* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VANHI TO CHETAVAVA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664638
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KHANDEKAR WAS A LITTERATEUR WITH MASTER OVER MANY STYLES. HE WAS ALSO FAMOUS FOR HIS PROFOUND WRITING SKILLS. HE DID NOT WRITE WITH THE SHEER PURPOSE OF ENTERTAINMENT. FOR HIM, A THOUGHTFUL CONSIDERATION WITH A CONCERN FOR THE SOCIETY WAS MORE IMPORTANT. HE STROVE FOR A MODERN SOCIETY. HIS ARTICLES BASED ON HIS OBSERVATIONS OF THE SOCIETY HELD A DEEP KNOWLEDGE WHICH STANDS TO BE TRUE TODAY AS WELL. IT WAS HIS DREAM TO BUILD A COUNTRY BASED ON GANDHISM WHICH WOULD FURTHER ALLOW ALL TO LIVE ON EQUAL GROUNDS. HE WISHED TO ACHIEVE A STRONG FOUNDATION BASED ON SCIENCE, EQUALITY, DIGNITY TO LABOUR, LOVE FOR OUR COUNTRY AND PURITY OF HEART. HE BELIEVED THAT THE MODERN WOMAN WAS EDUCATED AND PRUDENT. HE IMAGINED THE COMMON MAN TO BE FULL OF VIRTUE AND JUSTICE. HE BELIEVED THAT PEOPLE WOULD BE WILLING TO WORK TO THE FULLEST OF THEIR CONTENT. HE WAS INSISTENT UPON IGNITING MINDS IN ORDER TO ESTABLISH THE NEW INDIA. IT IS IMPERATIVE TO READ AND UNDERSTAND HIS ARTICLES IN ORDER TO GRASP THE DEPTH OF HIS ASPIRATION. ELSE, WE WOULD NOT BE ABLE TO CREATE THE NEW INDIA THAT HE SO WISHED TO ESTABLISH.
वि. स. खांडेकर हे ललित लेखक होते तसेच गंभीर समाजिंचतकही होते. त्यांच्या समग्र साहित्यास समाजिंचतनाची किनार अंगभूत असायची. केवळ रंजक लिहिणं खांडेकरांची वृत्ती नव्हतीच मुळी! विशुद्ध वैचारिक लेखन ते तन्मयतेने करायचे. त्यात नवसमाज निर्मितीचा ध्यास असायचा. त्यांचे समाज चिंतनपर वैचारिक लेख म्हणजे अपरासृष्टीच! गांधीवाद, समाजवादाधारित मानव समाज निर्मिती हे त्यांचं बिलोरी स्वप्न होतं. त्यांच्या कल्पनेतला नवा भारत विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित, श्रमप्रतिष्ठ, स्वदेशभावयुक्त, आंतरिक शुचितेने भारलेला असायचा. नवी स्त्री केवळ शिक्षित नव्हती तर सुजाण होती. सामान्यजन नैतिकता, न्याय व कृतिशीलतेस आसूसलेले ते कल्पायचे. नवा भारत घडवायचा तर निर्मितीचा वन्हि चेतायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. खांडेकरांची ही अपरासृष्टी समजून घ्यायची तर ‘वन्हि तो चेतवावा’तील वैचारिक लेख वाचायलाच हवेत. त्या शिवाय आपण नवा भारत निर्मिणार तरी कसा? नि केव्हा?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #वन्हि तो चेतवावा #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 11-07-2004

    वि.स. खांडेकर हे ललित लेखक होते तसेच गंभीर समाजचिंतकही होते. त्यांच्या समग्र साहित्यास समाजचिंतनाची किनार अंगभूत असायची. केवळ रंजक लिहिणं खांडेकरांची वृत्ती नव्हतीच मुळी! विशुद्ध वैचारिक लेखन ते तन्मयतेने करायचे. त्यात नवसमाज निर्मितीचा ध्यास असायचा.त्यांचे समाज चिंतनपर वैचारिक लेख म्हणजे अपरासृष्टीच! गांधीवाद, समाजवादाधारित मानव समाज निर्मिती हे त्यांचं बिलोरी स्वप्न होतं. त्यांच्या कल्पनेतला नवा भारत विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित, श्रमप्रतिष्ठ, स्वदेशभावयुक्त, आंतरिक शुचितेने भारलेला असायचा. नवी स्त्री केवळ शिक्षित नव्हती तर सुजाण होती. सामान्यजन नैतिकता, न्याय व कृतिशीलतेस आसूसलेले ते कल्पायचे. नवा भारत घडवायचा तर निर्मितीचा वन्हि चेतायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. खांडेकरांची ही अपरासृष्टी समजून घ्यायची तर ‘वन्हि तो चेतवावा’तील वैचारिक लेख वाचायलाच हवेत. त्याशिवाय आपण नवा भारत निर्मिणार तरी कसा? नि केव्हा? ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 29-08-2004

