* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANZADHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617326
  • Edition : 3
  • Publishing Year : 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VERSES IN THE SHORT ESSAY SHOULD BE LIKE THE SOFT GOLDEN SHADES OF THE SETTING SUN, THE HUMOR SHOULD BE AS CHARMING AS A HALF-BLOOMED LOTUS, BUT DELICATE...NOT A BELLY LAUGH, JUST A CHEEK-STIRRING...AND THE PHILOSOPHY IT IMPLIES SHOULD BE AS SPARSE, BUT BEAUTIFUL, AS THE MOONS JUST BEGINNING TO SHINE ON THE HORIZON. KHANDEKAR`S PERCEPTION OF SUCH IDEAL SHORT ESSAYS SHOULD BE.
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MANJADHAR #V S KHANDEKAR #SHRI #TILGUL #SUKLELYA PHULANCHA SUGANDH #NAU GUNTHE #JAMIN #PRAVAS #CHIMNICHE PILLU #PHOTOGRAPHERCHYA DUKANAT #DIVYA BHAS #TACHANYA #UPEKSHIT NAYIKA #DON SHABDHA #PUNHA EKDA #DAINANDINI #JUNI CHITRE #CRICKET ANI NATAK #EK ABHIPRAY #AKASHWANI #DULAKI #GOD SHEVAT #मंझधार #वि. स. खांडेकर # श्री #तिळगूळ #सुकलेल्या फुलांचा सुगंध #नऊ गुंठे #जमीन # प्रवास #चिमणीचे पिल्लू #फोटोग्राफरच्या दुकानात #दिव्य भास #टाचण्या #उपेक्षित नायिका # दोन शब्द #पुन्हा एकदा #दैनंदिनी #जुनी चित्रे #क्रिकेट आणि नाटक #एक अभिप्राय #आकाशवाणी #डुलकी #गोड शेवट#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, NASHIK 12-10-1997

    मंझधार : सर्वस्पर्शी लघुनिबंध संग्रह… वि. स. खांडेकर यांच्या प्रिती विलासाच्या मध्यान्हकाळी म्हणजे १९५९ मध्ये त्यांचा ‘मंझधार’ हा ६१ लघुनिबंधाचा संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यात खांडेकरी लघुनिबंधाची वैशिष्ट्ये, गुणदोष यांचे एकत्रित दर्शन एकाच ग्रंथा होत असे. अशा समग्र ग्रंथाचे विभाजन करून ‘पहिले पान’, ‘मंझधार’ आणि ‘धुके’ असे तीन लघुनिबंध संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने अलीकडेच प्रसिद्ध केले. त्यामुळे कदाचित ग्रंथ विक्री-वितरणाची व्यावहारिक सोय झाली असली तरी अभ्यासकांना मात्र असे विभाजन क्लेशकारक वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जी विशिष्ट दृष्टी ठेवून खांडेकरांनी आपल्या लघुनिबंधांची क्रमवारी मांडणी केलेली असे तिलाच तिलांजली मिळण्याचा संभव अशा परिस्थितीत निर्माण होतो. थोर साहित्यिकांचे अभिप्रेत दृष्टिकोनही इतिहासजमा होऊ नयेत. असेच कोणाही साहित्यप्रेमीला वाटत राहणार. ‘मंझधार’या लघुनिबंधसंग्रहात वीस लघुनिबंधांचा समावेश करण्यात आला आहे. १९४८ ते १९५६ या काळात त्यांचा लेखनाविष्कार झालेला आहे. १९४८ मधील ‘उपेक्षित नायिका’ आणि १९४९चा ‘एक अभिप्राय’ हे दोन लघुनिबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तुकारामाची पत्नी जिजाईच्या जीवनदृष्टीचा अत्यंत सुरेख व सखोल परामर्श खांडेकरांनी घेतला आहे. तिची तुलना चांदबिबी, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, शकुंतला, सीता, वसंतसेना आदींशी कौशल्याने केली आहे. सारखा तोंडाचा पट्टा चालविणाऱ्या जिजाईसमोर तुकाराम हा वीर पुरुषही होता. हे नमूद करून त्याच्या जागी आपण असतो तर एके दिवशी इंद्रायणीच्या पात्रात आपले प्रेत लोकांना दिसले असते, असा चमत्कृतीपूर्ण शेवट केला आहे. ‘एक अभिप्राय’ या लघुनिबंधात