* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: BARI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177664188
 • Edition : 8
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 192
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET
Quantity
THE` BARRE` TRIBE HAD TRADITIONALLY LIVED IN THICK AND BEAUTIFUL JUNGLES. THEY RESORTED TO DACOIT AND THEFT IN NEARBY LOCALITIES FOR THEIR LIVING. THEY HARDLY EVER DREAMT OF STABLE LIFE. THE SOCIO-POLITICAL CHANGES AROUND AND FALLING OF FORESTS SIGNIFICANTLY CHANGED THEIR LIFE STYLE AND INTRODUCED THEM TO NEW WAYS AND VALUES. `BARE’ RECOUNTS ALL THIS IN FORM OF A NOVEL. THE PICTURESQUE ENVIRONS, THE RUGGED LIFE-STYLE, THE PETTY FEUDS AND PLEASURES, THE NEW CHANGES ETC. HAVE BEEN POWERFULLY AND REALISTICALLY PRESENTED WITHOUT ANY ATTEMPT TO PASS ANY VALUE JUDGMENTS.
जंगलाच्या आसर्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अस्सल कथा. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरु करणाऱ्या श्री. रणजीत देसईंची हि पहिलीच कादंबरी. कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलतःच भिन्न प्रकृतीधर्माचे आहेत. त्यामुळं या दोन्ही साहित्यप्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललितलेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री. रणजीत देसाई त्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबारीकता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर सुतगट्टी या नावाचं गाव लागतं. तिथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलान वेढलेली वाट `सूतगट्टीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून याव, असा हा भाग. त्या बरीचीची, त्या जंगलाच्या आसऱ्यान वाढणाऱ्या बेरड जमातीची हि कथा. श्री. रणजीत देसईंचा रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते याच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामूळं हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची च्या पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकत हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापूढ प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेल, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविशयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
 • Rating StarTushar Chaudhari

  कोल्हापूर हून मोटारीने बेळगावला जाताना वाटेवर सुतगट्टी हे गाव लागते. तेथून काकती गावापर्यंतची पंधरा वीस मैलांची , अगदी दाट गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट "बारी" म्हणून ओळखली जाते.. बदलत्या काळाच्या सुसाट वाऱ्याने बेरड जमातीच्या जीवनमानात कमालीचा बदल झला. बेरडवाडीच्या चिमुकल्या जगाची सुखदुःखानी भरलेली ही एक सरळ कथा आहे.. त्याच बेरडवाडीतील नायक `तेग्या` अन नायिका `नागी` यांच्या जीवनातील संघर्ष, तसेच जंगलाच्या आसऱ्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अतिशय उत्तम अशी ही कथा आहे.. काल पुस्तक वाचायला घेतलेलं, आजच वाचून पूर्ण झालं..खुप छान कादंबरी आहे.. कथाकार रणजित देसाई यांची कादंबरी प्रकारातली ही पहिलीच कादंबरी.. त्यामुळे कथानायक "तेग्या" च्या रूपाने एक मित्र भेटल्याचा आनंदच झाला..😍 ...Read more

 • Rating StarSushant Deshmukh

  नमस्कार मंडळी, आज परत खूप दिवसांनी पोस्ट टाकतोय. दोनच दिवसांपूर्वी काही पुस्तके खरेदी केली होती रणजीत देसाई ह्यांची. त्यातलं "बारी" ही कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. बारी ही रणजीत देसाई ह्यांची पहिली कादंबरी. रणजीत देसाई यांच्या ह्या आधी ४ कादंबरी वाचलया आहेत त्यामुळे "बारी" वाचण्याची खूप इच्छा होती. "बारी" ही एका छोट्याश्या गावाची आणि तिथल्या बेरड लोकांची कथा. त्यांची भाषा, राहणीमान, जीवनाचा संघर्ष, हे अगदी सगळ उत्तम रीतीने मांडले गेले आहे. वाचताना तुम्ही त्या पात्रांमध्ये हरवून जाता. "बारी" वाचून झाली पण एक रुखरुख लावून गेली. खूप कमी लेखक असतात ज्यांच्या लिखणात अशी जादू, ताकद असते. मागच्या वेळेस अशीच रुखरुख "स्वामी" कादंबरी वाचली तेव्हा झाली होती. बेरडवाडीतला "तेग्या" आणि त्याची बायको "नागी" त्यांचा संसार, पुढे येणाऱ्या समस्या हे सगळं काही वाचताना आपण तिथे असल्याचा भास होतो. पण जेव्हा "बारी" संपते तेव्हा एक रुखरुख लागते त्याचा कारण मागे राहिलेला तेग्या आणि त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिलेला त्याचा जुना गावं.... सारं कसं अंगावर आल्यासारखं वाटतं. रिकामं घर खायला उठतं तसचं.. जास्त काही सांगणार नाही, एकदा "बारी" वाचून बघावी.. ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-04-2004

