* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668193
  • Edition : 2
  • Publishing Year : 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARATHI LITERARY LEGEND V.S.KHANDEKAR HAD PLANNED TO WRITE HIS AUTOBIOGRAPHY IN THREE PARTS. HE WROTE HIS FIRST AUTOBIOGRAPHICAL STORY FROM BIRTH TILL MARRIAGE IN THE BOOK ‘EKA PANACHI KAHANI’ WHICH WAS PUBLISHED IN 1981. KHANDEKAR COULD ONLY PENNED THREE DECADES OF HIS LIFE. AFTER THAT AUTHOR SUNILKUMAR LAWATE TOOK THE TASK IN HIS HAND. LAWATE EDITED KHANDEKAR’S AUTOBIOGRAPHICAL ESSAYS . ‘PAHILI PAVALA’ IS THE FIRST PART OF THOSE ESSAYS. THIS BOOK DESCRIBES V.S.KHANDEKAR’S EARLY LITERARY LIFE.
हा आहे तसा लेखसंग्रह; पण संपादकाच्या कौशल्यामुळे त्यास साहित्यिक आत्मकथनाच रूप आलय! मराठी सारस्वतातल हे पहिल साहित्यिक आत्मचरित्र. यात वि.स.खांडेकरांनी आपण साहित्याकडे आकर्षित का झालो इथपासून ते अनुवादाच्या माध्यामातून आपण भारतीय लेखक कसे झालो, इथंवरचा सारा प्रवास आत्मसंवादाच्या रूपात व्यक्त केलाय.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #पहिली पावलं
Customer Reviews
  • Rating Starलोकमत, कोल्हापूर दि. ३१ मे २०१८

    मानवी जीवनात ‘पहिलं पाऊल’ विशेष महत्त्वाचे असते. सृष्टीनिर्मितीचा नवारंभ ते मानवी जगातल्या गोष्टींना अनेक अर्थांनी महत्त्व आहे. भुईतून अंकुर बाहेर पडणे, झाडाला फांदी फुटणे,फुलांचे उमलणे, पहिला उच्चार, पहिले अक्षर अशा अनेक गोष्टी या दृष्टीने महत्त्ाच्या ठरतात. पहिल्या अविष्कारात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. पहिल्या अविष्कारात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. भविष्यातील घडणींचे भरणपोषण असते. त्यादृष्टीने लेखनातील पहिल्या उर्मीही अशाच आनंददायी, सुफळ असू शकतात. वि.स.खांडेकरांच्या वाङ्मयातील पहिल्या अविष्काराच्या वाटा जाणून घेणं तितकंच कुतूहलजनक आहे. खांडेकरांनी त्यांच्या वाङ्मयाच्या व घडणीच्या अनेक गोष्टी त्यांच्या ‘पहिलं पाऊल’ या आत्मपर लेखनात मांडल्या आहेत. वि.स.खांडेकरांना लेखक म्हणून अफाट लोकप्रियता लाभली. ध्येयवादाचे आणि स्वप्नकांक्षेची चित्रे त्यांनी रेखाटली. मध्यमवर्गीय ध्येयवादी स्वप्नसृष्टीचे जादूगार म्हणून त्यांनी ख्याती लाभली. भारतीय भाषांमध्ये ते पसरले. अशा या लेखकाच्या एवंâदर पहिल्या उर्मी सांगणारा ‘पहिलं पाऊल’ हा लेखसंग्रह आहे. त्यामध्ये खांडेकरांनी आपल्या आयुष्यभरातील कामगिरीच्या वाटा सांगितल्या आहेत. खांडेकरांचे लेखन, वाचन, संपादन व वक्तृत्वातील आरंभकाळातील अविष्कार रूपे सांगितली आहेत. लोकप्रिय ठरलेल्या लेखकाच्या लेखकाची स्वप्नभूमी घडविलेल्या काळाचे कथन त्यात आहे.