* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AN EYE FOR AN EYE
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980219
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 150.00 gms
  • Pages : 150
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SAYEED NEVER DOUBTS THE INNOCENCE OF LATIFA, THE BEAUTIFUL VILLAGE GIRL HE BROUGHT TO THE CITY AS HIS WIFE. BUT THERE IS NO WAY HE CAN SAVE HER FROM HER FATE.SET IN THE DESERT KINGDOM HE PORTRAYED SO VIVIDLY IN MIRAGE, BANDULA CHANDRARATNA TELLS THE TRAGIC STORY OF SAYEED AND LATIFA; THE LITTLE GIRL WHO PICTURES HER MOTHER LOST IN THE DESERT; THE FATHER WHO TRAVELS TO THE CITY TO RETRIEVE THE BODY OF HIS DAUGHTER. AND THROUGH IT ALL RUNS THE DISTANT ECHO OF LATIFA`S OWN STORY, THE TRUTH THAT LIES BEYOND THE TRAGEDY. A FINE ACHIEVEMENT, AS MOVING IN ITS EVOCATIONS OF INTENSE GRIEF AS IT IS HEARTENING IN ITS DEMONSTRATIONS OF UNSOLICITED, TOTALLY ALTRUISTIC ACTS OF KINDNESS.FRANCIS KING, LITERARY REVIEW CHANDRARATNA WRITES WITH THE BRACING CLARITY AND AUSTERITY OF A CHILLY DESERT DAWN... WRITTEN WITH A QUIET, UNAFFECTED GRACE AND SYMPATHY THAT COMPEL BOTH ATTENTION AND ACCLAIM BOYD TONKIN, INDEPENDENT A LITTLE MASTERPIECE DORIS LESSING, TLS
खेड्यातल्या एका सुंदर मुलीशी लग्न करून सईद तिला शहरात घेऊन आला. तिच्या निष्कलंक चारित्र्याबद्दल त्याला कधी स्वप्नातही शंका आली नाही; पण तो तिला वाचवू मात्र शकला नाही. एका सुडाने पेटलेल्या जिवाचा स्वत:शी आणि आजूबाजूच्या रानटी प्रवृत्तींशी चाललेला संघर्ष, त्याच्या मनाचा उडालेला गोंधळ या सगळ्यांना बंडूला चंद्ररत्ना मोठ्या नजाकतीने हात घालतात. आपली आई वाळवंटात हरवली असल्याची कल्पना करणारी छोटी मुलगी, चांगुलपणाने सईदच्या बिकट प्रसंगी त्याला निरपेक्ष मदत करणारे त्याचे मित्र, आपल्या मुलीचा दगडांनी ठेचलेला मृतदेह स्वत: शहरात जाऊन घेऊन येणारे समंजस वडील, हे सगळे तपशील कथेत सुसंगत भर घालतात. लतीफाच्या दु:खान्त जीवनकहाणीचा पडसाद कांदबरीवर उमटत राहतो तरी वस्तुस्थिती मात्र शोकांतिकेच्या पलीकडे जीवंतच राहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ANEYEFORANEYE #ANEYEFORANEYE #अ‍ॅनआयफॉरअ‍ॅनआय #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #BANDULACHANDRARATNA "
Customer Reviews
  • Rating StarDAILY TARUN BHARAT 13-9-2010

    श्रीलंकेत जन्मलेल्या बंडुला चंद्ररत्ना यांनी सौदी अरेबिया आणि इंग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये काम केले आहे. त्यांची पहिली कादंबरी ‘मिराज’ इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीतील कथानक ‘अॅन आय फॉर अॅन आय’ या कादंबरीत चालू राहते. मिराज कादंबरीच्या वेळी थोड्या कारणासाठी त्यांचे बुकर पुरस्काराच्या यादीत नाव येणे हुकले असले, तरी कमिटीतील अनेक परीक्षकांना या कादंबरीने भुरळ घातली. २०००मध्ये लंडनच्या एका मोठ्या प्रकाशकाने जेव्हा या पुस्तकाची पेपरबॅक स्वरूपातील आवृत्ती काढली, तेव्हा ती त्या वर्षीच्या समीक्षकांच्या दृष्टीने सर्वाेत्कृष्ट कादंबरी ठरली. सौदी अरेबिया येथील हॉस्पिटलमध्ये काही वर्षे काम करत असताना बंडूला चंद्ररत्ना यांनी पाहिलेले, अनुभवलेले आखाती देशातले जनजीवन तिथली राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, सामाजिक रूढी, चालीरीती हे अतिशय अस्सलपणे आणि अपरिहार्यपणे त्यांच्या लेखनात आलेले