* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: SNEHADHARA
 • Availability : Available
 • ISBN : 9788171616947
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 152
 • Language : MARATHI
 • Category : LITERATURE
 • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
SNEHDHARA: THE FINAL, PLEASANT MANIFESTATION OF THE DIVINE TALENT OF THE LATE RANJIT DESAI! A PERSON’S LIFE IS SHAPED BY HIS FATE, HIS CHARACTER AND HIS CIRCUMSTANCE. IN THIS COLLECTION OF CHARACTERSKETCHES – HIS LAST SUCH WORK – RANJIT DESAI GRATEFULLY REMINISCES ABOUT THE DIFFERENT HUMAN BEINGS ­– SIMPLE BEINGS AS WELL AS GREAT ONES – THAT TOUCHED HIS LIFE AND WITH WHOM HE DEVELOPED SOME SORT OF BOND. THIS IS NOT A CONTINUOUS AUTOBIOGRAPHY. AS IT HAPPENED, DIFFERENT MINOR OCCASIONS HAVE SERVED TO TRIGGER RECOLLECTION OF INTENSE MEMORIES OF CERTAIN PEOPLE. THIS IS AN EMOTIONAL RECOLLECTION OF EACH SUCH INDIVIDUAL AND THE EVENTS ASSOCIATED WITH HIM, WRITTEN BY A SENSITIVE PEN. THE CHARACTERS DESCRIBED HERE ARE NOT ‘COMPLETE’ BEINGS. THESE MEMOIRS AND SKETCHES TELL US ABOUT THE ENCOUNTERS DESAI HAD WITH EACH OF THESE INDIVIDUALS AND THE WAY THESE ENCOUNTERS MADE A LASTING IMPRESSION ON HIM. OUR JOY AT PRESENTING THIS COLLECTION WRITTEN BY THE LATE RANJIT DESAI TO THE READER IS TINGED WITH SADNESS…BECAUSE THIS IS THE LAST OF HIS UNPUBLISHED WORK THAT WE ARE PRESENTING IN BOOK FORM…
कै. रणजित देसाई यांच्या दैवी प्रतिभेचा हा प्रसन्न; परंतु अखेरचा ललिताविष्कार : स्नेहधारा ! दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हीच्या क्रियाप्रतिक्रियांमधून जीवन घडलं जात असताना ज्या ज्या छोट्यामोठ्या व्यक्तीशी त्यांचा ऋणानुबंध जडला, त्या सर्वांच कृतज्ञ स्मरण श्री. रणजित देसाई यांनी आपल्या या अखेरच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहात केलं आहे. हे सलग आत्मकथन नव्हे. काही तरी तात्कालिक निमित्त्त घडलं आणि त्या त्या व्यक्तीचं स्मरण उत्कटतेनं झालं. त्या व्यक्तीशी संबंधित प्रसंगांची आणि व्यक्तीचं हे हळुवार लेखणीनं केलेलं भावचित्रण आहे. या व्यक्तिरेखाही तशा समग्र, परिपूर्ण नाहीत. त्या व्यक्तीशी आलेला श्री. देसार्इंचा संबंध आणि त्या संबंधाची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या मनावर उमटलेला चिरकालिक स्वरूपाचा संस्कार यांनाच या छोट्या स्मरणसाखळीत प्राधान्य दिलं गेलं आहे. कै. रणजित देसार्इंच्या वाचकांच्या हाती त्यांची ही अखेरची ललितकृती देताना आम्हांला दु:खमिश्रित आनंद होत आहे. दु:ख अशासाठी, की श्री. देसार्इंचं हे अखेरचं अप्रकाशित असं साहित्य आम्ही ग्रंथरूपानं प्रसिद्ध करीत आहोत...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
