* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661910
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 17 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE REVOLUTIONARY DISCOVERIES IN SCIENCE AND TECHNOLOGY, IN PARTICULAR BIOTECHNOLOGY AND INFORMATION TECHNOLOGY IMPACT IN A MAJOR WAY LIFE OF HUMAN BEINGS IN THE TWENTY-FIRST CENTURY. THIS HAS ALSO LED TO CUT THROAT COMPETITION IN ALMOST ALL WALKS OF LIFE. NOT ONLY HAS LIFESTYLE UNDERGONE UNPRECEDENTED TRANSFORMATION BUT ALSO THE VALUE SYSTEM. FAMILY STRUCTURE, SOCIAL FABRIC, CULTURAL FOUNDATIONS HAVE ALL BEEN CAUGHT IN A MAELSTROM. THIS DOES NOT LEAVE ANY MEMBER OF SOCIETY ALONE, NOT EVEN THE SCIENTISTS THEMSELVES. THEIR PERSONAL AND MORE IMPORTANTLY THE PROFESSIONAL LIFE ARE GREATLY AFFECTED TAKING THEM INTO MINDBOGGLING VIRTUAL REALITY. THAT IS THE BASIC THEME OF ALL THE STORIES IN THIS ANTHOLOGY.
" विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आज होत असलेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळं एकविसाव्या शतकातील जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्या जोडीला असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि बाजारपेठांचा विस्तार यामुळं एक नव्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा आज रूढ होत आहे. त्यापोटी आपली जीवनशैली तसेच मूल्यव्यवस्था तळापासून ढवळून निघत आहे. त्यांच्यात होत असलेल्या आमूलाठा बदलाचा कॅनव्हास डॉ. बाळ फोंडके यांच्या या कथांना लाभलेला आहे. कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सांस्कृतिक वातावरण असं झंझावातात सापडल्यावर त्याच कुटुंबाचा, समाजाचा, संस्कृतीचा घटक असणार्‍या वैज्ञानिकाचं व्यावसायिक आयुष्यही झपाटल्यावाचून राहत नाही. त्याच चक्रावर्ताचं प्रतिबिंब या कथांमध्ये पडलेलं आहे. विज्ञानातील नवनव्या आविष्कारांची सांगड राजकारण, अर्थकारण, व्यापारी स्पर्धा यांच्याशी घातली गेली की, त्यातून तयार होणारं विलक्षण मिश्रण माणसांचे विविध स्तरांवरचे परस्परसंबंध, त्यांचं भावजीवन, त्यांची जिद्द, अहंभाव, मत्सर आणि महत्त्वाकांक्षा, प्रसिद्धीची झिंग आणि पैशाचा लोभ यांनाही व्यापून टाकते. षड्रिपुंचे तांडव सुरू होते. विज्ञानाच्या घोडदौडीपायी अस्तित्वात येत असलेल्या, या बीभत्स वास्तवाची भेदक अनुभूती देणार्‍या या कथा `व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी`च्या गूढरम्य प्रांगणात नेऊन सोडतात, स्थल आणि काल यांना छेद देणार्‍या पाचव्या डायमेन्शनमध्ये घेऊन जातात. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIRTUALREALITY #VIRTUALREALITY #व्हर्च्युअलरिअ‍ॅलिटी #SCIENCEFICTION #MARATHI #DR.BALPHONDKE #डॉ.बाळफोंडके "
Customer Reviews
  • Rating StarAmruta Chougule

    विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आज होत असलेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळं एकविसाव्या शतकातील जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्या जोडीला असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि बाजारपेठांचा विस्तार याुळं एक नव्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा आज रूढ होत आहे. त्यापोटी आपली जीवनशैली तसेच मूल्यव्यवस्था तळापासून ढवळून निघत आहे. त्यांच्यात होत असलेल्या आमूलाठा बदलाचा कॅनव्हास डॉ. बाळ फोंडके यांच्या या कथांना लाभलेला आहे. कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सांस्कृतिक वातावरण असं झंझावातात सापडल्यावर त्याच कुटुंबाचा, समाजाचा, संस्कृतीचा घटक असणार्‍या वैज्ञानिकाचं व्यावसायिक आयुष्यही झपाटल्यावाचून राहत नाही. त्याच चक्रावर्ताचं प्रतिबिंब या कथांमध्ये पडलेलं आहे. विज्ञानातील नवनव्या आविष्कारांची सांगड राजकारण, अर्थकारण, व्यापारी स्पर्धा यांच्याशी घातली गेली की, त्यातून तयार होणारं विलक्षण मिश्रण माणसांचे विविध स्तरांवरचे परस्परसंबंध, त्यांचं भावजीवन, त्यांची जिद्द, अहंभाव, मत्सर आणि महत्त्वाकांक्षा, प्रसिद्धीची झिंग आणि पैशाचा लोभ यांनाही व्यापून टाकते. षड्रिपुंचे तांडव सुरू होते. विज्ञानाच्या घोडदौडीपायी अस्तित्वात येत असलेल्या, या बीभत्स वास्तवाची भेदक अनुभूती देणार्‍या या कथा `व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी`च्या गूढरम्य प्रांगणात नेऊन सोडतात, स्थल आणि काल यांना छेद देणार्‍या पाचव्या डायमेन्शनमध्ये घेऊन जातात. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 17-11-2002

