* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667509
  • Edition : 32
  • Publishing Year : FEBRUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : RELIGIOUS & SPIRITUAL FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ARJUN, THE THIRD AMONGST THE PANDAVAS, STANDS FOR HIS SKILL OF ARCHERY AND IS CONSIDERED AS ONE OF THE GREATEST WARRIORS. THE DISTINGUISHED FIGHTER, HOWEVER, FELT CONFUSED WHEN THE FAMOUS MAHABHARAT WAR WAS ABOUT TO BEGIN ON THE BATTLEFIELD OF KURUKSHETRA. HE TURNED TO HIS CHARIOTEER, LORD KRISHNA, FOR ENLIGHTENMENT. THE LORD CLEARED ALL HIS DOUBTS THROUGH THE MOST INSTRUCTIVE AND INTERESTING DISCOURSES THAT CAME TO BE KNOWN AS THE BHAGVAD GITA. THE AUTHOR BELIEVES THAT IN THE PRESENT TIMES OUR POSITION IS NO BETTER THAN ARJUN. WE FACE VARIOUS PROBLEMS IN DAY TO DAY LIFE AND LIKE ARJUN CAN NOT MAKE UP OUR MINDS ON HOW TO SOLVE THEM. IGNORANCE, MISRULE, CORRUPTION, DOUBLE STANDARDS AND MANY SUCH FACTORS MAKE OUR MUNDANE LIFE DIFFICULT. THE AUTHOR DRAWS UP PARALLEL EXAMPLES FROM THE MAHABHARATA AND ATTEMPTS TO OFFER SOLUTIONS. THE TREATMENT OF THE THEMES IN THE ESSAYS IS LIKE THAT OF ART BUCHWALD WHOSE HUMOUR MAKES ONE SMILE AND BE SERIOUS AT THE SAME TIME.
संसार घरच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारख रंगवता येणार नाही का? आपल्या जल्मापूर्वी हे जग होतच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली एंट्री मध्येच केव्हातरी होते आणि एक्झिट हि. हे नाटक किती वर्षाचं, ते माहित नाही चाळीसी, पन्नाशी, साठी, सत्तरी.... सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार कि जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीच वरदान लाभणार, कि मतिमंद? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व,दंभ,लालसा.... किती सांगाव? कृष्णानं बासरीसहित आपल्याला चढवलं; पण त्या सहा छिद्रातून संगीत जन्माला येत नाही. स्वतःला काहीहि कमी नाही. स्वास्थाला धक्का लागलेला नाही. तरी माणस संसार सजवू शकत नाहीत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarAkshay Tajne

    लेखक , कथाकथनकार , आर्किटेक्ट , व्हायोलिन व हामोनियम - वादक , उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर , सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे , सुंदर रस्ता , सुंदर इमारत , सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते . म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या . मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या . विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा , खरं तर त्या कथा नाहीतच , कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत . एका व्यक्तीच्या विचार - आचारांची पद्धत . वपु त्याला ` पॅटर्न ` म्हणायचे . वपुंनी पॅटर्न्स मांडले . जे आपल्यासहित , आपल्या आवती - भोवती दिसतात . आणि म्हणूनच त्या पॅटर्न्सना दाद मिळते . विनोदी कथांमधून हसवता - हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं . ही अशीच जीवनाची तहा आहे , हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं . महाराष्ट्र सरकारनं त्यांना ` उत्तम लेखक ` म्हणून सन्मानित केलं आहे . CONCERN : गीतेतला , महाभारतामधला अर्जुन आणि मी स्वत : किंवा मला भेटणारी प्रत्येक गोंधळलेली व्यक्ती ह्यांत मला फरकच वाटत नाही . कृष्णावतार संपला , तो संपलाच ! अर्जुनाचा वंश विसाव्या शतकापर्यंत चालूच आहे . अर्जुनाच्या शंभर पटीनं धृतराष्ट्राच्या शंभर मुलांचाही वंश तितक्या पटीनं वाढतोय . निवडणुकीच्या तिकिटांच्या रांगेत उभा आहे . ह्या निवडणुकीपुरता तरी श्रीविष्णूंनी ‘ शेषा`ला रजा देऊन कदाचित डनलॉप घेतला असेल आणि शेषन रूपानं शेषाला पाठवला असेल . पुन्हा मत देताना विचारवंतांचा अर्जुन होणार . अर्जुनाला समोर शत्रू दिसेचना ; आप्त दिसले , कारण ते आप्त होतेच . ज्यांना दाखवण्यासाठी सिंहासन मिळवायचं , त्यांनाच मारल्यावर राज्याभिषेक कुणासमोर करायचा ? ...Read more