 • Rating StarPratik Yetavadekar

  स्वामीकार रणजित देसाई यांच्या कथा ,कादंबरी ,नाटक या साहित्यप्रकाराव्यतिरिक्त ललित लेख या प्रकाराला साजेसे असलेले लेखन हाताळले गेले. ते म्हणजेच दैनिक सकाळ च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी केले गेलेले *`कोरीव लेणी`* हे सदर त्या सदरात देसाईंनी सांगितलेल्या आठणी या शब्दबद्ध केल्या होत्या राम देशपांडे यांनी सलग तीन महिने हे सदर चालले. वाचकांच्या आग्रहाला बळी न पडता वृत्तपत्रीय सदर तीन महिन्यापेक्षा जास्त चालवता कामा नये या मतावर ठाम राहत `माझं श्रेय एवढंच` हा समारोपाचा लेख लिहून त्यांनी सदर लिहिणे बंद केलं यातून त्यांची साहित्याबद्दल श्रद्धेची भावना किती दृढ होती हे दिसून येते. चंद्र-सूर्याची भेट, ....आणि तानपुरा मस्त जुळला, देव दाराशी आला, समाधानाचा एक क्षण, तो बेचैनीचा दिवस, आणि मैफल अधुरी राहिली या प्रकारची अलंकारिक नावे लेखाला दिलेली असल्याने ते लेख वाचनीय च नव्हे चिरस्मरणीय झाले आहेत. आचार्य अत्रे, भाऊसाहेब खांडेकर, बालगंधर्व, शरद तळवलकर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, डॉ, एस. राधाकृष्णन, कुसुमाग्रज, इंदिरा संत, यशवंतराव चव्हाण या नामवंत व्यक्तींच्या आठवणी बरोबर कोल्हापूर मधील गोकुळ हॉटेल मधल्या एका मेहतर व्यक्तीची आठवण ही शब्दबद्ध करून गुरुवर्य ती.वि.स.खांडेकर यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्ठी त्यांनी शेवटपर्यंत कशा पाळल्या हे दिसून येते. बऱ्याच मैफिली साकार करायच्या होत्या.`छोट्या`पासून `मोठ्या`पर्यंत अनेकांनी त्यांच्या मनात घर केलं होतं स्नेहाच्या अतूट धाग्यांनी मन जखडलं होतं पण अचानक अघटित घडलं.मैफल अधुरी च राहिली. यातच स्वामीकार रणजित देसाईंच्या मैत्र किंवा नातं जपण्याच्या एका पैलूचे दर्शन घडते. ...Read more

 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  रणजित देसार्इंनी जागवलेल्या ऋणानुबंधांच्या गूढतरल भाव-स्मृती… रणजित देसाई यांनी अखेरच्या दिवसांत कोल्हापूरच्या दैनिक सकाळमध्ये कोरीव लेणी हे सदर लिहून, आपल्या अनेक स्नेहीसोबत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या व्यक्तिचित्रांचा हा संग्रह म्हणजे एकापरने रणजित देसाई यांच्या प्रतिभेचा अंतिम ललित आविष्कार. पुस्तकरूपात येणारे हे शेवटचेच लेखन. स्वा. सावरकर, आचार्य अत्रे, भालजी पेंढारकर, तात्यासाहेब शिरवाडकर, राजे देशमुख, सी. रामचंद्र, काशीनाथ घाणेकर, पुंडलिकजी कातगडे, प्राचार्य एम. आर. देसाई, शरद तळवलकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खर्डेकर, कुमार