  शोषितांचं जीणं... कथाकार रणजित देसाई यांचं मराठी साहित्यात वेगळं स्थान आहे. सामाजिक संघर्षाचं निरीक्षण, चिंतन देसाई यांच्या कथांतून होत असलेलं जाणवतं. ‘बारी’ ही देसार्इंची पहिली कादंबरी. बदलतं ग्रामीण जीवन हा विषय नवा राहिलेला नाही. तो अनेक लेखकांी आपापल्या परीने हाताळला आहे. यंत्रयुगाचा अपरिहार्य परिणाम शहरी व ग्रामीण जीवनावर झाला. याच वाटेने जाणारी ‘बारी’ ही कादंबरी वेगळी ठरते. बेरड जमातीचं जीवन चित्रण, त्यांचं मुख्य पिळवणूक असं वरकरणी स्वरूप भासलं तरी वास्तवात इतकाच एकांगीपणा कादंबरीत नाही. बेरवाडीचा तेग्या हा कादंबरीचा नायक आहे. त्याच्याभोवती गुंफलेली कथा ही तत्कालीन बेरड जमातीची कथा आहे. किंबहुना तळागाळातल्या सर्वच दुर्दैवी, शोषितांची ही कथा आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या चरितार्थाच्या साधनाद्वारे ही जमात पिढ्यान्पिढ्या जगत आलेली आहे. ज्ञानाचा, संस्कृतीचा, नव्या जीवनप्रवाहाचा, देशांतर्गत घडमोडींचा स्पर्शही या जमातीला झाला नाही. या पार्श्वभूमीवर तेग्याचा मुलगा ईश्वरा नव्या वळणावरचा प्रवासी आहे. तेग्याचं जीवन अखेरपर्यंत एकाच दिशेने वाहत राहते. पण ईश्वराच्या जीवनात स्थित्यंतरे येताना दिसतात. कादंबरीचा नायक तेग्या व त्याचे साक्षीदार दरोडे घालून चरितार्थ चालवत असतात. एकदा रात्रीच्या अंधारात चुकीने इनामदाराचं कुटुंब अडवलं जातं. तेग्या आईसाहेबांची माफी मागतो. पण बाळा महार इनामदारांपाशी चुगली करतो आणि कावेबाज इनामदार याचा गैरफायदा घेतात. सरोळीच्या पाटलाचा काटा काढण्याचा आदेश देतात. इथे तेग्या फसतो. कबूल केल्याप्रमाणे तेग्याला वकिलही देत नाहीत व पाच हजारही. अकरा वर्षांनी तेग्या तुरुंगाबाहेर येतो तो मनात सूडाची भावना घेऊनच. पण आईसाहेबांच्या शब्दाखातर तो माघार घेतो. तो पुन्हा उमेदीने पोटापाण्याच्या उद्योगाला लागतो, पण संकटं त्याची पाठ सोडत नाहीत. त्याचं घर आगीत भस्मसात होतं. इतकंच नव्हे तर नागी, त्याची बायकोही त्यात जळून जाते. असहाय्य तेग्या भ्रमिष्टासारखा होतो. दरम्यान त्याचा मुलगा ईश्वर मोठा झालेला असतो. अकरा वर्षांत बरंच काही घडून गेलेलं असतं. ईश्वराचा मार्ग भिन्न झालेला असतो. तो केंद्रावर जात असतो तेथे प्रार्थना, सूतकताई करत असतो. बेरडवाडीची तरुण पिढी, मुलं यांच्यावर केंद्रातील गुरुजींच्या विचारांचा प्रभाव असतो. बेरडवाडीत घडणाऱ्या घटनांत स्वातंत्र्यलढ्याचे, खादीधारीचे टोपीकरांचे तसेच भारताच्या स्वातंत्र्याचे, स्वातंत्र्यदिनाचे उल्लेख येतात. ईश्वरासारख्या तरुणांच्या मनात आशेचे किरण निर्माण होतात. उपेक्षित, शोषित जीवनापासून मुली मिळण्याची, स्वतंत्र, मनाचे जीवन जगण्याची आशा मनात जागी होते. कामधंदे उपलब्ध होतात, मजुरी मिळते. पण दुसरीकडे दारूसारखे व्यसन व धंदा यांनी बेरडांची पोरे बळी पडतात. नव्या कायद्याप्रमाणे जंगलतोडीच्या अपराधाबद्दल बेरडांना जबाबदार धरले जाते. जंगलाच्या गार्डकडून ईश्वराच्या बायकोवर अत्याचार केला जातो. तळागाळातल्या जमातींचे दुर्दैवाचे दशावतार चालूच राहिले होते. प्रस्तुत कादंबरीत गेल्या अर्ध शतकातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचे घडामोडींचे, क्रिया-प्रतिक्रियांचे चित्रण येते. टप्याटप्याने होणारे हे बदल तळागाळापर्यंत उमटणारे त्यांचे पडसाद, बदलाला सामोरं जाताना तेग्याच्या पिढीच्या प्रतिक्रिया यांचं सूक्ष्म चित्रण यात येतं. राजकीय स्थित्यंतर व औद्योगिक संस्कृतीचं वेगवान आक्रमण असा हा संक्रमणाचा काळ. समाजाच्या सर्वच स्तरात महत्त्वाचा होता. बेरड जमातींसारख्याचं परंपरागत जीवन व त्यात होऊ घातलेली स्थित्यंतरं लेखकाने टिपली आहेत. तेग्याच्या नातवाच्या तोंडची वाल्या कोळीची कथा हेच सूचित करते. -मधुलिका ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL (KOLHAPUR) 31-10-2004

