DR.BAL PHONDKE

About Author

Birth Date : 22/04/1939


ARMED WITH A MASTER’S DEGREE IN NUCLEAR PHYSICS AND A PH.D. IN IMMUNOLOGY FROM UNIVERSITY OF LONDON, DR. PHONDKE DID RESEARCH IN CELL BIOPHYSICS AT BHABHA ATOMIC RESEARCH CENTRE FOR 23 YEARS BEFORE BECOMING CHIEF EDITOR OF SCIENCE, TODAY AND SCIENCE EDITOR OF TIMES OF INDIA GROUP. HE WAS THEN INVITED BY THE THEN PRIME MINISTER SHRI. RAJIV GANDHI TO ASSUME THE POSITION OF DIRECTOR OF NATIONAL INSTITUTE OF SCIENCE COMMUNICATION, A CSIR INSTITUTE. HE HAS BEEN A MUCH SOUGHT AFTER SCIENCE COMMUNICATOR FOR THE LAST 50 YEARS. HE HAS AUTHORED ABOUT 70 BOOKS OF SCIENCE FACT AS WELL AS SCIENCE FICTION. HE HAS WON SEVERAL PRESTIGIOUS AWARDS INCLUDING NATIONAL AWARD OF DST, INDIRA GANDHI AWARD OF INSA, DR B C DEB AWARD OF INDIAN SCIENCE CONGRESS, SAVARKAR AWARD AND GODA GAURAV AWARD OF KUSUMAGRAJ PRATISHTHAN AMONG OTHERS. HIS BOOKS HAVE BEEN HONOURED WITH MAHARASHTRA STATE AWARD FOR EXCELLENCE IN LITERATURE FIVE TIMES. RECENTLY HE WAS ONE OF THE AUTHORS OF THE IMPORTANT TIFAC NATIONAL DOCUMENT TECHNOLOGY VISION 2035.

डॉ. गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, विज्ञानविषयक सदरे, लेख, कथा, पुस्तके आणि शोधनिबंधांचे लेखक आहेत. १९६० साली आण्विक भौतिकी विषयात मुंबई विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर २३ वर्षे मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रातील जीव-वैद्यकीय विभागात व्यावसायिक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र ही त्यांची संशोधनाची क्षेत्रे होती. १९६७ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी विषयाची डॉक्टरेट मिळाली. १९६५-६७ व पुन्हा १९७४ मध्ये लंडनमधील चेस्टर बिट्टी इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च येथे अभ्यागत शास्त्रज्ञ म्हणून काम केले. १९७६-७७ मध्ये अमेरिकेतील कॅन्सस विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील पॅथॉलॉजी विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. विविध विषयांचे व्यासंगी लेखक म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वत:चे वेगळे ठळक स्थान निर्माण केले आहे. त्यांनी लिहिलेले लेख नियतकालिके, मासिके आणि वर्तमानपत्रांमधून नेहमी प्रसिद्ध होत असतात. उद्याचे वैद्यक, चिरंजीव आणि कॉम्प्युटरच्या करामती या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुक्रमे १९८९, १९९० आणि १९९२ सालचे पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञान विषय लोकप्रिय करण्यासाठीचे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीचे इंदिरा गांधी पारितोषिकही १९९२ साली त्यांना मिळाले. इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन्सचे संचालक आणि प्रमुख संपादक म्हणून १९८९ पासून ते कार्यरत होते. सायन्स रिपोर्टर या मासिकाचे संपूर्ण स्वरूप बदलून ते अधिक आकर्षक, वाचनीय करण्यात डॉ. फोंडके यांच्या संपादन कौशल्याचा मोठा वाटा आहे. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे सध्याचे आकर्षक स्वरूप ही त्यांचीच कामगिरी आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या १९९८ च्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 17 total
ADNYAAT ANAMIKANCHE KARTUTVA Rating Star
Add To Cart INR 95
AKHERCHA PRAYOG Rating Star
Add To Cart INR 250
BHINTINNA JIBHAHI ASTAT Rating Star
Add To Cart INR 320
CHIRANJIV Rating Star
Add To Cart INR 200
24 %
OFF
DR.BAL PHONDKE COMBO SET - 16 BOOKS Rating Star
Add To Cart INR 3605 INR 2742
DRUSHTIBHRAM Rating Star
Add To Cart INR 150
DWIDAL Rating Star
Add To Cart INR 170
GOLMAAL Rating Star
Add To Cart INR 220
GOOD BYE EARTH Rating Star
Add To Cart INR 200
GYANBACHA VIDNYAN Rating Star
Add To Cart INR 250
KARNAPISHACHCHA Rating Star
Add To Cart INR 250
KHIDKILAHI DOLE ASTAT Rating Star
Add To Cart INR 200
12

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more