* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663259
  • Edition : 4
  • Publishing Year : OCTOBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BOOK DEPICTING OUR PRESENT-DAY STRESSFUL LIFE AND SUGGESTING SOME SIMPLE WAYS OF REDUCING STRAIN AND LEADING A MORE RELAXED LIFE.
आजच्या आपल्या जीवनपद्धतीचा आपल्या मनावर जो परिणाम होत आहे, त्यासंबंधी विचार मांडून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न लेखिकेनं या पुस्तकात केला आहे. आज समाजातल्या सर्व थरांतली माणसं मानसिक ताणतणावाखाली वावरताना दिसतात; घरात आणि बाहेर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना मनानं थकून जातात. मात्र लेखिकेच्या मते, हा ताण कमी करणं आणि आयुष्य अधिक सुखद व आनंदमय करणं, हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती असतं. हे कसं साध्य करायचं? सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि ‘ताण व आनंद’ या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड काल्र्सन यांचे विचार व लेखिकेचे स्वत:चे विचार यांची गुंफण करून लिहिलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित नवी दिशा देणारे ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating Starश्रीकांत नाईक

    ‘आपण, आपले ताणतणाव- एक चिंतन’ या पुस्तकाच्या रूपाने मला परीसच सापडला. पुस्तकातील तुम्ही दिलेली उदाहरणे आमच्या रोजच्या जीवनातीलच आहेत. ती लगेच भावतात. एका चांगल्या विषयाला आपण चालना दिली आहे.

  • Rating StarLOKSATTA 16-3-2003

    घाई आपल्या पाचवीलाच पुजलेली असते. विकासाची सांगड आपण शहरीकरणाशी घातली आणि प्रदूषण, धावपळ, दगदग, चिंता यांना मुक्तद्वारं दिलं. डॉ. रिचर्ड कार्ल्सन हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध स्ट्रेस कन्सल्टंट. ‘आपण आणि आपले ताणतणाव’ हे पुस्तक त्यांच्या या विषयावरच्या पु्तकांवर आधारित आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांनी कौटुंबिक स्वास्थ्यावर भर दिला आहे. कुटुंब हा आपल्या जीवनपद्धतीशी मिळतेजुळते असल्याने ते मराठीत आणण्याचा विचार झाला, तरी हा अनुवाद नव्हे, हे लेखकाने मुद्दाम नमूद केले आहे. यातील घटना-प्रसंग आपल्याच आजूबाजूच्या वातावरणातून घेतलेले आहेत. लेखनही सोप्या, संवाद साधणाऱ्या भाषेत केलेले असल्याने नवे विचारही चटकन आपलेसे होतात. ‘आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या प्रमाणावर आपलं व्यक्तिमत्त्व ठरत असतं.’ हे लक्षात घेतलं, की आधी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा बागुलबोवा पळून जाईल. चुका होणारच. त्यांच (पश्चत्तापाचंही) अवडंबर किती माजवायचं, तेही आपणच ठरवायला हवं. ध्यानधारणेचं महत्त्व आता बहुतेकांना पटू लागलंय. आपल्याच मनाला थोडं वेगळं वळण लावण्यानेही बरेच ताण नाहीसे होतात, हे लेखकाने प्रत्यक्ष प्रसंग सांगून छान सांगून छान समजावून दिलं आहे. सुबत्तेचा आणि संतोषाचा काहीही संबंध नाही, हे तर स्वच्छच आहे. कृतज्ञ असणं हा एक मोठाच अॅसेट आहे. जिब्राननं लग्नाबद्दल लिहिताना म्हटलेलं ‘आपली हृदयं परस्परांना द्या, पण ती परस्परांच्या अधीन करू नका’ - लग्नालाच नव्हे, तर प्रत्येक नातेसंबंधाला लागू पडतं. घरची माणसं हक्काची आहेत, असं म्हणत बाहेरचा राग त्यांच्यावर काढताना त्यांनाही याचा त्रास होईल, याचा विचार आपण करत नाही. अशाच छोट्या-छोट्या गोष्टींना नव्या कोनातून बघण्याची जादू आपलं आयुष्य आनंददायी करू शकते, हा मोठाच दिलासा या पुस्तकानं दिला आहे. ...Read more

  • Rating StarMUMBAI TARUN BHARAT 17-11-2002

    आजच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीत माणसाचे मन अधिक तणावग्रस्त होत चालले आहे. परिणामी मानसिक आजारांना निमंत्रण मिळत आहे. मन हे आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक. मनाचं हे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून संतांनी मन प्रसन्न करण्याचे मार्ग सांगितले आहे. रामदास स्वामी तर म्हणतात, मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे साधन. मानसिक रोगाने पछाडलेले अनेक लोक आपल्याला भेटतात. समाजातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाखाली वावरत असते. घरात आणि घराबाहेर प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे. नेमके हेच हेरून अंजनी नरवणे यांनी ‘आपण, आपले ताणतणाव - एक चिंतन’ या पुस्तकात मनावर होणाऱ्या ताणावर विचार मांडले आहेत व वाचकांशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तकात लेखिकेने अमेरिकन लेखक आणि ताण व आनंद या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड कार्ल्सन यांचे विचार व स्वत:चे विचार यांची गुंफण केली आहे. मनावरील ताणतणाव कमी करणं आणि जीवन अधिक सुखद व आनंदमय करणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हातात असतं असं लेखिकेचं म्हणणं आहे. पहिल्या भागात आपल्या मनाबाबत विचार करताना ‘आपण आणि आपलं मन’ या प्रकरणाखाली आपण आणि परिस्थिती, आपली वागणूक यात चुका आपण करतो आहोत का, तणावांना तोंड कसं द्यावं, आपण असे वागलो तर अशा अनेक मार्गांचा विचार केला आहे. लेखिकेने प्रसंग उद्धृत करून त्या समस्या कशा सोडवू शकू याचा विचार केला आहे. ‘आपण आणि आपलं कुटुंब’ या प्रकरणात कुटुंबातील समस्यांचा विचार करताना लेखक म्हणतो, कृतज्ञ आणि आनंदी असणं किती फायदेशीर आहे, दुसऱ्याला दोष देत राहण्यापेक्षा आपुलकीनं समजुतीनं कसं वागावं, आपलं कौटुंबिक वातावरण कसं असावं तसंच मुलांचं संगोपन, आपलं घर, घरातली कामं, आपलं वागणं कसं सुधारावं याबद्दल लेखिका सांगते. ‘आपण, नातीगोती आणि मित्रपरिवार’ या प्रकरणात आपलं इतरांशी वागणं कसं असावं त्यातील छोट्या छोट्या गोष्टींची माहिती लेखिका देते. ‘आपण आणि भोवतालचं वातावरण’ या प्रकरणात आपलं काम, आपल्या तक्रारी, आपले ताण कमी करणं, ते करताना समोरच्या माणसाच्या बौद्धिक पातळीचा अंदाज घेऊन बोलणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. सर्वांनी असेल त्या परिस्थितीत समजुतीनं, आनंदानं राहण्याचा प्रयत्न करावा, आपल्या आणि इतरांच्याही मनावरील ताण कमी किंवा दूर करण्यासाठी झटावं तसेच लहानसहान अडचणींचा बाऊ न करता त्या सोडविण्याकडे कल असावा असा लेखिका सल्ला देते. सदर पुस्तक वाचून जीवनातील ताणतणाव दूर करावेत व आपले जीवन अधिक सुखकर करावे, त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.