* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FIFTY SHADES FREED
  • Availability : Available
  • Translators : DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE
  • ISBN : 9789353171360
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 628
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :E. L. JAMES COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN UNWORLDLY STUDENT ANASTASIA STEELE FIRST ENCOUNTERED THE DRIVEN AND DAZZLING YOUNG ENTREPRENEUR CHRISTIAN GREY IT SPARKED A SENSUAL AFFAIR THAT CHANGED BOTH OF THEIR LIVES IRREVOCABLY. SHOCKED, INTRIGUED, AND, ULTIMATELY, REPELLED BY CHRISTIAN`S SINGULAR EROTIC TASTES, ANA DEMANDS A DEEPER COMMITMENT. DETERMINED TO KEEP HER, CHRISTIAN AGREES. NOW, ANA AND CHRISTIAN HAVE IT ALL - LOVE, PASSION, INTIMACY, WEALTH, AND A WORLD OF POSSIBILITIES FOR THEIR FUTURE. BUT ANA KNOWS THAT LOVING HER FIFTY SHADES WILL NOT BE EASY, AND THAT BEING TOGETHER WILL POSE CHALLENGES THAT NEITHER OF THEM WOULD ANTICIPATE. ANA MUST SOMEHOW LEARN TO SHARE CHRISTIAN`S OPULENT LIFESTYLE WITHOUT SACRIFICING HER OWN IDENTITY. AND CHRISTIAN MUST OVERCOME HIS COMPULSION TO CONTROL AS HE WRESTLES WITH THE DEMONS OF A TORMENTED PAST. JUST WHEN IT SEEMS THAT THEIR STRENGTH TOGETHER WILL ECLIPSE ANY OBSTACLE, MISFORTUNE, MALICE, AND FATE CONSPIRE TO MAKE ANA`S DEEPEST FEARS TURN TO REALITY.
‘फिफ्टी शेड्स फ्रीड’मध्ये अ‍ॅनेस्टेशिया (अ‍ॅना) स्टील आणि खिश्चन ग्रे यांच्या रंगलेल्या शृंगाराचं वर्णन आहे. ते दोघं विवाहबद्ध होतात आणि त्यांच्या प्रणयाला उधाण येतं. एलिना रॉबिन्सन नावाच्या स्त्रीचा खिश्चनला आलेला मेसेज पाहून अ‍ॅना खूप दुखावते. या मेसेजवरून तरी तिला असं वाटतं, की खिश्चनचे आणि त्या स्त्रीचे शरीरसंबंध आहेत. त्याबद्दल जेव्हा ती खिश्चनला विचारते, तेव्हा तो तिला एक धक्कादायक सत्य सांगतो, ज्याचा संबंध त्याच्या कामक्रीडेत डोकावणाऱ्या विकृतीशी असतो. खिश्चनच्या या खुलाशामुळे अ‍ॅना आणि खिश्चनच्या संबंधात अधूनमधून येणारा तणाव नाहीसा होतो आणि अ‍ॅना मनाने त्याच्या आणखी जवळ जाते. यथावकाश त्यांना पुत्रप्राप्तीही होते आणि त्यांचं कौटुंबिक जीवनही बहरतं. तेव्हा अ‍ॅना आणि खिश्चनच्या प्रेमाचा आणि शृंगाराचा हा प्रवास अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
#FIFTY SHADES FREED# E L JAMES # DR SHUCHITA NANDAPURKAR PHADKE# #फिफ्टी शेड्स फ्रीड#ई एल जेम्स# शुचिता फडके#
Customer Reviews
  • Rating StarPrasad Kulkarni

    "सेक्स"..मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक. जर ह हळुवारपणे असेल तर तो जीवन खुलवतो, जर तो रांगडा असेल तर जीवन नासवतो. परस्परांशी शारीरिक पातळीवर एकरूप होऊन केलेला संवाद म्हणजे सेक्स, असे म्हणता येईल. सेक्सच्या विविध छटा "फिफ्टी शेड्स फ्रिड" या ई. एल.जेम्स यांच्या पुस्तकात दिसतात. किंबहुना, "काम" हाच या पुस्तकाचा आत्मा आहे. याच पुस्तकावर आधारित "फिफ्टी शेड्स फ्रिड", हा सिनेमा ही प्रदर्शित झाला आहे. माझ्या मते, यामध्ये प्रामुख्याने सेक्स ला मानवी पातळीवर ठेवण्यात आले आहे. 624 पानांची ही कादंबरी, मला कुठेही, रटाळ, सेक्स चे विकृत वर्णन असलेली आढळली नाही. याचे सारे श्रेय, हे अनुवादक डॉ. शुचिता नांदपूरकर- फडके, यांना दिले पाहिजे, त्यांनी ह्यातील क्लिष्टता टाळून सोप्या , आणि ओघवत्या भाषेत याचा अनुवाद केला आहे. ...Read more

