* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAHILE PAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617296
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 124
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A SET OF TWENTY SHORT ESSAYS FROM THE VAST COLLECTION OF ESSAYS BY THE EMINENT AUTHOR. THE TOPICS ARE A COMBINATION OF POETRY, HUMOUR AND PHILOSOPHY. KHANDEKAR HAD HIS OWN ASSUMPTIONS ABOUT THE NATURE OF SHORT ESSAYS. HE BELIEVED IN JUST A TOUCH OF HUMOUR WITH LITTLE BIT OF POETIC LANGUAGE AND TRACE OF PHILOSOPHY. HE WAS A MAN OF FEW WORDS LOADED WITH DEEP MEANING. HIS ESSAYS ARE GENERALLY A MIXTURE OF IMAGINATION, FEELINGS AND THOUGHTS. IN HIS MIND’S EYE, HE ALLOWS HIS IMAGINATION TO RUN FAR AND WIDE. READING HIS ESSAYS WILL BE A TREAT TO MIND AND EYES.
श्री. वि. स. खांडेकर यांच्या मंझधार या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंघांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधात दिसतो. लघुनिबंधातील काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमवूÂ लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधाविषयीच्या श्री. खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात श्री. खांडेकरांच्या लघुनिबंधांत तत्त्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #पहिले पान
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    कोमल कविमनातून अंकुरलेले पहिले पान… वि. स. खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या ६१ लघुनिबंधांच्या मूळ संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा ‘पहिले पान’ नावाचा संग्रह आहे. या संग्रहातील प्रत्येक लघुनिबंध म्हणजे रम्य कल्पनाविलास तर आहेच; पण त्याबरोरच जीवनाचे तत्त्वज्ञानही त्यातून सूचित केले आहे. कोमल, सात्त्विक असा वाचनात रमविणारा तसेच अंतर्मुख करणारा जणू काव्यानुभवच आहे. ‘पहिले पान’ निबंधात कादंबरीसाठी पहिले पान लिहायला सुरुवात करण्यापूर्वी प्रतिभावंत लेखकाच्या मन:स्थितीचा अस्वस्थपणा दाखवला आहे. जणू काही कळीला फुलण्याच्या आधी जाणवणारा अस्वस्थपणा! जनमाला येणाऱ्या अपत्याच्या कल्पनेने आईच्या अंत:करणातले कोमल भाव, मनातली आंदोलनं वाचताना वाचकही त्या रम्य, उदात्त कल्पनेशी एकरूप होतो.’ ‘संसार’ या लघुनिबंधात संसारात सुख अधिक, की दु:ख अधिक हा बाह्यत: हास्यास्पद वाटणारा प्रश्न लेखकाच्या व वाचकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. तरीही शेवटी, संसार हा बाह्यत: भोगाने घडविलेला असला तरी त्याचा ..... त्यागाचा आहे. या निष्कर्षाप्रत लेखक येतातच. लेखकांनी निसर्ग सान्निध्याचा घेतलेला उत्कट अनुभव व आस्वाद विलोभनीय आहे. मग तो ऊबदार समुद्रस्नानाचा अनुपम असा उन्माद असो किंवा आपल्या माथ्यावर पसरलेल्या सशापासून हत्तीपर्यंत निरनिराळ्या आकारातील पांढऱ्याशुभ्र ढगांच्या सुंदर दृश्याचा आविष्कार असो. लेखक मनातील आठवणीच्या पेटीत रमून जातात. या आठवणी म्हणजे आयुष्यातील संचित सुख आहे. त्या जीवाभावाच्या मैत्रिणीप्रमाणे