  • Rating StarYogesh Ugale

    सर्वसाधारणपणे दोन वर्षांपासून हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे. वपुंच्या पुस्तकांचं आकर्षण प्रत्येक मराठी वाचकाप्रमाणे मलाही आहेच. त्या आकर्षणापोटी वपुंच्या इतर पुस्तकांबरोबर हेही पुस्तक मी घेतलं. कथा-कादंबऱ्यांची पुस्तकं पटापट वाचून झाली. परंतु या वैचरिक पुस्तकाला हात घालण्यास मन धजावत नव्हते. एक वर्षापूर्वी ‘प्रेममयी’ वाचलेलं अजून आठवतंय. आकाराने अतिशय छोट्या असणाऱ्या या पुस्तकाच्या पाना-पानावर जीवनाचे अमूल्य तत्वज्ञान खास वपु काळेंच्या साध्या पण थेट मनाला स्पर्श करुन जाणाऱ्या शैलीतून अवतरले आहे.. कथा-कादंबऱ्यांची पुस्तके कधीच वाचून संपवलेली. वाचनाचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता. मग ‘आपण सारे अर्जुन’ हाती घेतलं. सुरुवातीला हे आपल्याला पेलवेल का, याविषयी साशंकता होती. परंतु नंतर पुस्तकानेच माझी पकड घेतली. एकेक लेख वाचताना जाणिवा विस्तारताहेत, असं वाटायला लागलं. हे पुस्तक वाचताना मलाही माझ्यातला अर्जुन दिसायला लागला. वपुंची खिळवून ठेवणारी लेखनशैली, साधी भाषा, अतिशय गहन तत्त्वज्ञानाला आयुष्यातील प्रसंगांशी जोडण्याची ताकद, कुठल्याही प्रकारच्या पांडित्याचा आव न आणता प्रामाणिकपणे गीतातत्वांचा घेतलेला वेध आणि आपल्याला अर्जुन बनवणाऱ्या आपल्या आयुष्यातील क्षणांची होणारी जाणीव, ही या पुस्तकाची खास आकर्षणे.. खरंतर एवढं सुंदर पुस्तक याआधीच वाचायला हवं होतं, याचीही खंत वाटत राहिली. जसजसे आपण पाने उलटत जातो, तसतसा आपल्यामधला अर्जुनच आपल्याला वाचनात खिळवून ठेवतो. माणसाला तेच लेखन सर्वाधिक आवडतं, ज्यातून माणसाच्या व्यथांचा-वेदनांचा आविष्कार झालेला असतो. या कसोटीवर ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक शत प्रतिशत खरे उतरते. ओशोंचे अमृतमय विचार समजण्याची ताकद आपल्याला वपुंच्या प्रेममय लेखनशैलीतून मिळते. अन्यथा ओशोंच्या तेजस्वी विचारांचे आकलन होणे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला जवळ जवळ अशक्यच. वपुंच्या बोटाला धरुन चालल्याने हा प्रवास सुकर होतो. या वाटेवर अधूनमधून गुर्जिएफ, जे. कृष्णमूर्तींसारखी हिरवीगार वळणंही येतात. प्रवास सुरु राहतो. आतला अर्जुन डोकावत राहतो. तत्वविचारांचे सिंचन होत राहते. वाचक आणि लेखक एकरुप होऊन जातात.. माझ्या आयुष्यात अशी फार कमी पुस्तके आहेत, की जी मी परत वाचली असतील. कमी म्हणजे अगदी बोटावर मोजण्याइतकीच. त्या पुस्तकांमध्ये ‘आपण सारे अर्जुन’चा समावेश झाला आहे.. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (MADHURA) 22-06-2005

    ‘माणूस परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती’ - व. पु. काळे यांच्या ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकातील हे पहिले वाक्य. सहजगत्या निसटलेल्या या वाक्यातून माणूस उलगडायचा अयशस्वी प्रयत्न, तरीसुद्धा त्यालाच चिकटून राहून घसट करून कोण माझा आणि कोण माझा नाही असं गणत पुन:पुन्हा मांडूनही नापास होणारा तो माणूस. खरं तर माणूस म्हणजे एक कोडं! आणि एक माणूस एकदाच हे तर महाकोडं. माणूस जन्म घेतो तो एकटाच आणि शेवटपर्यंत एकटाच राहतो; पण आयुष्यभर नात्यांमध्ये लपेटून वावरतो. माणूस माणसाला ओळखतच नाही. अगदी माझी माझी म्हणवणारी माणसं जेव्हा केसानं गळा कापतात, तेव्हा रक्ताचा एक टिपूसही न येता रक्तबंबाळ होणं म्हणजे खरा खून! कोण, केव्हा, का, कधी, कुठे, कुणाशी कसा वागेल? सांगता येतच नाही. उरतात ते प्रश्न निरुत्तरीत. एका प्रश्नानं तर गीतेचा जन्म झाला. श्रीकृष्णाला रणागंणावर गीता सांगावी लागली; पण अर्जुनाला समजतच नव्हतं. प्रश्न, प्रश्न आणि पुन्हा प्रश्न. गुरुवर्य व्यासांनी महाभारात लिहिलं. व.