WILLA CATHER

About Author

Birth Date : 07/12/1873
Death Date : 24/04/1947


WILLA CATHER WAS BORN IN BACK CREEK VALLEY, VIRGINIA. SHE GRADUATED FROM RED CLOUD HIGH SCHOOL IN 1890. CATHER WANTED TO STUDY MEDICINE, BUT WHILE STUDYING AT THE UNIVERSITY OF NEBRASKA, CATHER DEVELOPED AN INTEREST IN WRITING.

विला कॅथर यांचा जन्म , व्हर्जिनियातील बॅक क्रीक व्हॅली इथं झाला.1890 साली त्यांनी रेड क्लाऊड हायस्कूल येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. कॅथर यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण नेब्रास्का विद्यापीठात शिक्षण घेत असताना कॅथर यांच्यामध्ये लेखनाची आवड रूजली. 1892 साली बोस्टन मासिकात त्यांची लघुकथा प्रसिद्ध झाली. जी पुढे त्यांच्या माय ॲन्टोनिया या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली. पदवी शिक्षणानंतर त्यांनी होम मंथली मासिकात संपादनाची धुरा सांभाळली. या मासिकात मजकूर वाढवण्यासाठी कॅथर यांनी विपुल लघुकथालेखन केलं. ज्या कथा द ट्रोल गार्डन या कथासंग्रहात प्रसिद्ध झाल्या. 1913 साली त्यांची ओ पायोनियर्स तर 1917 साली माय ॲन्टोनिया कादंबरी प्रसिद्ध झाली. द लॉस्ट लेडी या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना 1923 साली पुलित्जर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळच्या त्यांच्या लेखनाचा गाभा स्थलांतर आणि परंपरागत राहणीमानाचा विनाश या विषयांशी जोडलेला होता. या घवघवीत यशानंतर कॅथर यांच्या 1925 साली द प्रोफेसर्स हाउस, 1926 साली माय मॉर्टल एनीमी आणि 1927 साली डेथ कम्स फॉर आर्चबिशप या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. विला कॅथर यांच्या संपूर्ण साहित्यातून कला, इतिहास आणि धर्मविषयक जाणिवांचं सखोल चिंतन प्रकट होतं.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
48 %
OFF
DEVACHI MANSE Rating Star
Add To Cart INR 280 INR 146

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more