आयुष्यात सदैव साथ देतात. पुरोगामी सुधारक होण्याच्या नावाखाली आपले जीवन अधिकाधिक रुक्ष, रटाळ होऊ लागले आहे, हे सुचविणारा ‘पार्श्वसंगीत’ हा लघुनिबंध! लग्न हे रमणीय उद्यानात किंवा जलाशयाच्या काठी व्हायला पाहिजे. निसर्ग आणि मनुष्य यांच्यातील नाते यंत्रयुगात विरळ होत चालले आहे. काव्यमय अशा गोरज मुहूर्तावरील लग्न म्हणजे दोन जीवांना एकजीव करणारा सुंदर मधुर क्षण! हा मुहूर्त शोधून काढणाऱ्याला लेखकांनी महाकवी संबोधले आहे. ‘आवडते फूल’ या लघुनिबंधात लेखक हळुवार होतात. बकुळीची पिटुकली फुले, चिमुकली जाई जुई, रंगाची राणी अबोली, सुगंधाची राणी रातराणी या सर्व फुलांनी खरोखरच आपले जीवन धुंद केले आहे. म्हणूनच ‘तुमचे आवडते फूल’ या यक्षप्रश्नाला ‘जगातली सर्व फुले न पाहिलेली सुद्धा!’ हेच उत्तर यथार्थ वाटते. अनेकवेळा उदासीनपणाच्या छायेत माणूस जगतो. ‘स्टेशन’ या निबंधातून लेखकांनी उदासीनपणा झटकून जीवनाकडे पाहण्याचा आपला रसपूर्ण दृष्टिकोन प्रगट केला आहे. जीवन म्हणजे हासू, आसू, दया, प्रेम, त्याग, वात्सल्य, या सर्वांचे संमेलनच जणू! माणसाच्या मनातले सारे सूक्ष्म सुगंध एकमेकांना जाणवले तर दु:ख किती सुसह्य होतील हा लेखकाचा आशावादी दृष्टिकोन ‘जुनी पाती’ या निबंधात प्रगट होतो. ‘झोपाळा’ या निबंधात विनोदाचा मोहकपणा वाचकाला खुलवितो. ‘चांगली जागा मिळायला विशेषत: झोपाळा टांगता येईल असे घर मिळण्यासाठी भाग्य लागते,’ हे आपले म्हणणे विनोदी शैलीत पटविले आहे. अनेक प्रकारच्या तथाकथित आरामशीर बैठका व विश्रांतिस्थाने आपल्याला नकोशी का वाटतात व हृदयातील झऱ्यांना पाझर फोडणारी जादूची शक्ती झोपाळ्यात कशी आहे याचे रहस्य उलगडून सांगणारे रोमांचक वर्णन केले आहे. तसेच चौदा आण्याच्या सौद्यातला आनंद सांगणारा मंडईतील सर्वसामान्य पण अपूर्व अनुभव काव्यमय आहे. मिरची, कोथिंबीर, भोपळे, शेपू, वरकरणी रुक्ष दिसणाऱ्या भाज्यांचे सौंदर्य पाहायला लेखकांसारखे कोमल कविमनच हवे. अन्यथा व्यवहारापलीकडे व उपयोगापलीकडे अशा वस्तूंचा आपण विचारच करत नाही. ‘पुस्तकातल्या खुणा’ हा मनाला खरोखरच भिडणारा निबंध. परत परत वाचावासा वाटणारा! पुस्तकातील निळ्या तांबड्या खुणांप्रमाणेच आपल्या जीवनग्रंथातही आपण पानापानावर पैशामधून प्रतिष्ठेपर्यंत अनेक गोष्टी लिहितो. खुणा करतो. तेच आयुष्यातील अमर धन असते. त्यांच्या आठवणीतच जगण्यात मोठा आनंद आहे. हे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान वाचकाला अंतर्मुख करते. अशा तऱ्हेने अनेक सोप्या विषयांना धरून ‘मच्छरदाणी’, ‘पतंग’, ‘उपदेश’, ‘फुलपाखरू’, ‘पांढरे ढग’ या निबंधांतून लेखकांनी केलेल्या मनोगतातून त्यातील कल्पनारम्यता, सहजसुंदरता, जीवनाविषयीचे मार्मिक तत्त्वज्ञान वाचकाला अंतर्मुख करते व मार्गदर्शनपर ठरते. पुस्तक वाचून संपविल्यावर असे वाटते, की निबंधांचे वेगवेगळे संग्रह करून वाचकाचा आनंदही सुटसुटीत सोयीस्कर केला आहे की काय? सर्व लघुनिबंधांचा एकत्र संग्रह वाचण्यात, तोही कोणत्याही वयात वाचण्यातील सुख काही औरच आहे. मुखपृष्ठावरील चित्र सुचक व सुंदर आहे. पुस्तकाची ही नवीन आवृत्ती जुन्या व नव्या पिढीतील वाचकांना निश्चितच आवडेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more