* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
`WE ARE GOING`, SAID ANNIE, `ON A GREAT COSMIC JOURNEY. SO LISTEN UP, SAVERS OF PLANET EARTH, AND PREPARE TO MEET THE UNIVERSE`. GEORGE`S BEST FRIEND ANNIE NEEDS HELP. HER SCIENTIST FATHER, ERIC, IS WORKING ON A SPACE PROJECT - AND IT`S ALL GOING WRONG. A ROBOT HAS LANDED ON MARS, BUT IS BEHAVING VERY ODDLY. AND NOW ANNIE HAS DISCOVERED SOMETHING WEIRD ON HER DAD`S SUPER-COMPUTER. IS IT A MESSAGE FROM AN ALIEN? COULD THERE BE LIFE OUT THERE? HOW DO YOU FIND A PLANET IN OUTER SPACE? AND IF YOU COULD TALK TO ALIENS, WHAT WOULD YOU SAY?
‘जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट’ ची कथा फिरते शाळकरी वयातील जॉर्ज, त्याचे आई-वडील आणि आजी, एरिक हे वैज्ञानिक, त्यांची मुलगी अॅचनी, एरिकचे सहकारी रीपन, त्यांच्या मित्राचा मुलगा एमिट आणि एरिकचा ‘कॉसमॉस’ नावाचा ताकदवान, हुशार संगणक यांच्याभोवती. ग्लोबल स्पेस एजन्सीमध्ये एरिक काम करत असताना त्या एजन्सीद्वारे होमर नावाचा यंत्रमानव मंगळावर पाठवला जातो; पण काही दिवसांनंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटतो आणि जेव्हा तो परत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात येतो, तेव्हा तो विचित्र वागत असतो. दरम्यान, अॅतनीला परग्रहावरून असा संदेश येतो, की होमरला दुरुस्त केलं नाही तर पृथ्वीचा नाश होईल. म्हणून अॅ नी आणि जॉर्ज मोठ्या माणसांना कल्पना न देता मंगळावर पोचतात, एरिकना हे समजल्यावर तेही मंगळावर जातात. तिथे काय होतं? अॅ्नीला संदेश कोणी पाठवलेला असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि एकूणच अंतराळाविषयीची रंजक माहिती मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचली पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#PRAMODJOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #LUCYHAWKING #STEPHENHAWKING #GEORGESANDBIGBANG #जॉजअँडदबिगबँग #SCIENCEFICTION #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 13-12-2019

    साहस ते सायन्स... ‘काळाचा इतिहास थोडक्यात सांगणाऱ्या डॉ. स्टीव्हन हॉकिंगनी आपल्या विज्ञान-प्रसारक मुलीच्या मदतीने पाच झकास पुस्तकं लिहिली आहेत. डॉ. प्रमोद जोगळेकर ती मालिका मराठीत आणताहेत. किशोरवयाचा जॉर्ज आणि त्याची मैत्रिण अ‍ॅनी यांच्या अंतराळातल्ा साहसी सैर सपाट्याच्या चित्तथरारक कथा त्या पुस्तकांत सांगितल्या आहेत. गोष्टी नऊ-दहा वर्षांच्या मुलांना कळतील अशा सोप्या असल्या तरी त्या वाचून नऊ ते नव्वद वयाच्या सगळ्या मुलांची न्यूटनच्या नियमांपासून ते लार्ज हॅड्रॉन कोलायडरपर्यंतच्या विज्ञानाशी तोंडओळख होते आणि मग इच्छा असली तर दोस्तीही होते. जॉर्ज हा त्या कथांचा जिज्ञासू आणि धडपड्या नायक आपल्या फास्टर फेणेसारखा साहसवीर आहे. त्याचे आईवडील कट्टर पर्यावरणवादी आहेत. त्यांना आधुनिक विज्ञानाचा तिटकाराच आहे. त्याउलट अ‍ॅनीचे वडील डॉ. एरिक विज्ञानाने झपाटलेले संशोधक आहेत. जॉर्जच्या लाडक्या डुकरामुळे जॉर्जची अ‍ॅनीच्या कुटुंबाशी आणि पर्यायाने विज्ञानाच्या अद्भुत जगाशीही ओळख होते. कॉसमॉस हा डॉ. एरिक यांचा सर्वशक्तिमान कॉम्प्युटर या मुलांना जगभरात कुठेही पाठवू शकतो. जगाला वाचवायच्या इराद्याने ती शूर मुलं धोका पत्करून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जातात आणि मग अनेक चित्रविचित्र घटना घडतात. ‘जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हॅट’च्या सुरुवातीलाच डॉ. एरिक यांनी मंगळावर पाठवलेल्या यंत्रमानवाला वेड लागतं. तो त्याचं ठरवून दिलेलं काम सोडून भलतेच अनर्थसूचक संदेश पाठवायला लागतो. मग कॉसमॉसच्या मदतीने जॉर्ज आणि अ‍ॅनी त्या संदेशाच्या मागावर अवकाशात वणवण भटकतात, थोडे भरकटतात, भयानक संकटांशी झुंजतात. ‘जॉर्ज अ‍ॅण्ड द बिग बँग’मध्ये स्वित्झर्लंडमध्ये डॉ. एरिक यांचा एक भव्यदिव्य प्रयोग सुरू व्हायचा असतो. काही दुष्ट लोकांचा त्या प्रयोगावर राग असतो. ते तिथे घातपात