    भयावह वास्तवाचे दर्शन... ‘व्हर्च्युअल रिटॅलिटी’ म्हणजे सत्याभास, व्हर्च्युअलचा अर्थ मिथ्या अथवा जवळचा, निकटचा असाही होऊ शकतो. आभासी वास्तवाचा फेरफटका केला तर त्या वास्तवात टिकून राहण्याचे उपाय आपण शोधू शकू. अशा प्रेरणेतून कथानिर्मिती लेखक करतो. या वज्ञानकथा भयावह वास्तवाचे भेदक चित्रण सौम्यपणे पण नेमकेपणाने करतात. या सर्व कथांतून लेखकाचा जो दृष्टिकोन प्रगट होतो, जी भूमिका प्रगट होते ती अत्यंत लक्षणीय आहे. लेखकाच्या मनातील भारतीय व भारत यांच्याविषयीची आत्मियतेबरोबरच आदराची दृष्टी ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’तील अनेक कथात प्रतिबिंबित होते. विदेशी वा अमेरिकन लोकांना स्वत:च्या बुद्धीवर, कर्तृत्वावर विश्वास असला तरी भारतीयांच्या ज्ञानाविषयी, बौद्धिक कुवतीविषयी दबदबा आहे हेही या कथांतून आलेखित होते. कथाविषयांना साकार व सजीव करणाऱ्या भाषाशैलीचा प्रयोग डॉ. फोंडके करतात. विषयऔचित्य सांभाळण्यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शब्दशैलीचा वापर तसेच सुविद्य व्यक्तिचित्रणांमुळे येणारे इंग्लिश शब्दप्रयोग कथेतील वातावरणात सहजता व अकृत्रिमता निर्माण करतात. औद्योगिक, शास्त्रीय, तांत्रिक क्षेत्रातील संकल्पना लेखक संवादातून स्वाभाविकपणे स्पष्ट करतो. ‘ब्रेन-ड्रेन’सारख्या कथेची मांडणी पत्रात्मक स्वरूपात केल्याने कथेचा आशय अत्यंत स्वाभाविक शैलीत साकारतो. ‘कालकूट’सारख्या कथेवर असणारा ‘टाइम मशीच’चा प्रभाव कथाशयाचे नाविन्य थोडे कमी करतो. एकंदरीत कथासंग्रह वाचनीय असून आजच्या वास्तवाची जाणीव तीव्रपणे करून देणारा आहे. -डॉ. शुभदा शहा ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 16-12-2001

    वेगळ्या पण वाचनीय कथा... विज्ञानकथा नामक एक प्रकारे कथा-वाङ्मयात सध्या रुजू पाहतोय. तो रुजवण्यात ज्यांचा हात आहे वा महत्त्वाचा वाटा आहे त्यात डॉ. बाळ फोंडके हे एक! सायन्स टुडेचे संपादक आणि द इमॉनॉमिक टाइम्स व महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ संपादक म्हणूनकाम केलेल्या फोंडके यांनी ज्या कथा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी संग्रहात समाविष्ट केल्या आहेत, त्यासंबंधी म.टा.चे माजी संपादक कुमार केतकर म्हणतात, डॉ. फोंडके यांचे विविध शास्त्रज्ञांचे ज्ञान आणि आजूबाजूच्या सर्वंकष वास्तवाचे भान यामुळे त्यांच्या या कथांना त्रिमितीच्या पलीकडचे लाभले आहे. संग्रहात एकूण बारा कथा आहेत. या सर्व कथांना जसा सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक बेस आहे तसा तो माहिती तंत्रज्ञान व स्पर्धायुक्त जीवनाचाही आहे. पूर्वी स्पर्धा नव्हती असे नाही. पण् त्या स्पर्धेला जीवघेणी म्हणता येईल इतपत ती (क्रूर) नव्हती. त्यासंबंधी लेखक म्हणतो, गेल्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा जैवतंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांची घोडदौड सुरू झाली तेव्हा तर या तंत्रज्ञानाच्या उत्पादनांनी राहत्या घरांचे उंबरठे ओलांडून माजघरातच नव्हे तर शेजघरातही प्रवेश करायला सुरुवात केली. माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात, अगदी त्या जीवनाच्या खासगी मानल्या जाणाऱ्या दालनांमध्येही घुसखोरी आरंभली. त्यापोटी व्यक्तीव्यक्तींची आयुष्यं तर ढवळून निघालीच, पण नीतिमूल्यांची चौकटच विस्कटू लागली. जागतिकीकरणाच्या अनावर ओढीनं तर जीवनकलहाला जीवघेण्या स्पर्धेने परिमाण प्राप्त करून दिलं. –चंद्रकांत भंडारी ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आज होत असलेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळे एकविसाव्या शतकातील जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्या जोडीला असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि बाजारपेठांचा विस्तार याुळे एक नव्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा आज रुढ होत आहे. त्यापोटी आपली जीवनशैली तसेच मूल्यव्यवस्था तळापासून ढवळून निघत आहे. त्यांच्यात होत असलेल्या आमूलाग्र बदलाचा कॅनव्हास डॉ. बाळ फोंडके यांच्या या कथांना लाभलेला आहे. कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सांस्कृतिक वातावरण असं झंझावातात सापडल्यावर त्याच कुटुंबाचा, समाजाचा, संस्कृतीचा घटक असणाऱ्या वैज्ञानिकाचं व्यावसायिक आयुष्यही झपाटल्यावाचून राहत नाही. त्याच चक्रावर्ताचं प्रतिबिंब या कथांमध्ये घडलेलं आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more