गंधर्व, बालगंधर्व, सुलोचना, हंसा वाडकर, डॉ. पिसुर्लेकर, बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, भाऊसाहेब खांडेकर, बडे काही नाही’ म्हटल्यावर यशवंतराव म्हणतात, खोटं बोलू नको. माणसं ओळखणं ही अवघड गोष्ट. अनुभवानं मला ती जमली आहे. मी अशा समारंभात माझ्या माणसांना ओळख दाखवत नाही. चारचौघांत तुमच्यापाशी बोललो तर तर वशिल्याच्या कामासाठी लोकांचं लचांडे पाठीमागं लागतं... तर तू गैरसमज करून घेऊ नकोस.’’ रणजित देसाई यांचं विमान उशिरा आलं तर यशवंतराव अस्वस्थ झालेले दिसले. माधवीसाठी त्यांनी वेणूतार्इंच्या ड्रेसिंग टेबलवर प्रसाधनांची जणू जत्राच तयार ठेवली होती. माधवी मासा चांगला करते म्हटल्यावर साहेबांनी मासा दहा किलो पापलेट आणून ठेवले. ‘इथं कोणताही पदार्थ एकट्यानं खाल्ला जात नाही. बंगल्यातील सर्वांसाठी तो असतो. जेवताना ते सांगतात, ‘मला माशांची भयंकर भीती वाटते. काटे काढून दिले तरच खाईन.’’ भाऊसाहेब खांडेकरांना आचार्य अत्रे यांच्याकडे घेऊन जाण्याचे रणजितने कबूल केले, भाऊसाहेब टाळाटाळ करीत राहिले. सहाची वेळ ठरली असताना आठ वाजता अत्र्यांकडे गेले. ‘आज आमची शिवशक्ती धन्य झाली.’ म्हणत अत्र्यांनी हार घालून बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, भाऊसाहेब खांडेकर, बडे गुलामअली खाँ, इंदिरा संत, वसंत देशपांडे अशा साहित्य-संगीत-चित्रपट शिक्षण प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांशी आलेल्या कमी अधिक सौहार्दपूर्ण संबंधांच्या स्मृती जागवणाऱ्या या छोट्या-छोट्या लेखांतून रणजित देसाई यांच्या सौजन्यशील, समंजस, कलासक्त, कृतज्ञ भावविश्वाचे नेटके दर्शन घडते. ‘स्वामी’ची प्रत देण्यासाठी रणजित देसाई स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भेटीला मुंबईला जातात. पुस्तक चाळून ते चार दिवसांनी पुन्हा या म्हणतात. स्वामी वाचली, आवडली असे सांगतात, मात्र पुढे पण भाषा, परदेशी भाषेचा आधार घ्यायची जरूरी होती का?’ अशी पृच्छा करून ‘आपली मराठी भाषा समृद्ध आहे, भाषा समृद्ध आहे, भाषा शुद्ध करा. तुमची कादंबरी चांगली आहे.’ असे बजावतात. प्रकृतीच्या विकलांग अवस्थेतही सावरकरांनी आपली कादंबरी वाचून दोष दाखवावे. याचेच अप्रूप रणजित देसाई यांचे मन भरून येण्यास पुरेसे ठरते. यशवंतराव चव्हाण एका कार्यक्रमाच्या वेळी रणजित देसाई दिसूनही कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांना भेटू शकत नाहीत. ते डोंगरे यांना पाठवून सर्किट हाऊसवर येण्याचा निरोप देतात. रणजितचे हात पकडून बेडरूममध्ये नेतात. ‘तू रागावला असशील. गैरसमज करून घेतला असशील नाही?’ विचारतात. ‘तसं अत्र्यांकडे गेले. ‘आज आमची शिवशक्ती धन्य झाली’ म्हणत अत्र्यांनी हार घालून स्वागत केले. अत्रे म्हणाले, भाऊ तुमच्या अंगावर डाग असले तरी तुमचं मन गंगेइतकं निर्मळ आहे.’ भाऊंनी म्हटले. आज जो संयुक्त महाराष्ट्र होतोय त्याचे श्रेय तुम्हांला आहे. जे मनात आहे ते स्पष्ट बोलण्याचे धाडस केवळ तुमच्यात आहे. ‘श्रेष्ठ नाटककारांच्या पंक्तींत अत्रे बसू शकत नाहीत, ‘हा कोडफुटक्या खांडेकर काय सांगतो’ या जुन्या जखमांची भळभळ त्या भेटीने दूर झाली. तात्यासाहेब शिरवाडकर न कळवता अचानक कोवाडला येतात. ‘स्फूर्ती ही स्वयंस्फूर्तीच हवी. जेव्हा सुचेल तेव्हा लिही, उगीच भरडण्यात अर्थ नसतो, ‘असे ते सांगतात. ‘आयुष्यातल्या एकाकीपणाबद्दल शोक करू नको, त्याचा दोष कुणाला देऊ नकोस. कल्पित शोकामागे धावण्यात अर्थ नाही.’ असाही सल्ला देतात. हा माणुसकीचा जिव्हाळा रणजितना भाव्याकुळ करून टाकतो. अशा अनेक हृदयांतरीच्या स्नेहाच्या धारा रणजित देसार्इंनी खुल्या केलेल्या आहेत, म्हणून त्यांचे दर्शन प्रेरणादायी व कृतज्ञतेचे ठरते. -शंकर सारडा ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 20-06-1999

  स्मरणचित्रांचा हृद्य अल्बम… ‘तसं पाहिलं तर त्याच्या अंतरंगाचा ठाव घेणं कधीच कुणाला जमलं नाही. किनाऱ्यावर सागराच्या लाटा फेसाळत येतात, गर्जतात. तेवढंच का कलावंतांचं रूप असतं? त्यापेक्षाही आत कुठे तरी अथांग सागर पसरलेला असतो. त्याला क्वचित उधाण येतं. ण त्याच्या आत खोलवर चाललेली ही खळबळ कितीजणांना कळते?’ काशिनाथ घाणेकरांच्या संदर्भात रणजित देसाई यांनी हे लिहिले असले तरी ‘स्नेहधारा’ या त्यांच्या पुस्तकामागेही ‘खळबळ’ टिपण्याचीच प्रेरणा आहे असे मत सहज बनून जाते. अर्थात केवळ कलावंताच्या मनापुरतीच मर्यादा आखून न घेता सामान्यांच्या मनांचीही स्पंदने टिपण्याचे काम त्यांनी येथे भावनोत्कट शैलीत केले आहे. संपादक पांडुरंग कुंभार यांच्या म्हणण्यानुसार जेवढे लेख ते जमवू शकले त्या लेखांचा हा संग्रह आहे. आचार्य अत्रे आणि गुरू भाऊसाहेब खांडेकर यांच्या समेटाने पहिला लेख सुरू होतो आणि वसंतराव देशपांडे यांच्या अधुऱ्या मैफलीच्या व्यथेने पुस्तक संपते. आठवणींच्या माध्यमातून माणसाच्या माणुसपणाचे अंतरंग उघडे करण्याचे कसब देसाई यांना साधले आहे. आपली ‘स्वामी’ कादंबरी जेव्हा बक्षीसपात्र ठरली तेव्हा त्यांच्या मनाची झालेली अवस्था एवढाच काय तो वैयक्तिक उल्लेख बाकी सारे इतरांच्या अंतरंगात घुसून मर्मभेदी क्षण टिपणे! तात्यासाहेब शिरवाडकर असो अथवा कुमार गंधर्व यांच्या आठवणी असो, देसार्इंचा नम्रपणा त्यात उठून दिसतो. कुमार गंधर्व देसार्इंच्या घरी येऊन चार-पाच भजनं गातात हा केवळ कलावंतांच्या लहरीचा भाग नसतो तर स्नेहबंधाने जुळवून आणलेला योग असतो. भालजी पेंढारकरांविषयी लिहिताना देसाई कमालीच्या भावुकपणानं लिहितात. राजकारणाच्या काट्यातही साहित्याचे गुलाब बाळगणारे यशवंतराव चव्हाण देसाईच्या लेखणीतून समर्थपणे साकारत जातात. यातील काही लेख तर भावनांना