ROSHEN DALAL

About Author

Birth Date : 24/10/1952


ROSHEN DALAL (BORN 1952) IS AN INDIAN WRITER OF BOOKS FOR ADULTS AND CHILDREN ON THE HISTORY OF INDIA AND ITS RELIGIONS. SHE HAS A PHD IN INDIAN ANCIENT HISTORY. ROSHEN DALAL WAS BORN IN MUSSOORIE AND STUDIED IN VARIOUS SCHOOLS ACROSS THE COUNTRY. AFTER A BA (HONS) IN HISTORY FROM THE UNIVERSITY OF BOMBAY, SHE COMPLETED AN MA AND PHD IN ANCIENT INDIAN HISTORY FROM JAWAHARLAL NEHRU UNIVERSITY, NEW DELHI. SHE HAS TAUGHT AT BOTH SCHOOL AND UNIVERSITY, AND BEEN INVOLVED IN RESEARCH IN THE FIELDS OF HISTORY, RELIGION AND PHILOSOPHY, AND EDUCATION.

रोशन दलाल (जन्म १९५२) हे भारताचा इतिहास आणि त्याच्या धर्मांवरील प्रौढ आणि मुलांसाठी पुस्तकांचे भारतीय लेखक आहेत. तिने भारतीय प्राचीन इतिहासात पीएचडी केली आहे. रोशन दलाल यांचा जन्म मसुरी येथे झाला आणि देशभरातील विविध शाळांमध्ये त्यांचे शिक्षण झाले. बॉम्बे विद्यापीठातून इतिहासात बीए (ऑनर्स) केल्यानंतर, तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून प्राचीन भारतीय इतिहासात एमए आणि पीएचडी पूर्ण केली. तिने शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी शिकवले आहे आणि इतिहास, धर्म आणि तत्त्वज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रातील संशोधनात तिचा सहभाग आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SATTARITLA BHARAT Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more