* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ADGAL
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789913
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"‘ADGAL’ IS A BEAUTIFUL NOVEL THAT DEPICT THE STATE OF HELPLESSNESS AND REFUSAL FACED BY ANAGED RENOWNED DALIT WRITER. THE VIBRANT WAVE OF DALIT LITERATURE EXPRESSING THE DREADFUL EXPERIENCES OF THE BURNING REALITIES OF LIFE AROSE AND MINGLED IN PAST SIXTY MARATHI LITERATURE. DAILT LITERATURE DESCRIBED THE DISASTROUS CONSEQUENCES OF AN ANTI- ESTABLISHMENT REBELLIOUS FIGHT. IT EXPRESSES THE HEART- VENTING EXPERIENCES IN THE THEN UNFAMILIAR AND STRICKING STYLE. IT EXPRESSED LARGELY THROUGH STORIES, POEMS AND BIOGRAPHIES, BUT VERY RARELY IN NOVEL FORM. LATER, AFTER THE POST NINTY CONTEMPORARY LITERATRUE THE VIBRANT WAVE OF DALIT LITERATURE DECLIVED. ON THAT BACKGROUND THE PRESENT NOVEL WITH ITS MODERATE, TENDER AND GENTLE STYLE SIDELINED SEVERAL ESTABLISHED FRAMES AND TRENDS OF DALIT LITERATURE SEEMS TURING BACK TO CLASSICAL FORM AND AESTHETIC GRANDEUR, MAY THIS BE TURING TO NEO-ESTABLISHMENT. JUGA KALE A RETIRED PERSON, STARTED WRITING VERY LATE OF HIS AGE, AT 66. HE HAD A GREAT RESERVOIR OF EXPERIENCES OF LIFE AND A BIG RANGE, HE BECAME A PROFILE AND PERPETUAL WRITER. HE WROTE IN VOLUMES THOUGH HE BEGAN LATE. HE WAS RECEIVED AND APPRECIATED BY THE READING PUBLIC ON A LARGE. HE RECEIVED SEVERAL AWARDS AND HONOURS, AND OF COURSE IT FOLLOWED THE POPULARITY. ALL THOUGH THESE LIVED YEARS HE HAD TASTED THE SWEETS AND SORES OF THE LIFE. HE HAD THE TOUCHING MEMORIES OF THE DAYS SPENT IN THE VASTI WITH THE FELLOW PEOPLE. THE SAGA OF THE AGONIES AND SUFFERINGS IS STILL BURING AND ALIVE IN HIS HEART. THE LIFE IN THE DALIT VASTI HAS A GREAT IMPACT ON HIS MIND. AFTER RETIREMENT FROM THE JOB IN A BANK HE JOINED AS A TRUSTEE IN AN EDUCATIONAL INSTITUTE FOUNDED AND RUN BY A MP. MORE GURUJI. AS HE WAS HONEST, COMMITTED AND SENSITIVE PERSON HE TRIED TO WORK WITH THAT ZEAL AND COMMITMENT. HIS STRICT, SCRUPULOUS AND NON-CORRUPT WAYS BROUGHT DIFFICULTIES FOR HIM. HIS INSISTENCE FOR FINANCIAL CORRECTNESS ADMINISTRATIVE STRICKNESS DISAPPOINTED MAN AND THE FOUNDER MORE GURUJI ALSO. THERE GREW CERTAIN DIFFERENCES ON THE ISSUES OF VALUES. HE SUFFERED MUCH. THIS HAD BEEN A SCHOCKING AND EYE-OPENING EXPERIENCE FOR HIM. BESIDES ALL THIS GRASPING ALL THESE EXPERIENCES JUGA GOES ON WRITING. THE DAYS SPENT IN THE DALIT LOCALITY, THE BONDINGS WITH THE PEOPLE THERE TOGETHER WITH THE FURTHER LIFE HE LIVED, THE EDUCATION THE STAYING AWAY FROM VASTI FOR THE JOB, THE FAMILIARITY WITH DIFFERENT PLACES, PEOPLE, TRADITIONS, CUSTOMS, ALSO THE CHANGING PATERNS OF LIFE ENRICHED HIS PERCEPTION UNDERSTANDING AND VISION OF LIFE AND THE WORLD AROUND. HE OBSERVED THE VARIOUS WAYS OF THE WORLD. ALL THIS HE PICTURISED POIGNANTLY. THE NOVEL ‘ADGAL’ DRAWS A NICE PICTURE OF SELFSENTIMENTS, APPEALS, TREMORS AND ROLES OF THE AUTHOR. THOUGH THE WRITOR IS A DALIT, HE LOOKS AT THINGS WITH A CONSIDERATE WAY RATHER THAN A REBELLIONS ONE. HE LOOKS AT THE WORLD WITH AN INDEPENDENT, FREESOME THOUGHT AND THAT BY AND FACTUAL WORLD AND SUFFERINGS. THIS IS THE DISTINCT CHARACTERISTIC OF THIS NOVEL. ILLITERATE WIFE JANAKA, EDUCATED BUT NEW GENERATION SONS SUDHIR AND ARUN COULD NOT UNDERSTAND HIS YEARNING. HENCE HIS LIFE BECOMES A MESS MAKING HIM UNSTABLE, PEACELESS, SUFFERING, BROKEN AND SUFFOCATING BECAUSE OF ROUTINE CONFLICTS, COMMENTS AND QUARRELS. JUGA KALE IS A SENSITIVE TENDERHEARTED AUTHOR BUT