वाङ्मयाकडे आकर्षित कसे झाले हे सांगत असताना त्यांनी पुंगीवाल्याची लोककथा दिली आहे. पुंगीच्या सुरांमागे जसे उंदीर जातात, तशा आंतरिक उर्मीतून ते वाङ्मयाकडे ओढले गेले. सांगली, पुणे, शिरोडे व कोल्हापूर या स्थळावकाशाला खांडेकरांच्या घडवणुकीत महत्त्व आहे. बालपण सांगलीत गेले. सांगलीतील नाट्यवेडाने त्यांना वेगळ्या स्वप्नसृष्टीत नेले. वाङ्मयातील निर्मळ जगाच्या अस्पष्ट हाका या काळात त्यांना ऐकू येत होत्या. बालपणीच्या अनुभवाचा आयुष्यावर झालेल्या परिणाम प्रभावाच्या नोंदी त्यात आहेत. सामाजिक सुधारणा, पुराणमतवादाबद्दल अधिक्षेप, आगरकर व गडकरयांच्या लेखनाने कलेला संस्कार महत्त्वाचा ठरला. लेखनकला चंद्राप्रमाणे मोहक; पण तिचे चांदणे जीवनाच्या सूर्याप्रमाणे अलगद पडल्याचे ते सांगतात. खांडेकरांच्या आदर्शवादी, ध्येयवादी, भावनाप्रधान विचारदृष्टीच्यादेखील खुणा त्यात आहेत. आईप्रमाणे देखकाची मायाही आंधळी असते, असे ते म्हणतात. पुण्यात विद्यार्थीदशेत केशवसुतांची ‘तुतारी’ ही कविता वाचल्यानंतर त्यांना निरभ्र आकाशात वीज चमकल्याचे भासले. पहिले टीकालेखन, कथालेखन, लघुनिबंध, रुपककथा, नाटक, चित्रपट, कथालेखन, लघुनिबंध, रुपककथा, नाटक, चित्रपट, पटकथा व वक्तृत्वातील मनोगत या लेखनात आहे. सुरवंटाचे फुलपाखरात रुपांतर होण्याच्या काळाचे तसेच खांडेकरांच्या लेखनक्रमातील स्थित्यंतर नोंदी आहेत. शिरोड्यातील चिमुकल्या खेड्यात राहताना गांधींच्या रूपानं तेजःपुंज तारा समाजमनाशी सुसंवाद साधन होता असे त्यांनी म्हटले आहे. कादंबरीकार म्हणून खांडेकरांचे वेगळे असे स्थान आहे. स्वतःच्या कादंबरी रुचीबद्दल खांडेकरांनी विस्तृतपणे माहिती दिली आहे. कृष्णाकाठची काळी कुळकुळीत वांगी, लुसलुशीत कणसे आणि अवतीभोवतीची रसपूर्ण नाटके व भरमसाट वाचन यातून वाचनाचे स्रोत पसरविले. बालपणीच हरिभाऊ आपटे यांच्या ठिकाणी असणाNया निराळ्या शक्तीची जाणीव झाली. ह.ना. आपटे यांच्या ऐतिहासिक व सामाजिक कादंबNयांनी मन उत्कंठीत आणि प्रज्वलित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘मी त्यांच्या कादंबNयांचा दोस्त झालो’ असे म्हटले आहे. ‘उषःकाल’ ही कादंबरी त्यांनी रात्रभर जागून वाचून काढली. पहिली कादंबरी लिहित असताना ‘आतल्या उमाळ्यापेक्षा बाह्य परिस्थितीच अधिक कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कलाकृती ही नदीसारखी असते. तसेच लेखन आणि वाचन ही जुळी भांवडे आहेत, अशी वाक्ये या लेखनात ठिकठिकाणी आहेत. स्थळावकाश, वैचारिक, वाङ्मयीन जडणघडण, पहिले लेखनाविष्कार यांचा संबंध दर्शविणारे अतिशय प्रांजळ असे हे आत्मनिवेदनपर लेखन आहे. खांडेकर व्यक्ती आणि लेखक, तसेच त्या काळातील मराठी वाङ्मय समजून घ्यायलाही ‘पहिलं पावलें’ महत्त्वाची ठरतात. एका लेखकाच्या निर्मितीच्या या सृजनवाटा ‘पहिलं पाऊल’ मध्ये आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 15-07-2007