हात घालतात. मात्र साहित्याच्या मननाचा, चिंतनाचा आनंदही त्यातून मिळतो हे देसार्इंच्या लिखाणाचे वैशिष्ट्य, त्यामुळे सगळ्या आठवणी हृद्य झाल्या आहेतच, शिवाय वेगवेगळे संदर्भ मिळत गेल्याने इतिहासाचे एक आकलनही लेख वाचताना होत राहते. सावरकरांनी आपली ‘स्वामी’ कादंबरी वाचून प्रतिक्रिया नोंदवली याचा देसार्इंना मनस्वी आनंद झालाय. त्याचप्रमाणे पुरस्कार मिळाल्यावर औषधांच्या पैशांसाठी पुरस्काराची रक्कम विचारणाऱ्या हंसाबाई वाडकर तर अधिकच चटका लावून जातात. पुंडलिकजी कातगडे या खऱ्या-खुऱ्या स्वयंसेवकाचे स्मरणचित्र असेच रेंगाळत राहते. सनईचा सूर ऐकताच गाडीतून उतरून नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याला आशीर्वाद देऊन मनाचा आनंद मिळवणारे बाळासाहेब देसाई यांच्या सोबतीने निव्र्याज मनाने चांगल्याचे कौतुक करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना यांचेही स्मरणचित्र छान रेखाटले गेले आहे. तसेच शाहीर गव्हाणकरांच्या स्नेहाचे दर्शन हा आणखी एक मैत्रीचा पीळ. सी. रामचंद्र असो की लालजी गोखले असो, कलावंतांच्या हृदयाचे कप्पे रणजीत देसाई मोठ्या कलात्मकतेने उघडे करतात. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

THE ODESSA FILE
THE ODESSA FILE by FREDERICK FORSYTH Rating Star
प्रकाश पिटकर

आपण गोष्ट वाचत जातो .. पीटर मिलरच्या आणि त्याच्या जग्वार गाडीच्या मागोमाग जात राहतो ... खरं तर त्या गाडीतून आपण पण जात राहतो ... त्याचा बेधडक मागोवा ... त्यातले जीवावरचे धोके ... त्याच्या मागे असलेले अनेक गुप्तहेर .. आपण हा थरार अनुभवत राहतो ... सालोन टौबरच्या डायरीतल्या अनेक गोष्टींनी आपण देखील हललेले असतो .... पुस्तकातली गोष्ट राहत नाही .. आपली होऊन जाते ... आपली राजकीय मतं काहीही असली तरी ते कल्पनेपलीकडचे अत्याचार बघून आपण दिग्मूढ होत जातो .... फ्रेडरिक फोर्सिथने वास्तवावर आधारित अफलातून पुस्तक लिहिलंय... हे त्याचं दुसरं पुस्तक ..१९७२साली प्रकाशित झालं.... त्याला जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं झालं. .. त्यावर रोनाल्ड निम (Ronald Neame) याच्या दिग्दर्शनाखाली तेव्हडाच अफलातून सिनेमा निघाला... पुस्तक आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या दिवसात घेऊन जातं ...आपण अगोदर कुठेतरी धूसरपणे वाचलेलं असतं... मतं ठाम केलेली असतात ... पण हे पुस्तक वाचून मात्र आपण हादरतो ... पुस्तकातल्या पिटर मिलरच्या मागे आपण जात राहतो .... मोसाद आणि अनेक गुप्तहेर यांच्या देखील मागोमाग जातो ... खूप थ्रिलिंग आहे .... मोसादने मिलरच्या सुरक्षितेसाठी आपला एक कडक गुप्तहेर लावलेला असतो ... मिलरला हे अजिबात माहित नसतं.... मिलर प्रत्येक भयानक संकटातून वाचत राहतो .. एकदा तर त्याच्या जॅग्वारमध्ये