* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: VIDNYANATIL SARAS ANI SURAS
 • Availability : Available
 • ISBN : 9788184980387
 • Edition : 2
 • Publishing Year : APRIL 2010
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 208
 • Language : MARATHI
 • Category : SCIENCE FICTION
 • Available in Combos :RAHUL GOKHALE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
 • Print Books:
THE CHRONICLES OF SCIENTIFIC DEVELOPMENT ARE FILLED WITH LIVES AND TIMES OF SCIENTISTS AND RESEARCHERS, AND THRILLING MOMENTS OF DISCOVERIES AND INVENTIONS. THE DISCOVERIES AND INVENTIONS OVER CENTURIES, RANGING FROM THOSE OF SAFETY PIN TO ATOM BOMB PAY TESTIMONIALS TO THE SCIENTIFIC ACUMEN, THE INTELLIGENCE AND THE DEDICATION OF THESE RESEARCHERS, WHO WORKED TIRELESSLY TO ACHIEVE THE PROGRESS. HISTORY, THOUGH CONSISTS OF DATES AND YEARS, THIS ALONE DOES NOT MEAN HISTORY. THIS IS APPLICABLE TO SCIENCE HISTORY ALSO. THE HISTORY OF SCIENTIFIC DEVELOPMENT IS FULL OF MOMENTS OF ENTHUSIASM, EXCITEMENT AND THRILL, AS EQUALLY OF DESPAIR. ‘VIDNYANATEEL SARAS ANI SURAS’ – THROWS LIGHT ON SOME PAGES OF THE HISTORY OF SCIENTIFIC DEVELOPMENT, THE INVENTIONS AND DISCOVERIES. READERS WILL COME ACROSS THE INVENTOR IN THE ARTIST LEONARDO DA VINCI, LIFE AND TIMES OF ALFRED NOBEL, PAULING, SAKHAROV, BHATNAGAR AND EXCITING HISTORY OF DISCOVERY OF ASPIRIN TO ELECTRIC BULB. BOOK PRESENTS THIS HISTORY WITHOUT ENGULFING INTO ANY TECHNICAL FORMULAE OR CHRONOLOGIES. IT JUST TELLS THE STONES OF EXCITEMENT AND EXCELLENCE.
विज्ञानइतिहासाची पाने ही शास्त्रज्ञांच्या जीवनकथांनी आणि शोधांच्या रंजक कथांनी नटली आहेत. साध्या सेफ्टी पिनपासून अणुबाँबपर्यंत अनेकविध जे शोध लागले, ते संशोधकांच्या– शास्त्रज्ञांच्या परिश्रमांची, चिकाटीची आणि मुख्यत: त्यांच्या प्रतिमेची साक्ष पुरवितात. विज्ञानइतिहासातील अशीच काही पाने उलगडून दाखविण्याचा हा प्रयत्न. या पुस्तकात लिओनार्दो द विंची या प्रख्यात चित्रकारातील संशोधक भेटेल, नोबेल, पॉलिंग, साखारॉव्ह, भटनागर हे संशोधक-शास्त्रज्ञ भेटतील, तसेच अ‍ॅस्पिरीनपासून विजेच्या दिव्यांपर्यंत अनेक शोधांच्या रंजक कथा वाचायला मिळतील. विज्ञानातील हे सारे ‘सरस’ तितकेच ‘सुरस’ही आहे. ते तितक्याच रंजक पद्धतीने मांडलेले या पुस्तकात आढळतील.
महाराष्ट्र शासनाचा र.धो.कर्वे पुरस्कार- २०११
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIDNYANATILSARASANISURAS #VIDNYANATILSARASANISURAS #विज्ञानातीलसरसआणिसुरस #SCIENCEFICTION #MARATHI #RAHULGOKHALE #राहुलगोखले "
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAGAR 04-07-2010

  खरोखरच सरस आणि सुरस !... विज्ञान म्हटलं की, क्लिष्टपणा नि किचकटपणा याच गोष्टी आठवतात. तथापि राहुल गोखले यांचं ‘विज्ञानातील सरस आणि सुरस’ हे पुस्तक वाचलं की, आपला चांगल्या अर्थानं भ्रमनिरास’ होतो. खरोखरच विज्ञानात खरोखरच सरस आणि सुरस बरंच काही असतं. ाचा सुखद प्रत्यय येतो. अगदी टाचणीपासून अणुबॉम्बपर्यंत नानाविध शोधांच्या पार्श्वभूमीवर इथं विविध शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचं आणि परिश्रमांचं स्पष्ट दर्शन घडून येतं. शास्त्रज्ञ, शोध आणि संकीर्ण अशा तीन विभागांमध्ये ५२ शास्त्रीय शोधांविषयी हसतखेळत विवेचन केलंय. शास्त्रज्ञांचे स्वभाव, त्यांचे दृष्टिकोन आणि त्यांची चिकाटी यांविषयी भरभरून लिहिण्यात आलंय. त्यामुळे ‘शास्त्रज्ञांमधला माणूस’ इथं दाखवून देण्यात लेखकाला यश लाभलंय. त्यामुळेच हे निव्वळ रटाळ शास्त्रीय लेखन न ठरता रसाळ ललित लेखन ठरलंय. लेखकाला याबद्दल धन्यवाद द्यावेत तितके थोडेच ठरतील. समाजामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशाच लालित्यपूर्ण तरीही ‘शास्त्र’शुद्ध लिखाणाची गरज आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 04-06-2010

