* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: A YEAR BY THE SEA
 • Availability : Available
 • Translators : ARUNDHATI CHITALE
 • ISBN : 9789387789036
 • Edition : 1
 • Publishing Year : MARCH 2018
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 136
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
 • Print Books:
"LIFE IS A WORK IN PROGRESS, AS EVER-CHANGING AS A SANDY SHORELINE ALONG THE BEACH. DURING THE YEARS JOAN ANDERSON WAS A LOVING WIFE AND SUPPORTIVE MOTHER, SHE HAD SLOWLY AND UNCONSCIOUSLY REPLACED HER OWN DREAMS WITH THE NEEDS OF HER FAMILY. WITH HER SONS GROWN, HOWEVER, SHE REALIZED THAT THE FAMILY NO LONGER CENTERED ON THE HOME SHE PROVIDED, AND HER RELATIONSHIP WITH HER HUSBAND HAD BECOME STAGNANT. LIKE MANY WOMEN IN HER SITUATION, JOAN REALIZED THAT SHE HAD NEGLECTED TO NURTURE HERSELF AND, WORSE, TO ENVISION FULFILLING GOALS FOR HER FUTURE. AS HER HUSBAND RECEIVED A WONDERFUL JOB OPPORTUNITY OUT-OF-STATE, IT SEEMED THAT THE BEST PART OF HER OWN LIFE WAS FINISHED. SHOCKING BOTH OF THEM, SHE REFUSED TO FOLLOW HIM TO HIS NEW JOB AND DECIDED TO RETREAT TO A FAMILY COTTAGE ON CAPE COD. AT FIRST CASTING ABOUT FOR DIRECTION, JOAN SOON BEGAN TO TAKE PLEASURE IN HER SURROUNDINGS AND CALL ON RESOURCES SHE DIDN`T REALIZE SHE HAD. OVER THE COURSE OF A YEAR, SHE GRADUALLY DISCOVERED THAT HER LIFE AS AN ""UNFINISHED WOMAN"" WAS FULL OF POSSIBILITIES. OUT OF THAT MAGICAL, DIFFICULT, TRANSFORMATIVE YEAR CAME A YEAR BY THE SEA, A RECORD OF HER EXPERIENCES AND A TREASURY OF WISDOM FOR READERS. "
‘अ इयर बाय द सी’ ही कथा आहे लेखिका जोआन आणि तिचा पती यांच्या नात्याची. विरत चाललेलं पती-पत्नीमधील नातं एका अशा वळणावर येतं की, जिथं या नात्याची सांगता होऊ शकेल. त्या वेळी लेखिका जोआन निर्णय घेते तो घटस्फोट न घेता वेगळं राहण्याचा. थोडक्यात, या नात्यात एक ‘ब्रेक’ घेण्याचं ती ठरवते. नवरा नोकरीच्या निमित्तानं वेगळ्या शहरात जाऊन स्थायिक होतो. त्या वेळी जोआन मात्र केपकॉर्ड या आपल्या मूळ गावी राहायला येते. जुन्या आठवणी मनात उजळत असतानाच तिची तिथल्या कोळ्यांशी मैत्री होते. समुद्रकाठी वसलेलं हे गाव निसर्गसौंदर्यानं नटलेलं असतं. स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं ती आपली लेखिका म्हणून असणारी प्रतिष्ठा विसरून ‘क्लॅम्प्स’ पकडण्याचे काम करू लागते. ‘जोआन एरिकसन’ नावाची एक मैत्रीणही तिला याच दरम्यान भेटते. त्या ठिकाणी तिला आपले वेगळं विश्व तयार झालं आहे आणि ते आपलं हक्काचं आहे, असं वाटू लागतं. ती या विश्वात आपलं स्वतंत्र अस्तित्व शोधू लागते. आपल्या दबलेल्या इच्छा- पुन्हा एकवार बालपण जगण्याची तिची ऊर्मी- उफाळून येते. याच दरम्यान ती आपल्या वैवाहिक जीवनाकडे तटस्थपणे बघू लागते. पती-पत्नीच्या नात्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन तिला मिळतो. या वर्षभराच्या ‘ब्रेक’मध्ये तिला अनेक अनुभव येतात. हळूहळू पती-पत्नी दोघांनाही आपण काय हरवलं आहे किंवा आपल्याला नव्यानं काय गवसलं आहे, याचा गांभीर्यानं विचार करू लागतात. एका निर्मनुष्य बेटावर एक रात्र घालवून आपल्या ‘एकटेपणा’तली मजा उपभोगताना तिला आपल्या नवऱ्याविषयी असणाऱ्या भावना समजतात. पती-पत्नीचे काही काळानं गुळगुळीत, यांत्रिक होणारं नातं एखादा ‘ब्रेक’ घेऊन नव्या दमानं