    खांडेकरांची पहिली पावलं... ज्ञानपीठाचे मानकरी वि. स. खांडेकर यांनी विपुल लेखन केले. काव्य, टीका, कादंबरी, कथा, लघुनिबंध, नाट्यलेखन, रूपककथा, पटकथा, अनुवाद अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात त्यांनी स्वैर संचार केला. या प्रत्येक प्रकारातील आरंभीची त्यांच वाटचाल कशी सुरू झाली याबद्दल वाचकांना कुतूहल असते. खांडेकरांनी त्याबद्दल ‘पहिली पावलं’ नावानं एक आत्मकथन लिहिण्याचा संकल्प सोडला होता. परंतु तो काही पूर्ण झाला नाही. ‘एका पानाची कहाणी’ हे त्यांचे आत्मकथन १९८१ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात १८९८ ते १९२९ पर्यंतचा तीस वर्षांचा कालखंड, आला आहे. त्याशिवाय ‘सशाचे सिंहावलोकन’ असाही एका आत्मवृत्ताचा खंड त्यांना लिहायचा होता. त्यांचे एक निष्ठावंत अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यांच्या लेखनाचा अपूर्ण राहिलेला हा भाग पूर्ण करण्याचे मनावर घेतले आहे. खांडेकरांनी ‘पहिली पावलं’ आणि ‘सशाचे सिंहावलोकन असे स्वतंत्र लेखन केलेले नसले तरी या शीर्षकांना साजेल असे लेखनसंदर्भ तयांच्या प्रकाशित साहित्यात विखुरलेले आहेत. ते सर्व संकलित करून पुस्तरूपाने प्रसिद्ध करण्याचा डॉ. लवटे यांचा प्रयत्न आहे. ‘पहिली पावलं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने त्यातील एक भाग वाचकांना उपलब्ध होत आहे. हे एका अर्थाने स्फुट लेखांच्या रूपातील खांडेकरांचे वाङ्मयीन आत्मकथन आहे असे त्यांना वाटते. मराठी साहित्यिक आत्मकथनाच्या प्रांतातीलही हे पहिले पाऊल असावे, असे डॉ. लवटे यांना वाटते. खांडेकरांची पुस्तके वाचत असताना आणि अप्रकाशित कागदपत्रे बघत असताना विशिष्ट वाङ्मयप्रकारातील आरंभीच्या लेखनाबद्दलचे जे उतारे सापडले, ते संकलित करून डॉ. लवटे यांनी पहिली पावलं हे शंभर पृष्ठांचे पुस्तक सिद्ध केले आहे. यात निवडलेल्या उताऱ्यांपैकी मी वाङ्मयाकडे का आकर्षित झालो, मी लेखक कसा झालो? हे दोन पानी उतारे अप्रकाशित आहेत. पटकथा लेखनासंबंधी जया दडकरांच्या प्रश्नांची उत्तरे देणारे टिपणही अप्रकाशित होते. रुपककथांबद्दलचे विवेचन कलिकाच्या प्रस्तावनेतून घेतले आहे. उमेदवारी आणि काव्यलेखन याबद्दलचा मजकूर ‘ते दिवस ती माणसे’ या पुस्तकातून तर लघुनिबंध लेखनाविषयक मजकूर ‘एका पानाची कहाणी’ या पुस्तकातून घेतला आहे. बाकीचे लेख हे वृत्तपत्रातून व मासिकातून आलेले आहेत. एकूण १५ लेख या पुस्तकात आहेत. आपण लेखनाकडे, वाङ्मयाकडे आकृष्ट का झालो याचे उत्तर खांडेकरांनी आत्मप्रतिमेच्या परिपुष्टीसाठी असे दिले आहे. नियती, पूर्वकर्म, विशिष्ट ग्रहांचा प्रभाव वगैरे माझ्या बुद्धीला पटत नाही. लेखनाविषयक माझ्या जन्मजात आकर्षणाचं कारण लेखनात माझ्यातला मी ला काहीतरी मोठं समाधान वाटत असलं पाहिजे. मुरलीवाल्याच्या मागं जाणाऱ्या मुलांप्रमाणं त्यांना आंतरिक ओढ लेखन करण्याला प्रेरक ठरली असावी. माध्यमिक शाळेत व महाविद्यालयात असतानाच लेखक व्हावं, चांगला नामांकित लेखक व्हावं अशा विचित्र महत्त्वाकांक्षेने आपल्याल पछाडले, असे म्हणतात. पालक व शिक्षक यांच्यापैकी कुणातच वाङ्मय प्रेम नव्हते, तरीही मॅट्रिक होईपर्यंत खांडेकरांनी भरपूर वाचन केले. कोल्हटकर, गडकरी हे त्यांचे आदर्श. नाट्यवेड्या सांगलीत त्यांचे बालपण गेले, तेथे नाटककार देवलांच्या अवतीभोवती असणारी गर्दी बघून लेखक या प्राण्याविषयी खांडेकरांच्या मनात विलक्षण भक्तीची भावना निर्माण