पु.च्या मते तो ग्रंथ इतका परिपूर्ण आहे की त्यानंतर काहीच लिखाण झालं नसतं. तरी चाललं असतं, असं म्हणणाऱ्या व.पु. काळ्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यातील हे एक ‘आपण सारे अर्जुन’. आपली अवस्थाही कायम प्रश्न सोडवताना, ते न सुटता दुसऱ्या प्रश्नाची निर्मिती करणाऱ्याची असते. संजयसारखी दूरदृष्टी आपल्याकडं नाही आणि श्रीकृष्णासारखं निर्विचारी होणं आपल्याला जमत नाही. आपण कायम संभ्रमावस्थेत हेलकावे खात असतो. म्हणूनच अर्जुन होतो. आपण अर्जुनासारखे प्रश्नांच्यात लोंबणारे! निरुत्तरित प्रश्नांचा, मागोवा घेत उत्तराला चाचपडणारे. महाभारतातील घटना, व्यक्ती, गीतासार हे सगळं कसं जसंच्या तसं आजच्या काळात लागू पडतं हे फार हळुवारपणं पण मार्मिकतेनं व.पु.नी या पुस्तकात मांडलंय. अर्जुन म्हटलं की, दुर्योधन आलाच. आंधळ्याचं राज्य आलंच. आज अनेक आंधळ्या राजकर्त्यांची हाताखाली राज्य करतात. आयएएस. प्रामाणिक कस्टम अधिकारी, कमिनशर्स, धृतराष्ट्र जन्मांध आणि आता सारे डोळे असून आंधळे. व.पु. म्हणतात, ‘‘आपल्या मुलाची जन्मत:च नैसर्गिकरित्या लाभलेली कुवत किती आहे हे किती पालकांनी जाणून घेतलंय? प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी; पण अभ्यासक्रम सरसकट एकच. औरंगजेब कसा होता हे कोणाला जाणून घ्यायचं? आपण स्वत: कसे आहोत, याचा अभ्यास का नाही करायचा?’’ या पुस्तकात माणूस, त्याचे आचार-विचार, मानसिक कोंडी, त्याची उकल, पलायनवाद, आत्मीयता, कलेले बहाणे, पांघरलेले पडदे, अपेक्षा, अपेक्षाभंगाचे क्षण, तो झटका, नंतरची तडफड.... हे असं सगळं अपरिहार्य म्हणून स्वीकारार्ह. त्यातूनच सापडणारा प्रकाशकिरण दूरवर दिसणारं यशोशिखर आणि मधील धूसर पाऊलवाट. अशी सारी गंमत या पुस्तकात आहे. आयुष्यातील अनेक घटनांचं एका शब्दात वर्णन म्हणजे - टाळ्या, हशे, चेष्टामस्करी, आनंद, समाधान, चैतन्य, जोम, जोश, उत्साह, लाजणं, सुधारणं, घसरणं, आपटणं, निर्मितीक्षण, राग, क्रोध, संताप, तापटपण, भांडण, हेवेदावे, पश्चात्ताप, मारणं, अश्रू, माया, वात्सल्य, शीतयुद्ध... आणि असेच खूप काही या पुस्तकात आहे. माणसाची अपरिहार्यता, संभ्रमावस्था, असहायता काय असते? आत्मघृणा, आत्मप्रौढी, आत्महत्या, अहंभव हे काय आहे? मैत्री म्हणजे काय? आत्मा, परमात्मा, देव, दैव, प्रारब्ध, दिव्यशक्ती, तपस्या, श्रद्धा्र, भक्ती, संकल्प, व्रतवैकल्य, उपवास, उपासना, गुरू हे कशासाठी? अर्पणभाव, टेलिपथी, पलायनवाद कशाला म्हणतात? या पुस्तकात या सर्वांचा ऊहापोह केला आहे. दिवसेंदिवस कोरड्या होत चाललेल्या समाजाला अत्यावश्यक असलेले मनमंथन केलं आहे आणि ते एका भावनाप्रधान लेखकाने - व.पु.नी त्यांची ख्यातीच आहे की, मनाला हात घालणारे, स्पर्श करून उकल करणारे लेखक. व.पु. काळे म्हणतात, ‘‘विसाव्या शतकातला मी अर्जुन आहे.’ २१वे शतक त्याहून वेगळे नाही. ओशोची गीता प्रवचने ऐकल्यावर व.पु. नी हे पुस्तक आपोआप लिहिलं आणि ते वाचल्यावर माझा अर्जुन झाला. माझ्या आयुष्यातील प्रश्नमालिका एकामागून एक सरकत गेल्या आणि मी हरवले. शेवटी सांगावंस वाटतं गीता, महाभारत, गीतासार, ओशो प्रवचनं वाचाल तर उत्तमच; पण निदान हे १४६ पानाचं ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचावंच वाचावं. लेखक व.पु. काळे म्हणजे हलकंफुलकं पण मनात घुसणारं लिखाण. त्यांनी लिहिलेले सुंदर प्रश्नचिन्हाचं पुस्तकं. -वंदना धर्माधिकारी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more