करणार असतात. जॉर्ज आणि अ‍ॅनी जीव धोक्यात घालून तो प्रयोग, तिथले वैज्ञानिक आणि त्या वैज्ञानिकांचे मुख्य म्हणजे डॉ. एरिक यांना वाचवायला जातात. त्या साहसी मोहिमेत त्यांना वेगळ्याच शक्तिमान संगणकांची साथ मिळते, एक अनपेक्षित खलनायक, एक संशयास्पद दोस्त आणि एक विक्षिप्त मांजर भेटते, या सगळ्या धडपडीत जॉर्जच्या जिवावरही बेततं. त्या गोष्टी वाचताना उत्कंठतेने पानामागून पानं उलटली जातात. वाचकांच्या कल्पनाशक्तीला मदत करायला त्या सुरस कथांना मजेशीर कार्टून्सची जोड आहे. शिवाय त्या सगळ्या प्रवासात जॉर्ज आणि अ‍ॅनी सूर्यमालेतली किंवा तिच्याही पार जाऊन आल्फा सेंटॉरी, अ‍ॅण्ड्रोमीडा वगैरेच्या ग्रहमालांमधली जी ठिकाणं पाहतात. त्यांचेही मोठे, रंगीत फोटो पुस्तकात आहेत. गोष्टीतल्या सगळ्या चमत्कारिक घडामोडींच्या मागचं विज्ञान बालवयात कळलं नाही तरीसुद्धा गोष्ट व्यवस्थित समजते. किशोरवयात मुलांचं कुतूहल जागं होतं. ते शमवायला ती वैज्ञानिक माहिती सोप्या शब्दात समजावाला दुपानी टिपा पुस्तकभर, अगदी नजरेच्या टप्प्यात विखरून ठेवलेल्या आहेत. अंतराळप्रवास, त्यामागचं भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र सारं त्या टिपांमधून समजावलेलं आहे. सर्नच्या लार्ज हॅड्रॉन कोलायडरच्या प्रयोगासोबत रेड शिफ्ट, श्रोडिंगर मांजरी, सापेक्षता यांचीही गमतीत ओळख करून दिली आहे. न्यूटनच्या नियमांपासून सुरुवात करून आइनस्टाइनच्या सिद्धांतवरून थेट अद्ययावत वर्महोल्स, कालप्रवासापर्यंत सारं पुस्तकात सोपं करून सांगितलं आहे. कुमारवयातील मुलांनी ही पुस्तकं वाचली तर वर्गात शिकवताना त्या विज्ञानाची उजळणी होईल. पण मुलांनाच नव्हे तर कॉलेजात भौतिकशास्त्र न शिकलेल्या प्रौढांनी या पुस्तकांतून बरंच शिकायला मिळेल. पन्नाशीच्या लोकांना अंतराळाच्या सैर सपाट्यासोबत मनाने पुणे-फुरसुंगीची नॉस्टाल्जिक सफरही घडेल. जॉर्जच्या आईवडिलांच्या निमित्ताने विज्ञानकथेसोबत मुलांना पर्यावरणाची, त्याच्या विज्ञानाशी असलेल्या मैत्रीची कल्पना दिली गेली आहे. जॉर्ज आणि अ‍ॅनीकडे वैज्ञानिक जाण तर होतीच, पण सोबत अक्कलहुशारी, सुसंस्कृतपणा आणि पक्की दोस्तीही होती. शत्रूचाही माणूस म्हणून विचार करायची कुवत होती. तो मोलाचा संदेशही या पुस्तकांमधून मुलांपर्यंत पोहोचतो. – डॉ. उज्ज्वला दळवी ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    जॉर्ज आणि अँनी खास मित्र दोघेही नऊ वर्षाचे. अँनीचे वडील अंतराळ शास्त्रज्ञ. त्यांना अमेरिकेत अंतराळ संशोधनाची संधी मिळते. तिथे त्यांनी बनविलेला यंत्रमानव मंगळावर जातो आणि त्याच्यात बिघाड होतो. अँनीला वाटते तिला अवकाशातून कोणीतरी संदेश पाठवितो आहे . आण ते पृथ्वी नष्ट करण्याची धमकी देतायत . म्हणून ती जॉर्जला इ मेल पाठवून अमेरिकेत बोलावून घेते .दोघेही त्यांचा नवीन मित्र एमिटच्या मदतीने अंतराळात जातात आणि वेगवेगळ्या ग्रहांवर त्या संदेशाचा माग काढीत फिरतात.खरेच पृथ्वीला धोका आहे का ....?? कोण असतील हे लोक ??? कोणत्या ग्रहावरून येणार आहेत ....?? चला तर मग जॉर्ज आणि अँनीच्या अंतराळ सफारीचा माग काढीत या प्रश्नांची उत्तरे मिळवू . एक सुंदर बाल विज्ञानकथा असे या पुस्तकाबद्दल सांगता येईल . जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि त्यांची मुलगी ल्यूसी यांनी मिळून हे लहान मुलांसाठी पुस्तक लिहिले आहे . मुलांना विज्ञान रंजकतेने कळण्यासाठी आणि त्यांना गोडी लागण्यासाठी या पुस्तकांची निर्मिती आहे.अतिशय सोप्या भाषेत विज्ञानाची ओळख हे पुस्तकाचे वैशिष्ट्य. जोगळेकरांनी अनुवादही सोपा आणि सर्वाना समजेल असा केला आहे.जॉर्ज सिरीजमधील हे दुसरे पुस्तक आहे . स्टीफन हॉकिंग यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही .आईन्स्टाईन यांच्यानंतर भौतिकशास्त्रात सैद्धांतिक काम करण्याबद्दल ते जगप्रसिद्ध आहेत . या पुस्तकातील वैज्ञानिक माहिती अव्वल दर्जाच्या वैज्ञानिकांनी लिहिली असून ती अद्यावत आहे . ही माहिती अतिशय सोप्या पद्धतीत आणि सोप्या भाषेत मांडली आहे . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more