  • Rating StarMaharashtra Times Samwad 1-9-2019

    खळबळजनक प्रेमकथा… महाविद्यालयीन तरुणी अ‍ॅनास्टॅशिया स्टील आणि उद्योजक ख्रिश्चन ग्रे यांच्यातील अनोखी प्रेमकहाणी `फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे` या कादंबरीतून लेखिका ई. एल. जेम्स यांनी मांडली आहे. ही कादंबरी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. विशेषतः महिलांनी तीडोक्यावर घेतली. अ‍ॅना आणि ख्रिश्चन यांच्या प्रेमकथेत असं नेमकं काय होतं, या उत्सुकतेपोटी जे-जे कादंबरी वाचवतात, तेव्हा कथाविषय धक्का देऊन जातो. आपल्या जोडीदाराला शारीरिक इजा पोहचवून, प्रसंगी अवमानजनक वेदना देत लैंगिक सुखाचा आनंद घेऊ इच्छिणारा ख्रिश्चन या कादंबरीचा नायक आहे. तर त्याच्यावरील प्रेमाखातर या संबंधांचा स्वीकार करणारी अ‍ॅना ही नायिका. ही कादंबरी जून २०१५मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. आजपर्यंत जवळपास बारा कोटींचा खपाचा आकडा गाठलाय. जगातील सर्वाधिक वेगाने विकली गेलेली कादंबरी म्हणून तिचा लौकिक आहे. शिवाय ५२ भाषांमध्ये तिचे अनुवाद केले गेलेत. दुसरा भाग `फिफ्टी शेड्स डार्कर` आणि तिसरा भाग `फिफ्टी शेड्स फ्रीड` नावाने प्रसिद्ध झालेत. पण त्याचबरोबर जगभरात ही कादंबरी आणि त्यावरून काढलेल्या चित्रपटाला बंदीचा सामनाही करावा लागला आहे. एकवीस वर्षांची अ‍ॅना तिची मैत्रिणी केट हिच्यासाठी ख्रिश्चन ग्रे या तरुण उद्योजकाची मुलाखत घेण्यासाठी जाते. पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडते. तोही तिच्यावर भाळतो. दोघं एकमेकांकडे आकृष्ट होत ही प्रेमकथा पुढे सरकत असतानाच, ख्रिश्चन तिला स्वतःविषयी एक धक्कादायक माहिती देतो. ते म्हणजे शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर तिला एका करारावर सही करावी लागेल. एखाद्या मुलीला आकर्षण वाटावं, अशा सगळ्या गोष्टी ख्रिश्चनकडे असतात. मात्र शारीरिक संबंधांबाबत मात्र तो वेगळा असतो. आपल्या जोडीदाराला पीडा देण्यातूनच त्याला लैंगिक सुख लाभतं. हे जेव्हा तो अ‍ॅनाला सांगतो. तेव्हा अ‍ॅना हे स्वीकारायला तयार होत नाही. मात्र ख्रिश्चनवरच्या प्रेमापायी अखेर त्या करारावर सही करते. आजवरच्या कित्येक प्रेमकथांतून वेगवेगळे विषय हाताळले गेले असतील, पण परपीडनातून सुख मिळवण्यासाठी करार करणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा प्रथमच लिहिली गेली. त्यामुळे या कादंबरीविषयी चर्चा झाली. कादंबरीत ख्रिश्चनला अशी लैंगिक इच्छा होण्यामागे एक उपकथानक आहे. पण मुळात ख्रिशनची ही अट मान्य होणं, आणि त्यासाठी स्वतःहून तयार होणं, हे वाचकांना धक्का देणारं ठरलं. लैंगिक संबंध आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकथा असं काहीच स्वरूप असल्यामुळे आणि परपीडन ही गोष्ट अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय असू शकते. त्यामुळे अनेकांना या कांदबरीत नेमकं काय हे जाणून उत्सुकतेचं वाटलं. कादंबरीचा निम्मा भाग हा परपीडनातून लैंगिक सुख कसं मिळवलं जातं, याविषयीच्या औत्सुक्याचा परिचय करून देणारं असल्यानेच कदाचित त्याची चर्चा झाली. शिवाय ठरावीक पानानंतर शारीरिक संबंधांचं वर्णन हेही वाचकांना गुंगवून ठेवणारं आहे. ग्रे यांच्या या लैंगिक सुखाविषयीच्या इच्छा, त्यामागचा भूतकाळ, त्याची प्रेमकथा ते लग्न असा प्रवास या तीन कादंबरींतून मांडला गेला आहे. अर्थात त्यातला पहिला भाग धक्कादायक आहे तो त्यातल्या लैंगिक संबंधातील त्याच्या अनैसर्गिक इच्छांच्या पूर्ततेच्या वर्णनामुळे. अशा कादंबरी केवळ कामूक साहित्य म्हणून सोडून दिलं गेलं नाही, हेच या कादंबरीचं यश आहे. लैंगिकता या गोष्टींपाशी नुसतंच न रेंगाळता, त्याचा