ASHOK BIRBAL JAIN

About Author


NA

अशोक बिरबल जैन हे वर्धा येथील प्रथितयश डॉक्टर दाम्पत्य आहे. आपले अद्यायावात ज्ञान व ‘जैन हॉस्पिटल’ या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज व विविध सुविधा पुरविणाऱ्या रुग्णालयाच्या माध्यमातून ते गेली ३० वर्षे गरजू रुग्णांना आपली सेवा पुरवित आहेत. डॉ. अरुणा या मूळच्या पुण्याच्या असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत झाले आहे तर डॉ. अशोक हे मूळचे दिल्लीचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देशाच्या राजधानीत झाले आहे. महात्मा गांधींच्या आशीर्वादाने स्वातंत्र्यसेनानी डॉ. सुशिला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोघांनीही आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणानंतर गांधी - विनोबांची पवित्र कर्मभूमी वर्धा येथे आपले रुग्णालय सुरू केले. योगाभ्यास, निसर्गोपचार व वैकल्पिक चिकित्सा यामध्ये दोघांनाही गती आहे. गरजेनुसार रोगनिदान व रोगनिवारणाकरिता ते योग्य उपचारप्रणाली निवडतात. तसेच अनेक शासकीय व अशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता व शाळा कॉलेजमधील अध्यापक व विद्यार्थ्यांकरिता वैद्यकीय उपचारांसोबत आध्यात्मिक जोड देणारे उपक्रम व कार्यशाळा राबवितात. मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण केंद्राचे ते संचालक असून या विषयांवरील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. आजपर्यंत विविध वैद्यकीय विषयांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग केवळ अर्थाजनासाठी न करता सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी करणारे डॉ. जैन दाम्पत्य आजच्या पिढीसमोर रुग्णसेवेचे आदर्श उदाहरण ठरावे. अधिक माहितीसाठी : E-MAIL - ABJ@LIVE.IN
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MADHUMEHA : EK AAVHAN Rating Star
Add To Cart INR 380

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.