* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASHRU ANI HASYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665246
  • Edition : 7
  • Publishing Year : 1941
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I STARTED STORYWRITING IN 1925. THE NEXT 1213 YEARS I WAS WRITING STORIES AS AND WHEN TIME WOULD PERMIT. DURING THOSE YEARS I WAS TEACHING IN A SCHOOL.``TODAY, WHILE GOING THROUGH THE 13 STORIES INCLUDED IN THIS BOOK `ASHRU AND HASYA`, MANY A THOUGHTS ARE SURFACING MY MIND. MOST OF THESE STORIES ARE WRITTEN DURING MY 15 YEARS` STAY IN SHIRODA. WHILE GOING THROUGH THEM I AM RECOLLECTING MY STAY AT SHIRODA, WHICH I HAD ALMOST FORGOTTEN. IT WAS A SMALL VILLAGE, HAVING NATURAL BEAUTY, BEAUTIFUL ATMOSPHERE, THOSE VILLAGERS WHO UNKNOWINGLY HAD ENLIGHTENED MY MIND FOR A STORY, MANY SWEET AND SOUR INCIDENCES, THESE ALL HAVE A SPECIAL PLACE IN MY MIND. TODAY, AT THIS STAGE I CAN EVEN EYE `THE KHANDEKAR` DURING THOSE DAYS WITH A NEUTRAL MIND. 1925 WAS THE PEAK PERIOD FOR MARATHI SHORT STORIES, I WAS AN ACTIVE MEMBER, BUT BY 1940 THIS GOLDEN ERA OF MARATHI SHORT STORIES HAD COME TO AN END.``
१९२५ साली मी कथालेखनाला प्रारंभ केला.तेव्हापासून पुढे बारातेरा वर्ष,शाळेच्या धबडग्यातून जशी सवड मिळेल,तशी मी गोष्टी लिहित असे....." "अश्रू आणि हास्य " संग्रहातल्या तेरा गोष्टी चाळतांना माझ्या मनात विविध विचारतरंग निर्माण होत आहेत.या बहुतेक गोष्टी मी शिरोड्याला असतांना लिहिल्या असल्यामुळे त्या वाचतांना ;कालोदरात लुप्त झालेले माझे पंधरावीस वर्षांपूर्वीचे जीवनच जणू काही माझ्या डोळ्यांपुढे मूर्तिमंत उभे राहत आहे.त्या चिमुकल्या खेडेगावातला सुंदर निसर्ग,माझ्या कथांचे कळत नकळत स्पुर्तिस्थान होणारी तिथली आंबटगोड माणसे,अनेक स्वादिष्ठ व खारटतुरट घटना,इतकेच नव्हे, तर आज ज्याच्याकडे मी तटस्थपणाने,किंबहुना कठोर टीकाकाराच्या दृष्टीने पाहू शकतो,असा त्या वेळचा कथाकार खांडेकर,या सर्वांविषयीच्या आठवणी माझ्या या विचारतरंगाबरोबर अंतर्मनातून वर येत आहेत......." "मी कथा लिहिल्या ,तो काळ मराठी लघुकथेच्या पहिल्या बहराचा होता.तो बहर १९४० च्या आसपास संपला."