    वैचारिक लेखांची पर्वणी... ‘वन्हि तो चेतवावा’ हे डॉ. सुनीलकुमार लवटे संपादित उल्लेखनीय पुस्तक. प्रस्तुत पुस्तकात साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे समाजचिंतनपर वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. खांडेकरांच्या समग्र साहित्यातून ध्येयवाद जाणवत राहतो. त्यांच्या कल्नेतला नवा भारत विज्ञाननिष्ठा, समतानिष्ठा, श्रमप्रतिष्ठा, स्वदेश प्रेम यावर आधारलेला होताच, पण विशेष म्हणजे त्याला आंतरिक शूचितेचं अधिष्ठान होतं. प्रस्तुत पुस्तकात एकूण तेरा वैचारिक लेख आहेत. या लेखांतून विविध सामाजिक समस्यांवरचे विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. खांडेकर हे स्वप्नदर्शी साहित्यिक होते असं म्हटलं जातं; पण त्यांची स्वप्नं, ध्येयवाद हा मनाच्या तळमळीतून आलेला आंतरिक उमाळा होता. म्हणूनच तो पारदर्शी होता. समाजचिंतन हा त्यांच्या साहित्याचा मूळ गाभा होता. ते जीवनवादी साहित्यिक होते. गांधीवाद व समाजवादाच्या बैठकीवर त्यांचा मूळ पिंड पोसला गेला होता. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातला मूल्यांचा ऱ्हास, औद्योगिककीरणानं भौतिक सुखाची वाढती लालसा, यांत्रिकता, सामान्य माणसाची भावनाशून्यता, चंगळवाद, व्यभिचार या आत्मघाताच्या मार्गाकडे नेणारी भीषण सामाजिक परिस्थिती त्यांच्यासारख्या संवेदनशील चिंतकाला विषण्ण करते. सामान्य माणसापासून नेत्यापर्यंत सर्वांच्याच ढळलेल्या मूल्यहीन आचारविचारांनीही ते निराश झालेले दिसत नाहीत. त्यांचा आशावाद दुर्दम्य आहे. एकीकडे समाजाचं, देशाचं असं दाहक चित्रण करताना दुसरीकडे त्यांनी कल्पनेतली समाजसृष्टी लेखातून मांडण्याचं कार्य सातत्यानं सुरूच ठेवलं होतं. डॉ. भालचंद्र फडके यांनी त्यांच्या या समाजसृष्टीची ‘अपरासृष्टी’ या शब्दात चिकित्सा केली आहे. १९२७ ते १९६८ या चार दशकांतील लेखांतून स्त्रीजीवन, विद्यार्थीदशा, समाजदेश यांची स्थिती, त्याची चिकित्सा, कायदेविषयक मतं अशा विविध विषयांवर विचार व्यक्त केले आहेत. ‘वन्हि तो’ या लेखात प्रामुख्याने स्त्रीजीवन, विद्यार्थीदशा, समाजमूल्ये हे विषय आहेत. ‘कायदा म्हणजे काव्य नव्हे’ या लेखात वेश्याबंदीसारख्या उपेक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर विचार व्यक्त करताना ते म्हणतात, ‘स्त्री-पुरुष संबंधाविषयीच्या नीतीच्या आपल्या कल्पना आदर्श व काटेकोर झाल्या आहेत. मोठमोठी माणसेही ज्या भुका आवरू शकली नाहीत त्या तृप्त करण्याची संधी न मिळाल्यामुळेच ही माणसे वाममार्गाला लागतात. याबाबतीत त्यांची भूमिका शिक्षकांची, सुधारकांची, समाजचिंतकांची होती.’ ‘स्त्री विकास’ या जिव्हाळ्याच्या विषयावर रूळ बदलले पण या लेखात १९२० पासूनचा आढावा ते घेतात. स्त्रीशिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्रीशिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्रीजीवन व तिचा विकास यांची सखोल मीमांसा करतात. शिक्षणानं स्त्रीजीवनात झालेलं परिवर्तन, कारणे मांडताना पाश्चात्त्य लेखकाच्या या संदर्भातील विचाराचा आढावाही घेतात. ‘नवी सामाजिक मूल्ये’ या लेखात बदलती सामाजिक विषमता दूर करायची असेल तर बुद्धी, भावना, कायदा या साऱ्यांचा समतोल असावा तरच ही सामाजिक जडता नष्ट होऊ शकेल. नवी विद्या, नवे विज्ञान घेऊन आलेल्या इंग्रजी राजवटीने वैयक्तिक नीतिमत्तेच्या भारतीय जीवनाच्या गाभ्यावर जोरदार आघात केला. सामाजिक मनाची वैचारिक व भावनिक पोकळी व तिच्यापोटी निर्माण झालेला वैफल्यवाद हे आजच्या आपल्या समाजाचं खरं दुखणं आहे. सर्व जुन्या श्रद्धा गेल्या, पण त्याची जागा घेणाऱ्या नव्या श्रद्धा निर्माण करण्याच्या कामी आम्ही अपयशी ठरलो आहोत, हे त्यांचं भाष्य कटू वास्तव स्वीकारायला भाग पाडतं. व्यक्ती, समाज, राष्ट्र, मानवता या सर्वांच्याच बाबतीत सत्य व अर्थगर्भ ठरणाऱ्या केशवसुतांनी दिलेल्या संदेशाचं स्मरण ते करून देतात आणि नव्या भारताच्या निर्मितीचं स्वप्न सुजाण नागरिकांना दर्शवतात. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-08-2004

    प्रस्तुत पुस्तकात स्त्री-जीवन, विद्यार्थिदशा, समाजमूल्ये, बुद्धी व भावनांचे द्वंद्व इत्यादी विषयांशी निगडित वैचारिक लेख आहेत. या ग्रंथातील प्रत्येक लेखामागे विशेष असे प्रसंग, घटना आहेत. या लेखांना एक प्रतिक्रियात्मक असं रूप आहे. यामुळेच त्यांच्या समगर साहित्यास असलेल्या समाजचिंतनाच्या किनारीचे वाचकाला प्रत्यंतर येते. नवा भारत घडवायचा तर निर्मितीचा वन्ही चेतवायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. खांडेकरांची ही अपरासृष्टी समजून घ्यायची तर प्रस्तुत पुस्तकातील वैचारिक लेख वाचायलाच हवेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more