  ‘बारी’– एक आनंद प्रत्यय... ‘स्वामी’कार रणजित देसाई यांची पहिली कादंबरी ‘बारी’ १९५९ मध्ये प्रकाशित झाली. तिची तिसरी आवृत्ती मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे हल्लीच प्रकाशित झाली आहे. भाऊसाहेब खांडेकरांची प्रस्तावना लाभलेली, ‘बारी’ आज इतक्या वर्षांनंतरही पुना वाचताना, एक नवा आनंद देऊन जाते. बेळगावजवळच्या सुतगट्टी या गावाच्या जवळची पंधरा-वीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट सुतगट्टीची बारी म्हणून ओळखली जाते. भर दुपारीही सूर्यकिरण जमिनीवर पोहचू नयेत इतकी घनदाट झाडी येथे होती. या झाडीच्या आसऱ्याने वाढणाऱ्या बेरड जमातीची ही जिवंत, खरीखुरी कहाणी. जंगलावर अपरंपार प्रेम करणारे बेरड, त्यांचे परंपरागत जनजीवन, बदलत्या काळाच्या झपाट्याने त्यात घडत गेलेले बदल आणि बरेच काही हरवले आहे, या जाणिवेपोटी मनाला होणारे डंख असा या कादंबरीचा स्थूल आलेख आहे. बेरडवाडीचा तेम्या हा कादंबरीचा नायक असला तरी त्याच्या निमित्ताने बेरड जमातीत असणारे जगण्याचे, जीवन पद्धतीचे, समजुतीचे, आनंदाचे, दु:खाचे नीतीमूल्यांचे तपशीलवार संकेत येथे रसदारपणाने व्यक्त होतात. रणजितदादांनी हे सगळे सातावरण जवळून पाहिले. त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यावर सखोल चिंतन केले आणि त्यातूनच ‘बारी’चा जन्म झाला. सामाजिक परिवर्तन हा एक अटळ आणि आवश्यक भाग असतो; पण हे परितर्वन होताना भावनिक, मानसिक होरपळ होत असेल तर ती समजून घेण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. रणजितदादांच्या ठिकाणी असणारे भावनाशील मन विविध संवेदनांनी ओसंडून गेल्यामुळेच बरेडवाडीच्या तेग्याचे तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंतचे जीवन उत्कटपणे समोर आले आहे. बेरडांच्या जीवनात होऊ लागलेले बदल तेग्याला मानवेनासे होतात. ते त्याला आक्रमणासारखे वाटतात. ज्याने गावाचे नाईकपण करायचे त्या ईश्वराच्या पुढाकाराने जंगलतोड सुरू व्हावी, हे त्याच्या मनाला यातनाकारक वाटते. ईश्वरा म्हणजे तेग्याचा मुलगा तेग्याला राखणदाराची नोकरी करण्याविषयी सुचवितो तेव्हा तो ठाम नकार देतो. दारूभट्टी लावली म्हणून ईश्वरावर येऊ पाहणारा आरोप स्वत:वर घेऊन तो तुरुंगात जातो. तुरुंगातून सुटून आल्यावर मुलगा व सून उदरनिर्वाहासाठी खाणीवर जात असल्याचे त्याच्या लक्षात येते. तो घरच्या लोकांना विरोध करतोच, पण जमातीच्या लोकांनाही विरोध करतो. मात्र त्यात त्याला यश येत नाही. दरम्यान, खाणीवर काही मृत्यू घडतात. घराघरांतून रडारड सुरू होते. अखेरी वाघाचे जीवन जगलेला तेग्याचा मुलगा ईश्वरा वनरक्षकाची म्हणजे एका शिपायाची नोकरी स्वीकारतो आणि गांधीवादाची दीक्षाही घेतो. एका ईश्वराचा प्रश्न या नोकरीने सुटला तरी जंगलाच्या आश्रयाने वाढलेल्या तमाम बेरड जमातीचे भवितव्य काय? बेरड जमातीची झालेली शोकांतिकाच ‘बारी’ मध्ये व्यक्त होते. अस्सल, खरीखुरी माणसे कादंबरीत वावरतात. त्यांची