* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A GLANCE AT THE FEMALE CHARACTERS IN MAHABHARATA IS ENOUGH TO POINT OUT THE HERO OF THE EPIC. ALL THESE MOTHERS HAVE UNDERGONE SUCH EMOTIONAL TRAUMA, OVER AND OVER AGAIN, MAHARISHI VYAS ALSO COULD NOT GIVE JUSTICE TO THEIR SUFFERINGS. NO ONE ELSE HAS SUCCEEDED IN DESCRIBING THEIR UNIQUENESS AS A SEPARATE PERSONALITY. ON THE CONTRARY; HARDLY ANYONE HAS TRIED TO SKETCH THEIR JOURNEY. ALL THESE FEMALES OF MAHABHARATA CAST A SPELL ON US; THEY HAVE THE POWER TO HYPNOTIZE US. THEY LEAVE US SPELLBOUND. ONCE THIS SPELL IS BROKEN THEN THE FIRST IMPRESSION IT LEAVES ON US IS ABOUT ALL THESE MOTHERS. THERE SHOULD BE NO SECOND OPINION ABOUT WHO IS THE MAIN CHARACTER OF MAHABHARATA! WITHOUT ANY DOUBT IT GOES TO THOSE MOTHERS, AND THEIR MOTHERHOOD.
महाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच ‘महाभारताच्या नायकपदी कोण’ हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही; असे जरी म्हटले नाही तरी ह्या मातांच्या अनोख्या स्थानाचे अलगपणे, एका विशिष्ट दिशेने दर्शन घेण्याचे फारच कमी प्रयास झाले आहेत हे नक्की. महाभारतातील ह्या स्त्रियांकडे पाहून आपण मोहित होतो एवढेच नव्हे तर थक्क, स्तिमित होतो. ही स्तंभित अवस्था ओसरल्यावर पहिलीच संवेदना उमटते अरे! महाभारताच्या नायकपदी स्थापित करायचेच असेल, तर दुसया तिसया कुणाला नाही ह्या मातांना, त्यांच्या मातृत्वालाच ते स्थान दिले पाहिजे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #ANKRAHITSHUNYANCHIBERIJ #RAMAYANATILPATRAVANDANA #ANJANINARAVANE #SUSHMAKAROGAL
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    मला भावलेले पुस्तक महाभारतातील पितृवंदना ! महाभारतातील मातृवंदना ! लेखक :--,दिनकर जोशीं मराठी अनुवाद :-- सुषमा शाळिग्राम रामायण ,महाभारत हे आपले आद्य,पुरातन,पूज्य महान ग्रंथ,अक्षर व अक्षय असे वाङमय ! लहानपण ते किशोर अवस्थे र्यंत त्यातील गोष्टी, कथा मनावर संस्कार कर तात,मनाचे मनोरंजन करतात. वाढत्या वयाबरोबर बुद्धी प्रगल्भ झाल्यावर मात्र या अभि जात साहित्यकृतीत गूढार्थ, विषयाची व्यापकता,मानवी जीवनातील भावभावनां या सगळ्यांचे उत्कट,समग्र,सर्वां गीण असे दर्शन घडते कृष्ण द्वैपायन महर्षी व्यास मुनींच्या सर्वस्पर्शी,ओजस्वी व त्रिकालापलीकडचा वेध घेणाऱ्या दिव्य,अद्वितीय लेखणीतून महा भारताचा विशाल पट मांडला गेला आहे. अनेक विचारवंत,ज्ञानमहर्षी, सारस्वतानी आपापल्यापरीने महाभारताचा व्यासांना अभि प्रेत असलेला अर्थ उलगडून दाखवतांना दर्जेदार ग्रंथांची पुस्तकांची निर्मिती केली आहे सुप्रसिद्ध गुजराथी लेखक दिनकर जोशी यांनी गुजराती त लिहिलेलीव सुषमा शाळी ग्राम यांनी मराठीत अनुवाद केलेली" महाभारतातील मातृवंदना व महाभारतातील पितृवंदना ही दोन वेगवेगळी पुस्तक माझ्या वाचनात आली आणि आपण महाभार तावर काहीतरी खूप वेगळे वाचल्याचा अनुभव आला, महाभारतातील व्यासनिर्मित स्त्री पुरुष पात्रांच्या स्वभावाचे मनोविश्लेषण लेखकाने किती खुबीने केले आहे याची प्रचिती ही दोन वेग वेगळी पुस्तके वाच ताना आली.वाचनानंद आला पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रस्तावनेत लेखकाने खूप सुंदर वैचारिक प्रकट चिंतन करून वाचकाला अंतर्मुख केले आहे. त्यात महाभारताचा खरा नाय क कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.भीष्म,द्रोण,कौरव पांडव हे सारे नायकपदी त्याच्यातील त्रुटी,वैगुण्या मुळे बसू शकत नाही .कारण पुत्रा ला अवैधरित्या जन्म देऊन त्यांचे संगोपनाची जबाबदारी स्वपत्नीवर टाकून ते नामनिराळे झाले आहेत.त्यामुलांचे संगोपन करताना या स्त्रीयांनी खूप कष्ट घेतले.परिस्थितीशी संघर्ष केला सत्यवती,गांधारी,कुंती,उत्तरा यांनी ही अग्निपरीक्षा दिली तरी त्या दुर्भागी ठरल्या!महाभारता च्या नायिका त्या नायिका शोभ ल्या असत्या परंतु त्यांच्यातील काही त्रुटींमुळे त्या होउ शकल्या नाही किंवा आपण नेमकी तशी भूमिका घेउ शकत नाही. महाभारतातील मातृवंदनेत गंगा सात्यकी,,कुंती,गांधारी, अशा स्रियांची व पितृवंदनेत श्रीकृष्ण,भीष्म धर्म,अर्जुन,द्रोणाचार्य,दुर्योधन कर्ण, शकुनी या पुरुषांची नियतीने रचलेली अदभुत, रोमहर्षक अशी जीवनगाथा आहे ,शूरवीर, महान योद्धे असूनही अहंकार,मोह,लोभ, द्वेष,असूया,वैर यासारख्या षडरिपुनी व्यक्ती तसेच समिष्टी ग्रासली असेल तर त्याची परिणीती कुलविनाशात ,समाज विनाशत कशी होते हेच महाभार कार दाखवून देतात.ही मातृ पितृ वंदना त्यातील स्त्री पुरुष पात्रांच्या स्वभावातील विविध पैलूंचे दर्शन घडविते ! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    महाभारत हा एक न संपणारा विषय आहे. गेल्या पाच हजार वर्षात त्याचा अभ्यास ऋषिमुनींपासून सामान्य वाचकांच्या संगणकयुगीन प्रतिक्रियांपर्यंत हजारो पुस्तकांद्वारे जगापुढे आला आहे. येत आहे. देव माणूस राक्षस या वृत्तीभोवती फिरणाऱ्या घटना जुन्या कधी होतच नाहीत. त्यातही वैदिक, पौराणिक, अर्वाचीन आणि आधुनिक स्त्रियांचे चरित्रचित्रण हे जेवढे शोकात्म दिसते, तेवढे इतरत्र कुठे असेल असे वाटत नाही. सत्यवती, गंगा, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, हिडिंबा, उलुपी आणि चित्रागंदा यांच्या ‘मायाममते’चा अभ्यास करून गुजराती साहित्यातील आदरणीय नाव दिनकर जोशी यांनी ‘महाभारतातील मातृवंदना’ ही लेखमाला ‘चित्रलेखा’साठी लिहिली. ती तुफान गाजली आणि पुस्तकरूपाने आता वाचकांच्या भेटीस आली आहे. रामायण हे राम आणि सीता यांच्याभोवती फिरते. परंतु महाभारत तसे नाही अनेक पात्रांचे ते मायाजाल आहे. शब्दाचे अरण्य आहे. त्यात हवी ती फुले, फळ, पाने मिळतात. सत्यवती ही सर्वात वरिष्ठ कोळ्याची मुलगी. तिचा जन्म एका माशाच्या पोटी झाला होता असाही पौराणिक दाखला आहे. तिचा पराशरमुनींशी संबंध आला. व्यासांना तिने जन्म दिला. योजनागंधाची ती सत्यवती झाली शांतनूशी तिचे लग्न झाले. त्याला पुढे गंगा भेटते. तिच्यापासून भीष्म जन्मतो. गंगा जाते. परत येत नाही. येते ती अगदी भीष्माच्या अंतकाळी. कुंती ही राजघराण्यातील असून तिच्या जन्मापूर्वीच तिची शोकांतिका कशी सुरू झाली, गांधारी डोळस असून अंधपण का स्वीकारले, सर्वगुणसंपन्न, लावण्यसुंदरी द्रौपदी मूर्तिमंत वेदना ठरली, ती का? कृष्णाची बहीण असूनही सुभद्रा दुर्दैवी का ठरली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात आणि वाचकांस समाधान देतात. ...Read more

  • Rating Starआकाशाचार्य रमाकांत देशपांडे

    महाभारतामध्ये व्यक्तिरेखांची एवढी गर्दी असताना योग्य संदर्भानं वाचताना आपल्या व्यक्तिचित्रणानं मनात कोणताही गोंधळ निर्माण होत नाही. हे मुद्दाम नमूद करावसं वाटतं. लेखनापेक्षा भाषांतर करणं अधिक अवघड असतं. आपण एवढ्या ओघवत्या भाषेत हे लेखन केलं आहे, की े भाषांतर आहे, असे वाटत नाही. हेच आपल्या लेखनाचं फार मोठं यश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more