  विशेषत्वाने ‘सुरस’हे विशेषण कथा या वाङ्मयीन प्रकारासाठी वापरले जाते. बालकथांमधील परीकथा, जादूच्या कथा, साहसी कथा, बिरबल, तेनालीराम च्या कथा या सर्वच कथा सुरस या श्रेणीत मोडतात. पण विज्ञानकथांनाही सुरस म्हणणे म्हणजे जरा धक्कादायकच.पण विज्ञान जगतात सुर अशा काही घटना घडले, घडत आहेत की ज्यामुळे त्यांच्याही सुरस कथा बनल्या. विज्ञान हे शोध, प्रयोग यांनी खच्चून भरलेले. सेफ्टीपिनपासून अणुबॉम्बपर्यंत जे शोध गेल्या काही शतकांत लागले ते संशोधकांच्या शास्त्रज्ञांच्या परिश्रम, चिकाटीमुळेच आणि या शास्त्रज्ञांच्या जीवनकथा, शोधांच्या रंजक कहाण्या यामुळेच विज्ञानाचा इतिहास निर्माण झाला. पण हा विज्ञान इतिहास क्लिष्ट बोजड, अवघड, समीकरणे-सूत्रे यांत हरवू नये म्हणूनच राहुल गोखले यांनी विज्ञानातील शोध, प्रयोग, संशोधक शास्त्रज्ञ यांच्याबद्दल काहा ‘सरस’ आणि ‘सुरस’ कथा या पुस्तकातून अतिशय रंजक पद्धतीने वाचकांपुढे आणल्या आहेत. विज्ञानात असे काही शोध आहेत की जे एकाच सुमारास दोन शस्त्रज्ञांनी स्वतंत्रपणाने लावूनही त्यातील एकाच्या नावावर शोधाचे श्रेय गेले आणि दुसऱ्याच्या वाट्याला मात्र उपेक्षा आली अशा काही शोधांचा आणि शास्त्रज्ञांचा लेखकाने या पुस्तकातून घेतला आहे. त्याचप्रमाणे कला व विज्ञान क्षेत्रात लीलया संचार करून एक प्रतिभवंत म्हणून आपला ठसा उमटवणारा जगतविख्यात लिओनार्दो- द- दा विंची हा चित्रकलेबरोबरच आदर्श गावाची रचना कशी असावी याच्या अभ्यासाबरोबरच हवेतील आर्द्रतेच्या मोजणीचेही प्रयोग करायचा यावरकोणाचा विश्वासही बसणार नाही. लिओनार्दोप्रमाणेच रॉबर्ट हुक, देवीच्या लसीची प्रचारक मेरी माँटेग्यू, होमिओपॅथीचे जनक हानोमान, थॉमस एडिसन, नोबेल यांसह अनेक शास्त्रज्ञांच्या सुरस कथा वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. विज्ञान हे प्रवाही असल्याने अनेक वेळा जुन्या सिद्धांतांना धक्का लागतो आणि त्या संकल्पना सोडून द्याव्या लागतात. पण मग धर्मग्रंथ आणि वैज्ञानिक यांच्यात कलह निर्माण होतात. अशीच परिस्थिती १६ व्या १७ व्या शतकात युरोपात होती. पण अशा परिस्थितीतही ज्या संशोधकानी जीवावर उदार होऊन काही वैज्ञानिक सत्ये मांडून विज्ञानाला धर्माच्या जाचातून मुक्त केले असे काही शोधही लेखकाने आपल्यापुढे मांडले आहेत. म्हणूनच मानवी शरीरातील रक्त, भूलशास्त्र, शिवणयंत्राचा विकास, अ‍ॅस्पिरिन,दिवे या सर्वांबद्दलची हकीकत आपल्याला समजत आहे. त्याचप्रमाणे विज्ञानाने गुन्हेगारीचा माग काढण्यासाठी पोलिसांना कसा मदतीचा हात दिला आहे. तर सर्वांना थक्क करणारे आहे. संगीत, राजकारण या क्षेत्रात जशी घराणेशाही आहे तशीच जगात सर्वत्र घराणेशाही दिसून येते त्याचाही लेखकाने या पुस्तकातून वेध घेतला आहे. क्युरी, नोबेल, यांच्याप्रमाणेच बेक्वेरेल हे भौतिकशास्त्रातील संशोधक घराणे. या सर्वांच्याच धमन्यांमधून विज्ञान वहात होते हे दिसून येते. विज्ञानातील हे सर्वच सरस आणि सुरस आपल्याला या पुस्तकात एकत्रितपणाने वाचायला मिळते पण तेही अतिशय रंजकपद्धतीने, कथारूपाने, म्हणूनच वाचक विज्ञानप्रेमी या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more