* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK IS BASED ON LIFE OF CATTLE BREEDERS; THEY ARE CALLED MALDHARIS IN GUJARATI WHO LIVES IN GIR FOREST, WHICH IS KNOWN FOR LAST SURVIVAL OF ASIATIC LION. THE AUTHOR HAS VERY WELL DESCRIBED THE LIFE AND TRADITION OF MALDHARIS. THE WAY OF CONVERSATION, PHILOSOPHY OF LIFE AND RELATIONSHIP WITH NATURE AND ANIMALS, ESPECIALLY WITH LION IS THOROUGHLY DESCRIBED. THE BOOK IS A GOOD EXAMPLE TO URBAN PEOPLE, HOW THESE TRIBAL TAKING UTMOSTS CARE TO PRESERVE THIS NATURE. THE AUTHOR HAS SO AUTHENTICALLY PRESENTED THE ENTIRE NOVEL IT SEEMS YOU ARE WATCHING A MOVIE. THE CENTRAL THEME OF THE BOOK IS ABOUT SYMBIOTIC RELATIONSHIP BETWEEN HUMANS, LIONS AND NATURE. THE PEOPLES SEE GIR AS A LIVING ENTITY THEY TALK WITH JUNGLE, GIVES NAME TO THE HILLS. ONE OF THE BEST STORIES I LIKED AMONG THE ENTIRE BOOK IS ABOUT RAILWAY STATION MANAGER FROM SOUTH INDIA WHO STAYS AT KAASIYA NES AND CONSTRUCTS CONCRETE WATER TANK FOR LEOPARD AND OTHER ANIMALS.
‘माज्या बाळांनु, तुमी समदं ह्ये समजून घ्यावा, की हितं पक्क्या घरात -हातुया म्हून कोनीबी अमर व्हनार न्हाई हाये. हितं ह्या रस्त्यांवर मोटरी, टरक, फटफट्या, टेम्पा, ह्या समद्यांखाली सापडून जेवडी मानसं मरत्यात, त्यवड्यांना तितं स्हावजानं, बिबट्यानं का साप विंचवांनी मारलं असं कदी आयकलं न्हाई.’ आईमाचं बोलणं ऐकल्याबरोबर मी खोल विचारात पडलो. ह्या रमणीय पृथ्वीवर जीवन तर सगळीकडे फुललेलं-फळलेलं आहे, आणि जिथं म्हणून जीवन आलं, तिथं अनिश्चितता आलीच. इथं शहरात भीती वाटेल अशी अनिश्चितता. तिकडं गीरच्या जंगलात, नैसर्गिक वातावरणात असणारी अनिश्चितता रम्य, सुंदर! पुढे काही विचार मनात येण्यापूर्वीच आईमांचा आवाज खोलीभर पुन्हा गुंजला. ‘समदे सिकलेले लोक दररोज पेपरात वाचून आमाला सांगत्यात, तं उगाच उगाच भांडनं करून आनि लडाया करून मानसं कुटं न्हाई मरत? आनि तरीबी प्रिथिवीला ‘खमा’ म्हनायला पन हितं येळ हाये कोनाला?’ सरळ शांत वाहात जाणारी हीरण नदी एकाएकी काळ्या खडकांचा किनारा ओलांडून बाहेर यावी, तसं माझं मन उचंबळून आलं. गीरमध्ये आलो त्या पहिल्या संध्याकाळी आईमांच्या तोंडून ऐकलेल्या ‘खमा’चे अनेक अर्थ आज, अचानक अशा तNहेनं, फुलून-पांघरून माझ्या लक्षात येतील ह्याची मला कल्पनाही नव्हती.... एका चित्रकाराच्या आत्मशोधाची – त्याला सापडलेल्या ‘गीर’ची बहुपेडी व विलक्षण कादंबरी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #AKOOPAR #AKOOPAR #अकुपार #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITO #MARATHI #ANJANINARAVANE #अंजनीनरवणे #DHRUVBHATT #ध्रुवभट्ट
Customer Reviews
  • Rating StarUday R. Thombare