आहे. अनेक लोक आखाती देशात नोकरी धंद्यानिमित्त, पर्यटनासाठी जाऊन येतात. त्यांच्याकडून आपल्याला तिथल्या जीवनाबद्दलचे तुटक तुटक तपशील समजत असतात, पण तिथे राहून प्रत्यक्ष अनुभव घेऊन, नंतर त्याकडे अलिप्तपणे पाहून ते कादंबरी रूपात आपल्यापुढे आल्यामुळे, सर्व काही सुसंगत समजल्यासारखे वाटते. मुख्य कथा आहे सौदी अरेबियातील न्याय पध्दतीची व त्यामुळे होणा-या परिणामांची कोर्टाची सुनावणी होऊन लतीफाला व्यभिचारी ठरविण्यात आले. हुसैन हाशमीला रंगेहाथ पकडले होते. लतीफला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. हुसैन हाशमीला शिरच्छेदाची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यांची अंमलबजावणी होणार होती आणि ते पाहण्यासाठी अथांग जनसमूह लोटला होता. हुसैनने आपला मित्र सईदचा विश्वासघात केला होता. त्याचीच शिक्षा त्याला शिरच्छेदाच्या रूपाने मिळत होती. अब्दुल रेहमानच्या आजोबांच्या मते, हाशमी जमातच वाईट वर्तणुकीची कचराच ही जमात म्हणजे मूळ रक्तातच खराबी असलेली. लतीफाला दगडांनी ठेचून मारण्याच्या शिक्षेचाही अंमलबजावणी झाली आणि तिचा पती सर्वार्थाने कोसळून गेला. लतीफाच्या मुलीला लैलाला-सईदच्या दयाळू अंत:करणाचा मित्र, अब्दुल मुबारकने सांभाळले आहे. अलफौजींचा विश्वास आहे की चांगले हे नेहमीच वाईटावर विजय मिळवते. अब्दुल मुबारक त्यांना अरबांचे औदार्य आणि प्रेमळपण यांचे मूर्तिमंत आदर्श प्रतीक वाटतो. त्यांना वाटते आपले राज्यकर्ते जर त्यांच्यासारखे असते तर... पण ते सगळेच स्वार्थी आहेत. संपूर्ण अरब देशाला लागलेला कलंक आहेत ते. सईदचा बालपणीचा मित्र यासेर त्याला भेटतो आणि त्याच्या सांगण्यावरून सईदचे मन बायकोच्या वधाचा सूड घ्यायच्या कल्पनेने पेटून उठते. यासेरच्या मते, मानवी संस्कृतीच्या संपूर्ण इतिहासात घडला नसेल असा दुराचार आणि नीतिभ्रष्ट व्यवहार आपल्या इथे चालू आहे. व्यसनाधीन बादशहा आणि त्यांचे शेकडो नातेवाईक जनतेची संपत्ती लुबाडत आहेत. सगळीकडे झोपडपट्ट्या वाढत चालल्यात. मुतव्वा म्हणजे सरकारचे नोकर आहेत. आता तुझा न्याय तू स्वत:च मिळवला पाहिजेस. त्या झोपडपट्टीतल्या ज्या लोकांनी तुझ्या बायकोवर झालेल्या अन्यायाचा बदला घे. सईद, लक्षात ठेव. ‘अॅन आय फॉर अॅन आय’, असे ओरडत यासेरने तो खंजीर उंचावला. हवेत नाचवला आणि मग सईदच्या हातात दिला. विचारांच्या भोवNयात आवार्त घेणाऱ्या मनानेच सईदने खंजीरासह मुतव्वाच्या झोपडीकडे प्रयान केले. मुतव्वा वयस्कर चेहरा, पांढरी दाढी आणि लाल चौकड्यांचा गन्ना सईदला स्पष्ट दिसला. सईदने खंजिराचा हात वर उचलला आणि आता धावत जाऊन खंजीर खुपसणार, तोच पाठीमागून एक मुलगी धावत आली. त्याला घराकडे ओढू लागली. सईदने खंजीर म्यानात घालून खिशात ठेवला. पुढे गेल्यानंतर खंजिराच्या साहाय्याने खड्डा खणला. आणि खंजीर खड्ड्यात पुरून टाकला. घरी गेल्यावर मित्राला म्हणाला, ‘हो, आता मी आनंदात आहे.’ सौदी अरेबियातील अमानुष उपचार पध्दती, वेशभूषा, खान-पान चाली रीती या सर्वांचे दर्शन अनेक लहान मोठ्या प्रसंगातून कादंबरीत चित्रित झाले आहे. एक मोठा अॅल्युमिनियमचा थाळा, त्यात भाताचा मोठा ढीग आणि चिकन रस्सा होता. ते सगळेजण त्या एकाच थाळ्यातून सावकाश, शांतपणे जेवत होते, हे आज वाचतानासुध्दा विचित्र वाटते. लेखकाची साधी सोपी भाषा, कुठलेही अलंकार घालून न सजवता वाचकांपुढे येते. पण त्यातून अधोरेखित झालेले वास्तव अचंबित करते. विचार करायला भाग पाडते आणि वाटते हेच या कादंबरीचे बलस्थान आहे. याच कारणाने सुनंदा अमरापूरकर यांना या कादंबरीचा अनुवाद करण्यास प्रवृत्त केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती