* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WILL THE IRON FENCE SAVE A TREE HOLLOWED BY TERMITES?
  • Availability : Available
  • Translators : CAPT. RAJA LIMAYE
  • ISBN : 9788184981780
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 576
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-9 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WITH A WEALTH OF EVIDENCE, ARUN SHOURIE SPELLS OUT IMPERATIVES FOR DEFENCE BEYOND THE MILITARY.A MUST FOR OUR TIMES.
चीन, पाकिस्तान आणि बांगला देश, या शेजारी देशांकडून भारताला दिली जाणारी आव्हाने – विशेषत: लष्करी; हा या पुस्तकाचा गाभा आहे. पाकिस्तानमध्ये धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या दहशतवादाचा उलगडा करून घेताना, तेथे शालेय शिक्षणामध्ये सुरूवातीपासूनच द्वेषमूलक विचार कसे भिनवले जातात याच्या तपशिलाकडे गांभीर्याने पाहायला हवे. चीन स्वत:ची प्रगती साधताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणाच्या काय, कोणत्या आणि कशा खेळी करतो, चीनची व्यूहरचना कशी असते याचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे. या मोठ्या सत्ता फक्त आपला स्वार्थ कसा पाहतात हे जाणणेही महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय घटनांकडे पाहत असताना भारतीय नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे काश्मीरसारखे प्रश्न तर उद्भवलेच; पण याशिवाय पंजाबमधील दहशतवाद, लाखो बांगला देशींचा बेकायदा प्रवेश, बिहारमधील कोलमडलेले प्रशासन, नक्षलवाद अशा समस्या उभ्या राहतात; हे सप्रमाण सिद्ध करायचा यात प्रयत्न आहे. सजगपणे अभ्यास करून, सर्व अडचणींचे भान ठेवून, कालस्थान परत्वे आपल्या व्यवहारात बदल करून, लष्करीदृष्ट्या स्वत:ला सुसज्ज करून, सक्षम राष्ट्रीय शक्ती निर्माण करणे हा यावरील उपाय आहे. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्याबद्दल जिव्हाळा असणाया अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# GOVERNANCE #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR #MAGILPANAVARUNMAGECH #KALELKATYALAAAICHEMAN #ARUNSHOURIE #THEPARLIMENTARY SYSTEM #TRANSLATEDBOOK #ASHOKPATHARKAR #GOVERNENCE #VALVIGRASTAVRUKSHALAKATERIKUMPANVACHAVUSHAKELKA? #KALELKATYALAAAICHMAN #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR?
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वुईल द आयर्न सेव्ह ए ट्री हॉलोड बाय टर्माइटस्? हे अरूण शौरी यांचे पुस्तक २००५ मध्ये प्रकाशित झाले. त्याचा मराठी अनुवाद ‘वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का?’ या नावाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. या मराठी आवृत्तीसाठी दोन प्रकरे अरूण शौरी यांनी नव्याने लिहिली आहेत. चीन आणि नक्षलवाद यांच्या संदर्भात ती आहेत. अरूण शौरी यांनी दिलेल्या दोन व्याख्यानांमधून हे पुस्तक तयार झाले. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा स्मृतिव्याख्यान म्हणून झाले. करिअप्पा हे १९४७-१९४८ मध्ये वेस्टर्न एरिया कमांडर होते. पाकिस्तानच्या आक्रमकांना काश्मीर खोऱ्यातून पिटाळून लावून संपूर्ण काश्मीर जिंकून घेण्याआधीच त्यावेळी पंतप्रधान नेहरूंनी भारतीय लष्कराला थांबवले आणि आझाद काश्मीरचे लोढणे गळ्यात अडकवून घेतले, पुढे युनोकडे जाऊन सार्वमताची अट मान्य करून कायमची भावी कटकट मागे लावून घेतली याचे शल्य करिअप्पांना सतत जाणवत राहिले. १९५६ मध्ये कच्छवरील आक्रमण परतवून पाकचा जिंकलेला भाग परत करणे आणि काश्मीरबाबत कोणताही दबाव न आणता १९७१ च्या बांगला देश युद्धानंतर ९३हजार पाक युद्धबंद्यांना सोडून देणे तसेच जिंकलेला भूभाग परत करणे या राजकीय कृतीही करिअप्पांना व्यथित करणाऱ्या ठरल्या होत्या. त्यांच्या नावाच्या व्याख्यानमालेत बोलताना या सर्व पूर्वसृतींना उजाळा मिळणे स्वाभाविक होते. २००४ मध्ये आर्मर्ड कॉर्पसने त्यांना कॅव्हलरी स्मृती व्याख्यानासाठी पाचारण केले. आर्मर्ड कॉर्पस म्हणजे रणगाडा पथक. १९६५ च्या युद्धात भारतीय रणगाड्यांनी खेमकरण भागात पाकच्या