* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RANPHULE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662405
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WILD FLOWERS: THE SHORT ESSAYS INCLUDED IN THIS COLLECTION UNDER THE NAME "RANPHULE` WERE WRITTEN BY V. S. KHANDEKAR DURING 19271961. THEY WERE NOT PUBLISHED UNDER ONE TITLE TILL THE YEAR 2002. IT IS TRUE THAT HOWEVER BEAUTIFUL THE WILD FLOWERS FAIL TO ATTRACT ATTENTION, BECAUSE THEY REMAIN DESERTED, UNTOUCHED. THE ESSAYS IN TRUE SENSE RESEMBLE THE WILD FLOWERS, THEY ARE VARIED IN COLOUR, FRAGRANCE, SHAPES AND EACH IN TURN IS AN EXAMPLE OF ETERNAL BEAUTY. WE ARE PRESENTING THESE WILD FLOWERS BLOOMING IN THE ORCHARD OF MARATHI LITERATURE ESPECIALLY FOR THE CURIOUS TRUE LOVERS OF LITERATURE, FOR THE STUDIOUS RESEARCHERS, FOR THE PONDEROUS WAYFARER TO ALLOW THEM TO ENJOY THEIR BEAUTY. IN THESE SHORT ESSAYS YOU WILL BE MEETING THE MATURED THINKERS. MANY PEOPLE HAVE OFTEN THOUGHT THAT V. S. KHANDEKAR ALWAYS REPRESENTED HIGHER CLASS, BUT THESE ESSAYS WILL THROW LIGHT ON THE FACT THAT HE WAS ALSO THE SAVIOUR OF NEGLECTED AND DOWN TRODDEN PEOPLE. HIS INNOVATIVE PICTURISATION OF KAPINJAL, MAHASHWETA, PUNDARIK, VIKARNA, RAMDAS, HANUMAN, PENDYA, VRIDDHAR, ETC. WILL GIVE US A NEW INSIGHT. THIS COLLECTION IS A COMBINATION OF RURAL SWEETNESS AND URBAN SOURNESS. THIS IS A MAGICAL POTENT OF EXCLUSIVE MIXTURE. IF YOU PRESERVE IT, SAFEGUARD IT, IT WILL BECOME MORE EXPLOSIVE, SO IT IS BETTER TO READ IT AND DIGEST IT, ISN`T IT?
‘रानफुले’ हा वि. स. खांडेकरांनी सन १९२७ ते १९६१ या कालखंडात लिहिलेल्या परंतु अद्याप असंकलित राहिलेल्या लघुनिबंधांचा संग्रह. यात वाचकांना रानफुलांच्या रंग, गंध, आकार, सौंदर्याचा अस्सलपणा अनुभवायला मिळेल. रानफुले सुंदर असली तरी बऱ्याचदा उपेक्षित नि अस्पर्शित रहातात. मराठी साहित्य वाटिकेतून विहार केलेल्या अभ्यासू, संशोधक वाटसरुंचे या देशीकार सौंदर्य लेण्यांकडे अद्याप लक्ष कसं गेलं नाही याचं आश्चर्य वाटल्यावरून ती जिज्ञासू नव वाचकांसाठी मुद्दाम खुडून आणलीत. या लघुनिबंधातून तुम्हास खांडेकरांमधील विकसित, प्रौढविचारक भेटेल. खांडेकर पांढरपेशांचे प्रतिनिधी लेखक होते म्हणणाऱ्यांना या संग्रहातील अनेक निबंध ते वंचित, उपेक्षितांचे वाली कसे होते ते समजावतील. कपिंजल, महाश्वेता, पुंडरीक, विकर्ण, रामदास, हनुमान, पेंद्या, वृद्ध इत्यादी चरित्रांचे खांडेकरांनी केलेले अभिनव चित्रण प्राचीन साहित्याकडे आपणास नव्या दृष्टीने पहाण्याची शिकवण देईल. या संग्रहातील निबंधात गावरान मेव्याची मिठास जशी आहे तशी विलायती इलायचीची उग्रताही ! अनोख्या मिश्रणांचं हे अद्भुत रसायन ! जपाल, ठेवाल तसं कालौघात ते अधिक विस्फोटक होत राहणार, म्हणून वाचून रिचवणंच श्रेयस्कर नाही का?

