* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665390
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 236
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ANOTHER INNOVATION IS POPULAR SCIENCE WRITING. TAKING A CUE FROM AN EXTREMELY POPULAR SERIES OF SHORT RADIO PLAYS SCIENCE UNDERLYING DIFFERENT CURRENT EVENTS ARE EXPLAINED IN THESE SHORT SKITS. THE BANTER BETWEEN A COUPLE AND THEIR FRIEND WITH A SCIENTIFIC BENT MAKE THESE PLAYS VERY LIVELY. THE READER EASILY IDENTIFIES HIMSELF WITH THE OTHERWISE WELL-READ COUPLE, GIVING THE IMPRESSION THAT THE PLAYS ARE BEING ENACTED IN ONE’S DRAWING ROOM.
विज्ञान म्हणजे दूर कोट्यवधी कोस दूर अंतराळात असलेल्या ग्रहगोलांवर घडणाऱ्या घटनांचं क्लिष्ट विश्लेषण किंवा शक्तीमान सूक्ष्मदर्शकांची मदत मिळूनही न दिसणाऱ्या अणुरेणूंच्या अंतरंगात उठणाऱ्या तरंगांची तेवढीच किचकट चिकित्सा असं न राहता आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक पैलूंवर प्रभाव टाकणारे आणि तरीही अनाकलनीय वाटणारे अनेक प्रवाह असंच झालं.विज्ञानानं जसं आपलं रुप बदललं, दैनंदिन जीवनाच्या अनेक अंगांना त्याचा जसा स्पर्श होऊ लागला, तसं त्याची ओळख करून देण्याच्या प्रयत्नांनीही आपलं ठोकळेबाज स्वरुप बदललं. एखाद्या तात्यापंतोजींनी दिलेला रुक्ष भाषेतला आदेश असं त्याचं स्वरुप न राहता चहाच्या कपाभोवती किंवा पोह्यांच्या बशीभोवती केल्या गेलेल्या शिळोप्याच्या गप्पांचं रुपडं त्यानं धारण केलं आहे. त्याचंच प्रतिबिंब या पुस्तकामध्ये पडलेलं सापडेल. ANOTHER INNOVATION IS POPULAR SCIENCE WRITING. TAKING A CUE FROM AN EXTREMELY POPULAR SERIES OF SHORT RADIO PLAYS SCIENCE UNDERLYING DIFFERENT CURRENT EVENTS ARE EXPLAINED IN THESE SHORT SKITS. THE BANTER BETWEEN A COUPLE AND THEIR FRIEND WITH A SCIENTIFIC BENT MAKE THESE PLAYS VERY LIVELY. THE READER EASILY IDENTIFIES HIMSELF WITH THE OTHERWISE WELL-READ COUPLE, GIVING THE IMPRESSION THAT THE PLAYS ARE BEING ENACTED IN ONE’S DRAWING ROOM.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIDNYANPRAPANCH #VIDNYANPRAPANCH #विज्ञानप्रपंच #SCIENCEFICTION #MARATHI #DR.BALPHONDKE #डॉ.बाळफोंडके "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 17-04-2005

    सोप्या भाषेतील विज्ञानबोध... विज्ञानप्रपंच या पुस्तकातील लेखांच्या वैज्ञानिक गप्पांमधून अनेक विषयांवर प्रकाश पडतो. आपल्या चाळीशीतल्या मावस बहिणीचं मिसकॅरेज झाल्यामुळं उद्विग्न झालेल्या वहिनीला भावजी अपत्य संभवाची शास्त्रीय माहिती सांगतात. या विज्ञाप्रपंचात चर्चेसाठी घेतलेले विषयही विविध आहेत. त्यांची ही वानगी बघा. कोकिळा आपली अंडी स्वत: न उबवता दुसऱ्याच कोणत्या तरी पक्ष्याच्या घरट्यात ठेवून देतात आणि ती उबवण्याचं काम त्या दुसऱ्या पक्ष्याकडून आयतं करून घेतात. युरोपातल्या कोकिळा अकरा निरनिराळ्या पक्ष्यांच्या प्रजातीचा यासाठी वापर करतात. आपल्या अंड्याचा आकार, घाट, रंग, कवचाचा टणकपणा हा त्या दुसऱ्या पक्ष्याच्या अंड्याशी बेमालूम मिळताजुळता असावा याची दक्षता कोकिळा घेते. याला ‘एग मिमिक्री’ म्हणतात. त्यासाठी कोकिळा आपल्यासारखीच अंडी घालणाऱ्या पक्ष्याच्या घरट्यांचा शोध घेत असतात. एखाद्या गायडेड मिसाईलसारखे ते पक्षी बरोबर पोहोचतात. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 30-07-2006

