R. K. NARAYAN

About Author

Birth Date : 10/10/1906
Death Date : 13/05/2001




आर. के.नारायण यांचे पूर्ण नाव रासिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे होते. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. वडिलांच्या निरनिराळ्या ठिकाणी बदल्या होत असत. त्यामुळे आर. के. नारायण यांचे बालपण त्यांची आजी पार्वती यांच्याजवळ गेले. त्यांच्या आजीने त्यांना अंक गणित आणि संस्कृत शिकवले. पौराणिक कथा सांगून त्याबद्दल त्यांच्या मनात आवड निर्माण केली. मोठे झाल्यानंतर ते जेव्हा त्यांच्या वडिलांबरोबर म्हैसूर येथे गेले तेव्हा त्यांना तेथील वाचनालयात खूप पुस्तके वाचायला मिळाली. डिकन्स, थॉमस हार्डी आणि वूड हाऊस हे त्यांचे आवडते लेखक. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले परंतु वाचन आणि लिखाणाची आवड असल्यामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ लेखन करण्यास सुरवात केली. १९३५साली मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून आर.के.नारायण यांनी आपली स्वामी अँड फ्रेंड्स या नावाची पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी ती कुणाला आवडली नाही परंतु ग्रॅहम ग्रीन याना त्या कथांद्वारे आपल्याला एक नवीन मित्र मिळाला असे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन या कथामालिका छापण्यात रस दाखवला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर त्यांनी याच मालगुडी गावाभोवती एकापाठोपाठ फिरणार्‍या अनेक गोष्टी लिहिल्या. त्या मालगुडी डेज या नावाने पुस्तक रूपाने प्रसिध्द झाल्या. ‘मालगुडी डेज’ या नावाची दूरदर्शन कथा मालिकाही तयार करण्यात आली होती. याच पुस्तकातील गाईड या त्यांच्या कथेवरून गाईड हा चित्रपट निघाला. तोही खूप गाजला. श्री. ज. जोशी यांनी गाईडचे मराठीत भाषांतर केले आहे. द इंग्लिश टीचर, द बॅचलर ऑफ आर्टस्, डार्करूम, माय डेज, वेटिंग फॉर महात्मा, टॉकेटीव्ह मॅन ही त्यांची आणखी काही गाजलेली पुस्तके. साधी लेखनशैली आणि हलके फुलके विनोद यामुळे आर. के. नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेकॉव्ह यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. १९५८ साली त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९६४ साली पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि २०००साली पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले गेले. सुप्रसिद्ध व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण हे त्यांचे भाऊ होते.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
HALWAI Rating Star
Add To Cart INR 250
37 %
OFF
R. K. NARAYAN BIRTHDAY COMBO OFFER Rating Star
Add To Cart INR 550 INR 349
VADACHYA ZADAKHALI ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more