No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #रानफुले
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (kOLHAPUR) 05-01-2003

    वि. स. खांडेकर यांनी लघुनिबंध या फॉर्ममध्ये अनेक प्रयोग केले. त्यांच्या लघुनिबंध लेखनाची सुरुवात १९२७ मध्ये झाली. त्यांचे लघुनिबंध वाचकांशी संवाद साधणारे, त्याला आपलेसे करणारे होते. विविध नियतकालिके, दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लघुनिंधांना लोकप्रियता मिळत होती. १९२७ ते १९६१ या कालावधीत खांडेकरांनी लिहिलेल्या परंतु अप्रकाशित राहिलेल्या लघुनिबंधांचा ‘रानफुले’ हा संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या या संग्रहात १६ लघुनिबंध असून ते खांडेकरांच्या लेखनवैशिष्ट्यांची साक्ष देणारे आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 27-03-2005

    न खुडलेली ‘रानफुले’… डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे असंकलित साहित्य पुस्तकरूपाने संकलित करण्याचा चंग बांधून बरेच ग्रंथ अलीकडे प्रसिद्ध केले आहेत. त्यातीलच एक ग्रंथ म्हणजे ‘रानफुले’ हा लघुनिबंध संग्रह होय. लघुनिबंधाचा जनक कोण, फडके कीखांडेकर, हा वाद आता जुना झाला. तथापि खांडेकरांच्या इतर साहित्याप्रमाणे त्यांचा लघुनिबंधही आज तेवढाच लोकप्रिय आहे. तसे पाहता तयांचा लघुंनिबंध फडक्यांच्याच वळणाचा आहे. तरीही त्यातील विचारसौंदर्यामुळेच तो आजही टिकून आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील लघुनिबंध हे असंकलित स्वरुपात अनेक नियतकालिकांतून विखुरलेले होते. त्यांना परिश्रमपूर्वक संकलित करून डॉ. लवटे यांनी वाचकांची मोठीच सोय केली आहे. लघुनिबंध या वाङ्मय प्रकाराच्या स्वभावाप्रमाणेच येथील निबंध अनेक विषयांवर लिहिले गेले आहेत. त्यातून खांडेकरांची कल्पकता, नर्मविनोदी शैली ठिकठिकाणी जाणवते. उदाहरणार्थ : पांढारपेशी लोकांच्या आणि मुलांच्या भिरूपणाविषयी आजवर बरेच बोलून झाले आहे. पांढरपेशी म्हणजे भित्रा असेही समीकरण रूढ झाले आहे. (इति व. पु. काळे). त्याच पद्धतीने पांढरपेशी मुलांविषयी लिहिताना खांडेकर सहजपणे सांगून जातात की, पांढरपेशी मुले लग्नातील हुंड्याखेरीज इतर कशावरही घाव घालू शकत नाहीत किंवा ‘भागूबाई’ हा शब्द पांढरपेशा वर्गातील प्रभाइतकाच प्रभाकरांनाही लागू पडेल. खांडेकरांचे हे निरीक्षण या समाजस्तराचे नेमके वर्णन करणारे आहे. फलज्योतिष, हाही असाच एक सार्वत्रिक विषय. त्यावर विश्वास ठेवावा की न ठेवावा हा वादग्रस्त विषय आहे. खांडेकरांचाही त्यावर विश्वास नाही. फलज्योतिष खरे की खोटे, हा प्रश्न अलाहिदा असला तरी त्यामुंळे त्रस्त मनांना दिलासा मिळतो ही गोष्ट मात्र खरी आहे, हे सत्य ते सहजपणे नोंदवितात. याखेरीज श्रीकृष्ण-पेंद्या यांच्या बालमैत्रीच्या निमित्ताने मित्रत्व. आवडीचा उगम माणसाच्या मनात कसा होतो, लहानपणाचे छंद, भूतदया, विषमता, सभा-संमेलने, असे अनेक विषय या लघुनिबंधातून येऊन जातात. खांडेकरांचा पाश्चात्य लेखकांचा अभ्यास होता. अनेक थोर लेखकांचे सूक्ष्म वाचन त्यांनी केलेले होते, याची साक्ष त्यांच्या साहित्यातून ठिकठिकाणी पटते तशी या लघुनिबंध संग्रहातही पटते; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत साहित्य त्यांनी मुळातून वाचले होते व पचवलेही होते असे दिसून येते. चांगले वाचल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही हे खरेच आहे. ‘गंधर्वकन्ये काय बोलू?’, ‘प्रिया पंडरिका’ हे लेख वाचताना हाच प्रत्यय येतो. ‘गंधर्वकन्ये काय बोलू?’ हा लेख देवलांच्या ‘शापसंभ्रम’ नाटकाच्या संदर्भात सुचला आहे हे खरे; परंतु त्यातून खांडेकरांचे स्वतंत्र चिंतन ठिकठिकाणी प्रकट झाले आहे. उपरोक्त दोन्ही लेखांना ‘बापभट्टाच्या कादंबरी’ या महान संस्कृत ग्रंथातील कथेचा संदर्भ आहे. मराठीत आपण कादंबरी या वाङ्मय प्रकाराला कादंबरी हे नाव बाणभट्टाच्या कादंबरी या ग्रंथावरूनच दिले आहे. हे या निमित्ताने जाता जाता सांगावेसे वाटते. या ग्रंथात पुंडरीक आणि महाश्वेता यांची अलौकिक प्रेमकथा बाणभट्टाने कथन केली आहे. महाश्वेतेकडे मित्राच्या प्राणांची भीक मागणारा कपिंजल हा मित्रप्रेमाचा आदर्शच आहे. जीवन किती उदात्त असू शकते याचा हा भारावून टाकणारा प्रत्ययच ठरतो. या ग्रंथात कादंबरीचीही प्रेमकथा लेखकाने कथन केली आहे. बरेच गुंतागुंतीचे कथानक असलेला आणि अद्भुतरम्य घटनांनी भरलेला हा मोठाच ग्रंथ आहे. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग सर्वांनाच माहिती आहे. भीष्म, द्रोण यांच्यासारखे ज्ञानवृद्ध लोक खाली मान घालून बसलेले असताना मोठमोठे योद्धे हतबल होऊन तो प्रसंग पाहत होते. कोणीही पुढे हो बोलायला धजावत नव्हता. तेव्हा दुर्योधनाचा भाऊ विकर्ण पुढे होऊन म्हणाला होता की, ‘ही दासी नाही.’ त्याच्या त्या उद्गारांवर सगळेच आश्चर्यचकित झाले होते. परंतु त्यातून त्याचे जे असामान्य धैर्य दिसून आले होते ते खांडेकरांना कायमचे लक्षात राहिले आणि त्यातूनच ‘ही दासी नाही’ हा लघुनिबंध लिहिला गेला आहे. विकर्ण हा खांडेकरांना सामान्यांचा प्रतिनिधी वाटतो. सामान्यांना चुकीचे काय, बरोबर काय हे दिसते, कळते. परंतु बोलायचे धाडस ते करत नाहीत. ते धाडस सामान्यांना प्राप्त व्हावे असे खांडेकरांना वाटते. त्यासाठी त्यांनी विकर्णासारखे धैर्य दाखवावे, त्याचा आदर्श स्वीकारावा, असा संदेश खांडेकर देतात. एकंदरीत विचारांना खाद्य पुरविणारा, काही ठिकाणी प्रासंगिक तरीही अनेक ठिकाणी चिरकालिक विषयांना हात घालणारा लघुनिबंध संग्रह संपादित करू डॉ. लवटे यांनी मराठी साहित्यात चांगली भर घातली आहे, असे म्हणता येईल. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 17-11-2002

    उपेक्षितांचे अभिनव चित्रण... वि. स. खांडेकर यांनी १९२७ ते १९६१ या काळात लिहिलेल्या पण असंग्रहित राहिलेल्या लघुनिबंधाचा संग्रह ‘रानफुले’ या नावाने डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केला आहे. लघुनिबंधात खांडेकरांचा आवेश नेहमीच प्रौढ विचारकाचा असतो. त्ाचा प्रत्यय याही निबंधात येईल. रानफुले सुंदर असली तरी बऱ्याचदा उपेक्षितच राहतात. त्यांना रस, गंध असले तरीही समाजातही समूहाच्या स्वरूपात काही गट उपेक्षित असतात. त्यांना खांडेकरांनी ‘रानफुले’मध्ये न्याय दिला आहे. त्यांच्या कपिंजल, महाश्वेता, पुंडरिक, विकर्ण, हनुमान, पेंद्या, वृद्ध आणि रामदास या लघुनिबंधांत अभिनव चित्रण दिसेल. लघुनिबंध हा प्रकार व्यक्तिनिष्ठ समजला जात असल्याने लघुनिबंधकाराने व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होणे स्वाभाविकच असते. खांडेकर पांढरपेशांचे लेखक समजले जात असले तरी त्यांनी उपेक्षितांचेही प्रतिनिधीत्व केलेले आहे. ही सर्व वैशिष्ट्ये धमाल अपुल्या गायी मध्ये पेंद्यांच्या ठिकाणी आढळून येतील. स्वैर चिंतन आणि साध्या गोष्टींत महान अर्थ शोधण्याची दृष्टी यात तर्काच्या पातळीवर खांडेकरांचा हात कोणी धरणार नाही. खांडेकरांच्या लेखनाच्या वैशिष्ट्याचा काळ आज राहिला नसला, तरी या संग्रहातील निबंधात तोच काळ पुन्हा एकदा रस, रंग आणि गंधांसह जिवंत होतो. -अनिल डोंगरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more