    विज्ञानाची भूक भागवणारं पुस्तक... डॉ. फोंडकेंची भाषाही अत्यंत समृद्ध आहे. व्यसनाची तलफमधल्या ‘रासायनिक कातऱ्या’ असोत किंवा ‘दाटी आणि कोंडी’ मधला ‘वायुसारखे मनमौजी’ हा शब्दप्रयोग असो, फोंडके प्रत्येक गोष्ट अगदी नेमक्या शब्दात पकडतात. उदाहरणेसुद्धा इती छान की मुद्दा पटकन कळावा, झटकन पाहावा. ‘अनमान धपका’, ‘वाण’ यांसारखे थोडेसे मागे पडलेले शब्दही त्यांनी अनेकदा वापरले आहेत. पुस्तकाचं मुखपृष्ठही पुस्तकाचं नेमकं स्वरूप उलगडून सांगणारं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ते सुरेख छापले आहे. त्यांचे पूर्ण मार्क अनुक्रमे चंद्रमोहन कुलकर्णी व सुनील मेहता यांना द्यायलाच हवेत. एकंदरीत हे पुस्तक इतकं सुरेख जमलं आहे की विज्ञानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकाने ते वाचावं, संग्रही ठेवावं आणि आपली विज्ञान जिज्ञासा पुरी केल्याबद्दल डॉ. बाळ फोंडकेंना धन्यवाद द्यावेत. -डॉ. सतीश नाईक ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 17-07-2005

    वैज्ञानिक शंकांचे निरसन... डॉ. फोंडके यांनी आपल्या रोजच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नांना स्पर्श केलेला असून, पुस्तक वाचताना वाचकाला कुठेही कंटाळा येणार नाही, अशा तऱ्हेने अनेक नाजूक आणि अवघड विषयसुद्धा सहजतेने हाताळले आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठही आकर्क असून, ते पुस्तकातील विषयांचा आशय स्पष्ट करते. याबद्दल चित्रकार चंद्रमोहन कुलकणी अभिनंदनास पात्र आहेत. -निरंजन घाटे ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-03-2005

    हसत खेळत विज्ञान गप्पा... डॉ. बाळ फोंडके यांच्या ‘विज्ञान प्रपंच’ या पुस्तकात विविध विज्ञान विषयांचा प्रत्ययकारी अनुभव प्रत्येक श्रुतिका वाचताना सहजपणे होतो. विज्ञानाच्या नित्यनूतन आविष्कारांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर पडू लागला. विज्ञान म्हणजेदूर कोट्यवधी कोस दूर अंतराळात असलेल्या ग्रहगोलांवर घडणाऱ्या घटनांचं क्लिष्ट विश्लेषण किंवा शक्तिमान सूक्ष्मदर्शकांची मदत मिळूनही न दिसणाऱ्या अणुरेणूंच्या अंतरंगात उठणाऱ्या तरंगांची तेवढीच किचकट चिकित्सा असं न राहता विज्ञान म्हणजे आपल्यावर प्रभाव टाकणारे अनेक प्रश्न निर्माण करणारे व त्याच्याच अंगाने त्या प्रश्नांची उकल करणारे असे विज्ञान झाले आहे. मनुष्य विज्ञानाचा असाही अर्थ काढतो आणि हाच धागा डॉ. बाळ फोंडके यांनी प्रत्येक श्रुतिकेचे लेखन करताना लक्षात घेतला आहे. -एकनाथ आव्हाड ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.