ARUN SHOURIE

About Author

Birth Date : 02/11/1941


SCHOLAR, AUTHOR, FORMER EDITOR AND MINISTER, ARUN SHOURIE IS ONE OF THE MOST PROMINENT VOICES IN OUR COUNTRYS PUBLIC LIFE AND DISCOURSE. HE HAS WRITTEN OVER TWENTY-FIVE BESTSELLING BOOKS.

जालंधर येथे सुप्रतिष्ठीत शौरी कुटुंबात जन्मलेले अरुण शौरी हे बुद्धीवादी पत्रकार, राजकारणी व लेखक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. १९६८ ते ७२ आणि १९७५ ते ७७ या काळात वर्ल्ड बँकेवर अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९९८ ते २००४ या कालावधीत प्लॅनिंग कमिशनचे सल्लागार, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून कार्यरत होते. तसेच केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सरकार दरबारी शिपायांपासून उच्चपदस्थांपर्यंत चालत असलेले भ्रष्टाचार, वॉटरगेट अशी प्रकरणं, इंडियन एक्सप्रेस मधल्या लेखमालांमधून उघडकीस आणल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिटयूटने ज्यांच्या कृतीमुळे स्वातंत्र्याचे रक्षण झाले अशा वर्ल्ड प्रेस फ्रीडम हिरोजपैकी एक म्हणून गौरवले आहे. बिझिनेस वीकने स्टार ऑफ एशिया म्हणून; दि इकॉनॉमिक टाइम्स ने खाजगीकरणावरील कामामुळे बिझिनेस लीडर ऑफ दि इयर म्हणून गौरवले आहे. भारतीय कंपन्यांच्या प्रमुखांनी श्री अटल बिहारी वाजपेयी सरकारमधील सर्वांत उल्लेखनीय मंत्री म्हणून गौरवले आहे. मॅगसेसे अवॉर्ड, दादाभाई नौरोजी अवॉर्ड, अ‍ॅस्टर अवॉर्ड, इंटरनॅशनल एडिटर ऑफ दि इअर, पद्मभूषण या व अशा अनेक सन्मानांनी विभूषित, अरुण शौरी हे भारतातील अतिशय प्रसिद्ध असे वर्तमान आणि राजकीय घडामोडींवरील भाष्यकार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी मंत्रिमंडळात त्यांनी दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान व निर्गुतवणूक अशी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. हे त्यांचे एकविसावे पुस्तक.
Sort by
Show per page
Items 1 to 11 of 11 total
ANITALA JAMIN MILTO Rating Star
Add To Cart INR 450
24 %
OFF
ARUN SHOURIE COMBO SET-9 BOOKS Rating Star
Add To Cart INR 4645 INR 3516
ATMAVANCHANA Rating Star
Add To Cart INR 450
GOVERNANCE Rating Star
Add To Cart INR 320
HE SARV APALYALA KOTHE NENAR Rating Star
Add To Cart INR 650
KALEL KA TYALA AAICHE MAN Rating Star
Add To Cart INR 390
KHYATANAM ITHIHASKAR Rating Star
Add To Cart INR 250
MAGIL PANAWARUN....MAGECH Rating Star
Add To Cart INR 450
THE COMMISSIONER FOR LOST CAUSES Rating Star
Add To Cart INR 895
THE PARLIAMENTARY SYSTEM Rating Star
Add To Cart INR 295
VALVIGRASTA VRUKSHALA POLADI KUMPAN ... Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more