VRUSHALI PATWARDHAN

About Author

Birth Date : 05/12/1955


DR. VRUSHALI PATWARDHAN IS WELL KNOWN AS A CAUSAL NEWS READER, AIR, PUNE FOR 30 YEARS. SHE IS FIRST RANK HOLDER IN M.A. HINDI, PUNE UNIVERSITY AND OBTAINED PH.D. FROM S.N.D.T. UNIVERSITY. SHE IS A WELL-KNOWN VOICE ARTIST AND HAS GIVEN HER VOICE FOR A NUMBER OF DOCUMENTARIES, RADIO ADVERTISEMENTS AND ALSO FOR ‘GANPATI FESTIVAL SCENES, PARTICIPATES IN STAGE SHOWS. HER TRANSLATED BOOKS (MARATHI OSHO’S SHIVSUTRA, A SERIES OF N. A. WALSH’S CONVERSATION WITH GOD, A NUMBER OF BOOKS FOR CHILDRENS. SHE IS FELICITATED BY VARIOUS ORGANIZE FOR HER CULTURAL AND SOCIAL CONTRIBUTION.

डॉ. वृषाली पटवर्धन आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त निवेदिका म्हणून परिचित आहेत. हिंदी साहित्यात त्या एम.ए. एम.फिल. आहेत. तसेच पीएच.डी पदवाहीR प्राप्त केली. आहे. पुण्याच्या नामवंत वरिष्ठ महाविद्यालयांत त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. या व्हॉईसिंगच्या क्षेत्रातील आघाडीच्या कलाकार असून त्यांनी आजवर अनेक लघुपट, माहितीपट, आकाशवाणी व दूरदर्शनवरील जाहिराती इ.साठी आवाज दिला आहे. अभिवाचन, काव्यवाचन, रंगमंचावरील कार्यक्रम व आकाशवाणीवरील प्रायोगिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्या करतात. मेहता पब्लिशिंग हाऊसकडून त्यांनी मराठीतून अनुवादित केलेले बालसाहित्य, ओशो यांचे शिवसूत्र आणि गीतादर्शन हे ग्रंथ, एन.ए.वॉल्श यांच्या ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’ या प्रसिद्ध पुस्तक मालिकेतील दोन भाग प्रकाशित झाले आहेत. आजपर्यंत विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले आहे. ‘सिद्ध चॅरिटेबल ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा प्रमुख सहभाग असतो. संस्थेने याआधी प्रकाशित केलेल्या ‘नाथ-गीता’ आणि ‘नाथ-भागवत’ या ग्रंथांच्या लेखणीधरही त्याच आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 16 total
AMMA , MALA SHIRDILA GHEUN CHAL Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, CHAL TIRUPATILA JAU Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, MALA SALIM CHISTINCHYA DARGYAL... Rating Star
Add To Cart INR 195
AMMA, MALA SUVARNA MANDIR DAKHAV Rating Star
Add To Cart INR 195
CHALA JANUN GHEU YA HASTASAMUDRIK Rating Star
Add To Cart INR 50
CHALA JANUN GHEU YA PARMARTH Rating Star
Add To Cart INR 70
CHICKEN SOUP FOR THE SOUL INDIAN MOTHERS Rating Star
Add To Cart INR 270
CHITRAMAY RANGATDAR KATHA MALIKA 6 (... Rating Star
Add To Cart INR 180
ELMER MALIKA Rating Star
Add To Cart INR 300
34 %
OFF
OSHO COMBO SET - 33 BOOKS Rating Star
Add To Cart INR 5880 INR 3869
SACHITRA MAHABHARAT Rating Star
Add To Cart INR 350
SACHITRA RAMAYAAN Rating Star
Add To Cart INR 299
12

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more