* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EXODUS
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788177662566
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 664
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
EXODUS IS AN INTERNATIONAL PUBLISHING PHENOMENON--THE TOWERING NOVEL OF THE TWENTIETH CENTURY`S MOST DRAMATIC GEOPOLITICAL EVENT. LEON URIS MAGNIFICENTLY PORTRAYS THE BIRTH OF A NEW NATION IN THE MIDST OF ENEMIES--THE BEGINNING OF AN EARTHSHAKING STRUGGLE FOR POWER. HERE IS THE TALE THAT SWEPT THE WORLD WITH ITS FURY: THE STORY OF AN AMERICAN NURSE, AN ISRAELI FREEDOM FIGHTER CAUGHT UP IN A GLORIOUS, HEARTBREAKING, TRIUMPHANT ERA. HERE IS EXODUS --ONE OF THE GREAT BEST-SELLING NOVELS OF ALL TIME.
रोमन सम्राट व्हेस्पासियन याने आपला सेनापती टायटस याला दोन साध्या आज्ञा दिल्या. ज्यूंचे देऊळ जमीनदोस्त करा. सर्व ज्यूंना ठार मारा. जेरुसलेमच्या पाडावानंतर त्याने या आज्ञांचे तंतोतंत पालन करायला सुरूवात करताच जिवाच्या आकांताने देशोधडीला लागलेले ज्यू जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले. त्यांना स्वत:चा असा देशच राहिला नाही. ते जिथे जिथे पोचले, तिथे तिथे त्यांनी आपल्या देशाची स्मृती कायम मनात ठेवली. अपार कष्ट, हालअपेष्टा, जुलूम आणि कत्तली यांना तोंड देत आपला धर्म जिंवत ठेवला. दोन हजार वर्षे आपल्या ईश्‍वरदत्त पवित्र भूमीवर आपल्या प्राचीन राज्याची पुन्हा स्थापना करण्याचा ध्यास धरणार्‍या देशोदेशींच्या हद्दपार ज्यूंची - पासोव्हरची प्रार्थना संपत असे - ‘‘पुढल्या वर्षी जेरुसलेममध्ये’’ या शब्दांनीच. इतिहासाचा मागोवा घेत, जिद्दीने उभारलेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसासाठी तेवढाच प्रखर लढा देणार्‍या ज्यूंची कथा सांगणार्‍या श्री. लिऑन युरिस यांच्या एक्झोडस् या पुस्तकाचा हा अनुवाद.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EXODUS #EXODUS #एक्झोडस् #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BALBHAGWAT #बाळभागवत #LEONURIS "
Customer Reviews
  • Rating StarVaibhav Mahajan

    रोमन सम्राट व्हेस्पासियन याने आपला सेनापती टायटस याला दोन साध्या आज्ञा दिल्या. ज्यूंचे देऊळ जमीनदोस्त करा. सर्व ज्यूंना ठार मारा|जेरुसलेमच्या पाडावानंतर त्याने या आज्ञांचे तंतोतंत पालन करायला सुरूवात करताच जिवाच्या आकांताने देशोधडीला लागलेले ज्यू जगा्या कानाकोपर्‍यात पोहोचले| त्यांना स्वत:चा असा देशच राहिला नाही|ते जिथे जिथे पोचले, तिथे तिथे त्यांनी आपल्या देशाची स्मृती कायम मनात ठेवली. अपार कष्ट, हालअपेष्टा, जुलूम आणि कत्तली यांना तोंड देत आपला धर्म जिंवत ठेवला| दोन हजार वर्षे आपल्या ईश्‍वरदत्त पवित्र भूमीवर आपल्या प्राचीन राज्याची पुन्हा स्थापना करण्याचा ध्यास धरणार्‍या देशोदेशींच्या हद्दपार ज्यूंची - पासोव्हरची प्रार्थना संपत असे|- ‘‘पुढल्या वर्षी जेरुसलेममध्ये’’ या शब्दांनीच|इतिहासाचा मागोवा घेत, जिद्दीने उभारलेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसासाठी तेवढाच प्रखर लढा देणार्‍या ज्यूंची कथा No automatic alt text available. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 29-06-2003