देहयष्टी, रंगरूप, भाषा, सवयी, लकबी, विचारप्रवृत्ती, त्यांचे खास असे वेगळे जग यामुळे वेगळ्या प्रकारचे पण भावभावनांच्या कल्लोळांचे उत्कट जग अनुभवता येते. धाडस आणि प्रामाणिकपणा ही बेरड जातीची वैशिष्ट्ये. जशास तसे रोखठोक वागणे, दिलेला शग्द पाळणे, दुसऱ्याने फसविलेले कळताच त्याला धडा शिकविणे, अशी साढढाळ नीतीसूत्रे येथे आढळतात. तेग्या आणि मुगी हे परस्परांवर प्रेम करणारे जोडपे. त्यांची सहज, अलवार प्रेमकहाणी, मुलाविषयीचे वात्सल्य, वडिलांविषयीचा आदर, समाजाविषयीचा जिव्हाळा यासारख्या बहुपेडी धाग्यांनी एक परिपूर्ण चित्र विणले जाते. जिवाला जीव देणारे साथीदार, जिवाचा सखा वाटावा असा मित्र, माया उधळणारा मामा, बेरकी इनामदार ही इतर पात्रे आणि गावाची ‘रहाटी हे परितोषिक रसायन यामुळे चित्राला त्रिमिती प्राप्त होते. बेरडे समाजाची आपल्या अस्तित्वासाठी चाललेली झुंज तर येथे आहेच; पण त्याचबरोब ते जगणं सुंदर व्हावं, किंबहुंना जगण्यावरील प्रेम व्यक्त व्हावं म्हणून चाललेली आनंदमय धडपडही येथे आहे. तमाशा, उत्सव, जत्रा, शिकार, जंगलांचे वणवे, जनावरांची झुंज यासारख्या ग्रामजीवनाला वेटाळून राहिलेल्या, जातिवंत गोष्टींचे लक्ष वेधून घेणारे चित्रण कथाविषयाची रंगत वाढविते. सुतगट्टीचे डोंगर, गर्द झाडी, अरुंद रस्ते, हिंस्त्र प्राणी, वातावरणातील रंगढंग याबरोबरच स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत गेलेले समाजातील वातावरण, कायदे, सुधारणा, गांधी-विनोबांचे विचार, शिक्षण, नोकरी, दारूबंदी इ. विषयांचे समयोचित भानही कथानकाशी बिलगताना दिसते. जुने धागे हळूहळू निसटावे आणि नवे अपरिचित पण अपरिहार्य नकळत स्वीकारावे लागावे, असे अभिसरण येथे घडते. एक मोठा अवकाश कादंबरीच्या ओंजळीत येतो. त्यातून फेरफटका मारताना जुने जे हरवले, जे मुठीतून निसटले याची हळहळ आणि नवे जे समोर आले त्यातून होणारी त्या समाजाची फरफट यामुळे वाचकाचा जीव व्याकुळ होतो. ही सहवेदनाच दु:खांचा श्वासोच्छवास अनुभवताना आनंद न वाटला तरच नवल. म्हणून इतक्या वर्षानंतरही ‘बारी’ वाचताना एक नवा प्रत्यय येतो. -मंदा कदम ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ARDHADASHAK
ARDHADASHAK by MILIND MAHANGADE Rating Star
Rajendra Jadhav

Milind, absolutely great, you have touched all thoughts and feelings of those who are preparing for competitive exams. This book never let the reader to divert their mind. I think each reader can recall their past. This book will definitely help to tink, for those who are willing to appear for such competitive exams and their parents too. Once again congratulations and all the best. ...Read more

COMA
COMA by ROBIN COOK Rating Star
Sumit Deshmukh

सत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्या रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक असले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more