* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666953
  • Edition : 5
  • Publishing Year : JUNE 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF CREATIVE WRITING FROM THE AUTHOR OF THE BEST SELLER, `MRITYUNJAYA`- SHIVAJI SAWANT.
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र देणारी तेजोनिधी व्यक्तित्वे... मृत्युंजय’ची पताका मानानं मिरवत आणि एकेक भाषा पादाक्रांत करीत शिवाजी सावंत आपलं स्थान पक्कं करीत भारतीय सारस्वतात घोडदौड करीत आहेत. आता युगंधर श्रीकृष्णाचा त्यांचा प्रदीर्घ प्रकल्प आकर घेतो आहे. प्रचंड शिल्पकाम करताना अधूनमधून गंमत म्हणून या दगडावर चार छिन्न्या मार, त्या दगडातून एखादी छोटी कलाकृती घडव असाही त्यांचा खेळ रुचिपालट करण्यासाठी चालूच असतो. मग ते कार्यक्रमांची आमंत्रणे घेतात, संमेलनांना जातात; लहानमोठ्या प्रकाशनांमध्ये रस घेतात. छोटेखानी दिवाळी अंकांचेही लेख याच झटक्यात पूर्ण करतात. पण प्रत्येक कामात आपला जीव ओतूनच ते करायचे हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे छोटा लेख असो, भाषण असो की अन्य काही कार्यक्रम असो, सावंतांची त्यातली गुंतवणूक ही अर्जुनाला दिसणाऱ्या पोपटाच्या डोळ्यासारखी नेमकी असते आणि सारे काही रसवंत करायची त्यांची प्रतिज्ञा असते. ‘शेलका साज’ हा त्यांच्या २२ लेखांचा संग्रह. हा साज शेलका असल्याने त्यात सर्व प्रकारचा ऐवज आहे. किल्ले सुधागडावर कवी कुलेशाला संभाजी महाराज बोलावतात, उरभेट देतात आणि औरंगजेबाचा पुत्र शाहजादा अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंडाचा प्रस्ताव घेऊन आला असताना त्याला संभाजी महाराज कसे रोखतात - त्याची कहाणी ‘किल्ले सुधागड’ यात सावंत सांगतात. रायगडच्या बालेकिल्ल्यातल्या खासे महालात श्री शिवाजीराजे अखेरच्या दुखण्यात कसे दिवस काढत होते याचे चित्रदर्शी वर्णन करून त्यांच्या धीरोदात्त व्यक्तिमत्त्वाचे दर्शन सावंत घडवतात. ‘‘आरक्त देखिजे डोळा, ग्रासिले, सूर्यमंडळा सूर्यमंडळा, सूर्यमंडळा, जगदंबा! चैत्री पुनवेचा, हनुमान जयंतीचा सूर्य रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या ऐन माथ्यावर असताना महाराजांनी रायगडाच्या हनुमंतानी उड्डाणी झेप घेतली. सूर्यमंडळ कब्जा करण्यासाठी’’ असा भारावून टाकणारा शेवट सावंत करतात. ‘शिवभक्त सरलष्कर’ ही हकीकत आहे १६६५ सालची, औरंगजेबाच्या ब्रम्हपुरच्या छावणीतली. संताजी घोरपडे याच्या पराक्रमाची. म्हसवडच्या नागोजीराव माने यांचा पुत्र सिधोजी याने संताजीबद्दल छत्रपती राजारामाचे मन कलुषित केले. त्यांनी धनाजी जाधवाला सरसेनापती पद दिले. आणि पुढे शिवपिंडीच्या पूजेत मग्न असलेल्या संताजीच्या मानेवर नागोजीने तलवारीने आघात करून त्याचा बळी घेतला. औरंगजेबाकडे ते शिर घेऊन जातो. तेथे येसूबाई संताजीचं शिर तबकात पाहून डोळ्यात अश्रू ढाळत म्हणतात, ‘‘सरलष्कर, तुम्ही खरे शिवभक्त. आजवर आम्हांस मुजरा केलात, आता या क्षणी आमचा मुजरा रुजू करून घ्या.’’ औरंगजेब मनात म्हणतो, ‘‘ऐसी एकभी बहू-बेटी-बेगम हमारे तैमूर खानदानमें क्यों नही पैदा होती? ये मुल्क कभी नही शिकस्त लेगा - जहाँ ऐसे सालार है - ऐसी मलिकाएं है। ऐसे शाहजादे है। तौबा! हम लौटेंगे लाल किले देहली या नही?’’ पुस्तकात सगळ्याच ऐतिहासिक कथा आहेत असे मात्र नाही. ‘शिवकालीन मावळा’ हा मावळ्याचे खाणे, पेहराव, जगणे, लढणे, याची माहिती देणारा लेख आहे. तर शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारा गूढरम्य मनफूल हा लेख आहे. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांनी रायगडावर चैत्री पुनवेला आगमन केले. चंद्र हा कल्पनाशक्तीचा कारक. शिवरायांच्या मनाचं फूलही त्या आकाशातल्या चंद्राच्या लाटांवर हेलकावे खात असावे असे सावंत सुचवतात. शिवरायांची तरल कल्पनाशक्ती अनेक प्रसंगात दिसते, तिचे चंद्रभावाच्या प्रभावाच्या रूपात सावंत स्पष्टीकरण - समर्थन करू पाहतात. संभाजीच्या मनाचे शल्यही मांडतात. शिवराजांना चाणक्य नीती ज्ञात होती. चाणक्यासारखा कोणी त्यांना भेटला असता तर महाराष्ट्रात एक नवे पर्व सुरू झाले असते असे सावंतांना वाटते. चाणक्याची अर्थशास्त्रीय बुद्धिमत्ता आणि शिवरायांची सर्वसामान्यांबद्दलची राजस कणव यांची सांगड पडली असती तर दुग्धशर्करा योगच या देशातील समाजपुरुषाने चाखला असता. शिवरायांचा प्रधान अण्णाजी दत्तो याचा तो वकूब नव्हता; अण्णाजीने जमीनधारा पद्धत जमिनीची प्रत बघून सरकारी धारा वसूल करणे ही वापरली; त्याऐवजी प्रत्येक किल्ला धनधान्याने समृद्ध करावा व गवतकाडीने बंदिस्त करावा, शेतकऱ्याला जमिनीचा कस वाढवायला सहाय्य करावे - उत्पादनक्षमता वाढवावी - असा शिवरायांचा मानस होता. पण अण्णाजीला तो विचार प्रत्यक्षात आणता आला नाही असे सावंतांचे प्रतिपादन आहे. अण्णाजी दत्तो याला ते महाराष्ट्रातील शेतीच्या दुरावस्थेबद्दल जबाबदार धरतात. कामगार नेते मनोहर कोतवाल, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, अस्पृश्यांचा आधारवड राजर्षी शाहू महाराज यांच्यावरचेही लेख या संग्रहात आहेत. एका वाचकाने कसा गंडा घातला याचा किस्सा ‘चलाख’मध्ये आला आहे. ऐतिहासिक ललित लेखन - एक विचार, मी आणि कविता हे दोन लेख साहित्यविषयक चिंतन प्रकट करतात, तर शेवटी ‘तू नसतीस तर’ ही कविता आईबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबून निथळणारी आहे. ‘‘जळतानाही जगाला उजळण्याचा तेजोमंत्र सूर्याला देणारी, केवळ तूच’’ असे म्हणून ‘‘तू केवळ एक व्यक्ती किंवा जीव नसून’’, तू एक जीवनतत्त्व व जीवनसत्य आहेस असे सावंत म्हणतात. ‘‘तू आहेस एक अतितापासून ते अनागतापर्यंतचे एक जीवनतत्त्व, एक जीवनसत्य. ज्याचे एकमेव नाव आहे व असू शकते आई!’’ सावंतांचा हा ‘कोल्हापुरी’ शेलका साज भरजरी आहे; भव्य आहे; आणि भारावून टाकणाराही आहे. दुसऱ्या आवृत्तीत तो अधिकच नेटका व चकमकीत होऊन चमकतो आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more