तपशीलवार वर्णनातही ही कथा अडकलेली नाही. तर ख्रिश्चन ग्रेच्या आयुष्यातील घटना आणि त्याचा त्याच्या लैंगिकतेवर झालेला परिणाम हेही यात आहे. मात्र तरीही दुर्दैवाने ही कादंबरी केवळ परपीडनात आनंद मानणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा म्हणून वाचली गेलीय. ही कादंबरी मराठीत आणताना काही शब्द जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. त्यात खटकण्यासारखं काही नाही. पण भाषेत आणखी सहजता आली असती, तर ते अधिक नैसर्गिक वाटलं असतं. मुळात या कादंबरीत असलेले अनेक दोष अनुवाद करताना बाजूला सारणं तसं कठीणच आहे. अ‍ॅना आणि ग्रे यांच्यातील संवाद हे या कादंबरीचा प्राण आहेत. यू हॅव टू किस अ लॉट फ्रॉग्ज बिफोर यू फाइंड युवर प्रिन्स, अशा सारख्या वाक्यांना मराठीत आणणं कठीणच! -अपर्णा पाटील ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    ई. एल. जेम्सच्या फिफ्टी शेड्सच्या सिरीजमधील हे कदाचित तिसरे पुस्तक . जगभरात विक्रीचे उच्चांक गाठलेल्या फिफ्टी शेड्सचा सरळ सोपा अनुवाद . अतिशय सरळ मार्गाने जाणारे हे पुस्तक. नायक ख्रिश्चन ग्रे आणि नायिका ऍना स्टील यांचे लग्न होऊन ते हनिमूनला गेले.येथन ही कथा चालू होते . नायक ग्रे हा प्रचंड श्रीमंत असल्यामुळे त्याचा हनिमूनही तितकाच श्रीमंत आणि राजेशाही आहे .हनिमूनवरून आल्यावर नवविवाहितांचा संसार चालू होतो .त्यामध्ये येणारी छोटी मोठी वादळे .....उडणारे खटके ... ग्रे फॅमिलीचे शत्रू ....त्यांच्यावर केलेली मात...आणि शेवटी मूल होऊन चाललेला सुखी संसार यातच पुस्तक संपते. मग पुस्तकात असे काय आहे ........??? यात आहेत ग्रे पतीपत्नींच्या वेगवेगळ्या मूड आणि घटनेनुसार होणाऱ्या प्रणयक्रिडा आणि त्याची वर्णने .संपूर्ण पुस्तकात ख्रिश्चन आणि ऍनाच्या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या प्रणयक्रीडांची वर्णने सहज सोप्या पद्धतीने लिहिली आहेत . त्यात कुठेही किळसवाणे अश्लील वाटत नाही . कथेत आपसूक येणारी वर्णने आहेत असेच वाटत रहाते आणि त्या क्रिया नायकाच्या व्यक्तिमत्वाची बाजू उघड करतात ....आणि हेच पुस्तकाचे मोठे वैशिष्टय आहे . पुस्तक वाचताना ते कुठेही ओंगळवाणे वाटत नाही उलट पुढे काय होईल याची उत्सुकता वाढत जाते .लेखिका ई एल जेम्सची फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे आणि फिफ्टी शेड्स ऑफ डार्कर अशी दोन पुस्तके आहेत बहुतेक ती या आधीची असावीत. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT (MANTHAN) 10-02-2019

    शृंगाराच्या वळणांची प्रणयकथा... ब्रिटिश लेखिका ई. एल. झेम्स यांनी ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ आणि ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ ही ट्रायोलॉजी लिहिली असून, या प्रचंड खपाच्या कादंबऱ्या ठरल्या आहेत. एवढंच नाही तर या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाे आहेत. या तीनही कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला आहे. त्यातील ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ या दुसऱ्या कादंबरीतही अ‍ॅनास्टॅशिया स्टील आणि खिश्चन ग्रे यांच्या अनोख्या प्रेमकहाणीचे दर्शन घडते. अ‍ॅना आणि खिश्चन विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या प्रणयाला उधाण येतं. खिश्चनचे काही बाबतीतले वागणे पाहून अ‍ॅना मधूनच संभ्रमित होत असते. त्यातच एका स्त्रीने त्याला लिहिलेले पत्र तिच्या हातात पडते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. त्यानंतर ही शृंगारकथा अनेक प्रवाहांनी वाचकाला खिळवून ठेवत वाहत राहते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.