* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I SHALL NOT HATE
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL KULKARNI
  • ISBN : 9789386175083
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 202
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HEART-BREAKING, HOPEFUL AND HORRIFYING, I SHALL NOT HATE IS A PALESTINIAN DOCTOR`S INSPIRING ACCOUNT OF HIS EXTRAORDINARY LIFE, GROWING UP IN POVERTY BUT DETERMINED TO TREAT HIS PATIENTS IN GAZA AND ISRAEL REGARDLESS OF THEIR ETHNIC ORIGIN. ABUELAISH IS AN INFERTILITY SPECIALIST WHO LIVES IN GAZA BUT WORKS IN ISRAEL. AND, MOST RECENTLY, AS THE FATHER WHOSE THREE DAUGHTERS WERE KILLED BY ISRAELI SHELLS ON 16 JANUARY 2009, DURING ISRAEL`S INCURSION INTO THE GAZA STRIP. IT WAS HIS RESPONSE TO THIS TRAGEDY THAT MADE NEWS AND WON HIM HUMANITARIAN AWARDS AROUND THE WORLD. INSTEAD OF SEEKING REVENGE OR SINKING INTO HATRED, IZZELDIN ABUELAISH CALLED FOR THE PEOPLE IN THE REGION TO START TALKING TO EACH OTHER. HIS DEEPEST HOPE IS THAT HIS DAUGHTERS WILL BE `THE LAST SACRIFICE ON THE ROAD TO PEACE BETWEEN PALESTINIANS AND ISRAELIS`. THE EXTRAORDINARY STORY OF A PALESTINIAN DOCTOR WHO, DESPITE WITNESSING THE DEATH OF THREE OF HIS DAUGHTERS IN THE ISRAELI INCURSION INTO GAZA IN JANUARY 2009, CONTINUED HIS MEDICAL AND HUMANITARIAN WORK AIMED AT BRINGING THE PEOPLE OF THE REGION TOGETHER IN PEACE. HIS WEBSITE AND FOUNDATION CAN BE FOUND AT WWW.DAUGHTERSFORLIFE.COM
डॉ. इझेलदिन अबुइलेश- ज्यांना आता ‘तोगाझा डॉक्टर’ असे ओळखले जाते, त्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या भयानक दुर्घटनेनंतर जगातील सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. १६ जानेवारी, २००९ रोजी त्यांच्या घरावर झालेल्या इस्राईलच्या बॉम्ब हल्ल्यात त्यांच्या तीन मुली आणि पुतणी बळी पडल्या. गाझामधील लोकांच्या धडपडीचा आणि हलाखीच्या जीवनाचा अबुइलेश यांनी सांगितलेला वृत्तान्त वाचताना कधी स्फूर्तिदायक, तर कधी हृदय द्रावक वाटतो. गाझामध्ये राहणारा आणि इस्रायली इस्पितळात काम करणारा हा पॅलेस्टिनी असलेला वंध्यत्वोपचार तज्ज्ञ डॉक्टर आयुष्यभर या दोन विभागांतील सीमा रेषा दररोज पार करत असे. एक डॉक्टर याना त्याने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधारणे आणि स्त्रियांचे शिक्षण यावर भर देणे, हे मध्य पूर्वेतील एकूण परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. त्यांच्या मुलींचे बॉम्ब हल्ल्यात बलिदान पडल्यावर त्यांनी जो जगावेगळा प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचे नाव सर्व जगात झाले. त्यांना जगभरातून मानवतावादी पारितोषिके दिली गेली. या घटनेचा सूड घेण्याऐवजी, इस्रायलींबद्दल तिरस्काराची भावना बाळगण्याऐवजी, अबुइलेशचे मध्य पूर्वेतील लोकांना सांगणे आहे की, एकमेकांत संवाद सुरू करा. पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांमधील वैराची भावना संपून शांतता प्रस्थापित होण्याच्या मार्गावरील त्यांच्या मुलींचे बलिदान शेवटचे ठरावे, अशी त्यांना आशा वाटते
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MITIRASKARKARNARNAHI #ISHALLNOTHATE #मीतिरस्कारकरणारनाही #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHYAMALKULKARNI #IZZELDINABUELAISH "
Customer Reviews
  • Rating StarDainik Divya Marathi 30-12-16