बॉम्ब लावतात... जॅग्वार त्यात पूर्णपणे नष्ट होते पण मिलर मात्र वाचतो ... शेवटी तरी तो भयानक जखमी होतो .. मोसादचा गुप्तहेर त्याला वाचवतो ... फ्रँकफर्टमधल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा चार पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध येते तेव्हा तो गुप्तहेर बाजूलाच असतो .... तो त्याचा हात हातात घेतो ... मिलर त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून विचारतो... मी तुला ओळखलं नाही ... तो मिश्किलपणे हसत म्हणतो ... मी मात्र तुला उत्तम ओळखतो ... तो खाली वाकतो आणि त्याच्या कानात हळू म्हणतो ... ऐक मिलर ... तू हौशी पत्रकार आहेस .... अशा पोचलेल्या लोकांच्या मागे लागणं तुझं काम नाहीये ... तू या क्षेत्रात पकलेला नाहीयेस ... तू खूप नशीबवान आहेस .. म्हणून वाचलास ... टौबरची डायरी माझ्याकडे ... म्हणजे मोसाद कडे सुरक्षित आहे .. ती मी घेऊन आता इझ्रायलला जाणार आहे ..... तुझ्या खिशात मला सैन्यातल्या एका कॅप्टनचा फोटो मिळालाय .. तो कोण आहे ? तुझे बाबा आहेत का? मिलर मान डोलावून होय म्हणतो .. मग तो गुप्तहेर म्हणतो ... आता आम्हाला कळतंय की तू जीवावर उदार होऊन एड़ुयार्ड रॉस्चमनच्या एवढ्या मागे का लागलास ... तुझे बाबा जर्मन असूनही रॉस्चमनमुळे त्यांना जीव गमवावा लागला होता .... मग तो गुप्तहेर विचारतो ... की तुला मिळालेली ओडेसा फाइल कुठे आहे? मिलर त्याला ती पोस्टाने कुणाला पाठवली ते सांगतो ... जोसेफ ... तो गुप्तहेर मान डोलावतो .... मिलर त्याला विचारतो ... माझी जग्वार कुठे आहे ... जोसेफ त्याला सांगतो की त्यांनी तुला मारण्यासाठी त्यात महाशक्तिशाली बॉम्ब ठेवला होता ... त्यात ती पूर्णपणे जळली ... कारची बॉडी न ओळखण्यासारखी आहे ...... जर्मन पोलीस ती कोणाची आहे, हे शोधणार नाहीयेत .. तशी व्यवस्था केली गेल्येय ... असो ... माझ्याकडून एक छोटासा सल्ला ऐक ... तुझी गर्लफ्रेंड सिगी ... फार सुंदर आणि चांगली आहे ...हॅम्बर्गला परत जा .. तिच्याशी लग्न कर .... तुझ्या जॅग्वारच्या insurance साठी अर्ज कर .. तीही व्यवस्था केली गेल्येय .. तुझ्या गाडीचे सगळे पैसे तुला ते परत देतील ...जग्वार परत घेऊ नकोस .... त्या सुंदर कारमुळेच नेहेमीच तुझा ठावठिकाणा त्यांना लागत होता ... आता मात्र तू साधी अशी Volkswagen घे ... आणि शेवटचं ... तुझी गुन्हेगारी पत्रकारिता चालू ठेव ... आमच्या या क्षेत्रात परत डोकावू नकोस ... परत जिवंत राहण्याची अशी संधी मिळणार नाही .... त्याच वेळी त्याचा फोन वाजतो ... सिगी असते ... फोन वर एकाच वेळी ती रडत असते आणि आनंदाने हसत देखील ... थोडया वेळाने परत एक फोन येतो ... Hoffmannचा ... त्याच्या संपादकाचा .... अरे आहेस कुठे ... बरेच दिवसात तुझी स्टोरी आली नाहीये .. मिलर त्याला सांगतो .. नक्की