* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIMUKTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980110
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 209
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF YOU REALLY CARE A BIT ABOUT JUSTICE THEN DO NOT INDULGE YOURSELF IN VAIN DISCUSSIONS OR DO NOT EVEN SIT IDEALLY. SOMEONE SOMEWHERE HAS TO START THE CONTEST AGAINST THE EVIL PRACTICES. ONCE THE WAR STARTS THEN NATURALLY THERE ARE GOING TO BE BLOWS AND ATTACKS ON EACH OTHER BY BOTH SIDES. IF YOU REALLY INTEND TO START THE FIGHT, THEN YOU WILL HAVE TO PREPARE YOURSELF FOR GETTING HURT. IF YOU REALLY WANT TO ESTABLISH THE ETERNAL TRUTH THEN YOU WILL HAVE TO SEE BEYOND YOUR OWN PROFITS, YOU WILL HAVE TO WIDEN THE HORIZONS OF YOUR UNDERSTANDING.
न्यायाची चाड बाळगायची तर केवळ चर्चा करून, सोयीस्करपणे गप्प बसून भागत नसते. दुष्पप्रवृत्तीविरुद्ध कधी ना कधी लढा पुकारावाच लागतो. आणि लढाई झाली की वार होणारच! ते झेलण्याची, प्रसंगी होणा-या जखमा सहन करण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रासंगिक फायद्यावर नजर ठेवून सर्वांनी वागायचे ठरवल्यास सत्य कधीच प्रस्थापित होणार नाही!
* अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिप्रतिष्ठान,कराड यांच्यातर्फे `साहित्यरत्न` पुरस्कार २०१० * आठवे ग्रामीण साहित्य संमेलन, अहमदनगर -`शब्दगंध साहित्य पुरस्कार`२०१० * सोमेश्वर वाचनालय व साखर कारखाना यांच्या विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात `साहित्य साधना`पुरस्कार २०१० * संगमनेर इतिहास संशोधन मंडळातर्फे देण्यात येणारा `कवी अनंत फंदी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार`२०१०
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIMALMORE #विमल मोरे #TEENDAGADACHICHUL #तीनदगडाचीचूल #AUTOBIOGRAPHY #DIPAMAHANVAR #VIMUKTI #BHATAKYAJAMATI #PER #BAHAR #KAHAR
Customer Reviews
  • Rating Starपद्मश्री डॉ. शां.ब. मुजुमदार, सिंबायोसिस, पुणे

    आपले आत्मकथन `विमुक्ती` आवडले. एकूण जीवनप्रवास आपण अत्यंत हलक्या-फुलक्या भाषेत चितारला आहे. `रयत` मधील अनुभव, पुणे विद्यापीठातील राजकारण व प्राध्यापक संघटनेच्या माध्यमातून काम करतानाच्या अनोख्या आठवणी यांचे ओघवते वर्णन आपण पुस्तकात केले आहे. माझ्या नवाचा अधूनमधून केलेला शिडकावा सुखद वाटला. तुम्हाला आणि पुस्तकाला सदिच्छा! ...Read more

  • Rating Starवसंत आपटे, किर्लोस्करवाडी

    `विमुक्ती` वाचले. आवडले. सुरवातीच्या पाच-सात पानातच पुस्तकाने पकड घेतली. त्यातील `आईनं साखर वाढल्याचा बहाणा आवडायचा, नकार मात्र नको वाटायचा` अशी वाक्ये छान वाटली. जातीयतेचे चटके बसले त्याबद्दल आक्रोश न करता, आपली लेखणी संयत राहिली याचे समाधान वाटत. पुस्तकाची भट्टी एकूणच चांगली जमली आहे. आपले लेखन परिचित होते, पण त्यात इतके लालित्य प्रथमच दिसले. त्याचा आनंद झाला. विवेचनात ओघ चांगला आहे. तो रेंगाळत नाही आणि धांदलही करीत नाही. आपली कार्यपद्धती तशीच होती हे लक्षात आहे. भाषा पूर्णत: नागर चालली असती, असे मला वाटते. मेहतांनी निर्मिती छान केली आहे. एक चांगली कलाकृती त्यांनी वाचकांपुढे आणली त्याचे समाधान आहे. मन:पूर्वक अभिनंदन! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SANGLI 18-05-2009

