DR. H.V. SARDESAI

About Author

Birth Date : 10/04/1933
Death Date : 15/03/2020


SARDESAI WAS BORN ON 10 APRIL 1933. AFTER GRADUATING FROM MUMBAI IN 1955 WITH MBBS AND MD (MEDICINE) IN 1958, SARDESAI MOVED TO LONDON FOR HIGHER EDUCATION. MBBS, HE SPECIALIZED IN PREVENTIVE MEDICINE AND FORENSIC MEDICINE.

सरदेसाई यांचा जन्म १० एप्रिल १९३३ रोजी झाला. मुंबईत १९५५ मध्ये एमबीबीएस आणि १९५८ मध्ये एमडी (मेडिसीन) ही पदवी घेतल्यानंतर सरदेसाई उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. एमबीबीएस ला त्यांना प्रीव्हेंटिव्ह मेडिसीन आणि फॉरेन्सिक मेडिसीन या विषयांत विशेष प्रावीण्य मिळाले. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विषयात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एमडी पदवी घेऊन ते १९६०मध्ये भारतात परतले. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी लक्ष्मी रस्त्यावर कुंटे चौकात दवाखाना सुरू केला. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच लेखन आणि व्याख्यान या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याबद्दल व्यापक जागृती घडवली. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाशी एकरूप होऊन ते शहराच्या आरोग्य व्यवस्थेचे आधारवड झाले. वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जायचे. डॉ. सरदेसाई यांनी १९८५पर्यंत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. या काळात त्यांनी अनेक वैद्यकीय तज्ज्ञ घडवले. महाविद्यालयात शिकवताना इंग्रजी भाषा; मात्र लोकांना व्याख्यान देताना पूर्णपणे मराठी भाषेचा वापर ते करत. ते सूचनापत्रे, म्हणजेच प्रीस्क्रिप्शनही मराठीत लिहीत. औषध कसे घ्यावे, या सूचना ते मराठीत लिहीत. सरदेसाई यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. मेहता पब्लिशिंग हाऊसमार्फत त्यांचे धन्वंतरी घरोघरी पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी इतरही सुमारे ३० पुस्तके लिहिली; तसेच त्यांचे अनेक संशोधनपर लेखही प्रसिद्ध झाले. पुण्यभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
33 %
OFF
DHANVANTARI GHAROGHARI Rating Star
Add To Cart INR 180 INR 121

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more