झाली. नवं जग निर्माण करण्याची लेखकाची शक्ती त्यांना दिव्य भव्य वाटत असावी. काही उताऱ्यांवरून निश्चित काही हाती न लागण्याचीही शक्यता आहे. ‘हृदयाची हाक’ ही कदाचित माझी शेवटचीच कादंबरी म्हणणारे खांडेकर पुढे डझनावर कादंबऱ्या लिहितात तेव्हा लेखकाची विधाने ही त्या वेळेपुरती असतात हेही लक्षात घेणे जरूर असते. खांडेकरांच्या प्रस्तावना, भाषणे, स्वैर चिंतनात्मक लेख, मुलाखती यांचीही दखल घेऊन त्यांच्या लेखनप्रक्रियेचा आणि प्रेरणांचा अधिक खोलात जाऊन अभ्यास व्हायला हवा. अडीच रुपयांच्या कुड्या बायकोला घेणे शक्य व्हावे म्हणून कादंबरी लिहायला घेतली, यासारखी विधाने वाचकांची दिशाभूल करू शकतात. कादंबरीला फक्त अडीच रुपये एवढाच मोबदला मिळाला असाही अर्थ त्यातून निघू शकतो. अशा ठिकाणी स्पष्टीकरणात्मक, वस्तुस्थितीनिदर्शक टीपाही जरूर ठरतात. तरीही विविध वाङ्मयप्रकारामध्ये रस घेणाऱ्या खांडेकरांच्या त्याबद्दलच्या भावनांची थोडीफार कल्पना येण्यासाठी हे संकलन उपयुक्त आहेच. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMNA 13-09-2009

    ललिता बापट युगकर्ते आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर हे साहित्याच्या सर्व प्रांतात आपला ठसा उमटवून राहिलेले थोर सारस्वत! कथा, कादंबरी, लघुनिबंध, रुपक कथा, वैचारिक लेख, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, पटकथा, गीत लेखन, टीका, भाांतर, भाषण, पत्र, प्रस्तावना, पुस्तक परीक्षण, संपादन, मुलाखत अशा वैविध्यपूर्ण लेखनाने नुसते मराठीच नव्हे तर इतर भाषिक चोखंदळ वाचकांना आकर्षित करणारे थोर साहित्यिक! एका पानाची कहाणी; पहिली पावलं, सशाचे सिंहावलोकन अशा तीन आत्मकथनांसाठी त्यांनी व्यक्तिगत टिपणे केलेली होती. त्यांपैकी एका पानाची कहाणी - अर्थात वि.स. खांडेकर यांच्या जन्मापासून विवाहापर्यंतची - अर्थात १८९८ ते १९२९ पर्यंतचा त्यांचा जो तीन दशकांचा जीवनकाल त्यांनी शब्दबद्ध केला होता ते आत्मकथनपर पुस्तक १९८१ मध्ये प्रकाशित झाले आहे. १८९८ ते १९७६ या ७८ वर्षांच्या वि. स. खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या जीवनकालांपैकी उरलेल्या कालासाठीची दोन आत्मकथनपर टिपणांचा धांडोळा घेऊन ही दोन्ही उर्वरित आत्मकथनपर पुस्तके संपादित करण्याचे महत्त्वाचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी पूर्ण करण्याचे ठरवले. त्यापैकी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने अभ्यासू, चोखंदळ आणि युगकत्र्या वि. स. खांडेकर यांच्या साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्यांच्या हाती ‘पहिली पावलं’ हे दुसरे आणि साहित्यातील विविध प्रांतात टाकलेल्या त्यांच्या पहिल्या पावलांचा साद्यंत मागोवा घेणे शक्य व्हावे असे पुस्तक दिले आहे. साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या अगदी साहित्यप्रांतातील उमेदवारीच्या कालखंडापासून ते त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्याचे विविध भाषांमध्ये अनुवाद कसे झाले