HIS FAMILY IS DRY TASTLESS AND INSENSITIVE TOWARDS HIS CREATIVITY. THIS PARADOX IS THE UNDERCURRENT OF HIS NOVEL. IN SHORT THE NOVEL DESCRIBES THE LIFE FULL OF PARADOXES, CONFLICTS, AGONIES, FRUSTRATIONS, DISILLUSIONMENTS, SUFFERINGS BECAUSE OF THE CALLOUSNESS HIDDEN BEHIND.... AT FAMILY LEVEL AND IN THE WORLD AROUND HIM. THE GENERATION GAP AND ILLITERACY A CAUSING A DISTANCE AMONG FAMILY MEMERS, HELPLESSNESS OF THE SENSITIVE WRITER ALL THIS IS EXPRESSED WITH A GRAT SPEED FLUCENCY AND CHARM. A NICE STYLE COMMAND ON LANGUAGE CREATES A VERY BEAUTIFUL WORLD OF THE NOVEL AND GIVES A GREAT AESTHETIC EXPERIENCE TO THE READERS. THIS WILL BE THE TREND TURNING NOVEL BY A DALLIT WRITER MAKING IT CLASSICAL, SMOOTH AND GENTLE. "
बँकेतून सेवानिवृत्त झालेले जुगा काळे हे ‘अडगळ’ या कादंबरीचे नायक. वयाच्या सहासष्टीनंतर ते लिहायला लागतात. अल्पावधीत विपुल लेखन होते. सन्मान होतो. नावलौकिकही मिळतो; पण बायको आणि मुलांना त्यांच्या लेखनात, त्यांना मिळालेल्या मानसन्मानांमध्ये रस नाही. सेवानिवृत्तीनंतर माजी मंत्री व विद्यमान खासदार मोरे गुरुजींच्या शिक्षण संस्थेचं काम ते निरलसपणे करत असतात; पण त्या संस्थेतून त्यांना पद्धतशीरपणे बाहेर काढलं जातं. वस्तीशी असलेलं काळ्यांचं नातं, त्यांची समाजसेवा मुलांना रुचत नाही. वयाच्या या टप्प्यावर आपण घरातली अडगळ आहोत, असं काळ्यांना वाटायला लागतं. मसणजोगी समाजात जन्मलेले काळे दारिद्य्रात, अवतीभवतीच्या असंस्कृत वातावरणात वाढतात; पण शिक्षण आणि संवेद्य मन याच्या जोरावर ते व्यावहारिक आणि आत्मिक उन्नती करून घेतात. तरी समाजमन आणि व्यक्तिमन याचे गूढ व्यापार त्यांना प्रश्नांकित करतात आणि चिंतन करायला भाग पाडतात. दलित आणि दलितेतर या संबंधाचा माणूस म्हणून घेतलेला शोध आणि त्या अनुषंगाने प्रकटलेलं चिंतन, यासाठी ‘अडगळ’ जरूर वाचायला हवी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#L.C. JADHAV# ADAGAL NOVEL# DALIT AUTHOR# JUGA KALE# ADAGAL TREAND TURNING NOVEL#ल.सि.जाधव# अडगळ # दलित साहित्यिक# जुगा काळे
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 04-11-2018

    ल. सि. जाधव यांनी लिहिलेली ही कादंबरी. एका प्रस्थापित दलित लेखक वयस्क, अगतिक अवस्थेत असताना दलित साहित्यातला नवा प्रवाह ही कादंबरी अधोरेखित करते. या साहित्यिकाचं अस्वस्थ अंतरंग ही कादंबरी अतिशय समर्थ शैलीतून हळुवारपणे उलगडत जाते. या निमित्तानं अनेक गष्टींवरही जाधव भाष्य करत जातात आणि वाचकाला अंतर्मुख करत जातात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 07-10-2018

    दलित लेखकाचे अस्वस्थ अंतरंग उलगडणारी कादंबरी... ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने ल.सि. जाधव यांची ‘अडगळ’ ही कादंबी नुकतीच प्रकाशित केली आहे. ही कादंबरी एका दलित लेखकाच्या अगतिकतेची, हळव्या भावविश्वाची फरपट चित्रित करते. यातून दलित साहित्यिकाचं अस्वस्थ अंतरं समर्थ शैलीतून हळुवारपणे उलगडत गेलं आहे. या कादंबरीतून हळुवार काव्यात्मकता अंगभूत आहे. ती जाणवत राहते. कादंबरीच्या सुरुवातीलच लेखक असलेल्या नायकाला आकाशवाणी केंद्रातून त्याच्या नुकत्याच संपलेल्या कादंबरीवाचनाच्या मानधनाचा धनादेश आणि नवीन कादंबरीवाचनाचे संमतिपत्र पाठविण्यात विचारणा होते. सांसरिक जीवनातून वाटचाल करत असताना आलेल्या अनुभवाचे संचित गोळा करत आणि जीवनशैलीचे अनुसंधान राखत कादंबरी पुढे जात राहते. झोपडपट्टीतून आलेल्या आपल्या जीवनात सारस्वताचं रोपटं कसं उगवलं याचं चिंतन करत आणि विस्मृतीच्या फटीतून ओघळून गेलेले प्रसंग गोळा करत ही कादंबरी आकाराला येते, आयुष्य समजू लागलं की सगळ्यात प्रथम माणसं कळू लागतात. त्या माणसाबरोबर आपण जगतो म्हणजे प्रत्यक्षात नेमकं काय करत असतो अशा विचारांतून वर्तमानाचा वेध घेत ही कादंबरी अखेरच्या प्रवासावर पोहोचते आपला संधिकाल हीच आयुष्यातील अडगळ असते. ही गोष्ट या कादंबरीतून लेखकाने मार्मिकपणे दाखवली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more