    `दाहक आत्मकथा`… अलीकडे विविध सामाजिक व सांस्कृतिक घटकांची आत्मकथेने मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत आहेत. पण त्यामध्ये साहित्यिक आणि कलात्मक कस किती असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. तरीही तळागाळातील मंडळी आपल्या भोगवट्याच्या सात-बारा कसलाही आडपडदा नठेवता उघड करीत आहेत, त्यामुळे एक सामाजिक इतिवृत्त म्हणून अशा प्रयत्नांची किमान दखल घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर, अक्षरांचा उच्चार करण्याचा प्रबळ आत्मविश्वास जागविणाऱ्या कर्मवीर भाऊरावपाटील यांचे ऐिितहासिक ऋण निर्विवाद ठरावे. या पार्श्वभूमीवर रयत कुलातील सध्याची आत्मकथांची लाट बरेच काही सांगून जाते. दीपा महानवरांचे आत्मकथन याच परंपरेत मोडणारे असले तरी एकूण गुणवत्ता, कलात्मकता व दर्जा इ. कसोट्यांवर ते एकदम उजवे नि उत्तम आहे. एका आडवळणी वाडीत धनगर कुटुंबात जन्मलेल्या धोंडीराम (दीपा) दु:ख-दैन्य आणि द्रारिद्र्याशी निकराचा लढा देत. आत्मविश्वासाचा पैसा कवेत घेऊन शिक्षण, साहित्य, लोककला, संघटन, प्रशासन, संपादन, स्तंभलेखन, अध्यापन, समाजकारण आणि राजकारणही अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपली विशेष अशी उल्लेखनीय मुद्रा उमटवितो हा या आत्मकथानाचा गाभारा; नि त्यात समरस होऊन, प्रगल्भ आणि प्रौढ लेखणीचे अभिजात वरदान लाभलेल्या दीपाने मूळ ऐवजाचा मोठा सुरेख `साज` घडविला आहे. काय, किती नी कसे सांगावे हे शहाण्या लेखकाला आधीच कळावे लागते. सामासिक आणि चित्रात्मक शैलीच्या दीपाच्या बाबतीत हा प्रश्नच आला नाही. वाड्यापाड्यातीलजातीपातीची जुनाट जळमटे, अंधश्रद्धांचा धाक, रुढी परंपरांचे साखळदंड अशा कोंदट व कुबट परिस्थितीतून ज्ञानाच्या दिशेने झेपवणारा धोंडीराम त्याला लाभलेले सखे-सोबती, समर्थक, शिक्षक व सोयरेधायरे, शिक्षणसंस्था, सहकारी सोसायटी, बँक, ग्रामपंचायतीतील ठेंगू मंडळींचे विखारी राजकारण, नीतीमूल्यांची घसरण, पंच-सरपंच, आमदार, चेअरमन, प्राचार्य, प्रध्यापक, विभागप्रमुख, आजीव सेवक, संचालक, कुलगुरु इ. पदावर केवळ खुर्ची उठविणाऱ्यांचे `अस्सल` मातीचे पाय असे नानाविध पात्र प्रसंग परिस्थिती वगैरेचा कलापूर्ण व साक्षेपी आलेख दीपाने मोठ्या कलाकुसरीने रंगविला आहे. सिनेमातील संकलकासारखा एक समर्थ नी सजग संकलक चांगल्या लेखकातही वास करुन असतो. याचा पुरेपुर प्रत्यय या आत्मकथेत येतो. प्रवाही आणि प्रभावशाली भाषाशैली एकेका शब्दासाठी घेतलेले कष्ट, मोळीबंद वाक्यरचना, विस्मरणाच्या वाटेवरील म्हणी, घटना-प्रसंगातील चमकदार बारकावे. अशा अनेक गोष्टींमुळे दीपाचे हे लेखन वाचकाला खिळवून टाकते. नास्तिकता, मार्क्सवादी विचारांचा पगडा, संस्था संघटनांतील लढाऊ नेतृत्व, विधायक टिका-टिप्पणीची सुरसुरी आणि फिरकीदार वाणी, लेखणी हा सगळा तोफगोळा खरे तर शत्रू निर्माण करणारा, परंतु दीपाने कितीतरी माणसे आणि मनेही जोडली आणि हे त्या अव्वल मानवी मूल्यांनी ओथंबलेल्या पुस्तकाकारात येण्याच्या केलेला हा प्रयत्नही एकूणच पुस्तकाची गती-रिती उलटीपालटी करणारा. साहित्य, कला क्षेत्रातील `पोटदुखी`चे दीपाने नोंदविलेले काही प्रसंग खूपच खुमासदार आहेत. पेर-बहर-कहर अशा तीन भागात विभागलेली `विमुक्ती` अनुक्रमे दीपातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यादींचा विकास, विस्तार आणि प्रसंगी विस्कोट सुध्दा समरसून सांगते. ना खेद ना खंत अशी तटस्थता अवघडच असते. दीपाला हे जाम जमले आहे. नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागूंची प्रस्तावना आणि लेखनातील मोक्याच्या टप्प्यावर सॉक्रेटिस, सार्थ, देकार्ट, डी गॉल, जी.ए. कुलकर्णी यांनी पेरलेली अवतरणे, केवळ सूचक नि समर्पकच नाहीत. तर ती चिंतनोत्संजकही आहेत. तसेच दीपाच्या विचार व्यूहाची जातकुळी व्यंजित करणारी आहे. मेहता पब्लिशिंगच्या निर्मिती आणि चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ म्हटल्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. शाळा महाविद्यालयातून नुसतेच छापाचे गणपती बाहेर पडत नसत, अशा वेगळ्या घडण्या-बिघडण्याच्या काळाचे अपत्य असलेल्या दीपा महानवरांच्या स्वभावाची नि कार्यकर्तुत्वाची मूस नी कूसही केवढी विलक्षण आहे हे इथे पानापानावर प्रकट झाले आहे. - प्रा.वसंत पाटील ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.