    इस्रायलच्या निर्मितीची रोमहर्षक कथा… इस्त्रायलची निर्मिती आणि त्यानंतर त्याने अस्तित्वासाठी केलेला संघर्ष याचा इतिहास जगातील कोणत्याही इतिहासापेक्षा अधिक रोमहर्षक आहे. केवळ प्राचीन धार्मिक पुस्तकांमध्ये अस्तित्वात असलेला देश आधुनिक काळात प्रत्यक्षातआणणे आणि त्यासाठी निसर्गाबरोबर राजकीय प्रतिकूलतेवर मात करणे यासाठी लागणारी प्रखर निष्ठा आणि आत्मविश्वास यांचे थक्क करणारे दर्शन इस्त्रायलींनी जगाला घडविले आहे. सहा दिवसांचे यु, असो की दूर युगांडातील एन्टेबीवरील आश्चर्यकारक छापा असो, या घटनांनी इस्त्रायल ही दंतकथाच बनली आहे. जगाच्या नकाशावर शोधताना कष्ट पडावेत, इतक्या चिमुकल्या आणि वाळवंटी भूभागासाठी हजारो वर्षे संघर्ष, हिंसाचार करण्याइतके असे कोणते सोने या भागाला लागतले आहे, हा प्रश्न ज्यू नसलेल्या इतरांना पडू शकतो. परंतु इस्त्रायल हे ज्यूंचे स्वप्नच नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाचेही कारण आहे. ज्यू आपला देश गमवणार, हे बायबलमध्ये म्हटले होते, पण देव त्यांना तो पुन्हा मिळवून देईल. असेही बायबलमध्ये लिहिले होते. बायबलच्या प्रत्येक अक्षरावर दृढ श्रद्धा बाळगणाऱ्या ज्यूंनी, एक ना एक दिवस आपली भूमी परत मिळवू. हे स्वप्न बघत दोन हजार वर्षे अनंत यातना, कल्पनातीत हालअपेष्टा आणि असंख्य कतली यांना तोंड दिले. पण स्वत:चे राज्य पुन्हा स्थापन करण्याचा ध्यास कधीही सोडला नाही. असंख्य अडचणी येऊनही इस्त्रायलची एकदा निर्मिती झाल्यावर त्याच्या शत्रूंनी चहुबाजूंनी त्याच्यावर हल्ला चढविला; पण धर्मावरील असीम आणि अढळ श्रद्धेनेच ज्यूंनी शत्रूंवर मात केली. एकदा नव्हे अनेकदा. शेकडो वर्षे देशोदेशी आश्रय घेतलेल्या आणि सर्वत्र अल्पसंख्य असलेल्या या समाजाकडे हे बळ आले कोठून? त्यांची प्रेरणा कोणती? इस्त्रायलच्या निर्मितीमागचा ध्येयवाद आणि वास्तव परिस्थिती यांचे जिवंत दर्शन लिऑन युरिस यांच्या ‘एक्झोडस्’ या कादंबरीत घडते काल्पनिकता आणि वास्तव घटना याचा सुरेख मिलाप घडवून युरिस यार्न इस्त्रायलचा जणू इतिहासच लिहिला आहे. बाळ भागवत यांनी या कादंबरीचा केलेला सहज सुंदर अनुवाद ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने देखण्या स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. इजिप्तमधील ज्यूंना गुलामगिरीतून मुक्त करून मोझेस त्यांना इस्त्रायलमध्ये घेऊन आला. ते पहिले ‘एक्झोडस् - म्हणजे ज्यूंचे घाऊक स्थलांतर. त्यानंतर पण इस्त्रायलच्या निर्मितपूर्वी जगभरच्या ज्यूंनी तेथे जाण्याचा सपाटा लावला. तत्कालीन पॅलेस्टाईनमधील ज्यूंची संख्या वाढू लागल्यावर अरब देशांमध्ये असंतोष पसरला पॅलेस्टाईनवर ब्रिटिश सत्ता होती आणि ब्रिटन हे अरबांच्या बाजूने होते. ब्रिटिशांनी ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये जाण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. जवळच्या सायप्रस बेटावर असंख्य ज्यूंना ब्रिटिशांनी बंदी बनवून ठेवले होते. यातील काही मुलांना इस़्त्रायलमध्ये बेकायदा घेऊन जाण्याची योजना ज्यूंची गुप्तचर संघटना - मोसाद आलिया आखते. या ढोबळ कथावास्तूव ‘एक्झोडस्’ आधारित आहे. या कथेच्या अनुषंगाने तत्कालीन पॅलेस्टाईनमधील राजकीय स्थिती आणि तेथे जाऊ इच्छिणाऱ्या ज्यूंची पार्श्वभूमी यांची गुंफण करीत युरिस यांनी ज्यू त्यांचं धर्मनिष्ठा, त्यांचे सणवार इस़्त्रायलनिर्मितीमागचे तत्त्वज्ञान यांचे विश्लेषण केले आहे. तब्ब्ल ६४५ पानांच्या या कादंबरीचे पाच भागात विभाजन केले आहे. तत्कालीन वास्तव राजकीय परिस्थिती आणि कादंबरीतील कथा यांची बेमालूम सांगड घातली गेल्यानं कादंबरीतील घटना खऱ्याच आहेत अशी शंकाही अधूनमधून येते प्रत्येक भागापूर्वी ज्या भागात ते कथानक घडते, त्याचा नकाशा आणि कथानकास अनुरूप असे बायबलमधील वचन देण्यात आले आहे. संपूर्ण कादंबरी वाचल्यावर (किंवा वाचतानाही) ज्यूंचा जगभर झालेला छळ आणि त्यांची ससेहोलपट आणि त्यातूनच आलेली त्यांची विजिगीषु वृत्ती यांचा प्रभाव वाचकावर पडल्याशिवाय राहत नाही. ज्यूमधील अतिरेकी विचारसणीच्या लोकांचीही ओळख घडते. मात्र कादंबरीचा प्रारंभ, तिच्या सुरुवातीस आलेल्या प्रमुख व्यक्तिरेखा कथेच्या ओघात हरवून जातात. एक घटना घडत असताना त्यात असलेल्या व्यक्तिरेखांचा इतिहास देताना मूळ कथा बाजूलाच पडते. यामुळे कादंबरी वाचताना एकसंघ कथा वाचल्याचा परिणाम जाणवत नाही. हा या कादंबरीचा दोष, असे असले, तरी कादंबरी वाचनीय झाली आहे. गेल्या काही वर्षात मराठीत इस्त्रायलविषयक पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली आहेत. ‘एक्झोडस्’ ही त्यात मौलिक भर आहे. कादंबरीपेक्षा इस्त्रायलनिर्मितीचा जिवंत इतिहास असेच तिचे स्वरूप असल्याने संदर्भग्रंथ म्हणूनही तिचे स्थान अधिक टिकाऊ आहे. -राहुल बोरगावकर ...Read more

  • Rating StarThe New York Times

    "Passionate summary of the inhuman treatment of the Jewish people in Europe, of the exodus in the nineteenth and twentieth centuries to Palestine, and of the triumphant founding of the new Israel."

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more