सुरू करण्यात असणारी मजा ही कथा सांगते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#निरोप समारंभ#भविष्य# केप कॉर्ड# समुद्र# अनुभव# लेखिका# एकटेपणा# सील# बोट# जोश# लग्न# सहजीवन# जलोपचार# कोळी# खिसमस# जोआन अँडरसन# धुकं# मानसोपचारतज्ज्ञ# मैत्री# ओहोटी# प्रवाह# नीतिमत्ता# क्लॅम्प्स#JOAN ANDERSON# CAPE COD# SEAL# SEA# JOSH# CLAMDIGGER# WATER-THERAPY# BOAT #LOW# TIDE #CRISTMAS# COTTAGE# MARRIAGE# HUSBAND# GUILTY# FISHERMAN# THANKSGIVING# FOGG# DAUGHTER# WRITER# LONELINESS# SANTA CLAUS# FISH-MARKET# CLAMS# CLAMMING#
Customer Reviews
 • Rating StarBhagyashree Abhyankar

  हे पुस्तक *A year by the sea* या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या विलक्षण आत्मकथनात जोआन अँडरसनला एकांतवासात गवसलेला आनंद आणि आत्मज्ञान विषयीचे अनुभव कथन आहे व त्यानंतर जोआन च्या मनात निर्माण झालेली सागरी विश्वाची प्रचंड ओढ अन त्यतून झालेली *स्वत्वाची* जाणीव याचे चित्रण आहे.आत्मकथन समाजासमोर आणतांना ते कधीच अतिरंजित नसतं तर सत्य आणि व्यावहारीकतेचे भान ठेवून मांडलं जातं वैवाहिक जीवनाचा नवा पैलू उलगडणारी ही कथा आपल्याला गुंतवून ठेवते. आयुष्य म्हणजे सतत विकसित होणारी एक प्रक्रिया, आयुष्यात कधी दर्शनीय तर कधी सुप्त असा सतत बदल होत असतो. *समुद्राकाठचे एक वर्ष* या कथेत एका मध्यमवयीन स्त्रीने आयुष्यातील तोचतोपणा कसा घालवला आणि ती पुन्हा एकदा प्रवाही आणि उत्साही कशी झाली हे सांगितले आहे. फक्त कुटुंब आणि कौटुंबिक गरजा याव्यतिरिक्त स्वतःतील स्वतःच्या उत्कर्षासाठी केलेला हा अत्यंत धाडसी आणि विचारी प्रयत्न आहे. जोआन अँडरसन ही साधारण पन्नाशीच्या घरातील लग्नाला वीस वर्ष झालेली गृहिणी, इथे गृहिणी हा शब्द अत्यंत चपखल बसतो कारण घर, संसार, मुलं ,नवरा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना ती स्वतःला हरवून बसलेली आहे. आपल्याला अस्तित्वच नाही काय ही भावना तिला अस्वस्थ करते आणि यातून सुटण्यासाठी म्हणून ती आपल्या गावातल्या छोट्या घरात एकटीने जायचं ठरवते. सप्टेंबर ते सप्टेंबर असे बारा महिने तिला नवीन आयुष्याची ओळख करून देतात या एका वर्षात लेखिका स्वतःच्या आयुष्यात असाधारण अविस्मरणीय बदल घडवून आणते. स्वतःतील सुप्त गुणांची तिला जाणीव होते आणि पूर्ण स्त्रीच्या दृष्टीने तिने केलेली धडपड नकळत वाचकाला ही आदर्श वाटू लागते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही वेळ नेहमीच येत असते. कुटुंबातील सदस्यांच्या सुखात सुख मानणाऱ्या स्त्रीला मनात कुठेतरी एक सल असतो अन हा सल यशाकडे किंवा पूर्णत्वाकडे नेणाऱ्या आनंदात आडकाठी ठरत असतो. वीस वर्षाच्या वैवाहिक वाटचाली नंतर परस्परांमधील नातं थोडसं ताणल्यासारखं वाटल्यामुळे,दांपत्यजीवन कायदेशीर रित्या वेगळं न करता काही काळ वेगळे राहण्याचा निर्णय जोआन घेते .केपकॉर्ड नावाच्या आपल्या जुन्या गावी येऊन, जुन्या घरात राहून स्वतःच्या स्मृतीमध्ये रमते, निसर्गासह अनेक अनुभवातून तिचा स्वत्वाचा प्रवास पूर्ण होतो. हे पुस्तक वाचताना कोणत्याही स्त्रीला ही कथा आपलीच आहे असं वाटतं,हेच या पुस्तकाचे यश.... स्वानुभवाबरोबरच लेखिकेने अनेक मान्यवर व्यक्तींचे विचार मांडून स्वतःच्या लेखनाची उंची वाढवली आहे. माणसाच्या मनात अनेक कोडी असतात ,अनेक अनुत्तरीत प्रश्न ज्यांची उत्तरे कधीच मिळणार नसतात अशा प्रश्नांत अडकून माणूस शांतता हरवून बसतो. एका वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला लेखिकेचा स्वतःचा शोध हा बरोबर 12 महिन्याने संपतो. अत्यंत प्रॅक्टिकल सहचर आणि मोठे होऊन स्वतःच्या विश्वात रमलेली मुले यांच्यापासून दूर होऊन सागराच्या विशालतेकडे बघितल्यावर आपल्या अडचणी आपणच मोठ्या करतो ही जाणीव तिला होते.