पर्शातून एखादं व्यसन अंगात संचारणार तर नाही? इतकंच काय मारिजुआनाच्या पानांचा फोटोसुद्धा त्या व्यक्तीला भयावह वाटतो म्हणजे किती अडचणीत हा रुग्ण सापडला होता, हे कळते. पुन्हा पुन्हा कुलूप नीट लागलंय की नाही हे ओढून बघणं, नळ, लाईट बंद असण्याची सतत खात्री करत रहाणं, हे वरकरणी अगदी बालिश वाटतं पण हा एक फार मोठा मानसिक रोग आहे. त्यापासून सुटका करून घेताना बेली या पात्राला आलेले अनुभव या पुस्तकात विशद केले आहेत. ‘मॅन इंटरप्टेड’ असं या पुस्तकाचं नाव आहे. विदुला टोकेकर यांनी अगदी मानवतावादी दृष्टिकोनातून याचा अनुवाद केला आहे. त्या म्हणतात, या रोगाचा रुग्ण हा सतत भंगलेल्या विचारांचा बळी असतो. तरीही ते दिसून न येण्याच्या खटपटीत तो अधिकच केविलवाणा दिसतो. अशा रुग्णांना सहानुभूतीबरोबरच आधार देण्याचीही गरज असते. आपल्या भारतीय संस्कृतीत नशिबाने कुटुंब व्यवस्थेमुळे फारसं कुणाचं बालपण असुरक्षित राहत नाही. परंतु परदेशात मात्र सुरक्षित बालपणामुळे अनेक संकटं उभी राहतात. त्यापैकी या मनोव्यापारांच्या व्याधी असतात. एक काम करणारा अभिनेता ते ओसीडी रोगाने पछाडलेला मनोरुग्ण असा जेम्स बेली यांचा जीवनपट यातून उलगडत जातो. या रोगाच्या रुग्णानेच स्वत:चे अनुभव जसेच्या तसे कथन केले आहेत. सतत निराधार, अनाठायी भीती आणि काळजीने ग्रासलेली ही व्यक्ती ‘जर-तर’च्या फेऱ्यात अडकते. समुपदेशक, डॉक्टर, इतर रुग्ण अशी सगळी सरमिसळ यातून वाचायला मिळते. काही रुग्ण सतत हातपाय धुऊन जंतू संसर्गापासून सुटका करून घेणारे तर काही पुन्हा पुन्हा तेच संदर्भ टिपून ठेवणारे असा माहीत असताना स्वत:ला त्यातून प्रयत्नपूर्वक बाजूला काढून या रोगाशी सामना करणे तर अगदी कठीण काम होते. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करून जेम्स बेली यातून कसा बाहेर येतो हे वाचून वाचकांनी स्वत:ची या रुग्णांसाठी असलेली दूरदृष्टी व्यापक केली तर अनुवादिकेला आनंद होईल इतके त्यांनी हे अनुभव जिवंतपणे मांडलेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.