* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HMS ULYSSES
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9789353173647
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 364
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : CRIME & MYSTERY, THRILLER / SUSPENSE
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL THAT LAUNCHED THE ASTONISHING CAREER OF ONE OF THE 20TH CENTURY’S GREATEST WRITERS OF ACTION AND SUSPENSE – AN ACCLAIMED CLASSIC OF HEROISM AND THE SEA IN WORLD WAR II. NOW REISSUED IN A NEW COVER STYLE. THE STORY OF MEN WHO ROSE TO HEROISM, AND THEN TO SOMETHING GREATER, HMS ULYSSES TAKES ITS PLACE ALONGSIDE THE CAINE MUTINY AND THE CRUEL SEA AS ONE OF THE CLASSIC NOVELS OF THE NAVY AT WAR. IT IS THE COMPELLING STORY OF CONVOY FR77 TO MURMANSK – A VOYAGE THAT PUSHES MEN TO THE LIMITS OF HUMAN ENDURANCE, CRIPPLED BY ENEMY ATTACK AND THE BITTER COLD OF THE ARCTIC.
ही कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे. या सगळ्या विपरीत परिस्थितीला युलिसिसवरील सगळे अधिकारी आणि नौसैनिक ज्या असीम धैर्याने आणि शौर्याने तोंड देतात त्याचे भेदक वर्णन ‘एचएमएस युलिसिस’ या कादंबरीत आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#एचएमएसयुलिसिस #अ‍ॅलिस्टरमॅक्लीन #अनिलकाळे #दगोल्डन गेट #सीविच #दसटनबग #दडार्कक्रुसेडर #मार्कर #क्युअर #दलास्टडॉन #ओमेर्ता #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #HMSULYSSES #ALISTAIRMACLEAN #ANILKALE #THEGOLDENGATE #SEAWITCH #THESATANBUG #THEDARKCRUSEDAR #MARKER #CURE #THELASTDON #OMERTA #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starनकुल फुलंब्रीकर

    केवळ अप्रतिम! याव्यतिरिक्त या पुस्तकाबद्दल काय सांगावं... एखादा सिनेमा पाहत आहोत असं हे पुस्तक वाचताना वाटतं. द गन्स ऑफ नॅव्हरॉन, द लास्ट फ्रंटियर, द सटन बग, द गोल्डन गेट अशी एकाहून एक ऍलिस्टर मॅक्लिनची अनेक पुस्तके आतापर्यंत वाचली होती. पण ज्या पु्तकामुळे मॅक्लिन यांची लेखन कारकीर्द सुरु झाली ते `एचएमएस युलिसिस` मात्र आतापर्यंत राहून गेलं होतं. २०१९ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक मराठीत प्रकाशित केलं. प्रसिद्ध अनुवादक अनिल काळे यांनी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. पुस्तकाची थोडक्यात कथा अशी: दुसऱ्या महायुद्धात रशियाला युद्धसामुग्री पोहोचविण्यासाठी मालवाहू आणि तेलवाहू जहाजांचा एक काफिला दोस्त राष्ट्रांकडून पाठवला जातो. संरक्षणासाठी काही लढाऊ जहाजे काफिल्याबरोबर दिली जातात. क्रुझर जातीचे लढाऊ जहाज `एचएमएस युलिसिस` हे या सर्वांचे नियंत्रण करत असते. एकूण ३२ जहाजे असलेल्या काफिल्याला भयानक अडचणींना सामोरे जावे लागते. वादळे, खवळलेला समुद्र, बर्फवृष्टी, हाडं गोठवणारी थंडी, शत्रूचे हल्ले, उपासमार आणि थकवा. या सर्वांना तोंड देताना जहाजांवरील लोकांची बिघडत चाललेली मानसिकता, रोगराई आणि अपघात यामुळे प्रचंड नुकसान होते. अनेकदा जर्मन बोटी आणि विमाने हल्ला करतात. मात्र अशी भीषण परिस्थिती असूनही युलिसिस वरचे सर्व नौसैनिक पराक्रमाची पराकाष्ठा करतात. प्रत्यक्षात ३२ पैकी किती जहाजे सुस्थितीत रशियाला पोहोचतात हे प्रत्येकाने पुस्तकातच वाचावे. या कथेत म्हणजे आशा-निराशेचे चढ-उतार आहेत. सर्व ठीक चालले आहे असे वाटत असतानाच अचानक एखादी घटना घडते आणि होत्याचं नव्हतं करते. एखाद-दुसरं वगळता कथेतील सर्व पात्र कर्तव्यासाठी आपल्या भावना बाजूला ठेवतात. कडक स्वभावाचा ऍडमिरल टिंडॉल, कर्तव्यदक्ष पण भावुक स्वभावाचा आणि सर्वांना जवळ करणारा कॅप्टन व्हॅलेरी, सडेतोड सर्जन-कमांडर ब्रुक्स, कर्तव्यासाठी आप्तांची बोट बुडवणारा राल्सटन, तीक्ष्ण नजरेने शत्रूला शोधणारा १८ वर्षांचा क्रायस्लर, अक्षांश-रेखांशांची अचूक मोजणी करणारा कॅपोक किड, भीषण परिस्थितीतही बर्फासारखा थंड राहणारा युलिसिसचा चालक कॅरिंग्टन आणि अर्थातच शेवटपर्यंत या सर्वांचा साक्षीदार राहणारा सर्जन-लेफ्टनंट निकोल्स. पुस्तक वाचून झाले तरीही ही पात्र वाचकांच्या मनात घोळत राहतात. ही केवळ मुख्य पात्र. यांच्याशिवाय अनेकजण छोट्या-मोठ्या प्रकारे लक्षात राहतात. हे पुस्तक वाचणारा वाचक ऍलिस्टर मॅक्लिनचा फॅन होणार यात वाद नाही. एचएमएस युलिसिस कादंबरीला जगभरात मान्यता मिळालेली आहे. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वोत्तम कादंबऱ्यांपैकी ही एक गणली जाते. मॅक्लीनच्या इतर पुस्तकांप्रमाणेच यातही प्रेमकथा नाही. इतकेच काय तर या पुस्तकात एकही स्त्री पात्र नाही. पण क्षणाक्षणाला वाचकांना धक्के देणारे प्रसंग मात्र आहेत. पुस्तकाचे अनुवादक श्री अनिल काळे यांच्याशी माझे फोनवर बोलणे झाले. त्यांनी याआधीही मॅक्लिनची अनेक पुस्तके अनुवादित केली आहेत. एक अप्रतिम कलाकृती मराठीत आणल्याबद्दल श्री काळे तसेच मेहता पब्लिशिंग हाऊस चे आभार मानावे तितके कमीच आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more