सागराची भरती- ओहोटी तिला आयुष्याचं गमक शिकवुन जातात,स्वतः मोकळं व्हायचं ठरवते. छोट्याशा गावात तिचं स्त्री असणं आणि अनोळखीपण ती त्या लोकांमध्ये मिसळून दूर करते, स्वतःहून ती मुक्त जगाकडे झेपावते. निर्जन समुद्रकिनारी सुद्धा ती समाधान शोधते मनात पतीच्या आणि मुलांच्या आठवणीही जपते, भूतकाळातील मिळवलेले आनंद आणि त्या आनंदासाठी केलेली तडजोड या दोन्ही गोष्टी आता तिच्या नवीन आयुष्यात नसतात. कारण हे आयुष्य तिचं एकटीचं, तिने स्वतः स्वतःच्या आनंदाचा शोध घेण्यासाठी निवडलेलं असतं. या प्रवासात तिचे सहकर्मचारी, मैत्रीण, निसर्ग तिला खूप काही शिकवून जातात, जगावं कसं हे सांगतात त्यामुळे अनिश्चित भविष्य काळापासून ती सहज दूर होते. अशा या वर्षभराच्या *ब्रेक* मध्ये तिला अनेक अनुभव येतात स्वतःच्या अस्तित्वाची नव्याने जाणे होताना आपल्या वैवाहिक जीवनाकडेही ती तटस्थपणे बघू शकते. कौटुंबिक एकत्रीकरणात ती रमते पण स्वतःचं अस्तित्व राखून....... कुटुंबालाही तिच्यातील वेगळेपणाची जाणीव होते आणि या वर्षभराच्या ब्रेकने आपण काय हरवलंय आणि काय नवीन मिळवलंय याचा गांभीर्याने केलेला विचार तिला यांत्रिक होणारं नातं नव्या दमाने सुरू करण्याची स्फूर्ती देऊन जातो. हे पुस्तक म्हणजे लेखिकेने रेखाटलेली *स्त्री*. नातेसंबंध जपताना स्वतःला विसरणं हेच स्त्रीत्वाचं लक्षण अशी शिकवण घेत मोठी होणारी स्त्री ही खरोखरीच स्वतःचं अस्तित्व विसरून जाते.बरेचदा तिनं स्वतःवर घालून घेतलेली बंधनं ही तिच्या अस्तित्वाभोवती तिनं स्वतः घातलेलं कटघर असतं आणि या कटघरातच आपण कसे सुखी आहोत हे दाखवण्यात तिचं पूर्ण आयुष्य खर्ची पडतं, भावनाहीन अस्तित्व हे खरोखरीच त्रासदायक असत आणि आयुष्य जगण्यासाठी बदल आवश्यक असतात. आपल्याला काय हवाय हे एकदा समजलं की समाधानाच्या परिभाषा बदलत जातात .कारण समाधानी वृत्ती ही मानसिकता असते जी स्वकर्तृत्वाच्या निर्णयाने बदलूही शकते आणि एकदा बदलत्या रूपा नुसार वागता आलं की हवे तिथे हवे ते बदल सहज घडून येतात. बरेचदा भूतकाळ हा यासाठी उत्तम शिक्षक ठरतो. आयुष्याचे रंग काहीही न समजता एकमेकात मिसळले तर स्वातंत्र्य ,भावना,अपेक्षा, सुखदुःख सारं काही समोर येईल तसं स्वीकाराव लागतं मात्र हेच जर समजून-उमजून केलं तर जीवनाचं सुंदर चित्र तयार होतं. पुस्तक वाचताना हा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. स्त्रीच्या आयुष्याचे किंबहुना मनाचे अनेक पदर या पुस्तकाच्या वाचनाने उलगडत जातात आणि विचार प्रगल्भ करीत जातात. प्रत्येक स्त्रीने स्वतःचे गुण ओळखून *स्वत्व* शोधायला हवं, स्वतःला ओळखायला हवं. ही जरी एका स्त्रीची कहाणी असली तरी स्त्री असो वा पुरूष आयुष्याशी तडजोड करीत जगत असतो. ही तडजोड दोन्हीकडून समजून घेणं अपरिहार्य आहे.मात्र पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीचं अस्तित्व फारसं विचारात घेतलं जात नाही.सहजीवन जगताना परस्परांचा आदर करणे थोडक्यात *स्पेस* देणे आवश्यक असतं हेच खरं........ ...Read more

 • Rating StarANIL KAVANEKAR

  समुद्राकाठचे एक वर्ष हे आपले अनुवादित पुस्तक वाचले. आवडले. समुद्रकाठी वसलेल्या निसर्गसंपन्न खेड्यातील जीवनात लेखिकेच्या मनाची कवाडे खुली होतात आणि जीवनाकडे तटस्थपणे पाहण्याचा दृष्टिकोन लाभतो हा विचार खूप महत्वाचा वाटतो.

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.