    एका मनस्वी डॅक्टरचा थक्क करणारा जीवनप्रवास ! ईझेलादिन अबुइलेश हे एक पॅलेस्टिनी डॉक्टर आहेत. त्यांचे बालपण गाझापाट्टीतील जबलिया निर्वासित छावणीत गेले. जिथे जन्मदेखील झाला. ते स्त्रीरोगतज्ज्ञ होते. शिवाय ‘वंध्यत्वावर उपाय’ या शास्त्रावर त्यांचे विशेष ्रभुत्व आहे ते गाजत राहत होते; परंतु कमला ते इस्रायलच्या हॉस्पिटलला जात असत. तिथे त्यांचे बहुतांश आयुष्य गेले. हॉर्वर्डमध्ये त्यांनी ‘सार्वजनिक आरोग्य’ या विषयात प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवले. या विषयावरील त्यांची मते आणि त्यांचे संशोधन जगभरात प्रमाण मानले जाते. टोरोंटो विश्वविद्यालयातील डल्ला लाना प्रशालेत ते सहप्राध्यापक आहेत. ही प्रशाला सार्वजनिक आरोग्य या विषयाचे प्रशिक्षण देते. गाझापट्टीला डॉक्टर आपली मायभूमी मानतात. संबंध मध्य पूर्वेत त्यांनी सुचवलेला औषधोपचार प्रमाण मानला जातो. त्यांनी मायभूमी मानत असलेल्या प्रदेशाला जग मात्र जगातील सर्वांत मोठ छळछावणी मानते. या भागात पंधरा लाख पॅलेस्टिनी हे तीनशे साठ चौरस किलोमीटर एवढ्या जमिनीवर दाटीवाटीने राहत होते त्यामुळे अशा भागाची प्रगती होऊ शकेल, असे मत या पुस्तकात मांडले. डॉक्टर या नात्याने ते सीमेच्या दोन्ही बाजूकडील रोग्यांना औषधोपचार तसेच वयात येणाऱ्या मलींना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचा अनुभव यात मांडले आहेत. त्याचप्रमाणे मुलींना स्त्रियांना उत्तम शिक्षण मिळावे याचे महत्त्व आणि गरज या गोष्टी त्यांनी तेथील लोकांना पटवून दिले आणि शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. १६ जानेवारी २००९ मध्ये इस्रायल बॉम्बहल्ल्यात ईझेलादिन यांच्या मुली आणि पुतणी मारल्या गेल्यामुळे त्यांनी हे कार्य जोमाणे अंगीकारले. त्यांच्यावर झालेल्या या आघाताला त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याचे वर्णन केले. त्यामुळे त्यांचे कार्य जगातील सर्व लोकांच्या अंतकरणात ठसले गेले. विशेषत: इस्रायलमध्ये याचा परिणाम जास्त प्रकर्षाने दिसून आला याबद्दलची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी त्या भागातील लोकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे आणि शांततेकरता योग्य कृती करण्याचे आव्हान केल्याचे स्पष्ट केले होते. ते सध्या आपल्या मुलीच्या स्मरणार्थ धर्मार्थ संस्था उभी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. मुली आणि स्त्रिया यांना आरोग्य आणि शिक्षण या द्वारामुळे शारीरिक आणि मानसिक ताकद मिळून त्या प्रबळ भाव्यात उद्देशाने या लेखकांनी केलेल्या कार्याचे लेखन या पुस्तकात आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 27-11-2016

    ज्याचे घर आगीत होरपळते अशा व्यक्तीने द्वेषाचा अथवा बदला घेण्याची भावना व्यक्त करण्याऐवजी तो मानवतेचा संदेश देतो आणि वैराची भावना संपवण्याचे आवाहन करतो तेव्हा त्याच्यातील माणूस जागा झालेला असतो. डॉ. इझेलदिन अबुइलेश हे नाव आता जगभरात सन्मानाने घेतले जाे. इस्राईलच्या बॉम्बहल्ल्यात त्यांच्या तीन मुली आणि भाची बळी पडल्या. तरीही त्यांनी जगाला दिलेला प्रतिसाद खूप वेगळा होता. पॅलेस्टीनी आणि इस्राईली यांनी वैराची भूमिका संपवून शांतता प्रस्थापित करावी व त्यांच्या मुलीचे बलिदान हे शेवटचे ठरावे ही त्यांची भावना उदात्त ठरली व जगभरातून मानवतावादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. त्यांची कहाणी मराठीतून आलेली आहे. डॉक्टर अबुइलेश यांचे आत्मकथन श्यामल कुलकणीं यांनी अनुवादीत केलेले आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES PUNE 13-11-2016

    इझेलदिन अबुइलेश या पॅलेस्टिनी डॉक्टरची ही चित्तथरारक कथा आहे. गाझापट्टीतील छावणीत त्यांचे बालपण गेले. ते निर्वासिताचे जगणे वाट्याला येऊनही त्यांनी पुढे मोठी कामगिरी बजावली. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे ते तज्ज्ञ होते. या विषयावरील त्यांची मते जगभरात परमाण मानली जातात. टोरोंटो विश्वविद्यालयात ते अध्यापन करतात. या ध्येयवादी डॉक्टरने आपली आत्मकथा या पुस्तकातून सांगितली आहे. ‘वैद्यकीय उपचार हे लोकांना समजून घेण्याचे आणि एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याचे उत्तम साधन आहेत,’ असे ते म्हणतात. याच वृत्तीने त्यांनी काम केले. त्यामुळेच सोरोको रुग्णालयात त्यांनी ज्या स्त्रियांवर उपचार केले, त्या त्यांच्या जणू नातलगच झाल्या. या प्रकारचे अनेक प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतात; तसेच त्या अनुषंगाने गाझापट्टीतील जगणेही समजते. ...Read more

  • Rating StarSAKAL SAPATRANG 30-10-16

    गाझा पट्टीत काम करणारे डॉ. इझेलदिन अबुइलेश यांची ही आत्मकहाणी. अतिशय प्रेरणादायी आणि वास्तवदर्शी कहाणी आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more