इथपर्यंतचा मागोवा घेणारे हे ‘पहिली पावलं’ पुस्तक. मी वाड्:मयाकडे का आकर्षित झालो - अर्थात दुरून डोंगर साजरे हा या पहिल्या पावलांमधील पावलांचे ठसे लक्षात आणून देणारा पहिला लेख! वि. स. खांडेकर यांच्या साहित्याविष्कारांच्या संदर्भातील कुतुहलाची पूर्ती करणारे पंधरा लेख या संपादित ‘पहिली पावलं’मध्ये आहेत. मी लेखक कसा झालो. अंतर्मनातलं पूजास्थान तर माझ्या आयुष्याचा माझ्या लेखनावर परिणाम - प्रांजळपणे उलगडून सांगणारा तिसरा लेख सामाजिक सुधारणेचा कैवार चौथा लेख वाचकांना घेऊन जातो या अष्टपैलू लेखकाच्या उमेदवारी कालखंडातील पहिलं पाऊल - अर्थात, रखरखीत उन्हातील वाटचाल कथन करणाऱ्या जीवनानुभवातून! पाचव्या लेखामध्ये पहिलं पाऊल उमगते ते काव्यलेखन - ज्याची ते स्वत:च ट ला ट री ला री अशी गंमत करीत आपल्या या पहिल्या वाहिल्या काव्याच्या प्रांतातील पावलांचा मागोवा घेताना नवनीतमुळे प्राचीन कवितेची गोडी लागली आणि त्यानंतरचा वृत्तबद्ध काव्यलेखन छंद आणि वृत्तदर्पण कालापासून राजकीय चळवळी, सामाजिक सुधारणांच्या नानाविध पडसादातून मनात उमटलेल्या कवितेच्या मनाला आधार झालेल्या गोल्डन ट्रेझरचे दर्शन घडवतात! सहावा लेख - पहिलं पाऊल आहे - टीका लेखन! रसिकता अधिक डोळस व्हावी म्हणून - म्हणत हत्यारासारखी लेखणी चालविता येते या विचारातून चुरचुरीत, खुसखुशीत आणि लेखणीच्या स्वैरलीलांना पूर्ण अवसर देणाऱ्या रंगमंच विहाराबद्दल बोलता बोलता बऱ्याच सखोल अभ्यासाची गवाक्षे उघडून देतात. पहिलं पाऊल, कथालेखन - सुकुमार अर्थगर्भकला पहिलं पाऊल - वकृत्त्व - समाजमनाशी सुसंवाद, पहिलं पाऊल संपादन - तांबड्या मातीतील उठा-बशा या नऊ लेखांमधून वाचकांना आपल्या मिश्किल शैलीने, प्रांजळ कथनाद्वारे वि. स. खांडेकर १९२० ते १९३० च्या दशकात असहकार युगाच्या कालखंडात त्यांच्या वैनतेयमधील मजकुराचा माल पुरवणाऱ्या मदतनीसांच्या भूमिकेच्या रंगातून साहित्यिक आणि पत्रकार या अंशत: भिन्न प्रकृतीधर्माच्या जपणुकीने घेतलेले विविधांगी अनुभवच लक्षात आणून देतात. पहिलं पाऊल - पहिलं पुस्तक (नाटक) - मातृपदाच्या सुखाचा (आणि प्रसववेदनेचाही) लाभ - १९२८ साली सांगलीला रंगभूमीवर सादर झालेले ‘रंकाचे राज्य’ आणि या नाटकाने भाऊसाहेबांना त्यांच्या नाटकात नायिकेचे काम करणाऱ्या कमळाबार्इंविषयी चांगले उद्गार काढणारे पत्र पाठवणारे केशवराव दाते या किश्शापर्यंतचा साहित्याचा या सर्व प्रांतातील मुशाफिरीचा घेतलेला प्रामाणिक लेखाजोखा पुन:पुन्हा वाचण्यासारखाच आहे. रायटर्स आर्ट वर्कसारख्या ललित लेखकांचं अंतरंग आणि लेखन प्रक्रिया - त्या मागील प्रेरणा यांचा मागोवा घेणाऱ्या पाश्चात्य पुस्तकांच्या धर्तीवरील हे पहिलं पाऊल संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादन कुशलतेने अत्यंत माहितीपूर्ण करतानाच वि. स. खांडेकर यांच्या लेखन विशेषांचेच दर्शन घडवणारा हा जीवन तसाच लेखन प्रवास आत्मसंवादाच्या जोडीने मनाला भिडणारा आणि तितकाच गमतीजमतींसह खुलवणारा केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more