BELINDA VIEGAS

About Author


NA

बेलिंडा व्हीगस गोव्यात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून व्यवसाय करतात. त्यांचा जन्म केनियात नैरोबीला झाला. सहलींना जाणं, मासे पकडणं आणि अभयारण्यात हिंडणं अशा रम्य वातावरणात त्यांनी बालपण व्यतीत केलं आहे. भारतात परतल्यावर त्यांनी बेळगावला शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि एम.बी.बी.एस. करण्यासाठी बंगळुरूच्या सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिनसाठी त्यांना बंगळुरू युनिव्हर्सिटीकडून गुंडू राव गोल्ड मेडल मिळालं आणि कम्युनिटी मेडिसिनसाठी मेजर डॉ. के. पद्मनाभ मेनन प्राइझ मिळालं. त्यांनी बंगळुरूला एनआयएमएचएएनएस (द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस) मधून मानसोपचारशास्त्रात एम.डी. केलं. तिथं असतानाच त्यांना रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेकिंग मध्ये रस निर्माण झाला आणि त्यांनी उत्तरकाशी स्कूल ऑफ माउंटेनिअरिंगमध्ये एक कोर्सही केला. त्यांनी मानसोपचारशास्त्राची लेक्चरर म्हणून सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजात पुन्हा प्रवेश केला आणि विद्यार्थी आणि स्टाफसाठी ट्रेनिंगचे कार्यक्रम आखणं चालूच ठेवलं. नेपाळला माउंट एव्हरेस्ट बेसकॅम्पचा ट्रेक करीत असताना त्यांची व त्यांचे पती रिचर्ड यांची भेट झाली. लग्नानंतर त्या जर्मनीला गेल्या. तिथंच त्यांच्या मुलांचा जन्म झाला आणि त्यांनी लेखनाला सुरुवात केली. तरुणपणातच त्यांचं कुटुंब गोव्याला परत आलं आणि त्यांनी वार्काला व्यवसायास सुरुवात केली. अल्पकाळासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातही वास्तव्य केलं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DHIVARACHI AARTA SAAD Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more