VASUDHA PAWAR

About Author


MRS. VASUDHA PAWAR DID M. FROM SHIVAJI UNIVERSITY. A. (MARATHI) AND M. A. - (HISTORY) TWO SUCH TITLES HAVE BEEN EDITED. WELL-KNOWN HISTORY-RESEARCHER OF MAHARASHTRA DR. SHE IS THE CONVENIENT WIFE OF JAISINGRAO PAWAR. DR. HAVING PARTICIPATED IN MANY HISTORY CONFERENCES WITH PAWAR, HE HAS PRESENTED MANY RESEARCH PAPERS ON THE PLATFORMS OF THE CONFERENCES.

सौ. वसुधा पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून एम. ए. (मराठी) आणि एम. ए. - (इतिहास) अशा दोन पदव्या संपादित केल्या आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. डॉ. पवार यांच्याबरोबर अनेक इतिहास परिषदामध्ये सहभागी होऊन त्यांनी परिषदांच्या व्यासपीठांवर अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. प्रस्तुत लेखसंग्रहात त्यांच्या अशा प्रकारच्या काही शोधनिबंधांचा समावेश आहे. सौ. पवार यांच्या या लेखांतून राजर्षी शाहू छत्रपतींच्या बहुविध लोककल्याणकारी धोरणांवर प्रकाश टाकला गेला आहे. तत्कालीन शेकडो हिंदी संस्थानिकांपैकी फक्त शाहू छत्रपतींनाच लोकांनी राजर्षी ही पदवी का बहाल केली, याचे रहस्य लेखिकेने उलगडून दाखविले आहे. सौ. पवार यांचा गेल्या शतकातील थोर समाजसुधारक दिनकरराव शिंदे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा स्मृतिग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. यापूर्वी समाजशिक्षण माले - तून त्यांनी स्वातंत्र्यसौदामिनी महाराणी ताराबाई यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. याशिवाय क्रांतिसिंह नाना पाटील या ग्रंथाला संपादन-साहाय्य केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
RAJARSHI SHAHU CHATRAPATI : EK ABHYAS Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more