देतो ... पुढच्या आठवडयात ... इकडे तो गुप्तहेर ... जोसेफ ... तेल अव्हीवच्या लॉड विमानतळावर उतरतो ... अर्थात त्याला न्यायला मोसादची गाडी आलेली असते ... तो त्याच्या कमांडरला सगळी गोष्ट सांगतो ... मिलर वाचल्याचं आणि बॉम्ब बनवण्याची ती फॅक्टरी नष्ट केल्याचं देखील सांगतो ... कमांडर त्याचा खांदा थोपटून म्हणतो .. वेल डन ..... ! पुस्तक जरूर वाचा... भाषा खूप सोपी आणि सहज समजणारी आहे .... जगातलं एक नामांकित आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेलं पुस्तक आहे ... ...Read more

BAAJIND
BAAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
Pramod Pujari

टकमक टोक म्हणजे फितुर,अन्यायी लोकांसाठी शेवटची शिक्षा,हे आपल्याला माहीत आहेच पण या टोकावरुन फेकली जाणारी लोकं खोल दरीत पडत कितीतरी हजारो फुट,तळाला. आणि पै.गणेश मानुगडे सुद्धा आपल्याला एका कल्पनेच्या तळालाच घेऊन जातात,एखाद्या भोवर्यात अडकावं आणि अतीवगानं तळाशी जावं तशीच ही कादंबरी तितक्याच वेगाने जाते, `बाजिंद.` टकमक टोकावरुन ढकलुन दिलेल्या लोकांची प्रेतं धनगरवाडीच्या शेजारी येऊन पडत,ती प्रेतं खाण्यासाठी आजु-बाजूचे वन्यजीव तिथे येत आणि धनगरवाडीवरही हल्ला करत,याच गोष्टीला वैतागुन गावातली काही मंडळी सखाराम आणि त्याचे तीन साथीदार या समस्येचं निवारण काढण्यासाठी रायगडाकडे महाराजांच्या भेटीच्या हुतुने प्रस्थान करतात आणि कादंबरी इथुन वेग पकडते ती शेवटच्या पानावरच वेगवान प्रवास संपतो, या कादंबरीत `प्रवास` हा नायक आहे,किती पात्रांचा प्रवास लेखकांनी मांडलाय आणि १५८ पानाच्या कादंबरीत हे त्यांनी कसं सामावुन घेतलं हे त्यांनाच ठाऊक. एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहील्यावर अंगात स्फुरण चढतं,अस्वस्थ व्हायला होतं तसंच काहीसं `बाजिंद` ने एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण अंगात चढतं, मनापासुन सांगायचं झालं तर बहीर्जी नाईक यांच्याबद्दल जास्त माहीती नव्हती,कारण आम्ही इतिहास जास्त वाचलेला नाहीये,ठळक-ठळक घटना फक्त ठाऊक आहेत, फारतर फार `रायगडाला जेंव्हा जाग येते` हे नाटक वाचलंय,इतिहास म्हणुन एवढंच. पण अधिक माहीती या पुस्तकानं दिली, कथा जरी काल्पनिक असली तरी सत्याला बरोबर घेऊन जाणारी आहे, अगदी उत्कंठावर्धक,गुढ,रहस्य,रोमांचकारी अश्या भावनांचा संगम असलेली बाजिंद एकदा वाचलीच पाहीजे. धन्यवाद मेहता पब्लीकेशन्सचे सर्वेसर्वा Anil Mehta सर आणि बाजिंद चे लेखक गणेश मानुगडे सर तुम्ही मला हे पुस्तक भेट दिलंत त्याबद्दल आभार आणि हे भेट नेहमी हृदयाजवळ राहील, कारण भेटीत पुस्तक आलं की भेट देणार्याला नेहमी भेटावसं वाटत राहतं, बाकी तुमच्या सहवासात घुटमळत राहीन आणि तुमचं लिखान वाचुन स्थिर होण्याचा प्रयत्न करीन... -प्रमोद पुजारी ...Read more