* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983579
  • Edition : 4
  • Publishing Year : 1998
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 90
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 41 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS A COMMON PICTURE TODAY THAT THE THRONE BEARERS DO NOT INITIATE THE WRITERS. IT SEEMS THAT ALL THE GODS AND GODDESSES ARE GONE ON A LONG LEAVE. THIS LEAVES ONLY THE POOR, DOWNTRODDEN AND THE SCIENTIST TO BE THE SUBJECT.WHENEVER THESE POOR FIGHT WITH THEIR POVERTY IT IS INDEED A HEROIC DEED. THEY HAVE TO PAY FINE IF THEY LOSE THIS FIGHT. THIS FINE COMES IN THE FORM OF IMPRISONMENT OR DEATH. NEEDLESS TO SAY THAT A WRITER IS DRAWN TO THE PLACE WHERE SUCH FIGHT IS GOING ON. NOWADAYS, HE IS FINDING THE FIGHTING SPIRIT ONLY IN THE POOR.THIS BOOK IS A COMPILATION OF WORK BY MANY WRITERS AND ARTISTS, FROM ALL OVER THE WORLD.
‘आजचे राजे, महाराजे लेखकाला स्फुर्ती देणारे नाहीतच. देवदेवता तूर्त रजेवर आहेत. आज नायक व्हायला उरले आहेत – गरीब लोक आणि शास्त्रज्ञ. गरीब लोक जेव्हा लढा देतात, तेव्हा तो उपासमारीशी केलेला नायकी लढाच असतो. त्यात हरलं की दंड भरावा लागतो; तो तुरुंगवासाचा किंवा मरणाचा. साहजिकच लेखक लढाऊ-वृत्ती जिथं आढळते, तिथे ओढला जाणारच. आता ही लढाऊ-वृत्ती त्याला फक्त गोरगरीबांच्यातच आढळतेय....’ ...अशाच देश-विदेशातील लेखक, चित्रकार... अन् कलावंतांना अवगत करून देणारे ‘चरित्ररंग’.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating Starविनय वि.कुलकर्णी, नाशिक

    व्यंकटेश माडगुळकर यांचे *चरित्ररंग* हे पुस्तक देश-विदेशातील लेखक, चित्रकार आणि कलावंत यांची ओळख करुन देणारी व्यक्तिचित्रे आहेत. स्वतः लेखक एक प्रतिभावान चित्रकार, कथा, पटकथा, कादंबरी लेखक.निसर्गलेखन हा सुध्दा व्यंकटेश उर्फ तात्या माडगूळकर यांच्या आवडचा विषय होता. मारुती चितमपल्ली यांच्याबरोबर नागझिरा, नवेगाव बांध या जंगलात तात्यांनी भटकंती करून अप्रतिम निसर्गलेखन केले आहे.या अनुभवावर त्यांनी ` नागझिरा हे पुस्तक लिहीले व काझिरंगा अभयारण्याला भेट दिल्यावर त्यांनी जंगलातले दिवस हे पुस्तक लिहीले.बनगरवाडी या पुस्तकात ग्रामीण जीवनाचे सर्व अंतरंग येतात.सत्तांतर या पुस्तकात जंगलातील वानरांच्या टोळीतील अल्फा मेल होण्यासाठीच्या लढाया आणि माणसांचे राजकारण यातील परस्परसंबंध दाखविला आहे.त्यांना शिकारीची सुध्दा आवड होती.गदीमांसारख्या शब्दप्रभू भावाच्या सावलीत राहून सुद्धा आपली स्वतःची वेगळी ओळख असलेले लेखक आहेत. त्यामुळे त्यांनी निवडलेली व्यक्तिचित्रे ही लौकिकार्थाने अश्या सामान्य वाचकांसाठी आहे की ज्यांना हे विदेशी लेखक, चित्रकार यांची फार ओळख नसते व त्यांच्या साहित्य व कलेशी ते अनभिज्ञ असतात, एकूणच सध्याच्या वाचनशत्रु संस्कृतीत हे पुस्तक नव्या वाचकांना जागतिक साहित्य आणि कला यांच्याकडे कसे पहावे याची दृष्टी देतो. “एखाद्या लेखकाचे लेखन मनःपूर्वक वाचने म्हणजे सावकाशीने त्याची घेतलेली गाठभेटच असते" असे जेव्हा माडगुळकर *लिआम ओ फ्लहार्टी* या लेखकाच्या "गळ" या seagull पक्ष्याच्या कथेविषयी सांगतात तेव्हा ती कथा आपल्याकडल्या एखाद्या कोळीवाडयातच घडते असे वाटते आणि कळते की आपल्या भावना ह्या वैश्विक असतात. *लेखकाचे गाव लेखकाचे घर* या लेखात *जॉन स्टाइनबेक* या नोबेल आणि पुलित्जर पारितोषिके मिळवलेल्या अमेरीकन लेखकाचे "सालिनास" हे मूळ गाव आणि "कॅनरी रो" ही त्याची कर्मभूमी असलेल्या गावांना भेटी देण्याचा योग प्रस्तूत लेखकाला आला, स्टाइनबेक च्या कथांमध्ये आढळणाऱ्या पात्रांचे संदर्भ आपल्याला या गावातल्या स्टाइनबेक चे घर आणि परिसरातून दाखवतात. चित्रकार *विन्सेंट व्हॅन गॉग* यांच्या म्युझिअम च्या उद्घाटनानिमित्ताने "केनिथ विल्की" या पत्रकाराला व्हॅन गॉग वर एक लेख लिहायला सांगण्यात आले, त्या निमित्ताने कोणीही आजवर उजेडात न आणलेली माहिती केनिथला मिळाली आणि ती मिळवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न यावर "दी व्हॅन गॉग असाइनमेन्ट"हे पुस्तक लिहिले. त्यातल्या काही सुरस व चमत्कारिक प्रसंग या लेखात माडगुळकर यांनी उधृत केले आहेत. त्या वाचून आपल्या मनात विचार येतो की उपलब्ध चरित्रा पलीकडे सुद्धा एक चरित्र असते, आणि ते लिहिणारे लेखक ही दुर्मिळ असतात. “चित्रकार देउसकर "या लेखात मोठ्या कलावंतांची शासकीय धोरणांमुळे कशी परवड होते हे सांगितले आहे. “चांगला मित्र, चांगला लेखक" आणि शेवटचा प्रवास या लेखांमधुन माडगुळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने *कथाकथन* या त्या वेळी नविनच असलेल्या उपक्रमाचा पायारंभ कोणत्या कारणामुळे झाला हे सांगितले आहे. माडगुळकरांचा चित्रपट सृष्टीतील पटकथाकार आणि संवादलेखक आपल्याला शंकर घाणेकरांवर लिहिलेल्या "भल्याची दुनिया" आणि "मुक्काम पोस्ट ढेबेवाडी" या लेखांमधुन दिसतात. एकूणच एका कलासक्त लेखकाने लिहिलेली ही व्यक्तीचित्रे मनाचा ठाव घेतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more