    ध्रुव भट्ट हे मूळ गुजराती लेखक. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय, एखादा प्रदेश पाहिल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय काहीही न लिहिणारे व लिहिण्यासाठी प्रत्यक्ष त्या जागी जाऊन राहणारे लेखक. त्यांची अशाच अनुभवी भटकंती मधून साकार झालेली कादंबरी `अकुपार ` अंजली नरवे अनुवादित. अकुपार चा अर्थ इथे सांगणं उचित नाही. ते प्रत्यक्ष वाचून उमजून घेणं योग्य ठरेल. गुजरात मधील ` गीर ` बद्दल तिथल्या सांस्कृतिक, सामाजिक,पर्यावरणपूरक वैभवाबद्दल भाष्य करणारी कादंबरी. जंगलच्या राजा विषयीच्या प्रत्यक्षदर्शी घटना, त्याचं राजेपण, त्याच्या व्यथा नकळत मनात उतरत जातात.गीर मधील रहिवाशांची आपल्या परिसराबद्दलची समर्पण वृत्ती अनेक प्रसंगातून व्यक्त होते. एक अंध व्यक्ती अनेक मैल चालत जाऊन सावजांची (सिंहांची)शिकार करू नका अशी विनवणी नवाब व इंग्रज अधिकाऱ्यास करणारा , तसेच डोंगर दत्तक घेऊन त्यांचं थाटामाटात लग्न लावणारा गीरवासी खूप मोठी शिकवण देऊन जातो. आपल्या लग्नात मिळालेली गाय एका प्रसंगी सिंहांचं भक्ष्य होताना पाहणारी व तिचं समर्पण करणारी गीरवासी स्त्री भेटते. अहोरात्र भटकंती करून पर्यटकांचं रक्षण करून सिंहाचा हल्ला अंगावर घेणारा गीरवासी समर्पण भाव शिकवून जातो. तसेच गीर साठी सतत भटकत राहणारे, सर्व जंगल संपत्ती, प्राणी यांची काळजी घेणारे, स्वतः अनेक दुःखाचा सामना करत असताना सुद्धा गीर च्या भल्याचा विचार करून अहोरात्र झटणारे गीरवासी आपल्याला भेटून काहीतरी शिकवून जातात. असे अनेक प्रसंग खुप वाचनीय आहेत. एखादी अशिक्षित व्यक्ती सुद्धा खूप सोप्या शब्दांत, आपल्या वागण्या बोलण्यातून जीवन विषयक तत्वज्ञान सांगून जाते. वैयक्तिक हेवेदावे स्वार्थी वृत्ती, खून, मारामाऱ्या, कपट या सर्वांपासून मुक्त असं शांतता लाभावी असं लिखाण. प्रेमाचा,आपुलकीचा निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी अनेक उदाहरणे वाचण्यास मिळतात म्हणूनच संपू नये व वाचतच रहावं असं वाटतं. प्रत्येक पर्यावरण प्रेमीनी आणि सर्वांनी वाचायला हवं असं वाचनीय, वेगळे अनुभव देणारं पुस्तक. - धन्यवाद 🙏🏻 ...Read more

  • Rating StarSumit Dutte Jain

    गुजरात मधील घनदाट अरण्यात एक रेल्वे स्टेशन होते. आता आजूबाजूचा परिसर, घनदाट अरण्याने वेढलेला असल्यावर आपण कल्पना करु शकतो कि, त्या स्टेशनवर जास्त गर्दि कधीच नसणार. नव्हतीही..! स्टेशनवरच कशाला, तर ज्या गावात स्टेशन आहे, तो भागही दुर्गम व विरळ वस्तीचा.दिवसभरात मोजून पंधरा-वीस माणसाचं दर्शन व्हायचा, ऐवढा निर्मनुष्य. दिवसातून एक रेल्वेगाडी यायची व तीच परत जायची. अशाच एका छोट्याशा रेल्वेस्टेशनला एक करेळचा मनुष्य स्टेशनमास्तर ह्या पोस्टवर येतो. साहजिकच सर्वात मोठी अडचण होते ते भाषेची..! एक तर त्याला मल्याळम व इंग्रजीसोडुन काही येत नव्हत, अन त्या गावातल्या आदिवासीला गुजरातीही नीट येत नव्हती. ते त्यांच्याच स्वत:च्या भाषेत बोलायचे. मग