BIBHUTIBHUSHAN BANERJEE

About Author

Birth Date : 12/09/1894
Death Date : 01/11/1950


BIBHUTIBHUSHAN BANDYOPADHYAY WAS AN INDIAN BENGALI AUTHOR, AND ONE OF THE LEADING WRITERS OF MODERN BENGALI LITERATURE. HIS BEST KNOWN WORK IS THE AUTOBIOGRAPHICAL NOVEL, PATHER PANCHALI (THE SONG OF THE ROAD). HE WAS POSTHUMOUSLY AWARDED THE RABINDRA PURASKAR IN 1951, THE MOST PRESTIGIOUS LITERARY AWARD IN WEST BENGAL, FOR HIS NOVEL ICHHAMATI.

बिभूतीभूषण बॅनर्जी हे बंगाली साहित्यातील अग्रणी नाव. त्यांचा जन्म पशम बंगाल येथील मूर्तिपूर येथे झाला. ब्रिटिशकालीन भारतातील कोलकत्त्यातील नावाजलेल्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयातून (तत्कालीन रिपॉन महाविद्यालय) त्यांनी इतिहास,अर्थशास्त्र आणि संस्कृतमधील पदवी शिक्षण घेतले. चरितार्थासाठी त्यांना पदव्युत्तर शिक्षण सोडून जंगिपारा येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारावी लागली. शैक्षणिक सेवा बजावत असतानाच त्यांनी लेखनाची कास धरली. 1921 साली त्यांची पहिली कथा ‘उपेक्षिता’ प्रसिद्ध झाली. पण 1928 साली प्रकाशित झालल्या ‘पाथेर पांचाली’ कादंबरीने त्यांना भारतीय साहित्यात महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं. याच मालिकेतील त्यांची पुढील कादंबरी ‘अपराजिता’ ही विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली. या दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित आणि सत्यजित रे दिग्दर्शित ‘अपूर संसार’ या सिनेमाने कादंबरीच्या नायकाला नवी ओळख दिली. बिभूतीभूषण बॅनर्जी यांनी विपूल कादंबरी लेखन केलं. ज्यातील अनेक कादंबऱ्या रूपांतरणाच्या माध्यमातून सिनेमाच्या पडद्यावर झळकल्या. 1951 साली त्यांना पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेच्या ‘रबिंद्र पुरस्कारा’ने (मरणोत्तर) गौरवण्यात आलं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PATHER PANCHALI Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more