ATUL KAHATE

About Author

Birth Date : 07/04/1973


ATUL KAHATE IS A GRADUATE IN STATISTICS & HAS DONE HIS MBA. HE HAS WORKED FOR 18 YEARS IN INFORMATION TECHNOLOGY INDUSTRY WHERE HE HAS HANDLED VARIOUS RESPONSIBILITIES AT SYNTEL, AMERICAN EXPRESS, DEUTSCHE BANK, L&T INFOTECH AND ORACLE FINANCIAL SERVICES. HE HAS VARIOUS BESTSELLING MARATHI BOOKS TO HIS CREDIT ON VARIOUS TOPICS SUCH AS HISTORY, ECONOMICS, MEDICINE, INTERNATIONAL POLITICS, SCIENCE, TECHNOLOGY, BIOGRAPHY, AND CRICKET. HE HAS RECEIVED VARIOUS AWARDS FOR HIS CONTRIBUTION IN WRITING. HE IS ALSO A REGULAR CONTRIBUTOR TO MARATHI NEWSPAPERS AND TV CHANNELS.

अतुल कहाते संख्याशास्त्राचे पदवीधर आहेत. एम.बी.ए. ही पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे १८ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सिंटेल, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉयचे बँक, एल अँड टी इन्फोटेक आणि आयफ्लेक्स सोल्यूशन्स (आता ओरॅकल) इथे डायरेक्टर पदासह विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सिंबायोसिस, तसेच पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत अभ्यागत व्याख्याता म्हणून एक दशकाहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये ३० आणि मराठीत ४० अशी ७० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यातील अनेक पुस्तकांचा भारतातील तसेच विदेशांतील जवळपास ५० विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला आहे. त्यातील दोन पुस्तके चिनी भाषेत अनुवादित झाली आहेत. त्यांच्या क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकाच्या दीड लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यामधील अलीकडची पुस्तके - इम्रान खान, युद्धखोर अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बखर संगणकाची, अंतराळ स्पर्धा. मराठी साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार (दोन वेळा), उत्तम ग्रंथ पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार; संगणक क्षेत्रामधील योगदानासाठी इंद्रधनू-महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर आयटी एज्युकेशन अँड लिटरसी, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड, जीआर फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेखन नियमितपणे सुरू असते. तसेच सर्व मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांत त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत स्कोअरर आणि आकडेवारीतज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 13 total
ADOLF HITLER Rating Star
Add To Cart INR 425
ALAN TURING Rating Star
Add To Cart INR 295
AMERIKI RASHTRAPATI Rating Star
Add To Cart INR 895
ANTARAL SPARDHA Rating Star
Add To Cart INR 250
22 %
OFF
ATUL KAHATE COMBO SET - 11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 3950 INR 3098
BENJAMIN GRAHAM Rating Star
Add To Cart INR 170
GUNTAVANUKBHAN Rating Star
Add To Cart INR 295
HILLARY CLINTON Rating Star
Add To Cart INR 270
RUPERI SINDHU Rating Star
Add To Cart INR 125
SHARE BAZAAR Rating Star
Add To Cart INR 750
STEVE JOBS : EK ZAPATLELA TANTRADNYA! Rating Star
Add To Cart INR 200
WARREN BUFFET Rating Star
Add To Cart INR 230
12

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.