ह्या दोघांत संभाषण कसं होणार...? शिवाय, साप विंचवासोबत खेळणारे आदिवासी लेकर ह्या सुटाबोटातील माणसाला पाहीले कि पळून जायचे. ते रेल्वे स्टेशन होत सिंहासाठी आजही प्रसिद्ध असलेल्या गिर अभयारण्यात. मध्यवर्ती भागात.!! ह्या एकांतवासात जीवन कसं जगायच..? ह्यावर त्याने एक उपाय काढला. तो जास्तीत जास्त प्राण्यां सोबत मैत्री करु लागला. प्राण्यांच्या आवडी निवडी जाणू लागला. त्यांच्यासाठी त्याने स्टेशनवरच एक पाणवठा तयार केला. अक्षरक्ष: चित्ता देखील त्याचा मित्र झाला. अरण्याला खेटुन असणाऱ्या समुद्रात एका विशिॆष्ट मोसमात परदेशातून ,लांबून मासे येत असत. ईथे ते फक्त प्रजनन करण्यासाठी यायचे. स्थानिक मासेमारी करणारे ते मासे पकडुन जास्तीत जास्त उत्पन्न करत असत. परंतु त्या माश्याचा नैसर्गिक पर्यावरणावर, समु्द्री जीवनावर कसा वाईट परिणाम होतो ह्याची त्या मच्छमाऱ्याच्या प्रमुख असलेल्या स्त्रिला कळत, तेव्हा " ते मासे म्हणजे बाळांतपणासाठी माहेरी आलेली माहेरवाशीण असते. अशा माहेरवासीणीला मारुन आपण दोन जीवाचा बळी घेत आहोत." अस म्हणून ती इतरांना समजावून सांगते. तेव्हा ते आपल्या मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडतात. रोज दोन वेळेस येणाऱ्या रेल्वेमुळे आपल पंगु पोरगं चालायला लागल, म्हणून रेल्वेच्या इंजिनालाच देव मानून त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या आदिवासी बाया... विदेशातून आलेल्या अभ्यासु पर्यटकासोबत फिरताना स्थानिक गाईडचं वागण, वेळप्रसंगी जीवही धोक्यात घालण... गिरमध्ये सिंहाबरोबरच, सिंह ज्या प्राण्यावर जीवन जगतो ते प्राणी जगले पाहीजे. त्यासाठी मर्यादित क्षेत्राच्या पलिकडे कोणीही आपली म्हैस, गाय चरायला न्यायची नाही. तिकडील कुरण हे जंगली हरिण, निलगाय ह्यासाठी राखीव ठेवणारे आदिवासी..`स्थानिक राजाकडुन गिरला काही त्रास होऊ नये, त्यांनी काही हस्तक्षेप करु नये म्हणून, दोन टेकड्यांच लग्न देखील लावतात.` हि कथाही वाचनीय आहे. गिरच जंगल हे स्वत:मध्येच एक अद्भूत जीवन आहे. त्याला त्याची वेगळी भाषा, संस्कृती आहे.. गिरच्या जंगलात राहणारे आदिवासी, त्यांची जंगलाकडे पाहण्याची नजर, सिंहाबद्दल प्रेम, आपुलकी, निसर्गाबद्दलच ज्ञान , ह्या सर्वाबद्दल श्री धुव्र भट्ट ह्यांनी आपल्या "अकुपार" ह्या कांदबरीमध्ये वर्णन केल आहे. अस वाचनीय पुस्तक "अकुपार" पर्यावरण, मनुष्य आणि इतर प्राणी ह्यांच्यामधील संबध ह्यांच्यासंबधी विचार करायला लावणारी एक गुढकथा...!! ज्यात, आपल्याला कथानायक कथा सांगत असतो. पण शेवटपर्यंत त्यांच नाव आपल्याला कळत नाही. दुसरी महत्वाची लेखकाबद्दल गोष्ट म्हणजे, हे लेखक कथा जरी काल्पनिक लिहीत असले तरी त्यांच्या कथेमध्ये वर्णन केलेल्या भागात ते वर्षानुवर्ष राहतात. त्याचा अभ्यास करुनच लिहतात. त्यामुळे कथेमध्ये वास्तवतेच दर्शन वाचकाला होत असत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.