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #अश्रू आणि हास्य
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    आशयापेक्षा अभिव्यक्तीला महत्त्व… ‘अश्रू आणि हास्य’ हा वि. स. खांडेकर यांचा कथासंग्रह पुनर्मुद्रित स्वरूपात १९९५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील कथा १९३० ते ४० या दशकातल्या आहेत. १९२५ ला त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. त्यावरून या कथा उमेदवारीच्या काळाल्या आहेत, हे स्पष्ट होते. सामान्यत: एका पुस्तकाला पुरतील एवढ्या कथा उमेदवारीच्या काळातल्या आहेत, हे स्पष्ट होते. सामान्यत: एका पुस्तकाला पुरतील एवढ्या कथा संग्रहित करून सात-आठ कथासंग्रह झाले. त्यात बऱ्या वाईट, रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या आणि लाथाडलेल्या सर्व कथा एकत्रित होत गेल्या. असे खांडेकर म्हणतात. त्यांची विशिष्ट पद्धतीनं जुळणी करून ‘कालची स्वप्ने’ ‘आजची स्वप्ने’, ‘चंदेरी स्वप्ने’ आणि ‘अश्रू आणि हास्य’ असे चार कथासंग्रह त्यांनी सिद्ध केले. ‘अश्रू आणि हास्य’ हा कथासंग्रह प्रथम १९४१ मध्ये प्रसिद्ध झाल्याची नोंद आहे. त्याला जोडलेल्या ‘दोन शब्द’ खाली ११ मे १९४९ हा दिनांक नोंदलेला आहे. तो द्वितीयवृत्तींचा असावा आणि आता प्रसिद्ध झालेले पुनर्मुद्रण (तिसरी आवृत्ती) असावे. त्याला प्रकाशकांनी मात्र द्वितीय आवृत्ती म्हटले आहे. या कथासंग्रहात पूजास्थान (१९३०), तीन नंबरची खुर्ची (१९३१), मुके प्रेम, हवालदाराचां सत्याग्रह, करुण कथा (१९३२), सुपारीचे खांड, माया, मुकटा आणि फॅन्सी पातळ (१९३४), शिकार, जुना कोट, दोन चित्रे (१९३६), मिस कांचन, देव कुठे आहे? (१९४०) अशा १३ कथा आहेत. त्या कालक्रमानुसार छालेल्या नसल्या तरी खांडेकरांनी ‘दोन शब्द’ मध्ये मांडलेल्या काही विधानांचे परीक्षण करण्यासाठी वरील कालबद्ध मांडणी केली आहे. आपल्या कथासंग्रहात ‘अश्रू’चे (गंभीर कथांचे) प्रमाण जास्त असून, ‘हास्या’चे (खेळकर विनोदी कथांचे) प्रमाण कमी आहे, असे ते म्हणतात. हास्यात्मक कथा म्हणून ‘सुपारीचे खांड’, ‘हवालदारांचा सत्याग्रह’, ‘करुण कथा’, ‘मिस कांचन’ आणि ‘दोन चित्रे’ यांचा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उर्वरित कथांना अश्रूपूर्ण (गंभीर कथा) मानावे असे सुचवले आहे. त्यांची कथनसूत्रे तपासली, तर त्यांतल्या काही हलक्या-फुलक्या आशयाच्या आणि खेळकर मांडणीच्या (हास्याचा आत्मा असलेल्या) अशा वाटतात. ‘मिस कांचन’ या कथेत नटीऐवजी स्वयंपाकिणीचा सत्कार वर्णन केला आहे. अप्सरा पिक्चरचे मालक भय्यासाहेब मुंबईहून मॅनेजर भगवंतरावांना फोनवरून मिस कांचन येत असल्याचे कळवतात. प्रत्यक्षात ती मुंबईतच पळवली जाते आणि नटी होण्याची हौस असलेली स्वयंपाकीण गावात पोहोचते. तिचे स्वागत, सत्कार, मुलाखत आदी सोपस्कार भगवंतराव घडवून आणतात. ‘सुपारीचे खांड’ या कथेत निर्व्यसनी मास्तर धोतर नेसण्यासाठी कमरेवर सुपारीचा वापर करतो. ते रहस्य बनवले आहे. बढतीसाठी ‘हवालदार’ गावात नाटकाचं पोस्टर डकवणाऱ्यास, संतती प्रतिबंधक गोळ्या मागवणाऱ्या भलंभटजीला आणि त्याच्या बायकोला छळतो. ‘करुण कथे’च्या शोधात विठ्ठलरायांच्या जीवनातली धमाल वर्णन केली आहे. ‘दोन चित्रे’मध्ये एकाच चित्रकाराने रेखाटलेल्या दोन चित्रांच्या निमित्ताने सरदार इंगळ्यांनी केलेले संस्कृतीवरील भाष्य आहे. ज्या कथांना खांडेकर अश्रूपूर्ण (गंभीर कथा) म्हणतात; त्यातरी त्यांच्या कोटिबाज शैलीमुळे वाचकांवर गांभीर्याचा, परिणाम उणावतो. ‘मुके प्रेम’ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर एक महिन्याने कामावर हजर झालेल्या पोस्टमनचा पहिला दिवस वर्णन केला आहे. त्याच्या दु:खाबद्दल कुणीही सहानुभूती दाखवत नाही. शेवटी तो आपल्या मुक्या मुलाजवळ ते व्यक्त करतो. ‘माया’ कथेतले वडील आपल्या उपवर मुलीला स्थळ शोधल्याची व लग्न ठरवल्याची खोटी आशा पत्र लिहून लावतात. आपल्या या कृतीचं समर्थनंही करतात. ‘देव कुठे आहे?’’ या कथेत ‘चिमण्यात देव आहे सांगणारे बाबा बाळ्याला जप्तीच्या कामगिरीवर घेऊन जातात. जप्तीग्रस्त माणसांमध्ये ‘देव’ बाबांना दिसत नाही. त्यामुळे देव चिमण्यात आहे आणि माणसात नाही, अशी बाळ्याची समजूत होते. ही चमाकृती दाखवून ही कथा संपते. आपल्या कथांमधून निरनिराळे प्रयोग करण्याची क्षमता खांडेकरांनी दाखवली आहे. ‘तीन नंबरची खुर्ची मध्ये सं. सौभद्र नाटकाच्या कथानकाचा वापर आहे. ‘मुकटा आणि फॅन्सी पातळ’ या कथेत महाराष्ट्रकवी यशवंताचे काव्यगायन व त्यांच्या प्रतीक्षा’ व ‘आई’ या कवितांचा उपयोग समर्थकपणाने केला आहे. ‘करुण कथा’मध्ये न. चिं. केळकरांच्या ‘सविंकल्प समाधी’चा साभिप्राय उल्लेख आहे. ‘शिकार’मधील पती-पत्नी प्रत्यक्ष बोलण्याऐवजी ‘डायऱ्या’वाचून परस्परांना जाणतात. ‘माया’मध्ये पत्रलेखन आहे. त्यांची प्रयोगशीलता काळानुरूप स्वागतार्ह वाटते. तथापि सर्वच कथांमधील ‘वास्तव’ मात्र आजच्या कथेच्या वाचकाला तकलादू वाटण्याची शक्यता अधिक आहे. १९२५ ते १९४० या काळाला खांडेकरांनीही मराठी कथेचा पहिला बहर म्हटले आहे. त्यातली त्यांची कथा सखोल जीवनदर्शन घडवत नाही. त्यांच्या जोडीला त्या काळात ना. सी. फडके, य. गो. जोशी आदी कथाकारही लेखनप्रवृत्त झाले होते. त्या सर्वांच्या कथांचे स्वरूप समान आणि मर्यादाही सारख्याच आहेत. वास्तविक याच काळात दिवाकर कृष्ण कथालेखन करीत होते. त्यांच्या आणि खांडेकरांच्या कथांमध्ये कुठलाही अनुबंध अथवा देवाणघेवाण दिसत नाही. पाश्चात्त्य साहित्यात कथालेखन हा धंदा झाल्याचे खांडेकरांनी म्हटले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या कथेवर झाला असावा, असे वाटू लागते. या काळात य. गो. जोशी ‘शेवग्याच्या शेंगा’ ‘वहिनींच्या बांगड्या’ यांसारख्या आशयसंपन्न कथा लिहित होते. त्यांची दखल खांडेकरांच्या कथेने घेतलेली दिसत नाही. प्रारंभीच्या ‘दोन शब्द’मध्ये खांडेकरांनी आपल्या कथालेखनाची वैशिष्ट्ये व वाटचाल आणि काही कथांच्या जन्मकथा सांगितल्या आहेत. इथे ते संपन्न आशय, प्रभावी जीवनदर्शन आणि कथात्मक गुणवत्तेची जेवढी तरफदारी करतात ती त्यांच्या संग्रहातल्या प्रत्यक्ष कथांमध्ये आढळत नाही. आशयापेक्षा अभिव्यक्तीच्या पिंजऱ्यात त्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतल्याचा भास होतो. आपणच आपल्या कथांचे ‘कठोर टीकाकार’ झालो आहोत असे ते १९४९ मध्ये म्हणत असले, तरी ‘दोन शब्द’मध्ये कथांची भलामण केली आहे. नुसता ‘चमकृती’ हा मुद्दा पटविण्यासाठी मुद्दाम ओ हेन्रीच्या ‘दि कॉप अँड दि अ‍ॅन्थेम’ या कथेचा विस्तृत आशय विशद केला आहे. मराठी कथेच्या पहिल्या बहरातील कथांचे परीक्षण आजचे कथा निकष लावून करणे यथोचित होणार नाही. कारण साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व समकालीन समाजातून घडत असते. व्यक्तीच्या विकासाला मर्यादा असतात आणि समष्टीचा विकास अव्याहत होत राहतो. म्हणून या कथासंग्रहातले मानवी संबंध, भावनाभिव्यक्तीच्या पद्धती, मूल्यसरणी या गोष्टी आज तकलादू वाटतात, असे म्हणण्याऐवजी कालानुरूप वाटतात असे म्हणणे श्रेयस्कर आहे. -विजय काचरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more