* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOTHING TO LOSE
  • Availability : Available
  • Translators : UDAY KULKARNI
  • ISBN : 9788184981919
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 392
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
TWO SMALL TOWNS IN COLORADO: HOPE AND DESPAIR. BETWEEN THEM, NOTHING BUT TWELVE MILES OF EMPTY ROAD. JACK REACHER CAN`T FIND A RIDE, SO HE WALKS. ALL HE WANTS IS A CUP OF COFFEE. WHAT HE GETS ARE FOUR REDNECK DEPUTIES WHO WANT TO RUN HIM OUT OF TOWN. MISTAKE. THEY`RE PICKING ON THE WRONG GUY. JACK REACHER IS A BIG MAN, AND HE`S IN SHAPE. NO JOB, NO ADDRESS, NO BAGGAGE. NOTHING, EXCEPT BLOODY-MINDED CURIOSITY. WHAT IS THE SECRET THE LOCALS SEEM SO KEEN TO HIDE? A HARD MAN IS GOOD TO FIND. EX-MILITARY COP REACHER IS TODAY`S MOST ADDICTIVE HERO. NOW HE PULLS ON A TINY LOOSE THREAD, TO UNRAVEL CONSPIRACIES THAT EXPOSE THE MOST SHOCKING TRUTHS. BECAUSE, AFTER ALL, JACK REACHER HAS NOTHING TO LOSE.
‘होप’ आणि ‘डिस्पेअर’च्यामध्ये जी सीमारेषा होती, ती खरोखरच रस्त्याच्यामध्ये एक रेषाच होती. एका गावाचा रस्ता संपून दुसऱ्या गावाचा जिथे सुरू होतो, तिथे ती सीमारेषा तयार झाली होती. ‘होप’ म्हणजे ‘आशा’ तर ‘डिस्पेअर’ म्हणजे ‘निराशा.’ जॅक रीचरला कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे त्याला चालत जावे लागते, फक्त एक कप कॉफी साठी. पण त्याला रेस्टॉरंटमध्ये आलेल्या चौकडीमार्फत जाळ्यात अडकवले जाते. चूक... चूक... चूक... ते चुकीच्या माणसाला धरतात. जॅक रीचर हा त्याच्या क्षेत्रात मोठा असतो कामधंदा नसलेला, कायमस्वरूपी पत्ता नसलेला, सामानसुमान नसलेला फक्त मनस्वी जिज्ञासू. भटकेपणाचा आरोप ठेवून त्याला गावातून हद्दपार केले जाते. अशी कोणती गुपितं आहेत की जी स्थानिक प्रशासनाने दडवून ठेवली आहेत? मिलिटरीतून निवृत्त झालेला अतिशय कठोर वृत्तीचा जॅक रीचर हे नाजूक धागे पकडून अमेरिकेच्या सर्वात मोठ्या प्रतिष्ठा धुळीला मिळविणा-या धक्कादायक आणि गूढ प्रकरणाचे कारस्थान उकलण्यासाठी सज्ज होतो. कारण काहीही झालं तरी जॅक रीचरला काहीच गमवावं लागणार नव्हतं. एक रहस्यमय थरारकथा म्हणून या पुस्तकाकडे बघता बघता त्या वाटेने सुरू झालेला प्रवास देशभक्ती, कडवे धर्मवेड अशा अनेक भावनांपाशी, आग्रहांपाशी येऊन थांबतो. कोणतीही गोष्ट जेव्हा अतिरेकाकडे झुकते तेव्हा ती दुराग्रहामध्ये रूपांतरित होते. या दुराग्रहांचे, माथेफिरू धर्मवेडाचे जे दर्शन या पुस्तकात घडते ते भयचकित करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ एक रहस्यमय थरारकथा राहात नाही; तर ते मानवी प्रवृत्तींना आव्हान देत राहते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ONESHOT #ONESHOT #वनशॉट #UDAY KULKARNI#FICTIONTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BALBHAGWAT #बाळभागवत #LEECHILD #लीचाइल्ड #NOTHINGTOLOSE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more