पॅटन रणगाड्यांचा धुव्वा उडवला. त्यावेळी जनरल जे. एन. चौधरी हे लष्करप्रमुख होते. भारत स्वतंत्र झाल्यावर रणगाडा दलाचे पहिले भारतीय प्रमुख म्हणून त्यांनीच सुत्रे हाती घेतली होती. या व्याख्यानात चीनच्या जागतिक डावपेचाचे आणि महत्त्वाकांक्षेचे स्वरूप स्पष्ट करून भारत-चीन संबंधाचे भवितव्य कसे राहिल, कसे असावे याचा ऊहापोह केला होता. चीनची वृद्धिंगत होत चाललेली आर्थिक क्षमता लष्करी क्षमतेत रूपांतरित होणारा का? चीन आणि भारत आर्थिक क्षमतेतील रूपांतरित होणारा का? चीन आणि भारत आर्थिक क्षमतेतील अंतर या दोघांच्या लष्करी क्षमतेतील तफावत वाढणार का?’ असा प्रश्न शौरी विचारतात. या संभाव्य तफावतीकडे दुर्लक्ष वा डोळेझाक करणाऱ्या आपल्या राज्यकत्र्यांच्या वृत्तीमुळे भारताला हानी पोचणार नाही, अशी संरक्षणव्यवस्था आणि शासनपद्धती निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करून अशी शासनप्रणाली मिळेपर्यंत आपल्या देशाला खऱ्या अर्थाने सुरक्षितता वा शांतता लाभणार नाही असा नि:संदिग्ध इशारा अरून शौरी गंभीरपणे देतात. शौरी यांनी पहिल्या प्रकरणामध्ये भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील प्रगतीची रूपरेखा दिली आहे. अण्वस्त्रांचा विकास, अणुचाचण्यांचे यश, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती, कारगिलमधील विजय, सोव्हिएट युनियनच्या पतनानंतर भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात केलेला वास्तववादी यशस्वी बदल, आपल्या संरक्षणव्यवस्थेची क्षमता वाढवण्यासाठी फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, व इस्त्राएल या देशांशी केलेला कर, शस्त्रास्त्रे आणि युद्धसाहित्य निर्मितीत घातलेली भर, औद्योगिक क्षेत्रात मारलेली मुसंडी, भारतीय लष्करी कारवाईबाबत असणारी पाकपेक्षा अधिक सक्षम सिद्धता, काश्मीरमध्ये निवडुका स्वतंत्र आणि खुल्या वातावरणात घेण्याची दाखवलेली हिंमत आणि दहशतवादी शक्तींवर केलेली मात, ती सीमित असली तरी जनतेचे मनोधैर्य उंचावणारी नक्कीच होती वगैरे मुद्दे समर्थनासाठी पुढे केले आहेत. कोणत्याही देशाची संरक्षण यंत्रणा ही एखाद्या वृक्षाभोवती असलेल्या पोलादी कुंपणासारखी असते. ते पोलादी कुंपण कितीही मजबूत आणि चकचकीत असले तरी ते वाळवीने आतून पोखरलेल्या झाडाला वाचवू शकत नाही.एखादे वादळ त्या पोखरलेल्या झाडाला सहज पाडू शकेल. हे शौरी यांचे विधान या पुस्तकाच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण करणार आहे. दहशतवादी गटांचे संघटन खूप विरळ असते. काही दहशतवादी मारले गेले तरी त्यांचा गट संपत नाही. दहशतवाद्यांचे पायाभूत शस्त्र म्हणजे त्यांचे तंत्रज्ञान उदा. मदरसे, धार्मिक संस्था. या पार्श्वभूमीवर आपला खरा शत्रू कोण हे जाणून घ्यायला हवे. अरूण शौरी पाकिस्तानने भारताच्या परराष्ट्र धोरणाला आणि संरक्षण धोरणाला जखडून ठेवले आहे. दहशतवादी गटांना भारतात पाठवून येथील जनजीवन असुरक्षित आणि भयग्रस्त करून ठेवले आहे. १९८८ मध्ये बांगला देशाचे अध्यक्ष ईर्शाद यांनी इस्लाम हा राज्याचा धर्म असे जाहीर केले. बांगला देशातील मूलतत्त्ववाद्यांचा प्रभाव वाढतो आहे. पाकिस्तानी मूलतत्त्ववाद्यांचा तेथील वावर वाढतो आहे. पूर्वेकडील इस्लामीकरण या प्रकरणात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात लक्षावधी बांगलादेशी घुसलेले आहेत आणि भारतात घातपाती कृत्यांसाठी प्रशिक्षित बांगलादेशीय गट भारतात येत आहेत असे स्पष्ट करून अरूण शौरी आपल्या राज्यकर्त्यांचा व प्रशासनाचा गाफीलपणा आत्मघातकी ठरेल असा धोक्याचा इशारा देत आहेत.असाच चीनच्या संदर्भातील असणारा धोकाही शौरी दाखवून देतात. देशांतर्गत दहशतवादी गट म्हणून नक्षलवादी आंदोलनाची दखलही शौरी घेतात. ढासळत्या प्रशासन यंत्रणेचे दोष उघड करतात. त्यांचा इशारा स्पष्ट आहे. भारतीय राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा या प्रश्नाचे गांभीर्य वाढवत असेल तर जागरूक जनता निमूट बसणार का? त्या जनतेसाठीही शौरी काही मार्गदर्शक सुत्रे सांगतात. त्यासाठी प्रत्येक जबाबदार व्यक्तीने या पुस्तकाचे अध्ययन-अनुसरण करायला हवे. -अरुण शौरी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more