भाजीमास्तर, पोस्टमास्तर, शाळामास्तर आणि स्टेशनमास्तर यांची खुसखुशीत तुलना आढळते. ‘स्टेशन मास्तरांच्या कामासारखे रुक्ष काम’ हा अभिप्राय न रुचल्यामुळे खांडेकरांनी येथे स्वैर कल्पनाविलास केला आहे. १९५० मध्ये लिहिलेले ‘फोटोग्राफरच्या दुकानात’ आणि ‘दैनंदिनी’ हे दोन लघुनिबंध आहेत. पहिल्यात ‘फोटोमधल्या कृत्रिमतेची शिस्त’ अतिशयोक्त करून सांगितली आहे. लोक आपल्या भावना आणि आवडीनिवडीपेक्षा इतरांना काय बरे दिसेल हे लक्षात घेऊन फोटो काढून घेतात, हे निरीक्षण मांडले आहे. ‘दैनंदिनी’मध्ये दैनंदिनी लिहिणे म्हणजे जाणुनबुजून ढोंगी होणे– असे जगावेगळे मत व्यक्त होते. १९५१ मधील ‘सुकलेल्या पुâलांचा सुगंध’ ‘क्रिकेट आणि नाटक’ व ‘दिव्य भास’ हे तीन लघुनिबंध आहेत. पहिल्या लघुनिबंधात जुन्या पुराण्या पुस्तकांसंबंधी वाटणारी ओढ काव्यमय शैलीत विशद केली आहे. दुसऱ्या क्रिकेट आणि नाटकाची तुलना करताना ‘मनुष्य हा यंत्र नाही, पोपट नाही, राक्षस नाही, देव नाही; तो मनुष्यच आहे!’ हे सूत्र कल्पकतेने गुंफलेले आहे. १९५२ मधील तीन लघुनिबंध म्हणजे ‘जुनी चित्रे’, ‘डुलकी’ आणि ‘गोड शेवट’ हे होत. पहिल्यात ‘पांडव प्रताप’ पोथीतल्या चित्रांचे रासग्रहण आढळते. दुसऱ्या लघुनिबंधात नेपोलियनच्या डुलकी घेण्याच्या सवयीचे वर्णन ‘त्याने निसर्गावर विजय मिळवला. हवी तेवहा हुकमी डुलकी घ्यायची आणि हवे तेव्हा पुन्हा जागे होऊन कामाला लागायचे हे येरागबाळ्याचे काम नाही’ अशा मार्मिक शब्दांत केले आहे. ‘गोड शेवट’ हा लघुकथेच्या अंगाने लिहिलेला लघुनिबंध वाटतो. ‘मानवी जीवनाची खरीखुरी जाणीव शोकान्त कथा करून देतात. सुखान्त कथात ते सामर्थ्य आढळणार नाही.’ हा विचार मननीय वाटतो. ‘श्री’ आणि ‘तिळगूळ’ हे दोन लघुनिबंध १९५३मधील आहेत. ‘श्री’ मध्ये इंग्रज समुद्रातल्या बेटावर राहणारे असल्याने त्यांची मुळाक्षरे लाटांसारखी झाली आणि मराठे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणारे असल्याने आपली मुळाक्षरे अवघड जागी बांधलेल्या किल्ल्यासारखी झाली, असे मार्मिक निरीक्षण मांडलेले आहे. ‘तिळगूळ’ मध्ये काव्यरचना तंत्राचा मिश्किल परिहास केलेला आहे. कोणत्याही विषयावर काव्य न लिहिले हेच उत्कृष्ट काव्य कसे ठरते, हे सुचविले आहे. १९५४ मध्ये लिहिलेला ‘दोन शब्द’ हा एकुलता एक लघुनिबंध असून, त्यात ‘अच्छा’ आणि ‘इश्श्य’ या दोन शब्दांची सुरेख फिरकी घेतली आहे. विशेषत: बायकांच्या तोंडी ‘अच्छा’ शब्द ऐकल्यावर खांडेकरांना काय वाटते, हे मुळातून वाचण्यासारखे आहे. मानवी जीवनाचा सर्वस्पर्शी वेध घेण्याचे सामर्थ्य वि. स. खांडेकर त्यांच्या लघुनिबंधामध्ये आढळते. चिंतन-मनन-वाचन-व्यासंग या चार स्तंभांवर त्यांच्या लघुनिबंधाची भरभक्कम वास्तू उभी राहिलेली आहे. तिला मतमतांतराच्या परीक्षणा-निरीक्षणयुक्त बळकट खिडक्या-दारे आढळतात. प्रतिमा-अलंकारयुक्त भाषाशैलीचा मुलामा या वास्तूला आगळीच शोभा आणतो. त्यांचे लघुनिबंध वाचणे हा जत्रेतल्या रहाट पाळण्यात बसल्याचा अनुभव असतो. वक्रोक्ती, चमत्कृती, अतिशयोक्ती अशा उक्तिविशेषांचे मनोज्ञ दर्शन त्यांचा कोणताही लघुनिबंध घडवतो. ‘मंझधार’ ही त्याला अपवाद नाही. अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’ असा अनुभव घ्यायचा असेल त्याने खांडेकरांचा कोणताही लघुनिबंध संग्रह वाचायला हरकत नाही. -विजय काचरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more