* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE PROPHET MURDERS
  • Availability : Available
  • Translators : JAYANT GUNE
  • ISBN : 9788184985368
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 199
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AS REFRESHING AS COOKIES AND COLD LEMONADE ON A SUMMER DAY. I WISH THERE WAS A TURKISH ALMODOVAR TO FILM ALL THESE NOVELS ONE DAY. PERIHAN MAGDEN, AUTHOR OF 2 GIRLS.THE FIRST IN A NEW TURKISH DETECTIVE SERIES. A KILLER IS ON THE LOOSE IN ISTANBUL AND KILLING TRANSVESTITES. OUR PROTAGONIST & FELLOW TRANSVESTITE, NIGHTCLUB OWNER, AND GLAMOUR-PUSS EXTRAORDINAIRE & TURNS INTO AN INVESTIGATOR IN THE SEARCH FOR THE KILLER. ITS A TOUGH CASE & CAN SHE END THE SLAUGHTER WITHOUT BREAKING A NAIL?
इस्तंबूलमध्ये काहीतरी विलक्षण घडत आहे. एक पिसाट खुनी मोकाट सुटला आहे आणि शहरातील ट्रान्सव्हस्टाईटचे एकापाठोपाठ एक खून होत चालले आहेत. प्रत्येक खुनानंतर परिस्थितीचा गुंता वाढत चाललाय. या कथानकाचा नायक हा इस्तंबूलच्या रंगेल जीवनातील एक प्रख्यात असामी असतो. तो दिवसा संगणक-तज्ज्ञ व रात्री ट्रान्सव्हस्टाईट असे दुहेरी आयुष्य जगत असतो. दिवस मावळल्यावर ओठांना लिपस्टीक लावून स्त्री-वेशात तो या खुनांचा शोध घ्यायचं ठरवतो खरं; पण खुनाच्या मागे असलेल्या माथेफिरू शक्तींचा सामना करणं वाटतं तेवढं सोपं नसतं आणि प्रकरण अंगावर शेकण्याची वेळ येते. कथानायिकेच्या रूपातील आपला कथानायक त्यातून मोठ्या चातुर्याने मार्ग काढतो. ट्रान्सव्हस्टाईट, समलिंगी वेश्यांच्या अनोख्या जीवनावर आधारित विनोदी धाटणीची चातुर्यकथा. अशा प्रकारचा किंचित चावट पण प्रसंगनिष्ठ व बौद्धिक विनोद मराठीत प्रथमच येत आहे. ही कथा तुर्की आणि युरोपियन संस्कृतीचा संगम म्हणून प्रसिद्ध असलेल्या इस्तंबूल शहरात घडते. कथानकाच्या ओघात बॉस्फोरच्या निळ्याशार समुद्रकाठी वसलेले इस्तंबूल शहर व तुर्की संस्कृतीचा परिचय होतो. बोरेक आणि राकीची चव चाखून पाहावी असा मोह होतो. युरोव्हिजन गाजवणा-या तुर्की गाण्यांचे सूर ऐकू येऊ लागतात आणि आपले पाय नकळत ठेका धरतात... ‘यालारिम यालारिम यालारिम...’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEPROPHETMURDERS #THEPROPHETMURDERS #दप्रॉफेटमर्डर्स #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #JAYANTGUNE #जयंतगुणे #MEHMATMURATSOMAR "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA (UTSAV) 16-11-2014

    थरारक कहाणी… मानवी मन हे सुष्टदुष्ट-भल्याबुऱ्या अशा अनेक प्रवृत्तींनी बनलेले आहे. त्या मनाचा तळ गाठणे आजही शक्य झालेले नाही. मानवी मनाचा चांगूलपणा तसेच विकृतता हे आजही गूढच आहे. प्रसिद्ध मानोसोपचार तज्ज्ञ सिग्मंड फ्रॉइडच्या म्हणण्यानुसार माणसाचे मन े हिमनगाप्रमाणे आहे. ज्याचा केवळ १/८ भाग दृश्य स्वरूपात तर ७/२ भाग पाण्याखाली आहे. माणसाच्या मनातील या परस्परविरोधी वृत्ती-प्रवृत्तींमुळे तो जी भयानक कृत्ये करतो त्याचे चित्रण द प्रॉफेट मर्डर्स या अनुवादित पुस्तकात लेखक जयंत गुणे यांनी केले आहे. तुर्कस्तानमध्ये ‘ट्रान्सव्हस्टाइट’ समुदाय आहे. कादंबरीचा नायक स्वत: ‘ट्रान्सव्हस्टाइट’ आहे. त्याच्या मालकीचा नाइट क्लब आहे. नायक समाजातील एक प्रमुख व्यक्ती आहे. जो कॉम्प्युटर सुरक्षा प्रणालीतील एक तज्ज्ञही आहे. क्लबमधील या मुली ट्रान्सव्हस्टाइट होत्या. पुरुष व स्त्री अशा दोन्ही रूपांत वावरायला आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये ही एक विचित्र मनोवृत्ती होती. रात्री क्लबमध्ये येताना या व्यक्ती स्त्रीच्या शरीराप्रमाणे स्वत:त बदल करून मेकअप करून येत. हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. नायक स्वत: म्हणतो, शरद ऋतूत तो देखणा होताच, पण उत्तम मेकअपमुळे त्याचं रूपांतर एखाद्या चंदेरी दुनियेतील तारकेप्रमाणे होत असे. नाइट क्लबमधल्या मुलींचे एकामागोमाग एक मृत्यू होऊ लागल्याने नायक अस्वस्थ होतो. ते अपघाती मृत्यू नसून खून असल्याचे त्याला जाणवले. अशा पिसाट खुन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न नायक ‘मॅनली गर्ल’ या चॅटवरून घेण्याचा प्रयत्न करतो. ‘Jihad २०००’ हे टोपणनाव असलेला केमाल बासत्कु हा हुशार माणूस एकाच वेळी अनेकांशी चॅट करण्यात तरबेज होता. नायक निधर्मी आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करत होता. तर केमाल इस्लामी मूलतत्त्ववाल्यांकडे तो इस्लामचा सच्चा अनुयायी होता. त्याचा रोख प्रामुख्याने गे. लेस्बियन, ज्यू, सोशॅलिस्ट, सद्भिरुचीला सोडून कपडे घालणाऱ्या, देहाचे विकृत प्रदर्शन करणाऱ्या, दारू पिणाऱ्या, मुलांना प्रार्थना व उपवास शिकवीत नाहीत अशा पापी : अश्रद्ध लोकांवर होता. त्यांना अन्य मार्गावर आणण्याचं. काम तो करत होता. तो स्वत: समलिंगी होता. नायकाने त्याला शोधून त्याच्यातर्फे अनेक गोष्टींचा शोध घेतला. ‘द प्रॉफेट मर्डर्स’ एक भयानक, थरारक, विकृत गुन्हेगारीचा माग घेण्यातील थरारक अनुभव देते. तसेच ‘ट्रान्सव्हस्टाईट’ या जमातीवर,त्यांच्या जीवनशैलीवर, प्रकाश टाकत व भाष्यही करतं ते इस्तंबूलच्या या विलक्षण जमातीवरही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more