SUSHMITA BANERJEE

About Author

Death Date : 04/09/2013


SUSHMITA BANERJEE, ALSO KNOWN AS SUSHMITA BANDHOPADHYAY AND SAYEDA KAMALA, WAS A WRITER AND ACTIVIST FROM INDIA. HER WORKS INCLUDE THE MEMOIR KABULIWALAR BANGALI BOU BASED ON HER EXPERIENCE OF MARRYING AN AFGHAN AND HER TIME IN AFGHANISTAN DURING TALIBAN RULE.

सुस्मिता बंदोपाध्याय आणि सईदा कमला या नावानेही त्या प्रसिद्ध होत्या. कोलकता येथे मध्यमवर्गीय कुटुंबात सुस्मिता यांचा जन्म झाला. अफगाणिस्तानमधील जानबाज खान या व्यावसायिकाशी २ जुलै, १९८८मध्ये विवाहबद्ध होऊन त्या अफगाणिस्तानात पोहोचल्या. घरच्यांचा विरोध पत्करून केलेल्या या विवाहामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अनुभवाने खचून न जाता त्यांनी तेथे जुळवून घेतले. पण त्याच वेळी त्यांनी बुरखा घालण्यास आणि तालिबानी फतव्यास कडाडून विरोध केला. नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या सुस्मिता यांनी तेथील खेड्यात स्त्रियांसाठी एक क्लिनिक सुरू केले. त्यांच्या या समाजोपयोगी कामामुळे तालिबानींनी त्यांच्यावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली. यातूनच ५ सप्टेंबर, २०१३ रोजी तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांची त्यांच्या घराच्याबाहेर गोळ्या घालून हत्या केली. सुस्मिता यांनी १९९५ साली आपल्या वैवाहिक जीवनावर आधारित लिहिलेली ‘काबुलीवाल्याची बंगाली बहू’ ही पहिली कादंबरी खूप गाजली. २००३ साली त्यावर ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ हा हिंदी चित्रपटही प्रर्दिशत झाला होता. त्यानंतर ‘तालिबानी अत्याचार : देश व विदेश’, ‘मुल्ला ओमर, तालिबान व मी’ (२०००), ‘एक बोलही खोटा नाही’ (२००१) या पुस्तकांनाही लोकप्रियता लाभली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KABULIWALYACHI BANGALI BAYKO Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more